नांदा सौख्य भरे

Submitted by दक्षिणा on 21 July, 2015 - 06:34

२० जुलै पासून म्हणजे काल पासून झी मराठी वर नेहमी प्रमाणे एक घरगुती सिरियल सुरू झाली आहे. ज्याची थोडक्यात कल्पना आपल्याला प्रोमोजवरून आलीच असेल.
नायिका नेहमी प्रमाणे, कामसू, साधी, परंपरावादी, सत्य वचनी, प्रेमळ काय काय आणि काय नाही Sad
सर्व नायिकांनी असंच असलं पाहिजे असा झी मराठी चा अट्टहास, इतक्या सिरियलित अजून एक गोड गिट्ट नायिका. इतर सिरियल्स पाहता या मालिकेची चिरफाड करण्यात आपण का मागे रहायचं?
चला तर मग, आजपासून पहा आणि लागा कामाला, इथे लिहिण्याच्या.

hqdefault.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती निलिमा आधी आवडायची मला. आता डोक्यात जाते. Angry

एखादं माणूस आधी आपल्याशी कसं वाईट वागत होतं आणि अचानकच चांगलं वागू लागलं तर या लोकांना संशय नाही येत...
लगेच त्या व्यक्तीसाठी जीव ओवाळून टाकायला तयार होताना परिस्थितीचं भान ठेवता येत नाही. बावळट कुठची.

तेवढ डोक असत तर काय हव होत?

तिच लहान मुलांसारख झालय, त्यांना कस काही नवीन मिळाल की त्याचाच धोशा लावतात तस हिच काही झाल की "मी घरची मोठी सून आहे" हे पालुपद चालु असत.

हो ना. आणि सासू कशी आहे हे माहित असताना ती ललिताच्या कलाने वागतेय हे पाहून तर काय बोलावे तेच कळत नाही.

म्हणजे तिच्या पुढ्यातच ती लली ह्याचं खोटं त्याला आणि त्याच खोटं ह्याला असले कैतरी प्रकार करायची ना??? आणि हिच्याशी आणि निरंजनशी कशी वागायची तुसड्यासारखी. म्हणून मला वाटलं निलिमाला माहित असेल बहुतेक.

नीलिमाचं जाऊ द्या, तिची कुवतच तेवढी. पण त्या नीलचं काय? त्याने एकदाही विचारलं नाही स्वानंदीला की विम्मी मावशी कडे काय झालं म्हणून. तो निरंजनही त्याला सांगत असूनही. शेवटी स्वानंदीही म्हणते तू एकदाही विचारलं नाहीस. तर त्यावर हा मूर्ख म्हणतो की त्याने काय फरक पडणार आहे? यावर ती म्हणते की प्रश्न तुझ्या माझ्या वरच्या विश्वासाचा आहे. एवढं म्हटल्यावरही हा तिला विचारत नाही, हे सगळं ते दोघेच असताना घडतं तरीही :राग:.
अशा नवऱ्याबरोबर राहण्यापेक्षा माहेरी निघून गेलेलं केव्हाही चांगलं. मला पहिल्यांदा स्वानंदीचं वागणं पटलं

म्हणजे तिच्या पुढ्यातच ती लली ह्याचं खोटं त्याला आणि त्याच खोटं ह्याला असले कैतरी प्रकार करायची ना??? आणि हिच्याशी आणि निरंजनशी कशी वागायची तुसड्यासारखी. म्हणून मला वाटलं निलिमाला माहित असेल बहुतेक. >>>> नाही.

करेक्टे प्राची. माफी सोडुन दुसरा पर्याय आहे का विचारल्यावर सरळ तिला म्हणतो काही दिवस माहेरी जा म्हणुन? अगदी खर सांगायच तर उगाच ओढुन ताणुन घडवला गेला आहे हा प्रसंग. याव्यतिरीक्त अनेक गंभीर कारणं निर्माण करुन नीलकडुन तिला माहेरी पाठवता आल असत. इतक्या फुटकळ कारणावरुन कुठलाही नवरा आपल्या बायकोला माहेरी जा अस सांगणार नाही. कितीही मातृभक्त असला तरी.

इतक्या फुटकळ कारणावरुन कुठलाही नवरा आपल्या बायकोला माहेरी जा अस सांगणार नाही. कितीही मातृभक्त असला तरी.

>> असे काही महाभाग माहितीत आहेत मुगु.

असो.. त्या निलिमाला कालच्या भागात कसं वागवलं ललिताने.. आता तिची अक्कल ठिकाणावर येईल.

अशा नवऱ्याबरोबर राहण्यापेक्षा माहेरी निघून गेलेलं केव्हाही चांगलं. मला पहिल्यांदा स्वानंदीचं वागणं पटलं

>> स्वानंदी स्वाभिमान म्हणून नाही गेली नीलला सोडून.. नीलच्या सांगण्यावरून.. ललिताचा मान राहावा म्हणून गेलीये माहेरी. आणि आता घरच्यांनाही काही सांगितलं नाहीये. काय तर म्हणे "आपल्या घरातल्या गोष्टी अश्या बाहेर काय सांगायच्या असतात का" म्हणे. ह्या असल्याच फालतू डोसमुळे कितीतरी मुली आपला सासरी होणारा छळ माहेरी सांगत नाहीत. डायरेक्ट ९०% भाजल्या की मग माहेरच्यांना कळते. Angry

त्या निलिमाला कालच्या भागात कसं वागवलं ललिताने.. आता तिची अक्कल ठिकाणावर येईल. >>> ए हां काय झाल ते? मी नेमक तेवढच मिसल.

ललिता निलिमाला स्वतःला हवी तीच भाजी करायला सांगते. (बहुतेक मटार-बटाटा-टोमॅटो रस्सा)
निलिमाला भेंडीची भाजी करायची असते तर "माहेरून आली आहेत का भेंडी" असं विचारते.
निलिमाला घरातली सगळी कामं कर असं सांगते. आणि टोन पण एकदम जरबेचा असतो.

http://www.ozee.com/shows/nanda-saukhya-bhare/video/nanda-saukhya-bhare-...

इथे ११.५३ पासुन बघ बरोब्बर.

ओके.

ही सिरीअल फारच फालुतपणा आहे! कित्ती कट कारस्थानं तेही आपल्याच घरात!
प्रोमो काय दाखवलेला न सिरीअल काय चालु आहे Angry

अशा नवऱ्याबरोबर राहण्यापेक्षा माहेरी निघून गेलेलं केव्हाही चांगलं. मला पहिल्यांदा स्वानंदीचं वागणं पटलं

>> स्वानंदी स्वाभिमान म्हणून नाही गेली नीलला सोडून.. नीलच्या सांगण्यावरून.. ललिताचा मान राहावा म्हणून गेलीये माहेरी.>> त्या दिवशी तरी मला तसंच वाटलं पण तुम्ही म्हणताय तेच खरं आहे. जर स्वतः च्या मतासाठी जर ती माहेरी आली असती तर नवऱ्याने फोन केल्यावर त्याच्याशी गुलूगुलू बोलली नसती. पुन्हा तीच री ओढली असती की तुम्ही मला अजूनही विचारलं नाही विम्मी मावशी कडे काय झालं म्हणून. Angry
आणि असंच वागायचं होतं तर घर सोडून घर सोडून आलीच कशाला? सरळ त्या दोघींची माफी मागून ते प्रकरण तिथेच मिटवायचं Angry

कालचा भाग पाहिला नाही. कालपण निलिमाला झापलं का ललिताने?

मला जाम इच्छा आहे ललिताने निलिमाला हिडीसफिडीस करतांना बघण्याची.. बावळट ललिता कशी कारस्थानी आहे हे माहित असूनही हूरळून गेली आणि स्वानंदीला त्रास व्हायचं मुख्य कारण ठरली. फुटीर कुठची.. ती आणि स्वानंदी एक असत्या तर एव्हाना ललिता सुतासारखी सरळ आली असती..

पियु. निलिमाला पूर्णपणे माहित नाहीये लली कशी आहे ते. लली आणि लल्याचे सगळे उद्योग हे दोन्ही मुला-सुनांच्या अपरोक्ष चाललेले आहेत. आणि तसही निलीमाशी लली कधीच नीट बोलली नाहीये मधले काही दिवस सोडता. त्यामुळे निलीमावरची ललीची वसवस ही ना निलीमाला नवीन आहे, ना ललीला, ना प्रेक्षकांना...

ती आणि स्वानंदी एक असत्या तर एव्हाना ललिता सुतासारखी सरळ आली असती.. >>>> अग इतके दिवस होत्या की एकत्र, काय दिवे लावले?

निलीमा खरोखर बावळट दाखवलीय, स्वानंदी नसतांना ललिता तिचे खरे रुप निलीमाला दाखवते तरी ही बावळट विचार करते की आज यांना असे वागायला काय झालेय. आपली सासु कशी स्वार्थी आणी नीच आहे हे हिला अजूनही समजले नाही?:अओ::राग:

मुग्धटली.. Happy खरंच इतके दिवस होत्या की एकत्र......नुस्तं गोग्गोड दिसण्या बोलण्यापलिकडे काय दिवे लावले?
वच्छी मावशी कडे खिचडी काय, रंग खेळणे काय, नवीन घर लावणे काय....बावळट कुठच्या!
त्यामुळे निलीमावरची ललीची वसवस ही ना निलीमाला नवीन आहे, ना ललीला, ना प्रेक्षकांना... -- हे एक नंबर !!

आणि त्या निलिमा ने मागे एक्दा ऐकलं होतं ना , लली ला बोलताना की तिला नील आणि स्वानंदीला वेगळं करायचयं म्हणून .

इतके दिवस होत्या की एकत्र, काय दिवे लावले?

>> हळूहळू जात होती की ललिच्या हातातून सगळी सत्ता.. घरची कामे स्वानंदीच्या पद्धतीने मस्त चालली होती.. खर्च पण मस्त आटोक्यात चालले होते.. अजून थोडे दिवस एकत्र राहिल्या असत्या तर पूर्णच गेली असती.

रश्मी +१

स्वस्ति.. हे कधी झालं?

अगं नविन घरात आल्यावर . लली आणि नवरा बोलत असतात तेन्व्हा रूमच्या बाहेर निलिमा सामान काढत असते . तेन्व्हा ती ऐकते .

अगं नविन घरात आल्यावर . लली आणि नवरा बोलत असतात तेन्व्हा रूमच्या बाहेर निलिमा सामान काढत असते . तेन्व्हा ती ऐकते .>> विसरली असेल ती. Proud

कितीतरी संदर्भ असेच दाखवतात आणि नंतर दाखवत पण नाहीत... पण आपल्या बरोबर लक्षात असतं ना. Happy

Pages