क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्होगच्या फक्त १९ इनिंग्ज झालेल्या आहेत . अजून तो खेळ्तोच आहे. शोर्ट स्पॅनमधले अ‍ॅवरेज डेसेप्टीव असते. पहिल्या बॉलवर सिक्स मारला तर त्याचा स्ट्राईक रेट ६०० होतो. असा एकेक दर इणिन्ग्ला एकेक सिक्स मारून जर तो प्रत्येक वेळी दुसर्‍या बॉलला आउट होत गेला तर त्याचे करीअर स्ट्राईक रेट ३०० धरायचे की क्वॉय?
व्होगच्या रेकॉर्डला अर्थ नाही असे नाही पण त्याने १९ इनिंग्ज मध्ये १२०४ धावा काढल्या आहेत त्यात तो आता सलग तीन चार इनिन्ग्ज नाबाद राहिल्याने असे चित्र दिसत आहे. पुढे ते कमी होत जाईलच.

अ‍ॅडम व्होग याची कसोटी सरासरी १००.०८ आहे>>>>
आताशी सुरुवात आहे त्याची. आपले पत्रकार प्रचंड उतावळे असतात लगेच ब्रॅडमन ला मागे टाकले... अहो ब्रॅडमन यांच्या ५२ कसोटी नंतर ची सरासरी ९९ च्या वर आहे.
सुनील गावसकरांच्या पहिल्या ४ कसोटीत ५ डावात ७७४ धावा होत्या.

संपूर्ण सिरीज मधे निर्विवाद वर्चस्व गाजवणारी आपली अंडर १९ टीम, फायनल मधे एकदम दुबळी ठरली. वेस्ट इंडिज ने पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला. अभिनंदन वेस्ट इंडिज. आणि टीम इंडिया बेटर लक नेक्स्ट टाइम .
१४५ चं टारगेट मुळात फारच छोटे होते, पण ठराविक अंतराने १-१ करत ५ विकेट्स घेऊन थोडी आशा निर्माण झाली होती. पण लो स्कोरिंग मॅच मधल्या आवश्यक गोष्टी.. अचूक गोलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण यांच्या कमतरतेने फायनल हरलो Sad

हो, बेटर लक नेक्स्ट टाईम. ठीक आहे, टॅलेंटेड मुले आहेत, द्रविडसारखा कोच आहे. २००० च्या दशकासारखा (किंबहुना त्याहूनही जास्त चांगला) काळ पुन्हा २०२० च्या दशकात यावा अशी इच्छा. Happy

कालची श्रीलंकेबरोबरची तिसरी म्याच एक्दम पुच्याट झाली. पैल्या मॅचमध्येच भारताने निष्काळजी पणा दाखवला . लंकेचा कोणताच प्लेअर प्रॉमिसिंग वाटला नाही आणि अन्हुभवींनाही काही जमले नाही.

दुसर्‍या सामन्यानंतर 'युवीला बॅटींगची अधिक संधी देईन' असे म्हणणार्‍या धोनीने तिसर्‍या सामन्यामधे अगदी चुकार धावा करायची गरज असतानाही युवीला बॅटींगची संधी दिली नाही. त्याऐवजी राहाणे वन डाऊन आला. युवीची बॉलिंग आधीसारखी परीणामकारक वाटत नाहीये. कोहली परतल्यावर बहुधा राहाणेला युवीपेक्षा prefer केले जाईल ह्याची हि लक्षणे आहेत का ? रैना, पंड्या फिक्स असावेत.

रैना, पंड्या नक्कीच खेळतील. रहाणे बाहेर जाईल. युवराज खेळेल आणी बाय डिझाईन, फारसं काही करायची संधी न मिळता किंवा काही करता येईल अशी शक्यता नसताना संधी मिळून बाहेर जाईल - असं माझं प्रेडिक्शन आहे. बघू काय होतं ते. Wink

रहाणेचा नंबर नंतर लागेल. आधी युवराज (एक एक को चुन चुन के मारूंगा). तसंही धोनी ने सांगितलय की 'झटपट क्रिकेटसाठी भारतीय संघात रहाणेचे स्थान अंतिम संघात पक्के नसेल, पण आयपीएलमध्ये त्याने नक्कीच सातत्य राखले आहे. त्यामुळे तो महत्त्वाचा खेळाडू असेल'

एका होतकरू खेळा डूची जागा अडवतोय. तसेच नेहरू देखील.>>>>
खरे तर तिनही फॉरमॅट साठी वेगवेगळा संघ ठेवायला हवा म्हणजे किमान ४२ खेळाडूंचा खेळ आजमावता येईल!!

सव्वा अब्ज लोक आहेत भारतात! किती तरी चांगले खेळाडू संधीविना संपून जातात! नेहरा पेक्षा कैक पटीनी चांगले बोलर असतील संधी अभावी बसलेले!!

एशिया कप, अमेरिकेत लाईव्ह कुठे बघता येईल? मी विलो टीव्ही ला विचारलं, पण त्यांनी ई-मेल केलीये की त्यांच्याकडे राईट्स नाहीयेत. मला पुढच्या शनिवारची भारत-पाकिस्तान तरी पहायची आहे.

मॅक्कलमची शेवटच्या टेस्टमध्ये फास्टेस्ट टेस्ट सेंच्युरी ऑफ ऑल टाईम! कसला दणादण मारतोय! कधी नव्हे ती लाईव्ह पाहायला मिळाली. Happy

<< सव्वा अब्ज लोक आहेत भारतात! किती तरी चांगले खेळाडू संधीविना संपून जातात! नेहरा पेक्षा कैक पटीनी चांगले बोलर असतील संधी अभावी बसलेले!! >> म्हणूनच, सव्वा अब्ज लोकांतून ११ जणांच्या संघात निवडून आलेल्या खेळाडूला थोडी दिली झालं अधिक संधी !! Wink

धोनी जखमी , 'अशिया कप'ला मुकणार ! संजू सॅमसनला संधी मिळायला हवी होती, असं मनापासून वाटतं.

कालची रोहितची फलंदाजी दृष्ट लागावी अशीच ! नेहरा इथली त्याच्यावरची शेरेबाजी वाचून बहुधा पेटून उठलाय !! Wink
<< धोनी जखमी , 'अशिया कप'ला मुकणार ! संजू सॅमसनला संधी मिळायला हवी होती, असं मनापासून वाटतं.>> पेपरमधली बातमी वाचून ही पोस्ट टाकली होती. त्यामुळे माझी विकेट इथं गेली ! Wink

भाऊ.. रोहीत खरंच भारी खेळला काल.
ती पूल करुन हाफ नटराज, हाफ हेलिकॉप्टर स्टाइल मारलेली सिक्स कमाल होती.

रोहित च्या बरोबरीनं, हार्दिक पंड्या पण जबरदस्त खेळला.

सेहवाग च्या शब्दात 'नेहरा जी ईज बॅक'.

शनिवार सार्थकी लावा रे बाबांनो.

भाऊ, अहो अफ्रिदी चं असं वयच काय आहे की त्याने निवृत्त व्हावं? अभी तो उसके खेलने-कुदनेके दिन है| जेमतेम तिशी गाठलीये त्याने. लीप ईयर मधे वाढदिवस साजरे करतो तो.

असामी, मुंबई - सौराष्ट्र रणजी फायनल फॉलो केलीत का? गहुंजे च्या पीच बद्दल भारत-श्रीलंका मॅच नंतर आपलं ईथे बोलणं झालं होतं, त्याप्रमाणे मिडियम पेसर्स ना साथ देणारी विकेट होती.

मुंबई जिंकली!!
श्रेयस अय्यरने सिझन गाजवला. त्याला ग्रुम करायला हवं.
धवल कुलकर्णी, लाड, सुर्यकुमार यादव वगैरे मंडळीपण चांगली खेळ्ली.

Pages