चित्रपुष्पांजली - चित्रपुष्प स्वीकारणे बंद करत आहोत.

Submitted by संयोजक on 28 February, 2016 - 07:50

गो. नी. दांडेकर हे प्रामुख्यानं कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. पण त्यांनी धर्म, संस्कृती, इतिहास या विषयांवरही विपुल लेखन केलं आहे. शिवकालीन इतिहास हा तर त्यांच्या विशेष आवडीचा विषय होता. त्यातूनच त्यांच्या किल्ल्यांविषयीच्या प्रेमाचा उगम झाला असावा. गडकिल्ले पाहण्याचा त्यांना छंदच होता.
लेखन–वाचनासोबतच भ्रमण हादेखील त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता. गावोगावीचे गड-किल्ले-लेणी-देवळे इत्यादी जणू त्यांचे जिवाभावाचे सुहृदच.

गोनीदांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण यंदाच्या मराठी भाषा दिवस उपक्रमांतर्गत त्यांना वाहूया चित्रपुष्पांजली!

आपण वेळोवेळी अनेक अनवट जागी असलेल्या गड-किल्ले-लेणी-देवळे यांना भेटी दिल्या असतील, त्यांचे फोटो काढले असतील, तर ते सर्व इथे संकलित करूया.

नियम, अटी, सूचना!

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. हा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची स्वतः काढलेली प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली चित्रं, ती प्रताधिकारमुक्त असली तरी, देऊ नयेत.
३. देवळे / मंदीर यांची प्रकाशचित्रं देताना त्यांचं स्थापत्य अधोरेखित होईल व प्रामुख्यानं बाह्यदर्शन होईल अशा प्रकारचं चित्रण अपेक्षित आहे. शक्यतो पूजेतली मूर्ती नको, पण बाकी कोरीवकाम, दीपमाळ, कळस इत्यादी चालेल.
४. प्रकाशचित्राबरोबरच त्याबाबत स्थळकाळाची माहिती देणारे दोन शब्द जरूर लिहावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा प्रकाशचित्रं देऊ शकतो, मात्र सलग दोन प्रकाशचित्रं देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण येथे पाहा -http://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्पेन हा फोटो खास तुमच्यासाठी Happy

श्री संगमेशवर मंदिर सासवड एसटी स्थानकापासून साधारण १-१.५ किमी अंतरावर कर्‍हा आणि चांबळी (भोगावती) नदीच्या संगमावर हे मंदिर वसले आहे.

कमला नारायण मंदिर बेळगाव जवळ देगाव नावाच्या गावात आहे. कदंब शैलीतील हे मंदिर १२ व्या शतकाच्या आसपास बांधलेलं आहे. मंदिरात अतिशय सुंदर कोरीवकाम आहे.
देगाव हे गाव बेळगाव पासून जवळ असलेल्या कित्तूर या गावापासून ५ किमी अंतरावर आहे. गावात अगदी ऐन वस्तीत आहे मंदिर. आम्ही गावात गेलो तेव्हा गाडी आलेली बघून तिथल्या पुरातत्व खात्याच्या माणसाने ते उघडून दिलं, अन्यथा बंद असतं. त्याचे अजून फोटो जमल्यास टाकीन नक्की Happy

बेळगाव पासून जवळ असलेल्या खानापूर तालुक्यातील हलसी (हलशी) गावातील हे भूवराह नरसिंह मंदिर. हे मंदिर सुद्धा गावात ऐन वस्तीत आहे. अतिशय शांत परिसर.

IMG_1318.JPG

किती सुरेख फोटो आहेत !

औंध (जि. सातारा) येथील यमाई देवीच्या मंदिर. मंदिराजवळचं संग्रहालय सुद्धा पाहण्यासारखं आहे.
20130525_150040.jpg20130525_150621.jpg

टेंपल ऑफ हेल किंवा शुभ्र मंदिर - चिंगराय-थायलँड

विसावे शतक संपता संपता या ९ देवळांच्या समूहाचे निर्माण कार्य जे सुरु झाले ते आजतागायत सुरुच आहे .संपूर्णपंणे पांढरे शुभ्र असलेल्या देवळा च्या बाहेरच्या अंगाला प्लास्टर मधे काचेचे तुकडे जडवलेले आहेत.त्यांवर सूर्यकिरण पडले कि संपूर्ण देऊळ नुस्ते चम चम करत असते.

मुग्धटली - ऐ ते न >>>> आईशप्पथ हर्पेन मी भक्ती शक्तीच नाव मंदिर संबंधातच ऐकत आलेय आजतागायत. बघण्याचा योग अनेकदा येउन परत गेलाय.. असो.. जौद्या.

कोल्हापूर जवळील खिद्रापूर शिवमंदिर >>>> शिव भोला भंडारी.

अतिशय सुंदर फोटो.

ऋचा बेळगावच्या मंदिराची माहिती छान आहे. पुढच्या भेटीत मी नक्की जाईन ही दोनही मंदिरे पाहायला.

सॉरी सॉरी मंडळी ! माबोवर पाहिले पिक आहे ...चुकून तिनदा क्लिक झाले .

हे मन्गेशीचे देऊळ आहे . माझा मुलगा अक्षय याने या देवळावरील छायाचित्रांवर आधारीत एक प्रोजेक्ट केलेला होता .

या चित्राचे वैशिष्टय हे की आजुबाजुला पाण्याचा थेंबही नसून देवळाचे प्रतिबिंब साकार करण्यात आलेले आहे.

हा ओरिजनल फोटो असून फोटो घेताना एक ट्रिक वापरली आहे.

धन्यवाद !

सुप्रिया

Pages