Submitted by दक्षिणा on 21 July, 2015 - 06:34
२० जुलै पासून म्हणजे काल पासून झी मराठी वर नेहमी प्रमाणे एक घरगुती सिरियल सुरू झाली आहे. ज्याची थोडक्यात कल्पना आपल्याला प्रोमोजवरून आलीच असेल.
नायिका नेहमी प्रमाणे, कामसू, साधी, परंपरावादी, सत्य वचनी, प्रेमळ काय काय आणि काय नाही 
सर्व नायिकांनी असंच असलं पाहिजे असा झी मराठी चा अट्टहास, इतक्या सिरियलित अजून एक गोड गिट्ट नायिका. इतर सिरियल्स पाहता या मालिकेची चिरफाड करण्यात आपण का मागे रहायचं?
चला तर मग, आजपासून पहा आणि लागा कामाला, इथे लिहिण्याच्या.

विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जावेला सुद्धा डोक हव ना
जावेला सुद्धा डोक हव ना माणसांशी कस बोलाव याच? >+१
ललीताची जाऊ काहीवेळा खूपच लाडिक बोलते . ( `अगं वेत्सेला जेवायला चला' वगैरे). पण मला आवडते ती.
बापरे लोक ही सीरियल पाहतात मी
बापरे लोक ही सीरियल पाहतात
मी फक्त सुरुवातीचे १२-१५ एपिसोड पाहिले
ती हिरोइन कसली बकवास आहे
बापरे लोक ही सीरियल पाहतात मी
बापरे लोक ही सीरियल पाहतात
मी फक्त सुरुवातीचे १२-१५ एपिसोड पाहिले
ती हिरोइन कसली बकवास आहे
>>>
+१
आमच्याकडे फक्त दिदोदु साठी टिव्ही लागायचा. आजकाल लागतच नाही अगदीच. फक्त हवा येऊ द्या
आमच्याकडेही फक्त 'चल हवा येऊ
आमच्याकडेही फक्त 'चल हवा येऊ द्या ' अधून मधून 'तारक मेहता का उलटा चष्मा '
आणि इतर वेळी फ़क्त फॉक्स लाइफ , एन डी टीव्ही गुड टाइम्स , हिस्ट्री आणि डिस्कव्हरी
सगळेच डेली सोप सुरुवातीच्या ७-८ भागांनंतर प्रचंड बोअर होतात
संपदाचा ट्रॅक चांगला आहे. गोड
संपदाचा ट्रॅक चांगला आहे. गोड गोडुली आई व स्मार्ट्नमस्त बाबा भांडतात ते मस्त वाट्ते बघायला.
वच्छी आत्या खरेतर स्वतःच्या घरी जायला पाहिजे पण उगाच काड्या करत बसते.
वच्छी आत्या खरेतर स्वतःच्या
वच्छी आत्या खरेतर स्वतःच्या घरी जायला पाहिजे पण उगाच काड्या करत बसते.>>> काहीतरीच काय अमा? वच्छी आत्या खरेतर सौख्यभरे नांदायला आलेली आहे जहागिरदारांच्या घरात.
नीलनंदी राहिले बाजुला वच्छीलिता चा भंपकपणाच दाखवयतात.
देशपांडेज डोक्यात जातात
देशपांडेज डोक्यात जातात बर्याचदा . संपदाला वाटेल तस बोलतात . आणि स्वानंदी आली रडत तर लगेच तिची प्रेमाने विचर्पूस करतात . संपदा नाही का वैतागणार नाही का?
देशपान्डे परवडले एक
देशपान्डे परवडले एक वेळ....पण ती ललिता आणि तिचा तो माकडचाळे करणारा नवरा अजिबात सहन होत नाहीत...
संपदाची खरंच दया येते. नेहमी
संपदाची खरंच दया येते. नेहमी संपदा वाइट नी स्वानंदी गुणी. मला तर संपदा रेआलिस्टिक आणि ती स्वानंदी माठी वाटते.
संपदा जेव्हा सासरी गेली होती तेव्हा सासुला बरं नाहीये. तो ठोंबो नवरा म्हणे आईला डॉकडे कोण नेणार?
'अरे मी यायच्या आधी कोण नेत होतं?' असं तिने विचारायल हव्वं होतं खरंतर.
परवाच्या भागात संपदा जेव्हा
परवाच्या भागात संपदा जेव्हा घर सोडून जाणार म्हणून स्वानंदी ला फोन करते तेव्हा खूप सुंदर दिसली.. ती नेहमीच सुंदर दिसते पण त्या दिवशीचा तिचा skirt top तिला इतका खुलून दिसत होता. तिचे dresses आणि hairstyles खूप छान असतात. तिच्यासमोर हे स्वानंदी नावाचं ध्यान इतकं गबाळ दिसत होतं. आजपर्यंत त्या स्वानंदी चा कोणताच ड्रेस/साडी लक्षात राहील अशी नव्हती.
स्वानंदी ची हेअरस्टाईल अशी का
स्वानंदी ची हेअरस्टाईल अशी का ठेवलीये आणि.. माझ्या आईच्या कॉलेज डेज मध्ये असायची तशी, मध्ये भान्ग पाडून दोन बाजुन्ना दोन पिना टाईप्स.. नंदीचा चेहरा अजुनच ब्रॉड वाटतो त्यामुळे...!
काय म्हणताहेत नीलनंदी
काय म्हणताहेत नीलनंदी
मनाली मानलं, सॉलिड आहे हे.
मनाली मानलं, सॉलिड आहे हे.
मनाली , प्रत्येक पात्रासाठी
मनाली , प्रत्येक पात्रासाठी बरी एक स्मायली असतेच तुझ्याकडे ???
मागे ती आई-आजीची खुर्चीत डोलणारी एक मस्त होती
Thank you अन्जू , स्वस्ति
Thank you अन्जू , स्वस्ति
स्वानंदीच्या साड्यापण बोर
स्वानंदीच्या साड्यापण बोर असतात . निलिमाच्या रोज वापर्याच्या साड्या किती मस्त असतात .
ती निलिमा वाटतेच गोड . परवा त्या दिवट्या रावसाहेबांच्या पाचकळ सीनम्ध्य पण काय मस्त दिसत होती .
ही एक्दम गरीब बाई दिसतेय
नीलनंदी >> ज ब ह री.
नीलनंदी >> ज ब ह री.
काय म्हणताहेत नीलनंदी >>
काय म्हणताहेत नीलनंदी >>
स्माईलीचे नाक आणि स्वानंदीचे नाक मिळतेजुळते!!
नीलिमा कोण? नाही म्हणजे शिरेल
नीलिमा कोण? नाही म्हणजे शिरेल पहिल्या आठवड्यात दोन तीन दिवस बघितली होती पण आठवत नाहीये कोण ती.
मोठी सून . नंदीची मोठी जाउ
मोठी सून . नंदीची मोठी जाउ

संपदाचे कपडे खरेच मस्त असतात.
संपदाचे कपडे खरेच मस्त असतात. ती दिसते देखील छान. ती मधली सायली किती बालीश पणा करते.
इनोदी वाट्ते. आणि नील साहेब अर्ध्या दिवसात ब्राझिलला जातात काय. कैच्याकै. संपदाचा ट्रॅक छान आहे. ललिता वगिअरे आता विनोदी वाटू लागलेत.
थांकू स्वस्ति, हिला एकदाच
थांकू स्वस्ति, हिला एकदाच बघितलंय. हि नीलिमा होय. ओके
.
आज खुप दिवसांनी पाहिली हि
आज खुप दिवसांनी पाहिली हि मालिका.. त्या संपदाच्या विरोधात सगळी फॅमिली प्लानिंग करत असते.
मला तरी अज्जिबात ते बघायला छान वाटलं नाही. घरचे लोक्स असे एकत्र बसून घरातल्याच कोणाच्यातरी विरोधात काहीतरी प्लान बनवतात. नॉट सो ओके. मग त्यांना फॅमिली का म्हणावं?
त्या संपदाला वाईट म्हणजे एकदमच वाईट दाखवायचा प्रयत्न केला आहे. पण स्वानंदीशी तुलना करुन करुन तिचं कौतुक लहानपणी कधी झालं नसेल असंही वाटतं. त्यामुळे ती अशी अटेंशन सीकर झाली असेल. बहुतेक तिनेपण स्वानंदीसारखं त्यागमुर्ती असावं असं वाटत असेल झी वाल्यांना.
आणि त्या संपदाला पण काही स्वाभिमान नाही. कशाला राहाते यांच्या घरात मुळात? हिंमत असेल तर वेगळी का राहात नाही एकटी?
इकडे नील इतका स्वानंदीच्या कह्यात गेलाय.. आता ती म्हणेल ते सगळं ऐकतो.. त्याचं हे असं मतपरीवर्तन व्हायला कोणता वसा वसला हे विचारलं पाहिजे त्या नंदीला.
ललिता जुन्या घरातुन
ललिता जुन्या घरातुन वत्सलाच्या घरी तिथुन आताच्या घरात आली. तिची ती गोडबोली जाउबाई कुठे आहे?
जाऊ बाई नवर्याकडे गेलीय.
जाऊ बाई नवर्याकडे गेलीय. म्हणजे जे कोण अदृष्य भैय्यासाहेब आहेत त्यांच्याकडे.
ओके. ते होते का? म्हणजे
ओके. ते होते का? म्हणजे अदृष्य स्वरुपात. आणि कुठे राहतात ते? मग ही जत्रापण त्यांच्याकडेच का गेली नाही?
आणि कुठे राहतात ते? मग ही
आणि कुठे राहतात ते? मग ही जत्रापण त्यांच्याकडेच का गेली नाही?
>> ते गावाला राहातात. ललिता आणि तिच्या नवर्याच्या कारस्थानांमुळे त्यांनी त्या दोघांना दम भरलाय कि इकडे पाऊल ठेवले तर बघा. त्यामुळे जत्रा तिकडे गेली नसावी.
या नवरा बायकोनी मोठा फ्रॉड
या नवरा बायकोनी मोठा फ्रॉड केलेला असतो व मोठ्या भावाला ( भैय्यासाहेब) फसवलेले असते, म्हणून ते याना तिकडुन हाकलुन् देतात. व परत इकडे यायचे नाही असे सांगतात. अर्थात, हे वच्छी मावशीला माहीत असते म्हणून ती लोलिताला ब्लॅकमेल करते.
त्या संपदाला वाईट म्हणजे
त्या संपदाला वाईट म्हणजे एकदमच वाईट दाखवायचा प्रयत्न केला आहे. पण स्वानंदीशी तुलना करुन करुन तिचं कौतुक लहानपणी कधी झालं नसेल असंही वाटतं. त्यामुळे ती अशी अटेंशन सीकर झाली असेल.>> +१११११
संपदाला PG किंवा room sharing मिळत नाही आहे म्हणून ती नाइलाजाने तिथे राहात असते.
ऑ? मग त्यांच्या बायकोला हे
ऑ? मग त्यांच्या बायकोला हे माहित नसते का? ती तर मारे ललिवर विश्वास टाकुन दागिने वैगेरे देते. गोग्गोड बोलते.
काय पण. आणि ती का इथे ह्यांच्याबरोबर रहाते म्हणे नवर्यापासुन दुर?
Pages