मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

छाया देसाई, काही एरर दाखवली जाते आहे का ? तुम्हाला येणार्‍या अडचणीचा स्क्रीन शॉट येथे टाकू शकाल का ? नाहीतर क्रमाक्रमाने काय काय केलेत (कोठे क्लिक केले इ.) हे सांगितलेत तर तसे बघता येईल.

अलका, मायबोलीच्या नुकत्याच पूर्ण झालेल्या स्थलांतराच्या वेळी आधी असलेल्या काही सुविधा गायब झाल्या आहेत. तुमचा प्रश्न अशीच एक समस्या दर्शवतो. अ‍ॅडमिन त्यावर काम करत आहेत.

तुम्ही येथे लॉगिन केले की उजव्या हाताला 'माझे सदस्यत्व' असा दुवा दिसेल, त्यात जाउन 'संपादन' अशा विभागात जात येईल. तेथे आपला फोटो टाकण्याची सुविधा दिसेल.

मि आत्ताच गुलमोहर मध्ये एक कविता लिहिलि. मात्र शीषक न लिहिल्यामुळे ति सेव्ह करुनही दिसत नाहि. काय करावे?

कृपया, "Impossible IQ Question, Is it bikini or lamp, bet you can't get it right" ही जहीरात जी साईडच्या कॉलम मधे येतेय ती काढुन टाकता येईल का?

१]साईझच्या सगळ्या स्पेसिफिकेशन्स पाळून देखील माझा फोटो 'अवलोकन' मधे लोड करता येत नाहीये काय करु? फोटोचे डीटेल्स असे- फोटो टाईप-JPEG Image (.jpeg) साईझ-6.59 KB (6,752 bytes) डायमेंन्शन-१००*१००
२] 'माझ्याबद्द्ल' ह्या भागात फोटो टाकता येतो का? असल्यास तो कसा टाकावा?

Namaskar,
Mala kavita havi ahe (Kavita mhanje stree navhe)...
Ravi gela re soduni aakashala, niz niz mazya bala..... hi kavita jar kunala mahit asel tar.. please mala send kara.. maza id
umeshmankar@gmail.com...
Dhanyawad...

Aaplach
Umesh Mankar

'काहीच्या काहि कविता' या विभागातिल कविता तेथुन काढुन 'कविता' या विभागात कशी टाकता येइल? कृपया सांगा.

समीर
याच पानावर वर हिरव्या रंगात हितगुज लिहीलय त्यावर टिचकी मारा तिथे हितगुज विषयानुसार असे असेल. तिथे सगळ्या बीबींची (बुलेटीन बोर्डांची) यादी मिळेल.

http://www.maayboli.com/node/2007 इथे जाऊन 'चालू घडामोडी' ग्रूपचं सदस्यत्व घ्यावं लागेल. त्या नंतर तुम्ही इतर बातमी फलकांवर ज्या प्रकारे पोस्ट टाकता आहात त्याच प्रकारे इथल्या 'गप्पांच्या पानावर' किंवा लेखनाच्या धाग्यावर तुम्हाला लिहिता येईल.

झब्बू मध्ये फोटो टाकण्यासाठी :
*जिथे झब्बुसाठी फोटो टाकायचा आहे त्या पानावर जा.
*प्रतिसादाच्या खिडकीखाली मजकुरात 'image' किंवा 'link' द्या अशी सोय आहे. तिथे 'image' वर क्लिक करा.
*आलेल्या खिडकीत 'upload' वर क्लिक करा.
*स्वतःच्या कंप्युटरमधे साठवलेली file शोधायला Browse वापरून फोटोची file upload करा.
*त्यानंतर send to text area हे बटण वापरल्यावर फोटो ची लिंक आता प्रतिसादाच्या खिडकीत दिसु लागेल.
*एकदा preview करून फोटो नॅट दिसतो आहे ह्याची खात्री करून save चं बटण क्लिक करा.

मला अनुस्वार लिहिता येत नाही.सुरुवातीला लिहिता येत होता.पण आता .न असे होते.काही शब्द जसे की अन्तर,बन्धन वगैरे लिहिता येणे शक्य आहे पण सगळेच शब्द अनुस्वाराशिवाय लिहिता येत नाहीत. ही मोठीच गैरसोय होते.काही पर्यायी व्यवस्था आहे का?

Pages