चित्रपुष्पांजली - चित्रपुष्प स्वीकारणे बंद करत आहोत.

Submitted by संयोजक on 28 February, 2016 - 07:50

गो. नी. दांडेकर हे प्रामुख्यानं कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. पण त्यांनी धर्म, संस्कृती, इतिहास या विषयांवरही विपुल लेखन केलं आहे. शिवकालीन इतिहास हा तर त्यांच्या विशेष आवडीचा विषय होता. त्यातूनच त्यांच्या किल्ल्यांविषयीच्या प्रेमाचा उगम झाला असावा. गडकिल्ले पाहण्याचा त्यांना छंदच होता.
लेखन–वाचनासोबतच भ्रमण हादेखील त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता. गावोगावीचे गड-किल्ले-लेणी-देवळे इत्यादी जणू त्यांचे जिवाभावाचे सुहृदच.

गोनीदांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण यंदाच्या मराठी भाषा दिवस उपक्रमांतर्गत त्यांना वाहूया चित्रपुष्पांजली!

आपण वेळोवेळी अनेक अनवट जागी असलेल्या गड-किल्ले-लेणी-देवळे यांना भेटी दिल्या असतील, त्यांचे फोटो काढले असतील, तर ते सर्व इथे संकलित करूया.

नियम, अटी, सूचना!

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. हा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची स्वतः काढलेली प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली चित्रं, ती प्रताधिकारमुक्त असली तरी, देऊ नयेत.
३. देवळे / मंदीर यांची प्रकाशचित्रं देताना त्यांचं स्थापत्य अधोरेखित होईल व प्रामुख्यानं बाह्यदर्शन होईल अशा प्रकारचं चित्रण अपेक्षित आहे. शक्यतो पूजेतली मूर्ती नको, पण बाकी कोरीवकाम, दीपमाळ, कळस इत्यादी चालेल.
४. प्रकाशचित्राबरोबरच त्याबाबत स्थळकाळाची माहिती देणारे दोन शब्द जरूर लिहावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा प्रकाशचित्रं देऊ शकतो, मात्र सलग दोन प्रकाशचित्रं देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण येथे पाहा -http://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दौलताबादचा किल्ला
जंजीर्‍याप्रमाणेच हा देखील अभेद्य आणि अजिंक्य किल्ला आहे. हा कोणालाही कधीही लढून घेता आला नाही.

DSC03054.JPG

नेवासे येथील जिथे पैसाच खांब आहे ज्याला टेकून ज्ञानेश्वरी रचली गेली असे म्हटले जाते तिथे बांधलेले मंदीर

Newase Dnyaneshwari Mandir.JPG

माबोवरच पूर्वी कधीतरी पूर्वप्रकाशितः

राजगडाच्या चोरदरवाज्याबाहेरिल लगेचची तीव्र उताराची वाट...
rajgad utaratana 100_2188_0.JPG

मावळांतील एका देवळाचा कलशारोहण कार्यक्रम
F1980016 kalashasthaapana1.JPG

भक्तिशक्ति - निगडी
ratra 11 DSCN2480.jpg

मुग्धटली - ऐ ते न
माझ्या माहीती / आठवणी प्रमाणे भक्ती-शक्ती ही एक अजोड शिल्पकृती आहे. अर्थात त्याचे मंदीर झाले असल्यास माहीत नाही.

असो परत वळतो मूळ विषयाकडे
वेरूळ येथील कैलास लेणं

DSC02852.JPG

जौद्या हो हर्पेन भौ,
पण आम्हा पिंचीकरांसाठि भक्तिशक्तिची ती पंचविसेक मीटर उंच टेकडी किल्ल्याप्रमाणेच आहे. आजही ऐतिहासिक काळाप्रमाणेच या भक्तिशक्ति किल्ल्याचे दरवाजे सुर्यास्तानंतर साडेआठ वाजता बंद होतात ते दुसर्‍या दिवशीच्या सुर्योदयालाच उघडतात... Proud
अन मंदिराचे म्हणाल, तर छत्रपती अन तुकाराम बुवा, दोघेही दैवतच हो आमच्यासाठी.....

सुरुवात माझ्या गावापासुन... सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यात जुना किल्ला विजयदुर्ग! बाराव्या शतकाच्या अखेरीस राजा भोज द्वितीय याने बांधलेला आणि १६५३ मध्ये आदिलशहाकडून जिंकून घेतल्यावर शिवाजी महाराजांनी ह्याचा विस्तार केला. किल्ल्याच्या बाजूने वाघोटण खाडी आहे. मोठी जहाजे ह्या खाडीत येऊ शकत नाहीत आणि मराठ्यांची गलबते समुद्रातून सहज दिसत नसे. त्यामुळे एके काळी हा किल्ला जवळपास अजिंक्य होता. ब्रिटीश काळात त्याला पूर्वेचे जिब्राल्टर सुद्धा म्हटले जायचे.
खालील छायाचित्रात एका टेहेळणी खिडकीतून दिसणारी पश्चिम भिंत.

आतापर्यंत खूप सुंदर चित्रे आली आहेत.
प्रकाशचित्राबरोबरच त्याबाबत स्थळकाळाची माहिती देणारे दोन शब्द जरूर लिहावे. हा नियम प्लीज पाळा.

अन्जू, विमलेश्वर देवळाचा एक फोटो माझ्याकडे आहे पण जुन्या काळातला फिल्म कॅमेराचा. ते देऊळ आणि परिसर खुपच सुंदर आहे. कोकणातली बरीच पुरातन देवळे पांडवानी वनवास काळात एका-एका रात्रीत बनवल्याच्या आख्यायिका असतात. Happy

vt२२० विमलेश्वर देऊळ आणि परिसराचा असेल तर द्या. माझ्याकडे देवळाचा आहे मुख्य आणि कालभैरवाचा बाहेरचा भाग आहे, पण एवढे खास वाटत नाहीयेत म्हणून टाकले नाहीत. विजयदुर्ग समुद्रदर्शन मस्त फोटो.

हो कोकणातील बरीच शिवमंदिरे पांडवानी एका रात्री बांधली अशी अख्यायिका आहे, त्यांना इथे दक्षिण कशी करायची होती, अशी सेम स्टोरी ऐकायला येते.

आसूद ता. दापोली, रत्नागिरी येथील श्री केशवराज मंदिर. नदी पार करून, टेकडी एवढ्या पायर्‍या चढून गेल्यावर याचे दर्शन होते Happy
पण तिथल्या निसर्गसौंदर्यामुळे सगळे श्रम विसरायला होते..

keshvraj.jpg

आणि हे विजयदुर्गाचे दुसरे दर्शन! हे ब्रिटीशकालीन रेखाचित्र छत्रपति शिवाजी महाराज संग्रहालय फोर्ट मुंबई मध्ये दिसले. तिथल्या कोकणवासी सुरक्षारक्षकाने आम्हाला हा फोटो काढू दिला! Happy
संग्रहालयात इतर अशीच रेखाचित्रे उपलब्ध आहेत - राजापूरची खाडी, भोर घाट, कारले लेणी इत्यादि.

हे उत्तर थायलँड मधील फुंग थाओ चायनीज देऊळ. मूळ देऊळ १८७६ मधे बांधले गेले होते, पण ते डागडुजी करण्या पलीकडल्या अवस्थेत गेल्याने १९९८ मधे पुनर्निमाण करण्यात आले.

हा सिंधुदूर्ग किल्ला.
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ व ४५ दगडी जिने आहेत.ह्या किल्ल्यावर शिवकालिन ३ गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एकमेव मंदिर आहे. हे मंदिर राजाराम महाराजांनी बांधले.

चीन च्या दक्षिण पश्चिमे कडे असलेल्या स'छुवान प्रांतातील मिंगशान पर्वतश्रेणी च्या कुशीत वसलेले हे छोटसं तिबेटिअन खेडं.. आणी या खेड्यातील ही भलीमोठी मोनेस्ट्री.. समुद्रसपाटी पासून १४००० फुट उंचीवर असल्याने
चारही बाजूने बर्फाच्छादित शिखरे सतत या खेड्याकडे डोकावून बघत असतात.

शोभा अगं आता मी हाच टाकत होते! Happy
सिंधुदुर्ग म्हणजेच मालवण किल्ला ना? बोटीतून किल्ल्यावर जाताना माझ्या तोंडी गाणे होते...
"मालवण पाण्यामधे किल्ला, शिवाजी आत कसा शिरला... शिरला तर शिरला, तयाने झेंडा कसा रोविला!"

हे मुंबईनजीक अंबरनाथ मधील पुरातन शिवालय. हे देखील शिलाहार काळातील आहे. आम्ही जेव्हा तिथे गेलेलो तेव्हा पेपरात आलेल्या माहितीप्रमाणे हे हेमांडपंथी स्थापत्यशास्त्राचा नमुना आहे. वेळेअभावी आता इथे मी जास्त लिहित नाही. खालील दुव्यावर जास्त माहिती मिळेल.
http://www.esamskriti.com/essay-chapters/The-Puratan-Shivalaya-in-Ambern...

अन्जू विमलेश्वराचे फोटो प्रिंटेड आहेत गं! Sad

मालवण पाण्यामधी किल्ला, हे गाणं मलाही आठवलं.

अंबरनाथच्या शिवमंदिर फोटोंची वाटच बघत होते मी, नाहीतर आमच्याकडे आहेत का बघणार होते.:)

९५० वर्षे झाली मध्ये या देवळाला, दोन वर्ष झाली बहुतेक. खूप मोठा महोत्सव झाला.

Pages