मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

रचनाशिल्प,
माहिती हवी आहे इथे जावुन तुम्ही एक नवीन धागा सुरु करुन हा प्रश्न विचारु शकता. नवीन धागा कसा सुरु करायचा हे इथे सविस्तर लिहीलय.

धन्यवाद, मदत समिती !
रचनाशिल्प

एखादा मायबोलीचा सदस्य शोधायचा असेल तर कसे शोधायचे ? सदस्यांची काही लिस्ट वगैरे आहे का ?

याच पानावर वरती आडव्या निळ्या पट्टीवर लिन्क आहे. Happy

मिळाले , तेच लिहायला आले होते .:)

नमस्कार संपदा,
याच पानावर "मायबोलीकरांची सूची" हा दुवा आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला सदस्यांची सूची पाहता येईल व सदस्य शोधता देखील येतील.

"मायबोलीकरांची सूची" हा दुवा "मदतपुस्तिका" विभागात आहे.

सस्नेह,
मदत समिती.

सॉरी मदत समिती , पण मायबोलीकरांची सूची हा दुवा मदत पुस्तिका विभागात आहे ना ? मायबोली विशेष मध्ये नाही . माझा गैरसमज झालेला नसावा . Happy

बरोबर संपदा. चूक दुरुस्त केली आहे. Happy

मला नविन लेखन करायचे आहे पण मुखप्रुष्टवर नविन लेखन अथवा सदस्य प्रवेश हा धागा दिसत नाही.

सुबोध पाटील,
तुम्ही इथे लिहु शकलात म्हणजे तुम्ही आधीच मायबोलीवर प्रवेश (लॉग इन) केलेला आहे. नवीन लेखन करण्यासाठी पानाच्या उजव्या बाजुला असलेला नवीन लेखन करा हा दुवा वापरा. गुलमोहोर विभागात फक्त स्वतः केलेले मराठी लिखाण टाकणे अपेक्षित आहे. तसच हे पण बघा.

धन्यवाद मदत समिती,

विरंगुळा मधे मला नविन गप्पांचे पान हा दुवा दिसतो आहे.

नवीन प्रणालीवर स्थलांतर झाल्यावर गुलमोहराचा चेहरा-मोहरा बदललाय. तुमच्या लक्षात आलं असणारच उदा.
१. गेल्या ७२ तासांमधलं लेखन ह्यात कोणत्याही विभागात गेल्यास, फक्तं टायटलच दिसतय. लेखक्/लेखिकेचं नाव, एकूण प्रतिसाद, नवीन प्रतिसाद असली माहिती गायब आहे. (ती चांगली माहिती होती.)
२. माझे सदस्यत्वं ह्यात, पाऊलखुणांमधे काही स्तंभांची शीर्षकं इंग्रजीत आहेत. उदा. Type, Replies

हे अपेक्षित आहे का?

काही दिवसा॑पासुन मला माबोवर लिखाण करण्यास अडचण येत आहे, कारण माझ्याकडे सदस्य प्रवेश ही खिडकी दिसत नाही. तसेच नविन लेखन करा हा दुवा देखिल दिसत नाही. आपली मदत हवी आहे

याहू मैल वर कुनाचा तरी प्रतिसाद अल अहे त्यात त्यन्च पत्त नहिइ अनि मग असे प्रतिसद कसे अभार मानवे... अणि त्यानि पुस्तक वाचन्याचि ईछा व्यक्त केली अहे ..

मदत्_समिती

परवा माझी फूल हि कविता मायबोली वर टाकली होती तीच कविता कुण्या स्वरूपा नावाने टईमपास ही टाईमपास या sight वर पुन्हा दिसली .जर कवित चोर मायबोलिवर अस्तील तर कश्या टाकव्य कविता? कसा ठेवावा विश्वास्?..आज मझ्या बाबतीत हे घदल उद्य नखी कुनच्या कविता चोरल्या जातील.?...कुणीतरी याची नक्की दखल घ्या.......नाही घाच....

मदत समिती...

१) नुतनीकरणापुर्वी अस्तित्वात असलेले सिग्नेचर हे फीचर गायब झाले आहे.
२) मला शिवाजी फोण्ट ची लिन्क हवी आहे.

धन्यवाद!

@ कल्पतरु
देवनागरीसाठी मदत हवी असेल तर प्रतिसाद लिहीता तिथे '?' बटन आहे त्यावर टिचकी मारा. ती सोय काढलेली नाही.
@ बाळुनाना
मायबोलीवर कुठलीही लिंक्/दुवा देण्यासाठी तुम्ही तो सरळ प्रतिसादात कॉपी + पेस्ट करु शकता किंवा प्रतिसादाच्या चौकटीवर साखळीचे चित्र असलेले बटन आहे( त्या डोळ्याच्या बटनाशेजारी) त्याचा वापर करु शकता.
@ वेदनगंधा
मायबोलीवरुन तुम्हाला कोणी इ-मेल केली असेल आणी त्यात त्या व्यक्तीचा पत्ता दिसत नसेल तरी तुम्ही त्या मेलला (रीप्लाय) उत्तर देवु शकता.

मायबोलीवर कुणीही चोरलेले साहित्य टाकू नये याबद्दल काळजी घेतली जाते, कोणी असे साहित्य मायबोलीवर टाकले तर योग्य ती कारवाई केली जाते, मायबोलीशी निगडीत नसलेल्या दुसर्‍या कुठल्या संकेतस्थळावर असे काही घडत असल्यास मायबोली काही कारवाई करु शकत नाही.

@फुलराणी
मायबोलीच्या नूतनीकरणामुळे 'विचारपूस' नेहमीच्या जागी न दिसता "माझे सदस्यत्व" मध्ये गेल्यावर पाऊलखुणाच्या बाजूला दिसते.

@ पल्ली
तुम्ही 'मदत हवी आहे' या ग्रूपमध्ये कवितेसंबंधी प्रश्न विचारु शकता.

'?' बटन आहे त्यावर टिचकी मारली. पण हा प्रोब्लेम येतो.
err.xls (121.5 KB)
मराठी / एन्ग्लिश फोन्ट सीलेक्टन ओपशन पण दिसत नाही. मदत करा...

कल्पतरु, तुम्ही सांगता तसेच मलाही दिसते आहे. बाकीची बटणे नीट चालताहेत. कदाचित माझ्या मशिनवर जावास्क्रिप्ट चा प्रॉब्लेम असेल.
अ‍ॅडमिन, कृपया पाहाल का ?

कल्पतरु,

नवीन धागा आपला आपणच चालू करता येतो. तेथे आपण पाहिजे तो विभाग निवडू शकता किंवा तसा अस्तित्वात नसेल तर तयार करु शकता.

'साहित्य लेखन' मध्ये 'बालगोष्टी' असं वर्गीकरण सध्या नाहीये, ते त्यात समाविष्ट केले जाईल. तोपर्यंत आपण कथा विभागात ते टाकू शकता. नंतर विभाग बदलायचा.

@ बाळुनाना
मायबोलीवर कुठलीही लिंक्/दुवा देण्यासाठी तुम्ही तो सरळ प्रतिसादात कॉपी + पेस्ट करु
>>>>>>>>>>>
धन्यवाद मदत समिती....:)

मूळ लेखात एकदा पोस्ट केल्यानंतर काही बदल झाला असेल तर तसे दिसते. उदा. नाव बदलले, लेखात बदल केला इ.

Pages