चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या ऐवजी कोई हसीना कापायला हवे होते. >> अनुमोदन अमा. अगदिच अस्थानी वाटतं ते गाणं. बाकी अख्खा सिनेमा भारी आहे.

होळीचे गाणे वगळता सगळी गाणी उपरीच आहेत. आम्ही तर सेवेन मगिनिफिशन्ट, सेवन सामुराइ , आणि शोले एकाच इंटेन्सिटीने बघतो. एकमेकाच्या काप्या असूनही: Proud

गब्बर तर इली वॅलेकवरून ढापलाय अक्षरशः

अस्सं..

१९७३ चा जोहर मेहमूद इन हाँगकाँग पाहिला.

स्टीव्ह मार्टीन, मायकेल केनचा डर्टी रॉटन स्काउंड्रल्स आधीचा कि नंतरचा ? नंतरचा असेल तर हिंदीवरून ढापला म्हणवत नाही. मग याच्या आधीचा सिनेमा शोधावा लागेल.
अनिल कपूर, माधुरी, पद्मविभूषण अनुपम खेर यांच्या भूमिका असलेला राकेश रोशनच्या खेल मधे वरच्या दोन्हीची ढापाढापी आहे.

मला पूर्वी शोलेची एक कॉपी सापडली होती..
त्यात संजीव कपूर गब्बरला ठेचून ठार मारताना दाखवला होता.. (पोलिस येतच नाहीत).
त्यात कैरीच्या सीनला .. जय: ये अपने आपको तात्या टोपे के पोते समझते हैं .. अशी ओळ होती..
.
पुढे... सेन्सारने हे बदलायला लावलं असावं तेव्हा पोलीस येतात आणि..
.
ये अपने आपको जेम्स बाँड्के पोते समझते हैं.... असा बदल झाला..
.
ती कॉपी माझ्या मित्राने (दुकानदाराला हरवली असे सांगून) ढापली , आणि ती सचिन-सुप्रियाला भेट दिल्याचे समजते..

१९७३ चा जोहर मेहमूद इन हाँगकाँग पाहिला.
>> तो तुम्हाला 'पाहवला ' या बद्दल तुमचे कौतुक !
जोहर मेहमूद सेरिजमध्ये जो मे इन गोवा हा सुसह्य आहे त्यातल्यात्यात . गाणीहे सुरेख आहेत.गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याचा बॅकड्रॉप दिल्याने बरा वाटतो. तत्कलीन भाबड्या प्रेक्षकाना सुटेबल होता.
१९७३ चा जोहर मेहमूद इन हाँगकाँग हा १९६४ च्या बेडटाईम स्टोरीची नक्कल आहे (मार्लन ब्रांडो,डेविड निवेन). यावरूनच पुन्हा डर्टी रॉटन स्काऊंड्रल्स (१९८८) चा रिमेक झाला आणि खेल ही नक्कलही.

रच्याकने, सिंगापोर हा शम्मी कपूरच चित्रपट पाहिला तर त्यातले तत्कालीन सिंगापोर एअर पोर्ट एखाद्या एस टी स्टँड सारखे दिसते. तेव्हा बहुधा ब्रिटीश आर्मीचे एअर पोर्ट वापरीत होते असे दिसते. काळ किती बदलला....

१९७३ चा जोहर मेहमूद इन हाँगकाँग >>>> हा असा नावाचा पण पिक्चर आहे होय... काय आहे नक्की या सिनेमात ????

मला पूर्वी शोलेची एक कॉपी सापडली होती..
त्यात संजीव कपूर गब्बरला ठेचून ठार मारताना दाखवला होता.. (पोलिस येतच नाहीत).
त्यात कैरीच्या सीनला .. जय: ये अपने आपको तात्या टोपे के पोते समझते हैं .. अशी ओळ होती..

>>>
मेरे पास ये डीव्हीडी है...!!!

ती कॉपी माझ्या मित्राने (दुकानदाराला हरवली असे सांगून) ढापली , आणि ती सचिन-सुप्रियाला भेट दिल्याचे समजते..
>>>
मी तो मित्रही नाही अन सचिन-सुप्रिया ही
Proud
Rofl

अँकी आणि गोगा,
तुमच्या त्या स्पेशल कॉपी मधे 'संजीव कपुर' खाना खजाना वाल्या शेफने ठाकुरचा रोल केला का संजीव कुमार ऐवजी Proud
बहुत नाइन्साफी है !

काल जॉय आणि साला खडूस बघितले..

जॉय मस्तच..
जे लॉरेन्स, रॉ डि निरो, तिची आई, आज्जी, नवरा..सगळ्यांनीच छान काम केलय.. ब्रॅडलि कुपर ला इतक फुटेज नव्हत तरी मस्त..

साला खडूस सुद्धा चांगलाय..
ती नवी अभिनेत्री खतरनाक आहे.. आर माधवन बद्दल क्या कहना तो सुद्धा मस्तच..
बघावा असा.. Happy

गब्बर म्हणजे लसुण आणि सं.क. लसुण ठेचुन फोडणीत घालतोय असे दृष्य डोळ्यासमोर आले... Happy

काल शैतान पाहिला, त्या आधी गेल्या आठवड्यात that girl in yellow boots पाहिला. कल्की अतिशय ताकदीची अभिनेत्री आहे. तिला तशा भुमिका मिळावयास हव्यात हे प्रकर्षाने जाणवले.

कल्की अतिशय ताकदीची अभिनेत्री आहे. तिला तशा भुमिका मिळावयास हव्यात हे प्रकर्षाने जाणवले.>>> +१ मला तर ती देव डी पासुनच आवडते.जिं.ना.मि.दो मधे खडुस कॅरेक्टर मस्त केलय तिने.

आज 'कश्मकश' पाहिला. ६ महिन्यापूर्वी शेवटचा अर्धा तास पाहिला होता. काही कळला नव्हता. खुप गुंतागुंत आहे इतकंच कळलं. पण आवडला. २ आठवड्यापूर्वी सुरुवातीचा अर्धा तास पाहिला. आता पूर्ण पाहणं गरजेच होतं. तो आज पाहिला.
मुळ बंगाली असलेला हा डब चित्रपट आहे. बंगाली नाव 'नौका डुबी' आहे. हेच नाव जास्त योग्य वाटतं. एका अपघातामुळे (नौका डुबी) ४ जणांचं आयुष्य काय वळण घेतं याची स्टोरी आहे. चित्रपट पाहताना stories by Ravindranath Tagore या मालिकेची आठवण झाली. थोडं सर्च केल्यावर कळलं की कथा रविंद्रनाथांचीच आहे. direction रितुपर्णो घोष यांचं आहे आणि कलाकार रिया सेन (कमला), रायमा सेन (हेम), जिशू सेनगुप्ता (रमेश), प्रोसनजीत चॉटर्जी (नलीनक्ष). जिशू सेनगुप्ताचं काम मला जास्त आवडलं. पण for a change रिया सेनही छान वाटली. कथा खुपच गुंतागुंतीची आहे. मला ती नीट मांडता येईल असं वाटत नाही. &pictures HD वर बर्याचदा लागतो. पाहीला नसेल तर जरूर पहा. YouTube वर पण आहे.

काल अचानक एका चॅनलवर `देल्ही बेली' जस्ट सुरू झालेला दिसला. मग आख्खा बघितला. एकदम टीपी सिनेमा आहे. तशी टिपिकल बॉलिवुडी स्टोरी, पण वेगवान स्क्रिप्ट, कॉमेडी थ्रिलर, सर्वांची कामं अगदी सहज झालेली... ते 'भाग भाग डी के बोस' गाणं केवळ ५-१० सेकंदांसाठी ऐकू येतं. स्क्रिप्ट इतकं गुंतवून ठेवणारं आहे, की शेवटी ते गाणं लक्षातही राहत नाही.

आज रुम चित्रपट बघतेय..
इतक्या छान चित्रपटाच मार्केट तर पाहा.. अख्ख्या पुण्यात दिवसाचे फक्त तीन शोज.. म्हणाव तर काल रिलीज झाला..पण किती दिवस सुरु असेल कुणास ठाऊक..

भाग भाग डी के बोस या गाण्यात मला तरी काही वावगं वाटल नै.. हे उगा गाण कस घाण आहे म्हणत लोक शिवीगाळ स्वतःच करतात.. मुर्ख लेकाचे.. चित्रपट मला सुद्धा आवडला.. मज्जा आली पाहताना Proud

सध्या, सिडीज चे मार्केट थंडावले आहे का ? मी इथे नवीन चित्रपटांची नावे बघतो आणि भारतात जाऊन सीडिज ची चौकशी करतो, तर असे सांगतात कि त्या अजून बाजारात आलेल्याच नाहीत ! आता र्‍हिदम हाऊस बंद झाले तर, कुठे शोधू ?

सर्वात आधी सर्व चित्रपटरसिकांची क्षमा मागतो.

वोह कौन थी हा सिनेमा मी काल पैल्यांदा पाहिला. जरासुद्धा अंदाज नव्हता कथेचा हे बरं झालं. असे जुने सिनेमे पाहताना मेंदूचा एक भाग आपोआप त्या काळात जाऊन त्या काळातल्या प्रेक्षकांच्या उदारमतवादाप्रंमाणे हार्ड डिस्क फॉर्मट करून टा़कतो. मग अचंच का अन तच्चंच का हे प्रश्न पडत नाहीत. काही चुका जाणवतात पण माफ करून टाकलं. त्याचा फायदा आपल्यालाच. शिणुमामा एण्जॉय करता आला.

एक आई आणि तिचा जेमेतेम पाच वर्षाचा मुलगा घरामागिल शेड मधे ज्याला ते रुम संबोधतात बंद असतात.. ती रुम म्हणजेच त्यांच जग असत.. त्यापलिकडे काही आहे हे त्या लहानग्याच्या खिजगणतीतही नसतं... ती आई जी तिथे ७ वर्षापासुन अडकुन असते ती त्या मुलाला बाहेर काढून स्वतःची त्या इसमापासुन सुटका करुन घेण्यात यशस्वी ठरते.. इतक्या वर्षानंतर बाहेर आलेली ती आणि जगाची अजिब्बात ओळख नसलेला तो छोटा मुलगा यांची त्या जगात सामावुन घेतानाची धडपड, त्याच अन त्याच्या आईच भावविश्व, एकाएकी समोर आलेला जगाचा लोकांचा पसारा समजावुन घेताना आलेल बावरलेपन, हे सगळ म्हणजे 'रुम' नावाचा चित्रपट..
यावर्षीच्या बेस्ट पिक्चर साठी ऑस्कर नामांकन मिळालेला..
सुंदर .. नक्की बघावा असा..

परवा सहज शोधाशोध करताना घुंघट हा १९६० मधला चित्रपट दिसला. कलाकारांमधे भारत भूषण, प्रदीप कुमार आणि बीना राय अशी मातब्बर नावं बघून केवळ अतीव उत्सुकतेपोटी आणि आपल्या सहनशक्तीची परिसीमा कुठवर आहे ते बघण्यासाठी हा चित्रपट बघायला सुरुवात केली. आणि आश्चर्याचा धक्का बसला!
चित्रपटाची मूळ कथा टागोरांच्या एका कथेवरून घेतली आहे आणि ती काहीशी हटके आहे, भा.भू., प्र. कु. आणि बीना राय या तिघांच्या गंभीर भूमिका आहेत आणि तिघांनीही चक्क चांगलं काम केलं आहे! भा. भू. चित्रपटात बराच वेळ सूटबूट अशा मॉडर्न वेषभूषेत आहे त्यात तो चक्क देखणा दिसतो Happy गाणी चांगली आहेत आणि कथानक वेगवान आणि अनपेक्षित कलाटण्या असणारं आहे त्यामुळे चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
मला वाटतं त्याकाळी हा चित्रपट गाजला होता आणि बीना रायला फिल्मफेअर पुरस्कार याच चित्रपटासाठी मिळाला होता. कुठलाही नियमाला काहीतरी अपवाद असतोच त्यामुळे भा. भू. आणि प्र. कु. हे अभिनयात ठोकळे आहेत या नियमाला हा चित्रपट अपवाद ठरू शकेल Happy

अनुपमा (चित्रपट न पाहिलेल्यांनी पुढील पोस्ट मुळीच वाचू नये)

'अनुपमा' चित्रपट पहायची पंचवार्षिक योजना आखून पण किती वर्षं होऊन गेली. किती वेळा ब्लेक एन्ड व्हाईट चॅनेल वर लागलेला असायचा पण फार रडारड असेल ह्या भीतीने दर वेळी मी चॅनेल बदलून पुढे निघून जायचे. काल अचानक सर्फिंग करताना पुन्हां लागलेला दिसला. धर्मेंद्र, त्याची आई दुर्गा खोटे, बहिण आणि मित्र देवेन वर्मा हिलस्टेशनवर येत होते. म्हटलं थोडं वेळ पाहू आणि रडारड सुरु झाली की इथून कटू. 'कुछ दिल ने कहा' ऐकायची इच्छा होतीच. पिक्चर पहायला सुरुवात केली आणि शेवटपर्यंत पाहिला. Happy माझ्या सुदैवाने शर्मिला टागोर ची आई मरते वगैरे भाग आधीच लागून गेला असल्याने चित्रपटाच्या पुढल्या भागात फार अश्रुपात नव्हता.

कथा फारशी गुंतागुंतीची नाही नाहीतर काही जुन्या हिंदी चित्रपटांच्या कथा विकीवर वाचताना आपल्यालाच चक्कर येते. मुलीला जन्म देऊन बायको देवाघरी गेली म्हणून त्या मुलीचा राग करणारा बाप, आयुष्यभर स्वत:ला दोषी मानून जगल्यामुळे दबलेली, लोकांपासून तुटलेली नायिका आणि तिला ह्यातून बाहेर काढणारा सरळमार्गी नायक. बस! पण एकेक व्यक्तिरेखा मस्त आहेत अगदी. तसा शर्मिला टागोरचा रोल कोणात फारशी मिक्स न होणाऱ्या, आत्मविश्वास नसलेल्या मुलीचा हे मान्य. पण तरी तिचं न बोलणं मला कित्येकदा असह्य झालं. तिचे दोन्ही खांदे हलवून 'बोल ग बाई काहीतरी' असं म्हणावं असं अनेकदा वाटलं Happy धर्मेंद्रचा साधा, स्वत:वर विश्वास असलेला नायक आवडला. एकदम नवरा मटेरियल! Happy शशिकला ची अनिता थोडी अति चुलबुली वगैरे वाटली पण तिचा खलनायिकेचा रोल नाही हे पाहून बरं वाटलं. कारण 'या दिलकी सुनो' ह्या गाण्यात तिला अंधारातून धर्मेंद्रकडे बघताना पाहिल्यामुळे ही त्याच्यावर लाईन मारते आहे आणि शर्मिलाला नडणार अशी माझी पक्की खात्री झाली होती. देवेन वर्मा तरुणपणी क्युट दिसायचा ह्याचा साक्षात्कार झाला. दुर्गा खोटेंची आई मस्त. विशेषत: त्या शर्मिला बाकी लोकांत बसून जेवणार नाही हे कळल्यावर तिच्या सोबत जेवायला जातात तो प्रसंग पाहिल्यावर 'ऐसीइच सासू मंगती है' असं वाटून गेलं एकदम Happy डेव्हिड ह्यांचा सह्रदय डिव्होर्स लॉयर आणि ब्रह्मा भारद्वाज ह्यांनी रंगवलेली शशिकलाच्या वडिलांची व्यक्तिरेखा पण छान. कसं जमायचं त्या वेळी ह्या लोकांना अश्या क्युट व्यक्तिरेखा लिहिणं? आपण वीस-पंचवीस वर्षं आधी जन्माला यायला हवं होतं असं पुन्हा एकदा वाटून गेलं. कदाचित आजच्यापेक्षा मी त्या काळात अधिक रमले असते. असो. तरुण बोस मात्र जरा जास्तच व्हिलनिश दिसलेत बुवा. धर्मेंद्रच्या घरी शर्मिलाला न्यायला ते येतात तेव्हा एक चिडलेला बाप मुलीला घरी घेऊन जायला आलाय असं वाटायच्या ऐवजी एक व्हिलन नायिकेला किडनॅप करायला आलाय असंच वाटलं.

'कुछ दिल ने कहा' पुन्हा एकदा ऐकलं आणि पाहिलं. सुरुवातीचा पक्ष्यांचा किलबिलाट खासम खास. पार्टीत 'या दिलकी सुनो दुनियावालों' सुरु व्हायच्या आधी शशिकला लाईट्स डीम करते म्हणून अपुऱ्या प्रकाशात त्याचे शब्द ऐकताना किती सुरेख वाटतं. 'ये फूल चमनमें कैसा खिला, मालीकी नजरमे प्यार नही' हे शब्द नायिकेच्या दु:खाची नस् अचूक पकडतात. ह्या जुन्या गाण्यांचं एक असतं, शब्द किती दर्दभरे असले तरी गाण्याचं संगीत ऐकून एक प्रकारची प्रसन्नता वाटते. डिप्रेशन येत नाही आणि उदास वाटत असेल तर औदासिन्य कुठल्या कुठे पळून जातं. हे कसं काय जमवलं असेल त्या संगीतकारांनी देव जाणे! 'धीरे धीरे मचल ऐ दिल-ए बेकरार' ऐकायला मिळालं नाही पण तेही मला फार आवडतं. लग्न करूनही प्रेमात असलेल्या जोडप्यांची (!) गाणी तशी फार नाहीत हिंदी चित्रपटांत, बागेत जे नाचा-बागडायचं ते लग्नाआधी हा जणू अलिखित नियम. ह्या बाबतीत रील-लाईफ आणि रियल लाईफ ह्याम्च्यात एकवाक्यता आहे. असल्या पार्श्वभूमीवर पियानो वाजवता वाजवता कृतक रागाने नवर्याच्या तोंडातून सिगारेट काढून घेणारी बायको बघायला छान वाटते. मला तर ते घर सुध्दा मस्त वाटतं. एकदम मोकळंढाकळं, प्रसन्न, येणाऱ्या बाळाचं स्वागत करायला उत्सुक असं.

अर्थात हिंदी चित्रपट पाहताना जास्त विचार करायचा नाही हे कळलं तरी अजून वळलेलं नाही. श्रीमंताघरी वाढलेल्या नायिकेचं गरीब नायकाच्या घरी कसं निभेल ह्याची मला काळजी लागली. आधी नीट वागत असलेली नायकाची आई सासू झाल्यावर त्रास देणार नाही कश्यावरून? बरं नायक-नायिकेची ओळख फार दिवसांची नाही. एव्हढ्या ओळखीवर नेसत्या वस्त्रानिशी घरातून निघून जायचं? किती ती रिस्क. Happy तसंच नेसत्या वस्त्रानिशी घर सोडण्यातल्या अनेक practical अडचणी डोक्यात पिंगा घालून गेल्या. शर्मिलाला बघायला मुलाकडचे येतात तेव्हा त्यात नवरा मुलगा कुठेच दिसत नाही (इथे आपण वीस-पंचवीस वर्षं आधी जन्माला आलो नाही ह्याचं समाधान वाटलं!) हे अर्थात त्या काळाला धरूनच. शेवटी तिकीट न काढता जाणारी नायिका बघून (आणि हिला जागा पण खिडकीकडची मिळते बरं) हिची रास मकर असली तर पुढे नक्की तिकीट चेकर धरणार असले तद्दन मुंबई लोकल छाप विचार मनात आले. डेव्हिडअंकलना शशिकला आणि देवेन वर्माच्या प्रेमाची माहिती असते पण शर्मिला आणि धर्मेंद्र बद्दल ते ओळखू शकत नाहीत हे पटलं नाही. तसंच शेवटी 'चलो चलो वर्ना देर हो जायेगी' म्हणून तिला नेमकं स्टेशनवर न्यायचं आहे हे त्याना कसं कळतं? नायिकेच्या वडिलांना शेवटी स्टेशनवर यायचं कसं कळतं? असे काही प्रश्न अनुत्तरीत राहिले.

सहसा मी एकदा पाहिलेला हिंदी पिक्चर पुन्हा पहात नाही. पण अनुपमा पुन्हा कधीतरी पाहायला नक्की आवडेल.

चीकू, घुंगट सिनेमाबद्दल मी सुध्दा ऐकून आहे. पण भारत भूषण, प्रदीप कुमार वगैरे नावं ऐकून चित्रपट पहायची हिंंमत नाही झाली. फार रडारड आहे का हो?

कापोचे, वो कौन थी एन्जॉय केला म्हणताय म्हणून गुमनाम,कोहरा,बीस साल बाद, धुंद, कानून सुध्दा पहा असं सुचवावंसं वाटतंय. आवडतील.

धुंद मधे झिंतामान आहे ना ?
>>> व्हय , पण पूर्णपणे साडीत आहे चित्रपटभर. मेक अपही नाही फारसा. Wink ::फिदी:

अभिनय चाम्गला आहेपण. चित्रपट उत्तमच आहे.

झींतामान मध्ये जी ग्रेस होती ती या कचकड्याच्या बाहुल्यात नाही. त्यामुळे रुढार्थाने सुंदर नसूनही तिने काळ गाजवला.

Pages