चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Egg khan suru kelay sadhya. Let's see
Aajchi pragati - diwas bharat chukun ekdach lift vaparali. No junk food at all. ३ ltr pani pyayale.१ km chalale

मला पण 5 kg कमी करायचय... पण तशी जिद्दच वाटत नाहीये..
व्यायाम रोज करते.. अन् खाते पण तोलुन मापुन..
पण...

वर शतावरीचा उल्लेख आला आहे म्हणुन लिहतोय. अगदी दुधारी तलवार आहे. हार्मोनल चेंजेस होतात. योग्य व्यक्तिच्या सल्ल्याशिवाय घेउ नये.

*

दररोज प्रोटीन ची मात्रा कमी पडतेय. डाएटिशिअन कडे जाणारच आहे, पण तोपर्यंत 'राइटबाइट' आदींचे प्रोटीन बार्स खाल्ले (दिवसातून एक्-दोन बार) तर फायदा होतो काय? की नैसर्गिक रित्या (डाळी / अंडी) यांचे प्रमाण वाढवू आहारात?

रंगासेठ ,
अंडी (पांढर)अन चिकन ( शक्यतो ब्रेस्ट ) जेवढे खाशील तेवढे चांगल . दिवसातून किमान १ वाटी वरण खा .

'राइटबाइट' चा अनुभव नाही पण जेवढ नॅचरल तेवढ बर अस माझ मत .

.

चिकन तर खात नाही मी Happy
आणि दररोज तूर्/मूग डाळीचे वरण जात नाही. मुळात नुसता वरण आवडत नाही.
बघू फोडणी वगैरे घालून खाता येईल काय.

आख्खा मसूर चांगला प्रोटिन सोर्स आहे
अगदी कमी तेलात मिक्स डाळिंची आमटी, आंबट गोड वरण,डाळ मेथी इ.इ. विवीधता आणून वरणाचा कंटाळा कमी करता येईल.

घरी केलेलं पनीर पण चांगले होईल. गायीच्या दुधाचे. पटकन होते. असा काही फा.....र वेळ नाही लागत करायला. किंवा मग घरीच केलेला चक्का वापरून कोशिंबीरी.

रंगासेठ,
डाळ आणि पनीरच्या खूप गोष्टी बनवता येतात. काही उदाहरणे-
१. फक्त डाळीच्या इडल्या/ डोसे
२. डाळीची खिच डी- तूप आणि लोणच्याबरोबर झकास!
३. मूगडाळीचे डोसे विथ पनीर स्ट्फ रोल
४. पनीर टिक्का आणि चटणी
५. लेंटिल सूप

फक्त डाळिबरोबरच भाज्या भरपूर खा....

आख्खे मसुरला मोड मस्त येतात.त्याची सुकी किंवा पातळ उसळ छान लागते.
मोड न काढताही वेगळी छान चव लागते. मी बर्याचदा ह्यात पालक, केल वैगरे पालेभाजी टाकते गॅस बंद करायच्या २ मिनीट आधी.
हे मसुर मोड आणि मोड शिवाय खिचडीत घालता येतात.

मस्त धागा आहे…

गेल्या वर्षभरात भारताबाहेर राहून १२ किलो वजन वाढलय!

काही दिवसांपूर्वी व्यायामाला सुरुवात केली आणि खूप जास्त थकवा यायला लागला… blood test केल्यावर कळाल की आयर्न ३ वर आलय Sad
मग सध्या फक्त चालण सुरु केलय जस जमेल तस….

या वर्षा अखेर पर्यंत वजन पुन्हा ६० किलो वर न्यायच आहे… या धाग्यामुळे खूप उपयोगी tips मिळाल्या… सर्वांचे आभार…

नियमित डाएट आणि व्यायाम चालू झाला की हळुहळु update देत जाईन इकडे Happy

मंजूडी ,
ब्लडप्रेशरसाठीच्या औषधाने - कॅल्शियम चॅनल ब्लॉकर किंवा ACE inhibitor प्रकारातील औषध असेल तर वॉटर रिटेंशन होवू शकते. याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

जिम जॉइन केल्याचा दुसरा आठवडा सुरु आहे..सकळी ७-७:४५

सकाळी नश्ता ऑफिस मधे जो असेल तो करावा लागतो ..
त्यात कधी पोहे , उपमा, बटाते वडा, भजी, अस काहिही असत..

पर्याय नाहिये सध्यातरी..

दुपरी घरची २ पोळ्या आणी भाजी..त्यानंतर एखाद दुसर बिस्किट.. (न्युट्रि चॉइस टाईप)

५:३०-६ वाजता भेळ टाईप डाएट भेळ अस काहितरी..

८ ला जेवण २ पोळ्या भाजी..

वजन खुप्प्प्प दिवस ५६-५७ च आहे काही बदल होत नाही//

हाईट नुसार निदान ५ केजी कमी करायचे आहेत...

माझा आजचा व्यायाम:
३० मिनिटे एलिप्टिकल + १५ मिनिटे रोइंग

डाएट फारसा व्यवस्थित नव्हता म्हणुन देत नाही .

माझे काही प्रश्न आहेत:

१. heart rate आणि calorie जाळण्याचे समीकरण काय आहे…. माझा साध्या व्यायामाला पण हार्ट रेट १८० ला पोचतो.
उदा, ६-७ च्या स्पीड ने चालणे, पळणे , एलिप्टिकल
२. माझ्याकडे ऑस्ट्रेलिया मध्ये हॉट प्लेट आहे...आपला नेहमीचा gas नाही आणि त्यावर पोळ्या अजिबात नीट होत नाहीत . म्हणुन मी फ्रोजन पोळ्या वापरते. या पोळ्याना दुसरा काही पर्याय आहे का? कारण फ्रोजन म्हणजे ताज्या नाही आणि शिवाय preservative असणार.
भात सोपा पर्याय आहे पण रोज नाही खाऊ शकत.

>>माझ्याकडे ऑस्ट्रेलिया मध्ये हॉट प्लेट आहे...आपला नेहमीचा gas नाही आणि त्यावर पोळ्या अजिबात नीट होत नाहीत .>>
माझ्याकडेही १२-१३ वर्ष हॉट प्लेट होती. एकदा अंदाज आला की नीट होतील पोळ्या. हॉट प्लेट एकदा गरम झाली की बराच वेळ आच कमी केली / बंद केली तरी आधीच्या तापमानाला रहाते हे लक्षात घ्या. पोळ्या छोट्या, साधारण ६ इंच व्यासाच्या करायच्या. कणीक थोड्या कोमट पाण्यात भिजवली तर त्यानेही फरक पडतो. मी हॉटप्लेट वर पोळ्या करुन फ्रीजही करुन ठेवायची.

भाता ऐवजी दलीयाची खिचडी करता येइल. त्यात भाज्या, मोड आलेली कडधान्य घालून पोट्भरीचे पौष्टिक जेवण होइल. गव्हाच्या पीठाचे डोसे, नाचणीचे डोसे, मूगाचे डोसे हे अजून काही पर्याय.

Pages