नांदा सौख्य भरे

Submitted by दक्षिणा on 21 July, 2015 - 06:34

२० जुलै पासून म्हणजे काल पासून झी मराठी वर नेहमी प्रमाणे एक घरगुती सिरियल सुरू झाली आहे. ज्याची थोडक्यात कल्पना आपल्याला प्रोमोजवरून आलीच असेल.
नायिका नेहमी प्रमाणे, कामसू, साधी, परंपरावादी, सत्य वचनी, प्रेमळ काय काय आणि काय नाही Sad
सर्व नायिकांनी असंच असलं पाहिजे असा झी मराठी चा अट्टहास, इतक्या सिरियलित अजून एक गोड गिट्ट नायिका. इतर सिरियल्स पाहता या मालिकेची चिरफाड करण्यात आपण का मागे रहायचं?
चला तर मग, आजपासून पहा आणि लागा कामाला, इथे लिहिण्याच्या.

hqdefault.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लग्न अक्षरशः गुंडाळले. नवर्यामुलाचे आई-बाबा जे काही करत होते पूर्ण लग्नभर ........

रच्याकने, ललिताला बिल्डरला पैसे का देते \ घर विकते ? तिने ते घर विकत कुठे घेतलयं ? देशपांडेंचं नाव घेऊन ती त्या बिल्डरला पैसे कमी करायला लावते असं काहीतरी आठवतयं. ललिता - माधव कोणालाही एक क्षणभरही वाटू नये की वच्छी कडे एवढे पैसे कुठून आले ?

लग्न झाले पण? मी मेंदी लावताना लोक्स नाच करत होते ते पाहिले. काल होता का स्पेशल भाग?

हो, काल २ तासांचा स्पेशल भाग होता. पण नक्की काय झालं? बिल्डरने घराचं भाडं ११ लाख सांगितलं ना? मग ते पैसे वच्छीने दिले का? आणि ती फाईल वच्छीकडे होती ती दिली का तिने ललिताला?

बिल्डर घर खाली करायला सांगतो, हे दोघं २ महीन्याची मुदत मागतात तर तो भाडं १ लाख आणि १० लाख डिपॉझिट असं ११ लाख मागतो. वच्छी फाईल देते ललिताला.

मुद्दलात, बिल्डरला कसले पैसे द्यावे लागतात तेचं मला कळलं नाहीये Wink

मुद्दलात, बिल्डरला कसले पैसे द्यावे लागतात तेचं मला कळलं नाहीये >> हे मला पण माहित नाहिये. Happy रात्री साबांना सगळ्या शंका विचारल्या पाहिजेत. Wink

फाईल मधे काय आहे ????>> घर बिल्डरच्या नावावर केल्याचे कागदपत्र.

अगं वच्छी कडे कोटी कुठले यायला ? ५० लाख मिळाले तिला आयकर खात्याला टिप दिल्याचे.

पेटहाऊस बूक केलं पण म्हणून बिल्डर पैसे का वसूल करतोयं ? कँसल केलं असं म्हणू शकतात ना ?

बिल्डर कडून पेंटहाऊस बुक केलंय पण अजून १ वर्ष त्यांना ते विकता वगैरे येणार नाही असा काहीतरी क्लॉज आहे म्हणे. सो आता बिल्डरला पण ते परत देऊ शकत नाहीत. परत केलं तर बिल्डर ते विकू शकत नाही. मग त्याचं नुकसान होईल. म्हणून बिल्डर उरलेले पैसे (जे त्यांनी बुडवलेत खोटं सांगून) ते मागतोय. ते देणं शक्य नाहीये म्हणून तो त्यांचं राहतं घर मागतो सो दॅट ते रेंटवर देऊन त्याला पैसे वळते करता येतील(!). घर गेलं तर हे लोक्स राहणार कुठे? म्हणून ते स्वतःचंच राहतं घर त्याला देतात पण २ महिने तेच घर भाड्याने घेतात ज्याचे वर सांगितल्याप्रमाणे तो ११ लाख मागतो.

हुश्श! Happy

ललीता आणि तिचा नवरा म्हणजे अगदीच हास्यास्पद प्रकरण आहे. येवढे अचाट , आचरट प्लॅन करायच्या ऐवजी जर उद्योगधंद्यात लक्ष घातलं असतं तर अशी वेळ आली नसती.

देशपांडे त्यांचा पॅन नंबर घेउन सर्च का करत नाहीत?
नील चा मोठा भाउ इतका दुबळा का दाखवला आहे?
सम्पदा महेश चे काय झाले? लग्न झाले का?
ती ललिताची थोरली जाउ इतकी का विश्वास टाकते?

नील चा मोठा भाउ इतका दुबळा का दाखवला आहे? >>> तोचं काय नीलला पण काही संशय येत नाही ?

संपदाचं लग्न झालं पण ती महेशला विजा झाला नाही वगैरे काहीतरी सांगते, नीट पाहीलं नाही. ती बॅग भरताना दिसली काल.

ती जाऊ विश्वास टाकते आनि मधेचं संशयाने बघते ( म्हणजे तसा अभिनय करते असं मला वाटतं नेहमी Wink )

नीलचा मोठा भाऊ आईच्या डॉमिनेशनमुळे दुबळा झालाय असं दाखवलंय बहुधा.

ललिताची मोठी जाउ भोळसट आणि बावळट असावी.

आज पहिल्यांदाच स्वानंदीने बाबांचा ओरडा खाल्ला. बरं झालं. आगाऊ कुठची! हा खोटेपणा चालला बरा तिला? आणि पुढच्या भागाची झलक पाहून तर कपाळाला हात लावला. नीलचे आईबाबा येडे आहेत का? त्यांच्या खोलीला कान लावून ऐकतायत काय! Uhoh

अगदी अगदी, बालिश व्हिलन आहेत ते दोघं Wink

रच्याकने , ललिताला नक्की कसली भिती वाटत्ये नील स्वानंदीला सांगेलं अशी ? संपदाने खोटी कागदपत्र केल्येत ते नीलच्या सांगण्यावरून का ? आणि स्वानंदीला नाहीत आहे ना ते ?

लेखकाला किती लक्षात ठेवावं लागत असेल नक्की कोणाला काय माहीत आहे आणि काय नाही ते Wink

ते बाबा ओरडले की काय मस्त दिसतात. असाच बाप्या हवा घरी. नील अन महेशचीच कीव येते आहे.
नव्या संसारात ह्या रडक्या बाया. अन रहस्य अन काय काय.

अरे नाहीरे गौरी नीलची खरी बायको नाही तो अभिनेत्री गिरीजा जोशीशी लग्न करतोय लवकरच. कालच कुठेतरी वाचलं.

मगाशी ५ मिनिटं सर्फिंग करताना बघितलं, योगेशराव होते म्हणून ठेवलं चालू, त्यांनी काम चागलं केलंय. अरे ती स्वानंदी काय दिसत होती, ते दागिने अजिबात शोभत नव्हते आणि संपदा पण सो सो च वाटली. आपलं ते बाबा ओरडून बाहेर पडले स्वानंदीचे मग मी channel बदललं.

गेले कित्येक भाग पाहिले नाहियेत. रिपिट रात्री १२.३० ला असते Sad
लग्नानंतर नक्की काय झालं?
संपदाचं लग्न झालं का?
घोडतोंडीला तिचं खोटेपण कळलं का?
बाबा घोतों ला का ओरडले?
ललिताने घर विकले आहे तर हे नवा जोडा राहतोय कुठे मग?

जरा अपडेट द्या पटापटा.

लग्नानंतर नक्की काय झालं?>> हे मला माहित नाही. Wink

संपदाचं लग्न झालं का? >> हो, ललिललबाईंनी दम दिला तिला तेव्हा लग्नाला तयार झाली. नंतर महेश सोबत भांडण केलच तिनं.

घोडतोंडीला तिचं खोटेपण कळलं का? >> नाही कळलंय अजून.

ललिताने घर विकले आहे तर हे नवा जोडा राहतोय कुठे मग? >> स्वतःच्याच घरात भाड्याने राहतायत.

घोडतोंडीला >> Biggrin

लग्नानंतर नक्की काय झालं?>> हे मला माहित नाही. Wink

संपदाचं लग्न झालं का? >> हो, ललिललबाईंनी दम दिला तिला तेव्हा लग्नाला तयार झाली. नंतर महेश सोबत भांडण केलच तिनं.

घोडतोंडीला तिचं खोटेपण कळलं का? >> नाही कळलंय अजून.

ललिताने घर विकले आहे तर हे नवा जोडा राहतोय कुठे मग? >> स्वतःच्याच घरात भाड्याने राहतायत.

घोडतोंडीला >> Biggrin

एखाद्याच्या/ कुणाच्याही दिसण्यावरून शेरेबाजी करणं चुकीचं नाही का वाटत तुम्हाला?
बाकी सिरिअल, अभिनय, कथा वगैरे गोष्टी रद्द आहेत हे मान्य. त्याबद्दल बोलायला नकोच. पण व्यक्तिगत शेरे कशाला?
असो. मी मालिका बघत नाही. त्यामुळे बाकी चालूद्या.

Pages