नांदा सौख्य भरे

Submitted by दक्षिणा on 21 July, 2015 - 06:34

२० जुलै पासून म्हणजे काल पासून झी मराठी वर नेहमी प्रमाणे एक घरगुती सिरियल सुरू झाली आहे. ज्याची थोडक्यात कल्पना आपल्याला प्रोमोजवरून आलीच असेल.
नायिका नेहमी प्रमाणे, कामसू, साधी, परंपरावादी, सत्य वचनी, प्रेमळ काय काय आणि काय नाही Sad
सर्व नायिकांनी असंच असलं पाहिजे असा झी मराठी चा अट्टहास, इतक्या सिरियलित अजून एक गोड गिट्ट नायिका. इतर सिरियल्स पाहता या मालिकेची चिरफाड करण्यात आपण का मागे रहायचं?
चला तर मग, आजपासून पहा आणि लागा कामाला, इथे लिहिण्याच्या.

hqdefault.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नका बघु>>>>का? का ? का? म्या मात्र आता मधून मधून बगणार. वच्छी आत्या काही वेळेस लल्लुची जाम फजिती करते. तेव्हा मज्जा येते. असल्या येड्या सिरीयल मधून मधून, जेव्हा आपल्या फेवरमध्ये असतील तेव्हाच बघाव्यात.

स्वानंदीला साड्या मात्र कमीच दिल्यात वाटते . मी जेव्हा जेव्हा बघितलं तेव्हा निळ्या रंगाची साडी आणि त्यावर गुलाबी रंगाचं ब्लॉऊज Lol मे बी कदाचित अधन मधन पाहत असेन म्हणून वाटलं असेल

हो जाई तसच आहे, कधी कधी गुलाबी साडी पिवळ ब्लाउज हे कॉम्बी असत, पण जास्त ऑप्शन्स नाहीयेत दिलेले.. ललिला तरी कुठे फार काही ऑप्शन्स दिलेत...

हिच तर झी ची खासियत आहे.. प्रोमोजवरुन दाखवायच की आम्ही की नै तुम्हाला वेगळच दाखवणार आहोत बर्का.. बाकीच्या मालिकांसारख नै कै.. आणि एकदा मालिका सुरु झाली की हा माझा मार्ग एकला म्हणत त्याच रस्त्यानी जात रहायच.

मला योगेश सोमण भेट्ले...... म्हणजे या मलिकेतल्या स्वानंदीचे वडिल. सहित्य संमेलनाला आले होते ते.... अखिल भारतीय साहित्य संमेलन ! खुप भारी वाटले त्यांचे व्यक्तिमत्त्व! Happy

अरे वा मधुरा, मस्त. विपुत लिहिते.

मधुरा तुमची विपु दिसत नाही मला. इथेच लिहीते योगेश सोमण माझे भाचेजावई आहेत. Happy

मी हि सिरयल पाहणे बंद करून जमाना झाला. वीकेन्डला चुकून एक नजर पडली तर त्यात ती वच्छी मावशी 'सौ'नंदी च्या सासुला गंगावना वरून काही बोलत होती.. कितीतरी वेळ तेच Uhoh
आता गंगावन लावणे हा काय खूप मोठा इश्श्यू आहे का? Uhoh

चाभरट दाखिवल्यात त्या बायका. जशी काय ती ललिता टकली आहे आणि विग लावलाय. चांगले खांद्यापर्यंत केस आहेत. तरी एवढी नाटकं.

अरे डोक्यावरून पदर घेन्यावरून अर्धा एपिसोड वाया घातला .

ती स्वानंदीची जाउ - निलिमा वहिनी मला जास्त आवडते . ती दिसते जरा जहागिरदारांची सून . एक आब आहे तिच्या वागण्यात - नटण्यात . संपदापण . मस्त तयार होते .
नाहीतर स्वानंदी .नविन लग्न झालाय म्हणून आहे- नाही ते सगळे दागिने घालते . त्यातही गळ्यातलं आणि कानातले मॅचिंग नसत .

प्राजक्ता, लोल्लिताने वच्छीच्या बहीणीच्याच मदतीने तिला घराबाहेर काढायचा प्लॅन केलाय, तो यशस्वीसुद्धा झाला. आता आजच्या भागात वच्छी ललिला म्हणतेय की मी तुम्हाला जे ११लाख दिलेत त्यातुन दोन महिन्याचा आमचा २०,००० खर्च वगळुन उरलेले पैसे परत करा, मी जाते या घरातुन निघुन.

मला एक कळत नाही ललिताला तशीही वच्छी नकोय घरात म्हणुन ती आपल्या जावेच्या मनात भरवतेय पण मोठ्या जावेला सुद्धा डोक हव ना माणसांशी कस बोलाव याच? इतके दिवस वच्छी घरात होती तेव्हा वत्सला मला हे देतेस का ग? ते देतेस का ग? म्हणुन तोंडातुन मध गाळत बोलायची आणि काल ललिने दोन चुकिच्या गोष्टी काय सांगितल्या तिच्या तुसड्यासारख घरातुन जा म्हणुन सांगितल तिला? तु आता इथे राहु नको हे सांगण्याची काही पद्धत असते ना?

नवीन काय शोधून काढलयं वच्छी ने >>> आता ललिता , जानकी वहिनी करवी वच्छीला घराबाहेर काढणार . ( कसं ते माहित नाही .. बघत रहा )

परवाच्या भागात , नील जाम आवडला . संपदा वरून जे सुनावतो स्वानंदीला .
आणि ते यडं " पण आमच्या सर्वांच प्रेम आहे ताईवर" करून रडत बसतं.

स्वस्ति, तिने जानकीच्या डोक्यात वच्छी आणि तिचा नवरा ही दोन माणस घरात अ‍ॅड झाल्याने महिन्याच सामान १५-२० दिवसात संपल, दुधाचा खर्चही जास्त झालाय आणि अजुन काही बाही सांगुन तिच्या इथे रहाण्याचा कसा त्रास होतो ते पटवुन दिलय.

सम्पदा आणि महेश चे काय झालेय?
त्याने कोणता तरी निर्णय घेतला मोठा , असे हीरवीण तिच्या आई सोबत बोलत होती काल

नील काही पैसे कमावतो की नाही ? >>> कमवतो अस म्हणतात, पण बघाव तेव्हा हा ऑफिसबाहेरच असतो..

क्लिओपात्रा, महेशला संपदाबरोबर रहाण्यात इंटरेस्ट नाही अशा अर्थाचा डिसीजन घेतलाय त्याने.

@मुग्धटली , ओके.

संपदा वरून जे सुनावतो स्वानंदीला >>> तेव्हा तो म्ह्णाला कि संपदा ह्ळ्दीकुन्कु प्रोग्रम मधे त्याला टोमणे मारत होती !! Happy

Pages