Submitted by दक्षिणा on 21 July, 2015 - 06:34
२० जुलै पासून म्हणजे काल पासून झी मराठी वर नेहमी प्रमाणे एक घरगुती सिरियल सुरू झाली आहे. ज्याची थोडक्यात कल्पना आपल्याला प्रोमोजवरून आलीच असेल.
नायिका नेहमी प्रमाणे, कामसू, साधी, परंपरावादी, सत्य वचनी, प्रेमळ काय काय आणि काय नाही 
सर्व नायिकांनी असंच असलं पाहिजे असा झी मराठी चा अट्टहास, इतक्या सिरियलित अजून एक गोड गिट्ट नायिका. इतर सिरियल्स पाहता या मालिकेची चिरफाड करण्यात आपण का मागे रहायचं?
चला तर मग, आजपासून पहा आणि लागा कामाला, इथे लिहिण्याच्या.

विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असा नवरा असण्यापेक्षा सिंगल
असा नवरा असण्यापेक्षा सिंगल राहिलेलं योग्य.
>> "इन्फिनाईट अनुमोदन" अशी काही स्मायली आहे का माबोवर?
परवाच्या भागात त्या ललिने त्याला बेडरूममध्ये नेल्यानंतर त्याने ललिचे जे काही गुणगान गायलेत.. खरंच डोक्यावर पडलाय कि श्रावणबाळ सिंड्रोम झालाय देवजाणो
श्रावणबाळ सिंड्रोम कसला,
श्रावणबाळ सिंड्रोम कसला, डोक्यावर पडलाय.
खरंच, ललीला इतका श्रावणबाळ
खरंच, ललीला इतका श्रावणबाळ सिंड्रोम झालेला मुलगा असणं हे तिच भाग्यच. का ही ही !!
नील- टिप्पीकल ममाज बॉय! झी
नील- टिप्पीकल ममाज बॉय!
झी च्या कथा लेखकांमध्ये कॉमन सेन्सचा अभाव आहे. याचा फटका प्रेक्षकांनाच बसतो.
रश्मी अग ममाज बॉय इतके आंधळे
रश्मी अग ममाज बॉय इतके आंधळे नसतात ग..
तुझे बरोबर आहे मुग्धा. पण
तुझे बरोबर आहे मुग्धा. पण नाण्याची दुसरी बाजू समजुन घ्यायची असते हीच गोष्ट या नील सारख्या प्राण्याना पटत नाही. स्वानंदी जरा काही ललिताविरुद्ध बोलली की हा वाटेल तसे तिला बोलतांना दाखवलाय. ( आठवा नवीन फ्लॅटमधला पहिला की दुसरा दिवस)
म्हणुन तर मी म्हटलय की नीलची
म्हणुन तर मी म्हटलय की नीलची कॅटेगरी ममाज बॉयच्याही पुढची आहे. मुलगा कितीही ममाज बॉय असला तरी एकदा तरी बायकोला विचारेल की नक्की काय सिच्युएशन होती त्यावेळची. ह्याच आंधळ प्रेम आहे आईवर.
हेच जर सून घरफोडी दाखवली असती
हेच जर सून घरफोडी दाखवली असती तर नवरा मात्र बायकोचा बैल दाखवतात सिरीयलमध्ये.
http://cdn.talkimo.com/124.gi
http://cdn.talkimo.com/124.gif
अशक्य आहे हे सगळे
अशक्य आहे हे सगळे सत्यापासून फारकत घेतलेले.
सध्या कोणी पाहत नाही आहे का?
सध्या कोणी पाहत नाही आहे का? गेले २ दिवस झाले मज्जा येत आहे पहायला..
मी बघते ना. वटसावित्रीच्या
मी बघते ना. वटसावित्रीच्या मुहुर्तावर सासूचे दात घशात घालायचा कँपेन चालू झाला आहे. आजी पण आली आहे सोबत.
स्वानंदी दोन्ही ड्रेसेस छान आहेत.
काय चालु आहे सध्या....कोणीतरी
काय चालु आहे सध्या....कोणीतरी अप्डेटस टाका ना प्लीज
थोडक्यात, प्रोमोत दाखवलेली
थोडक्यात, प्रोमोत दाखवलेली मालिका फायनली सुरू झाली आहे.
थोडक्यात, प्रोमोत दाखवलेली
थोडक्यात, प्रोमोत दाखवलेली मालिका फायनली सुरू झाली आहे.>> खरं की काय?? बघायलाच पाहिजे मग.
हो बै. झाल सुरु ते एकदाच. आता
हो बै. झाल सुरु ते एकदाच. आता यशस्वी होवो म्हणजे प्रेक्षक भरुन पावतील.
सोमवारि काय झाल कोणी थोडक्यात
सोमवारि काय झाल कोणी थोडक्यात सान्गाल का? तो एक एपिसोड चुकला पहायचा आणि दुसर्या दिवशीच सगळी मज्जा चालु झाली.
स्नेहा_म +१ मलाही काय झाले
स्नेहा_म +१
मलाही काय झाले कळलेच नाही. मुख्य म्हणजे आज्जीला कळल्यावर पुढे तिने आणि स्वानंदीने कसे डील केले? काय ठरवले? आणि घरच्या इतर कोणाकोणाला माहीत पडले आहे हे?
मलाही काय झाले कळलेच नाही.
मलाही काय झाले कळलेच नाही. मुख्य म्हणजे आज्जीला कळल्यावर पुढे तिने आणि स्वानंदीने कसे डील केले? काय ठरवले? >>>> +१
घरात कोणालाही ठाउक नाहीये बहुदा..
आज्जीनी स्वानंदीला सांगीतले
आज्जीनी स्वानंदीला सांगीतले की समोरचा जसा वागतो तशीच तू पण वाग. मग दोघीजणी ठरवुन स्वानंदीच्या सासरी जातात. नील्,नीलिमा आणी तिचा नवरा यांना आनंद होतो, पण लोलिता ( आउ, धत्तुरे) आणी तिच्या डँबिस अहोचा चेहेरा पायताण हाणल्यासारखा होतो. आजी म्हणतात की त्या काही दिवस तिथेच रहाणार आहेत आणी मग आउचे बेडरुम झोपण्यासाठी निवडतात. लोली खवळते, पण चेहेरा हसरा ठेवते. स्वानंदी म्हणते की ती लोलीच्या मैत्रिणीची उद्या माफी मागणार आहे. पण नंतर लोलीच्या मैत्रिणीचा फोन येतो ती सांगते की स्वानंदी घरी आली होती आणी तिला कळले आहे की तिची मुलगी, जिचे लग्न मोडले म्हणून स्वानंदी माफी मागायला गेली होती, ती दहावीत आहे. ( तसा मेसेज स्वानंदी घरी आल्यानंतर लोलीच्या मैत्रिणीला करते) पण दुसर्या दिवशी आल्यानंतर मैत्रिण माफी नको म्हणते, त्या वेळी नील ला थोडा संशय येतो. बाकी कालचे वगैरे मी पाहीले नाही, पण आता मालीकेला रंग चढेल.
त्या आधी निलीमा रडुन स्वानंदीची माफी मागते आणी लोलीचे खरे स्वरुप कळल्याचे सांगते.
रश्मी, वच्छीने आजीला सगळ
रश्मी, वच्छीने आजीला सगळ सांगितल का? जहागिरदार खोट्या श्रीमंतीचा आव आणत आहेत वै? तु सांगते आहेस ते सगळे आत्ताचे एपिसोड्स आहेत. त्या आधीच सांग.. म्हणजे वच्छीने आजीला सांगण्यापासुन ते त्यांनी प्लॅन करेपर्यंत.
वच्छीने आजीला सगळ सांगितल का?
वच्छीने आजीला सगळ सांगितल का? जहागिरदार खोट्या श्रीमंतीचा आव आणत आहेत वै? >>>
हो..वच्छीला ललीता नील चे २ रे लग्न जुळवत आहे हे कळल मग तिने येउन ललीता ला खूप सुनावल, त्याचवेळी ललीता ती निलीमा चा वापर करुन घेत आहे हे ही बोलली जे निलीमाने बाहेरुन ऐकले.. त्यामुळे तिलाही सगळे खर कळलय .. वच्छी ला लली चा खूप राग येतो आणि मग ती स्वा च्या घ्हरी जाउन आजीं कडे सगळे कबुल करते.. अगदी तिने स्वानंदीला त्या घरातल स्ठळ का पाहिले इथपासुन ते ती आता नील साठी मुली बघतेय पर्यंत..ती घरातल्यांना पण सांगणार असते पण आजी म्हणतात की हे सगळ वसंताला कळले तर त्याच्या आणे नील मध्ये आइ आणि मुली ची बाजु घेऊन वाद होतील म्हणुन मीच हे सगळे मॅनेज करते.. मग ती स्वा ला घेउन वडाच्या पूजेला जाते आणि तिथे तिला सगळे समजल्याचे सांगते आणि मग त्या दोघी मिळुन नील च्या घरी जातात..
सॉरी मुग्धा, उशिर झाला
सॉरी मुग्धा, उशिर झाला प्रतीसाद द्यायला, पण मृनिशने सांगीतले आहेच. धन्यवाद मृनिश.:स्मित:
(No subject)
धन्यवाद मृनिश..
धन्यवाद मृनिश..
स्वानंदीकडे खूप पैसे कुठुन
स्वानंदीकडे खूप पैसे कुठुन आले एकदम?
अरे त्या महेश नी त्याच्या
अरे त्या महेश नी त्याच्या बायकोला (संपदा) फितवून पैसे घेतलेत; अमेरिकेचं पक्कं होतंय म्हणून. बेसिकली हे १० लाख लोलितानीच गाडी विकून संपदाला दिलेले आहेत.
देशपांडेंच्या घरी ब्रेफा ला
देशपांडेंच्या घरी ब्रेफा ला कायम सगळे पोहेच खाताना दाखवतात
देशपांडेंच्या घरी ब्रेफा ला
देशपांडेंच्या घरी ब्रेफा ला कायम सगळे पोहेच खाताना दाखवतात >>>>
अगदी बरोबर.. पोहे त्यांचा आवडता नाश्ता आहे बहुतेक..
स्वानंदी पेक्षा तिची आजीचं
स्वानंदी पेक्षा तिची आजीचं जास्त स्मार्ट दाखवलीय. त्या ललिताच्या नवऱ्याने साबणावर चावी छापून घेतली हे त्या बावळट स्वानंदी च्या लक्षात आलं नाही पण आजीने बरोबर ओळखलं
Pages