आपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.
आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443
शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
पात्र परिचय :
माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट
मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?
शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .
आज विशेष
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!
रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न
१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .
माई स्वतःच्या मरणाविषयी बोलते
माई स्वतःच्या मरणाविषयी बोलते तेव्हा एकही जण असं बोलू नको असं तिला म्हणत नाही. काल अभिराम पण गप्प बसला. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग म्हणतात ते असं.
माईंना निलिमाच्या हातची खीर मिळेस्तोवर कावळे दहा वेळा पिल्लं काढतील. पांडू आणि नाथा चंद्रसूर्यासारखे झालेत, एक उगवला की दुसरा मावळतो (जय पुलं!). वकिल कागदपत्रं माझ्याकडे नाहीत म्हणतोय. मग खंय गेली ती?
बाकी नाथा आणि आण्णा ह्यांनी शेवंताचा खून केलाय अशी शंका मला कधीची आहे. एकट्या माणसाला दिवसाढवळ्या एव्हढ्या उंच झाडावर टांगून घेऊन आत्महत्या करता येईल?
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः १.
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
ह्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं सिरियल संपताना दिली नाहीत तर दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता ह्यांच्या डोक्याची शकलं होऊन त्यांच्याच पायावर लोळण घेऊ लागतील.
स्वप्ना, बाकी कुठेही शुकशुकाट
स्वप्ना, बाकी कुठेही शुकशुकाट असू शकतो. पण या धाग्यावर कधीही आलं तरीही एक तरी नवीन पोस्ट असतेच असते.
मी_इंदू, जुन्या धाग्यात
मी_इंदू, जुन्या धाग्यात नव्याची आणि नव्यात जुन्या धाग्याची लिंक देता का? Nidhii, खरं आहे. पण म्हटलं लॉन्ग विकेन्ड येतोय म्हणून शुकशुकाट असेल
मित
मित
आधीचा भाग रात्रीस
आधीचा भाग
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443
रश्मी देविका भारी भाऊकाका
रश्मी देविका भारी
भाऊकाका व्य.चि. भारी नेहेमीप्रमाणे
ह्म जेवनेको क्या गये.. यहा
ह्म जेवनेको क्या गये.. यहा पोस्टी गोळा हो गये!!!
स्वप्ना राज कित्याक ईतके प्रश्न विचारतंस गो? घरात काय चलंलाहा माहीत असा मां?
क्लि
क्लि
स्वप्नाचे प्रश्न भारीयेत, पण
स्वप्नाचे प्रश्न भारीयेत, पण निर्मात्याने उत्तर तर दिले पाहीजे ना.:फिदी: त्या अस्मिताला बोलवा म्हणा, म्हणजे ती म्हणेल शोधल की सापडत.:खोखो:
अस्मिता :- दत्ता, तुम्ही खोट बोलताय. मला असे वाटत की नदीकाठली जमीन तुम्हाला हवीय म्हणून तुम्ही ही सगळी नाटक करताय.
मनाली:- ए दत्ता, बर्या बोलाने खर सान्ग हा, नाहीतर आमच्या मॅडम तुला जेलमध्ये टाकतील.:राग:
सिद्धेश्वरः- ए मनाली गपे, मी आहे ना. तर दत्ता तुम्हीच सान्गा स्वप्ना राज यानी विचारलेल्या प्रश्नाना तुमच्याकडे काय उत्तर आहे? नाहीतर आमच्या मॅडमनी केस हातात घेतलीच आहे.
बन्डुजी :- ओ दत्ताराव, काय त्ये खर बोला हा, आमच्याशी गाठ आहे.
दत्ती:- आवशीक घो तुजो, तुझ्या तोन्डाक शिरा पडल्या, जातय का नाय हिथुन नायतर बघीन घेऊन सगल्याना.
@ रश्मी-
@ रश्मी-

अगो रश्मी तै ठोकळीक विसरलीस
अगो रश्मी तै ठोकळीक विसरलीस !!
ठोकळी - माधव ? अस्मिताला कोणी बोलवलं ईथे? हे डीटेक्टिव्ह वैगरे सगळं थोतांड आहे..मी सायन्टीफिक कारण देईन म्ह्णाले होते ना? मग?
.. आणि पांडू - हं हं हं..
.. आणि पांडू
- हं हं हं.. इलंय.. अस्मिता म्याडम इलंय ... अहं अहं अहं 
अगो ठोकळीक नाय इसरले. ह्यो
अगो ठोकळीक नाय इसरले. ह्यो मामला फक्त अस्मिता आणी दत्ता यान्च्यातच चाललाय ना. आणी ती दत्तावर सन्शय घेते म्हणून दत्ती डाफरते अस्मिताला.
मित पान्डु डोळ्यासमोर आला.
मित
पान्डु डोळ्यासमोर आला.
मित, पांडु भारी
मित, पांडु भारी
मित, पांडु भारी >+१
मित, पांडु भारी >+१
ह्यो मामला फक्त अस्मिता आणी
ह्यो मामला फक्त अस्मिता आणी दत्ता यान्च्यातच चाललाय ना>>>>> ह्म्म्म..ठोकळी खरवस खात बसली असेल
बाद्वे आज शिमग्याचो प्रोग्राम असा... येवा हां नाईकांकडे!!!
आज शिमग्याचो प्रोग्राम असा...
आज शिमग्याचो प्रोग्राम असा... येवा हां
नाईकांकडे!!! >>> नाईकांकडे इतके दिवस शिमगाच सुरू आसा . राजाला कसली दिवाळी अन नाईकांना कसला शिमगा ?
ठोकळी - माधव ? अस्मिताला कोणी
ठोकळी - माधव ? अस्मिताला कोणी बोलवलं ईथे? हे डीटेक्टिव्ह वैगरे सगळं थोतांड आहे..मी सायन्टीफिक कारण देईन म्ह्णाले होते ना? मग?>>>निलीमा होsssहोssहो, अग तिची मदत होईल अस मला आपल वाटलं, तु चीडू नको बघू.....
रश्मी तुझी पोस्ट बघ कशी वाहवत
रश्मी तुझी पोस्ट बघ कशी वाहवत चालली आहे
मन्ग, तिचो धबधबा बनुक चाल्ला
मन्ग, तिचो धबधबा बनुक चाल्ला हा.:खोखो:
माई - अरे त्या अस्मीताक
माई - अरे त्या अस्मीताक कित्याक बोलावलान
पुर्वा - अग आज्जी माधवकाकाला ते योग्य वाटत असेल
अभिराम - ते जाऊदे, माझ्या लग्नाची कोणाला इथे काही पडलेलीच नाहीये, पण मी देवीकाच्या आईवडिलांना सांगीतले आहे लग्नाची तारिख काढायला.
(No subject)
हायला, आत्ता एक शिमग्याची एक
हायला, आत्ता एक शिमग्याची एक झलक पाहीली. लई भीती वाटली रे बाबो!
कधी...कुठे...केव्हा?
कधी...कुठे...केव्हा?
आजच्या भागात दाखवतील बहुतेक.
आजच्या भागात दाखवतील बहुतेक. ते शिमग्याचे सोन्ग घेणारी बाया-मानसे येतात तेव्हा माई सान्गतात की होळी होणार नाही कारण घरात दुखवटा आहे. तेव्हा त्यातले एक सोन्ग घरात जोरात पळत येत, आणी अर्चिसला एकट्यालाच बहुतेक आपला चेहेरा दाखवत. पण कोण असेल माहीत नाही, बहुतेक गणेश तर नसेल्?:अओ:
अरे बापरे
अरे बापरे
झालं , म्हणजे आता स्वप्नाला
झालं , म्हणजे आता स्वप्नाला आणखी एक प्रश्न पडणार -- ११) सोंगाच्या रूपात कोण आलं होतं ??
आता स्वप्नाला आणखी एक प्रश्न
आता स्वप्नाला आणखी एक प्रश्न पडणार -- ११) सोंगाच्या रूपात कोण आलं होतं ??>>>>>>:हहगलो:
Pages