काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला " माझिया प्रियाला " मधली जोडी पण आवडायची. आणि तो टयटल ट्रॅक ही +१११११ ... खरय ... अभिजीत आणि म्रुणाल .. मस्त जोडी होति .. घना राधा ने पन कमाल केलि .. आता सुरु असलेल्या पैकी बोलायचे तर .. कोनीच नाही ..... Happy त्यातल्या त्यात .. म्हाळसा बानु मल्हारी can be considered ...

मुक्ता स्वप्नील माझी सदासर्वकाळ आवडती जोडी. मला स्वजो मुक्ताबरोबर असेल तरच आवडतो.
अजूनही ब-याच आवडत्या जोड्या आहेत लिहिन नंतर.

नायक-नायिका एकत्र आवडलेल्यांपैकी.

सुनील बर्वे- अमृता सुभाष (झोका).

राजेश शृंगारपुरे- भार्गवी चिरमुले (भाग्यविधाता, ही सिरियल फार कमी बघितली, जाम बोअर झाले नंतर).

उमेश कामत- उर्मिला कानेटकर (असंभव)

पियुष रानडे- गिरीजा ओक (लज्जा).

सिद्धार्थ चांदेकर- मृण्मयी देशपांडे (अग्नीहोत्र).

सतीश राजवाडे- मुक्ता बर्वे (अग्नीहोत्र).

हरीश दुधाडे- स्वरदा थिगळे (मा म तू झा)

तसंच संदीप कुलकर्णी- मृणाल कुलकर्णी जोडी दोन्ही सिरीयलमध्ये आवडली (अवंतिका, गुंतता हृदय हे).

मला वाटतं 'काहे दिया परदेश' हे नाव नादमयतेसाठी दिले असावे. जी नादमयता वरील नावात आहे ती 'का दिले परगावी' यात नाही.

काहे दिया परदेश' .. मराठी मुलगी अमराठी मुलगा यान्ची प्रेम कथा असावी .. म्हनुन हे नाव .. तो बोलतो त्यावरुन तरी हेच दिसते ..

प्रोमोवरुन ते बनारससारखं वाटतंय, घाट वगैरे. ती नायिका फोनवर म्हणते मुंबईची आठवण येते, म्हणजे बहुतेक मुंबई माहेर आणि सासर युपी असावं.

अंजली प्रोमो दाखवतायेत ह्या आठवड्यात. का रे दुराव्याच्या जागी येतेय.

माझ्या आवडत्या जोड्या
भूषण प्रधान- संस्कृती बालगुडे(पिंजरा)
उमेश कामत- स्पृहा जोशी(एलतिगो)
अभिजित खांडकेकर- मृणाल दुसानिस(माप्रिप्रिक)
अनिकेत विश्वासराव- ऋजुता देशमुख(कळत नकळत)

ऋचा Happy

लोकेश गुप्ते, वादळवाटमध्ये आवडला, नंतर एरवी नाही. माझी लिस्ट खूप मोठी आहे मुगु. मी लिहिलं ना, इथे थांबते असं एका पोस्टमध्ये Lol .

शरद पोंक्षे, अजिंक्य देवपण खूप आवडतात.

मकरंद देशपांडेपण पहिल्यांदा खूप क्युट दिसायचा. 'पैलतीर' ही मालिका मी शाळेत किंवा जुनियर कॉलेजमध्ये होते तेव्हा लागायची, तेव्हा आम्हा मैत्रीणीना तो खूप आवडायचा. नंतर त्याने स्वतःचा अवतार करून घेतला.

इथे फक्त मराठी शिरेलीतलेच हिरो अपेक्षित आहेत का? एखाद्या शिरेलीपुरते आलेले, हिंदी शिरेलीतले आवडते हिरो चालणार नैत?

काल दुधी - लौकी हलव्याचा प्रोमो बघितला. '
हिरो-हिरवीन गोरी-गौरीच्या प्रोमोइतकी गोड नाही दिसले.

अणि ती उभी का? उभं राहुन हलव्यासाठी दुधी / गाजर किसणे माझ्याच्याने होणार नाही.

सासर युपीचं असल्याने त्या लोकान्चे रीतीरीवाज साम्भाळत ही पण अदु , जानु स्वानंदु च्या वाटेवर निघालेली वाट्ली प्रोमो वरुन....

Pages