चित्रपुष्पांजली - चित्रपुष्प स्वीकारणे बंद करत आहोत.

Submitted by संयोजक on 28 February, 2016 - 07:50

गो. नी. दांडेकर हे प्रामुख्यानं कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. पण त्यांनी धर्म, संस्कृती, इतिहास या विषयांवरही विपुल लेखन केलं आहे. शिवकालीन इतिहास हा तर त्यांच्या विशेष आवडीचा विषय होता. त्यातूनच त्यांच्या किल्ल्यांविषयीच्या प्रेमाचा उगम झाला असावा. गडकिल्ले पाहण्याचा त्यांना छंदच होता.
लेखन–वाचनासोबतच भ्रमण हादेखील त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता. गावोगावीचे गड-किल्ले-लेणी-देवळे इत्यादी जणू त्यांचे जिवाभावाचे सुहृदच.

गोनीदांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण यंदाच्या मराठी भाषा दिवस उपक्रमांतर्गत त्यांना वाहूया चित्रपुष्पांजली!

आपण वेळोवेळी अनेक अनवट जागी असलेल्या गड-किल्ले-लेणी-देवळे यांना भेटी दिल्या असतील, त्यांचे फोटो काढले असतील, तर ते सर्व इथे संकलित करूया.

नियम, अटी, सूचना!

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. हा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची स्वतः काढलेली प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली चित्रं, ती प्रताधिकारमुक्त असली तरी, देऊ नयेत.
३. देवळे / मंदीर यांची प्रकाशचित्रं देताना त्यांचं स्थापत्य अधोरेखित होईल व प्रामुख्यानं बाह्यदर्शन होईल अशा प्रकारचं चित्रण अपेक्षित आहे. शक्यतो पूजेतली मूर्ती नको, पण बाकी कोरीवकाम, दीपमाळ, कळस इत्यादी चालेल.
४. प्रकाशचित्राबरोबरच त्याबाबत स्थळकाळाची माहिती देणारे दोन शब्द जरूर लिहावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा प्रकाशचित्रं देऊ शकतो, मात्र सलग दोन प्रकाशचित्रं देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण येथे पाहा -http://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार सुंदर फोटो सर्वच.

कृष्णा नगर जिल्ह्यात अशी मस्त देवळे बघितली आहेत काही, अकोले भागात नाही गेले. पण हर्पेन ह्यांनी नेवासे इथला फोटो टाकलाय ते बघितलं, नेवासे येथील मोहिनीराज पण बघितलं, त्याचे फोटो पण असतील कदाचित अल्बममध्ये.

उपरोक्त चित्र अमृतेश्वर मंदीर रतनवाडीचे दिसतेय!

हेच मलहि पोस्ट करयचे होते पण वेळ संपली म्हणे म्हणून केले नाही!

Pages