काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आवडले प्रोमो. लेकीन है तो शिव की नौरी वाला डायलॉग तो हिरो क्यूटली कॅरी करतो. लोकेशन वेगळं आहे, आकर्षक वाटला बनारसचा घाट प्रोमोत. प्रत्यक्ष सिरियलीत सेटच असेल जास्त पण तरी निदान मराठी सिरियलींच्या त्या बोरिंग बंगल्यांमधून आणि टिपिकल कुटुंबांमधून बाहेर येऊन ही सिरियल काहीतरी फ्रेश देईल असं वाटतय. बघूया. निदान बघाविशी वाटतेय हे काय कमी.

अग ते वाचलय म्हणुनच हा प्रश्न पडला ना की रुल अगदी हार्ड & फास्ट आहे का की त्यात काही चालुन जाउ शकत? मला मराठी मालिकेत टवका वाटलेले म्हणजे लोकेश गुप्ते, ललित बदाणे सध्यातरी येवढेच आठवतायत.

ओह खरंच असं नाव आहे का? माफ करा मला माहित नव्हतं.. ऐकून खूप हसायला आल मात्र... ललित च्या बदामी डोळ्यांशी काही संबंध असेल म्हणून हे नाव पडलं असं वाटलं...

लौकी बघितली . ती नुसते धूसफुसते तर बाहेर सासुला ऐकायला जातं
आणि तिथे आदू आणि रजनी बाहेर शिरा ताणून धुडगूस घालतात तो केबिनमध्ये गट्टू ला कळतही नाही

बनत नसता तर हिन्दी चित्रपट सृष्टी कशावर तगली असती ???>>> म्हणूनच विचारलं... पण ती गौरी ज्या प्रकारे धुसफुसत असते त्यावरून वाटलं कि तिने गाजरं आणली हलवा बनवण्यासाठी आणि तरी तिला परंपरे प्रमाणे दुधी हलवा बनवायला लावला सासू ने...

प्रभाकर बाबांचं नाव आहे आणि बदाणे आडनाव. >> असं होय. ओके अन्जू. Happy

ललित च्या बदामी डोळ्यांशी काही संबंध असेल म्हणून हे नाव पडलं असं वाटलं... >> हे भारीये. Happy

सासूने हाक मारल्यावर इतकं दचकायचं कशाला?

सोशीक सूनेचा मारा असणार आहे आणि वर चवीला मराठी मुली सोसून युपी नवर्‍याला आपलं करतात.

तसेही मुंबई पुणे युपीला आपलं करतच आहे.

त्यावरून वाटलं कि तिने गाजरं आणली हलवा बनवण्यासाठी आणि तरी तिला परंपरे प्रमाणे दुधी हलवा बनवायला लावला सासू ने... >>>> परंपरा नसेल, घरात गाजराच्या हलव्यापेक्षा दुधी हलवा जास्त आवडत असेल.

पहिला प्रोमो , गौरी आणि गॉरी वर होता , दूसरा गाजर आणि लौकी वर न होता गाजर आणि गाजर ( हा ज जड ) असा असता तर ???

कालचा पण प्रोमो पाहिला. दोघंही क्युट आहेत. आणि ती मुलगी सोशिक वगैरे वाटली नाही. (म्हणजे गोड आहे पण अति मिळमिळीत नाही जान्हवी सारखी.)

नवरा चुकीच्या नावाने हाक मारतो तर त्याला एक छोटुसा फटका मारते कि नावाचा बरोबर उच्चार कर. आणि काल पण दुधी किसताना चांगलीच grumble करत होती. शिवाय नवर्‍याकडे एक रागीट कटाक्ष पण टाकला. अगदीच काही चंपु नसेल.

Pages