नांदा सौख्य भरे

Submitted by दक्षिणा on 21 July, 2015 - 06:34

२० जुलै पासून म्हणजे काल पासून झी मराठी वर नेहमी प्रमाणे एक घरगुती सिरियल सुरू झाली आहे. ज्याची थोडक्यात कल्पना आपल्याला प्रोमोजवरून आलीच असेल.
नायिका नेहमी प्रमाणे, कामसू, साधी, परंपरावादी, सत्य वचनी, प्रेमळ काय काय आणि काय नाही Sad
सर्व नायिकांनी असंच असलं पाहिजे असा झी मराठी चा अट्टहास, इतक्या सिरियलित अजून एक गोड गिट्ट नायिका. इतर सिरियल्स पाहता या मालिकेची चिरफाड करण्यात आपण का मागे रहायचं?
चला तर मग, आजपासून पहा आणि लागा कामाला, इथे लिहिण्याच्या.

hqdefault.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तिचा चेहरा घोड्यासारखा वाट्टो!!! हसून हसून गडबडा लोळण>>> यावरूनच टायटल साँग घेतलं असणार मग.. घोड्याला खायला पुरणपोळी... Lol

कोणीतरी मागे झी च्या fb पेजवर लिहिलं होतं, हिरो छान. हिरोईन बदला. माकडाचा चेहेरा वाटतो.

ती हिरवीण मात्र मागे मुलाखतीत सांगत होती काहीजणांना माझ्यात दीपिका पडुकोणचा भास होतो (नीलला पण), Sad . अरेरे कीव करावीशी वाटली.

ही गोष्ट जर दिपिकाला समजली तरी ती प्लॅस्टिक सर्जरी ने एक तर चेहरा बदलून घेईल किंवा पुलंच्या भाषेत पदयात्रा करत काशी गाठेल.

पण याच हिरोइनला झीचा फ्रेश चेहरा कि कायसा पुरस्कार मिळाला ना? हिच्या जागी संपदा नीलबरोबर चांगली दिसली असती.

संपदा पण मेन हिरोईन म्हणून नाही आवडणार मला. नीलसाठी छानच हवी होती, त्याच्या आधीच्या सिरीयलमधली गौरी नलावडे चांगली होती मुळात ती अभिनयपण छान करायची. चार वर्षे त्या दोघांची सिरीयल चालू होती star प्रवाह वर.

ती गौरी आता फ्रेंड्स (मूवी) मध्ये येतेय स्व जो बरोबर.

ती हिरवीण मात्र मागे मुलाखतीत सांगत होती काहीजणांना माझ्यात दीपिका पडुकोणचा भास होतो (नीलला पण),>>>>>>>>>> फ्रेश चेहरा पुरस्कार देताना पण निलेश साबळेने मराठीतली दिपीका पदुकोण असं म्हटलं होतं.

तिचा चेहरा कोई मिल गया मधल्या जादूसारखा वाटतो का कोणाला? मला वाटतो. ती हसताना रडल्या सारखी एक्स्प्रेशन्स देते.

हसताना रडल्या सारखी, मलाही वाटते. जाउदे आता झीच्या सिरीयल म्हणजे हिरोईन सो सो समीकरण झालंय.

असंभवची उर्मिला छान होती आणि ए ल दु गो ची मुक्ता बर्वे. कुंकूची मृण्मयी पण छान होती पण ती शिरेल आपल्याला झेपली नाय ब्वा. सुनील बर्वे पण आवडतो पण नाही बघितली ती.

झीच्या हिरोणी- मुली बर्‍या आहेत तशा दिसायल पण त्यांच्या अति सोशीक, अति भोळ्या, अति सहनशील, अति चांगल्या इइ अति अति कॅरेक्टर मुळे अजिबातच आवडेनाश्या होतात. Happy

जान्हवी, मेघना, जुन्यात कुंकु, कुलवधु, असंभव, अनुबंध मधल्या चांगल्या होत्या.

स्वानन्दीची केशरचना ( हेअरस्टाईल) एकदम भन्गार आहे. त्यापेक्षा तिने मध्ये भान्ग पाडुन दोन वेण्या घालाव्यात, नाहीतर स्टेप कट करुन मागे पोनी घालावी. नीलला आणी ललिताला पण आवडेल. इथे बघा किती तेलकट दिसते ती.Swanandi1.jpg

स्वानंदी दिसायला सो-सोच आहे. पण काही काही वेळा दिसायला साधारण असूनही आपल्या अभिनयक्षमतेमुळे काही जणी आपलं दिसणं विसरायला लावतात Happy उदा. मुक्ता बर्वे. ती दिसायला साधारणच आहे (हेमावैम). पण ती इतका जबरदस्त अभिनय करते की आपण त्याच्यावरच फिदा होऊन जातो! दुसरं उदाहरण म्हणजे सोनाली कुलकर्णी (सिनियर), साधारण चेहरा असूनही तिच्या अभिनयामुळे तो आपल्याला भावून जातो!
याच्या उलट होसूमीयाघची जान्हवी. खरं तर दिसायला खूप छान आहे, सोज्वळ सुंदर चेहरा, उंच, शेलाटी, स्लिम फिगर वगैरे.. पण आता तर तिला बघितलं की लगेच चेनेल बदलावंसं वाटतं, ती बोलायला लागली की टी.व्ही. म्यूट करावासा वाटतो :(. दुसरं उदाहरण म्हणजे सोनाली कुलकर्णी (ज्युनियर्)..गोरीगोमटी, घारी, सुंदर्..पण अभिनयाच्या नावाने शून्य Sad

ज्यु. सोकु आवाजाच्या बाबतीत राणी मुखर्जी आहे. बाकी सिनीयर सोकु बाबत अनुमोदन. जान्हवी मला दिसण्याबाबतच आवडते. स्वानन्दी कॉन्फिडन्ट दाखवलीय, तसा अभिनयही ती चान्गला करते. पुढे बघु काय होते ते.

अजुन एक ऑब्झर्व करा आज्.बोलताना तिचं नाक सुक्ष्म फुरफुर करतं.. घोड्यासारखंच.

दिसण्यापेक्षा अभिनय महत्वाचा पण तोही दिसत नाही त्या स्वानंदीत. मोठी सोकु आणि मुक्ता बर्वे स्मार्ट आहेत दिसायला माझ्यामते, फार सुंदर नसल्या तरी.

हा स्वानंदी तुकारामाची बायको म्हणून नऊवारी आणि ग्रामीण बाजात बरी वाटली होती पण सेम टोन तिचा इथे वाटतो, त्यामुळे तिच्या अभिनयाबद्दल मला शंकाच आहे.

मी आदेश बांदेकर आमच्या सोसायटीत आले तेव्हा सांगणार होते, हिरो चांगला आहे हिरॉईन नाही. पण ते पक्षाच्या कार्यक्रमाला आले होते म्हणून नाही सांगितलं आणि संकोचपण वाटला.

दक्षुला स्वानन्दीच्या नाकावरल्या मर्मरन्ध्रातले सुक्ष्म जन्तु नाही दिसले म्हणजे मिळवले.:खोखो:

Lol

दिसण्यापेक्षा अभिनय महत्वाचा आहे याला अनुमोदन. पण तोही नसेल तर लोक बोलणारच ना!

रच्याकने, त्या नवीन 'पसंत आहे मुलगी'चा प्रोमो बघितला..कसले भयानक आहेत ते हीरो-हीरॉईन (?), दिसायला साधारणच आणि निदान प्रोमोवरून तरी फार अभिनयसम्राट आहेत असे वाटत नाही Sad

'पसंत आहे मुलगी'>>>> Uhoh हे सिरीयल चे नाव आहे ???? बापरे,,झी वाले काय काय दाखवणार आहेत ?????

झीवाले उलटे का चाललेत, म्हणजे मागे मागे?:फिदी:

१) आधी दिल्या घरी तू सुखी रहा.- का? २) मला जावई विकत घेणे आहे.

३) नान्दा सौख्यभरे- का? ४) मला अजून मुलगी पसन्त करायची आहे.:फिदी:

अरे हो निधी, कन्यादान तर मी विसरलेच होते.:स्मित: तशीही लक्षात रहाण्यासारखी नव्हतीच ती. दिल्या घरी पण बकवास होती, पण अतिशा नाईक आणी योगेश सोमण मुळे लक्षात राहिली. मला अतिशा नाईक आली की फार हसू यायचे.:फिदी:

Pages