चित्रपुष्पांजली - चित्रपुष्प स्वीकारणे बंद करत आहोत.

Submitted by संयोजक on 28 February, 2016 - 07:50

गो. नी. दांडेकर हे प्रामुख्यानं कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. पण त्यांनी धर्म, संस्कृती, इतिहास या विषयांवरही विपुल लेखन केलं आहे. शिवकालीन इतिहास हा तर त्यांच्या विशेष आवडीचा विषय होता. त्यातूनच त्यांच्या किल्ल्यांविषयीच्या प्रेमाचा उगम झाला असावा. गडकिल्ले पाहण्याचा त्यांना छंदच होता.
लेखन–वाचनासोबतच भ्रमण हादेखील त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता. गावोगावीचे गड-किल्ले-लेणी-देवळे इत्यादी जणू त्यांचे जिवाभावाचे सुहृदच.

गोनीदांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण यंदाच्या मराठी भाषा दिवस उपक्रमांतर्गत त्यांना वाहूया चित्रपुष्पांजली!

आपण वेळोवेळी अनेक अनवट जागी असलेल्या गड-किल्ले-लेणी-देवळे यांना भेटी दिल्या असतील, त्यांचे फोटो काढले असतील, तर ते सर्व इथे संकलित करूया.

नियम, अटी, सूचना!

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. हा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची स्वतः काढलेली प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली चित्रं, ती प्रताधिकारमुक्त असली तरी, देऊ नयेत.
३. देवळे / मंदीर यांची प्रकाशचित्रं देताना त्यांचं स्थापत्य अधोरेखित होईल व प्रामुख्यानं बाह्यदर्शन होईल अशा प्रकारचं चित्रण अपेक्षित आहे. शक्यतो पूजेतली मूर्ती नको, पण बाकी कोरीवकाम, दीपमाळ, कळस इत्यादी चालेल.
४. प्रकाशचित्राबरोबरच त्याबाबत स्थळकाळाची माहिती देणारे दोन शब्द जरूर लिहावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा प्रकाशचित्रं देऊ शकतो, मात्र सलग दोन प्रकाशचित्रं देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण येथे पाहा -http://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिमाचलातील हे शिकारी मातेचे मंदीर!! महाभारता च्या काळापासून अस्तित्वात आहे अशी आख्यायिका आहे.
अज्ञातवासात राहात असता पांडव या जागी ध्यान करत .दरवर्षी इथे नवरात्री उत्सव साजरा होतो. दुर्गादेवी च्या
नावावर कातळात खोदलेल्या ओबडधोबड आकृत्या आहेत.
प्राचीन काळी या देवळाच्या चारहीबाजूला पसरलेल्या जंगलात शिकार करायला येणारे शिकारी, या देवीला चांगली शिकार मिळण्याकरता नवस बोलत ,म्हणून ही हिला शिकारी माता हे नांव पडले असावे.
या देवळाला छप्पर नाही. समुद्रसपाटी पासून १३,००० फूट उंचीवर असल्या कारणाने येथील तुफानी हवेच्या जोरामुळे ते टिकतच नाही कधी. अगदी उघड्यावरचे मंदिर आहे हे.

कुल्लू मधील पार्वती दरीत , पार्वती नदी च्या किनार्‍यावर बांधलेला मणीकरण गुरुद्वारा.
इथे उकळत्या पाण्या च्या झर्‍यात तांदूळ्,डाळी,बटाटे माती च्या मडक्यांत भरून शिजवायला ठेवलेले दिसले.

हिमाचलातील एका छोटुश्या खेड्यातील( बगसियाड) हे लाकडी मंदीर.. संपूर्ण मंदिरात आतून बाहेरून कोरीव काम केलेलंय. असतील नसतील तितके देव देवता कोरलेले आहेत. एकसंध लाकडांतून निर्माण केलेले खांब तर तर केवळ अप्रतिम आहेत.

वरचे सर्वच फोटो फार सुंदर.

वाड्याचे विमलेश्वर देऊळ (देवगड तालुका), पांडवकालीन मानतात तिथे जातानाची वाट आणि असलेले शिलालेख (किंवा तत्सम चित्रे).

vimleshwar koriv.jpg

मुख्य देवळाचा फोटो पण आहे पण एवढा छान आला नाहीये. कोणाकडे असल्यास द्या इथे. (बहुतेक जिप्सीने टाकले होतेना फोटो, हेमाताई तुमच्याकडे पण असेलना मुख्य मंदिराचा (देवळाचा) तर जरूर द्या इथे). देवळाचे वैशिष्ट्य म्हणजे ते संपुर्ण देऊळ एका दगडात कोरलेले आहे.

.

अन्जू, कुणकेश्वर मंदिर कसलं सुंदर आहे.. आणी ते दुसरं विमलेश्वर .. प्राचीन दिस्तंय कितीतरी. अजून काहीतरी माहिती समजली तर आवडेल.

विनी, खूपच अनोखे दिस्तंय हे!!

१६७१ मधे तेंव्हाच्या पनामिनियन गव्हर्नर ने चाच्यां च्या हल्ल्यापासून वाचवायला संपूर्ण पनामा शहर जाळून नष्ट करून टाकले . १६७३ मधे संपूर्ण सुरक्षिततेकरता सभोवताली तट बांधून पुन्हा नव्याने वसवण्यात आले.
अजूनही शहराचा हा भाग (जो जवळ जवळ मोठीशी वस्तीच आहे) जसाचातसा जतन केलेला आहे. आणी आता वर्ल्ड हेरिटेज मधे सम्मिलित केला गेला आहे.

हा स्पॅनिश फोर्ट चा एक हिस्सा

नाना फडणविसांचा वाडा.
मु.पो.मेणवली, तालुका-वाई, जिल्हा सातारा

थांकु थांकु साधना.. Happy
हाँ.. हा मेणवली चा वाडा मी पण पाहिलाय ..अद्भुत आणी गूढ फीलिंग आलं होतं..

जिप्स्या त्या भित्तीचित्रांचं रिस्टोरेशन चं काम संपलं का आता??

अरे वाह! मस्त चित्रे सगळ्यांचीच

जिप्सी हजर आहे म्हणजे डोळे निवणार आज

रत्नागिरी मधील पन्हाळे काजी लेणी.
या लेणी अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत असून त्यामागचा इतिहास आम्हाला तरी भेट देताना कळला नाही.
या लेण्यांमध्ये डोंगरात खोदकाम केलेली घरे आढळून आली.
कोणाला काही माहिती असेल तर वाचायला नक्की आवडेल

panhalekaji1_0.jpgpanhalekaji2_0.jpgpanhalekaji3_0.jpg

अहाहा... इथे मेजवानीच.....

वर्षूनील..... ९व्या शतकातील बौद्ध मंदीरे- बोरोबुदूर (इंडोनेशिया) या फोटोतील स्त्री कोण आहे?

श्रवणबेळगोळचा मराठीतील शिलालेख.... एक उल्लेखनीय गोष्ट, त्यातिल "ल" शेंडीचा नसुन आपण सध्या परत नव्याने कान्याला जोडुन लिहितो तसा आहे. Happy तर "र" हा सावरकरी र आहे.

मेहेकर जि बुलढाणा येथील बालाजी मंदीर
सभामंडप नवीन बांधलाय पण गाभारा जुन्या दगडी बांधकामाचाच आहे. इथली बालाजीची पुजेतली मुर्ती अखंड काळ्या पाषाणात कोरून काढलेली असून १२ फुटी आहे. ही बालाजीची सर्वात मोठी मुर्ती मानली जाते. ब्रिटीश राजवटीत ही कस्ल्याशा उत्खननात सापडली असता ह्या मुर्तीला तिकडे न्यायचे घाटत होते त्यामुळे रातोरात मंदीर बांधून हिची प्राणप्रतिष्ठा केली गेली. त्याच वेळी सापडलेला ताम्रपट आजही कुठल्याशा ब्रिटीश संग्रहालयात बघायला मिळू शकतो.

DSC03494.JPG

Pages