चित्रपुष्पांजली - चित्रपुष्प स्वीकारणे बंद करत आहोत.

Submitted by संयोजक on 28 February, 2016 - 07:50

गो. नी. दांडेकर हे प्रामुख्यानं कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. पण त्यांनी धर्म, संस्कृती, इतिहास या विषयांवरही विपुल लेखन केलं आहे. शिवकालीन इतिहास हा तर त्यांच्या विशेष आवडीचा विषय होता. त्यातूनच त्यांच्या किल्ल्यांविषयीच्या प्रेमाचा उगम झाला असावा. गडकिल्ले पाहण्याचा त्यांना छंदच होता.
लेखन–वाचनासोबतच भ्रमण हादेखील त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता. गावोगावीचे गड-किल्ले-लेणी-देवळे इत्यादी जणू त्यांचे जिवाभावाचे सुहृदच.

गोनीदांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण यंदाच्या मराठी भाषा दिवस उपक्रमांतर्गत त्यांना वाहूया चित्रपुष्पांजली!

आपण वेळोवेळी अनेक अनवट जागी असलेल्या गड-किल्ले-लेणी-देवळे यांना भेटी दिल्या असतील, त्यांचे फोटो काढले असतील, तर ते सर्व इथे संकलित करूया.

नियम, अटी, सूचना!

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. हा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची स्वतः काढलेली प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली चित्रं, ती प्रताधिकारमुक्त असली तरी, देऊ नयेत.
३. देवळे / मंदीर यांची प्रकाशचित्रं देताना त्यांचं स्थापत्य अधोरेखित होईल व प्रामुख्यानं बाह्यदर्शन होईल अशा प्रकारचं चित्रण अपेक्षित आहे. शक्यतो पूजेतली मूर्ती नको, पण बाकी कोरीवकाम, दीपमाळ, कळस इत्यादी चालेल.
४. प्रकाशचित्राबरोबरच त्याबाबत स्थळकाळाची माहिती देणारे दोन शब्द जरूर लिहावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा प्रकाशचित्रं देऊ शकतो, मात्र सलग दोन प्रकाशचित्रं देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण येथे पाहा -http://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्पेन तोरणा खूपच सुंदर फोटो!!
वर्षु सगळ्या चीनी आणि अति-पूर्वेच्या देवळांचे फोटो सुरेख! रंगीबेरंगी सजावटीत तिकडच्या देवळांचे, दक्षिण भारतातल्या देवळांशी फार साधर्म्य आहे. Happy

मंडपेश्वर गुंफा, बोरीवली, मुंबई. वर्षभर ह्या गुंफा असलेल्या भागात बाजूच्या झोपडपट्टीमुळे जाऊ नये वाटते. पण त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री इकडे जत्रा असते. जत्रा म्हणजे गर्दी ह्या अर्थाने. त्या रात्री लोक पणत्या लाऊन परिसर उजळून टाकतात... त्या मागची कथा मला माहीत नाही. कुणाला माहीत असल्यास ऐकायला आवडेल.

गोव्यामधील तांबडी सुरला येथील महादेव मंदिर. गोव्यातील सर्वात प्राचीन मंदिर, हे मंदिर दाट जंगलात आहे, जवळूनच एक नदी वाहते.

IMG_1343.JPG

थांकु vt220 ..

वाट (मंदिर)चेडी लुआंग - चिंगमाय , थायलँड.
१४व्या शतकात या मंदिराचे बांधकाम सुरु झाले , पण संपायला पंधरावे शतक उजाडायला लागले. ८२ मीटर उंच आणी ५२ मीटर चा परीघ असलेली ही इमारत, लाना साम्राज्य काळातील सर्वात भव्य इमारत होती.

Oṃ maṇi padme hūṃ[1] (Sanskrit: ओं मणिपद्मे हूं) is the six-syllabled Sanskrit mantra particularly associated with the four-armed Shadakshari form of Avalokiteshvara, the bodhisattva of compassion. The first word Om is a sacred syllable found in Indian religions. The word Mani means "jewel" or "bead", Padme meaning the "lotus flower", the Buddhist sacred flower, while Hum represents the spirit of enlightenment

लदाख मधे फिरताना सगळीकडे हि अक्षरे रंगवलेली दिसतील...

वा.. विकु.. तुझ्या फोटोची ही भर पडली.. सुंदर!!

बर्मी टेंपल.. हे चिंगमाय मधील एकुलते एक बर्मीज टेंपल.

चिंगमाय प्रॉविंस ला अगदी जवळजवळ लागूनच आहे म्यांमार ची सीमा त्यामुळे मोठ्या प्रमाणात बर्मी शरणार्थी इकडे येतात. थाय सरकार त्यांच्या पुनर्वसाकरता खूपच प्रयत्नशील दिसले.

लोणावळ्याहुन अ‍ॅम्बी व्हॅलीकडे जायच्या रस्त्यावर लागणारा कोरीगड. समुद्रसपाटीपासुन उन्ची ९२३ मीटर. ट्रेकींगसाठी खुप कठीण नसावा. पावसाळी वातावरणात छान दिसतो.

वाड्याचं विमलेश्वर मंदिर एका दगडात(कातळात) बांधलं आहे. दोन्ही बाजूला हत्ती आहेत (ते दीपमाळा आहेत त्यामुळे अस्पष्ट दिसतायेत). हत्तीवरचे माहूत दिसतायेत.

vimleshwar vada.jpg

श्री गंगाधरेश्वर मंदिर अकोले.. आमच्या गांवातील साधारण १७ व्या शतकातले हे मंदिर शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे!

Gangadhar.jpgGangadhar2.jpg

प्रवरा तिरी असलेले शिल्पकलेचा अजून एक उत्कृष्ट अविष्कार असलेले पुरातन सिद्धेश्वर मंदीर.

हे म्हणे जमिनी खाली होते शेकडो वर्षांपुर्वी जमिन नांगरताना फाळ कळसाला अडकल्याने हे सापडले!

Siddheswar.jpg

वरती उत्तमोत्तम छाया चित्रकारांनी काढलेले फोटो आहेत त्या पुढे माझे हे फोटो जरा गरीब वाटतील पण स्थळ माहत्म्यासाठी हे फोटो इथे पोस्ट करण्याचे धाडस केलयं. मायबोलीकरांनी पोस्ट केलेल्या भरजरी जरतारी मखमली वस्त्रांसोबत माझी ही छोटेशी ठिगळांची घोंगडी समजा! Happy

कृष्णा - घोंगडीची ऊब भरजरी जरतारी मखमली कापडाला नसते

लईच आवडली घोंगडी अजून काही वाकळ, गोधडी, चौघडी काय असलं तर दावा की

अकोले म्हणजे नगर जिल्ह्यातलं का ?
>>>>>

बरोबर!! Happy तेच ते ते जिथे कळसूबाई, भंडारदरा, रतनगड, पट्टा किल्ला आदी बरीच उत्तमोत्तम ठिकाणे आहेत! आणि निसर्गानेही ज्या तालुक्याला भरभरुन दिलयं! Happy

बीड जिल्ह्यातील माजलगांव तालुक्या जवळील केशवराज मंदिरातील भगवंताची अत्यंत सुबक प्रतिमा...
तिरुपती येथिल श्री बालाजींची एवढया जवळुन नाही पाहता येत. परंतु माझ्या पाहण्यातील ही आजवरची सर्वांग सुंदर मुर्ती! मुर्तीच्या डोक्यामगील प्रभावळीवर भगवंताचे दशावतार कोरलेले आहेत!

keshavaraaj.jpg

Pages