फुसके बार – २० जानेवारी २०१६ - रोहित वेमुला आणि जिवानिशी गेलेल्याचे खेळणे करणे - राजकारण्यांचा आवडता फड

Submitted by Rajesh Kulkarni on 19 January, 2016 - 11:36

रोहित वेमुला आणि जिवानिशी गेलेल्याचे खेळणे करणे
राजकारण्यांचा आवडता फड

.
हैद्राबाद विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी रोहित वेमुला याची आत्महत्या ही नि:संशय दु:खद व दुर्दैवी घटना आहे. ज्या डॉ. आंबेडकरांच्या नावाने स्थापलेल्या संघटनेचा तो सदस्य होता, अशा रोहितने त्यांचे निर्धाराने झगडण्याचे तत्व न अंगिकारता हे दुर्दैवी पाऊल का उचलावे यात मी जात नाही.

या निमित्ताने त्याच्या दलित असण्याचे भांडवल करत आंदोलने सुरू झाली आहेत, आणखी किती दिवस ‘दलितां’नी ‘सवर्णा’कडून अन्याय सहन करायचा वगैरे वल्गना करणे चालू आहे.

हा युवक आंदोलन चालवत होता. आंबेडकर स्टुडंट असोसिएशन नावाच्या संघटनेचा नेता होता. याकूब मेमनला फाशी देण्याला त्याच्या संघटनेने विरोध केला होता. काही जण तो याकूब मेमनच्या फाशीविरूद्ध नव्हे तर एकूणच फाशीच्या शिक्षेविरूद्ध आंदोलन करत होता अशी (त्याच्या वतीने) पळवाट काढत आहेत. त्यांना हे माहित नाही की फाशीची शिक्षा रद्द करा असे म्हणणारेही दहशतवाद किंवा तत्सम गुन्ह्याखाली झालेल्या गुन्ह्यांना फाशीतून वगळू नये असे म्हणतात. त्यामुळे असे म्हणण्याला काही अर्थ नाही. तर त्यावरून अभाविप आणि त्याच्या संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात भांडणे झाली होती. त्यांनी तेथील अभाविपच्या शाखेचा अध्यक्ष सुशीलकुमार याला त्याच्या होस्टेलच्या खोलीत मारहाण केल्याचा आरोप होता. मुळात मारहाण झालीच नव्हती इथपासून आरोप-प्रत्यारोप झाले.

तुम्ही एकदा पीएचडीसारख्या उच्चशिक्षणासाठी जाता तेव्हा त्याच्याशी संबंधित कामे करणे अधिक महत्त्वाचे आहे हे तुम्ही ठरवायला नको का? तुम्हाला शिष्यवृत्ती कशासाठी मिळत असते? एफटीआयआयचे विद्यार्थीदेखील त्यांच्या अभ्यासक्रमाचे सोडून काय काय करतात हेदेखील नुकतेच समोर आले. तुम्ही अशैक्षणिक किंवा सामाजिक गोष्टींशी संबंध नसलेल्या व अनेकदा राजकीय स्वरूपाच्या गोष्टी करणार आणि मग त्यात राजकीय हस्तक्षेप झाला की मग मात्र साळसुदपणे विद्यार्थ्यांवर किंवा दलितांवर अन्याय झाला म्हणून आरडाओरडा करणार. कोणी याबद्दल बोलेल काय?

रोहितच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही असे वाचण्यात आले. रोहित कोणत्या चळवळीत भाग घेतो याची त्याच्या घरच्यांना कल्पना होती का? त्यांनी त्याला चांगले शिकणे ही प्राथमिकता आहे असे समजावले होते का? त्याच्यावर झालेल्या कारवाईमुळे त्याची शिष्यवृत्ती बंद झाली. त्यामुळे त्याच्यापुढील अडचणी वाढल्या असणार. हॉस्टेलमधून काढल्यावर बाहेर राहण्याची जागा नाही, रोजच्या खर्चाची सोय कशी करायची, रोज कोणापुढे हात कसे पसरायचे यातून येणारी अस्वस्थता नक्कीच समजू शकतो. या महिनाअखेरीस रोहितचा वाढदिवस (असणार) होता. पण मला शिष्यवृत्ती मिळत नाहीये, मी तुम्हाला पार्टी कशी देऊ, असे तो मित्रांना म्हणाला. पण संघटना म्हणून चालवणा-यांनी आपली परिस्थिती कोणती आहे, कशी आहे याचे भान नको का ठेवायला? असे म्हटले की लगेच कोणी चळवळी करणे हा आमचा हक्कच आहे वगैरे म्हणायला नको. याकूब मेमनची फाशी तुमच्याशी संबंधित आहे का? तुमच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न आहे का? असेल तर हरकत नाही. पण मग त्याविरूद्ध मत असणारेही तुम्हाला भेटतील. तेव्हा मात्र डॉ. आंबेडकरांच्या नावाने स्थापन केलेल्या तुमच्या चळवळीच्या नावाचे भांडवल करू नका. स्वत:च्या दलित असण्याचे ‘भांडवल’ या भलत्याच मुद्द्यासाठी करू नका. तुम्ही केवळ तुम्हाला जे वाटते ते मांडत आहात हे कळू शकते, पण ‘भांडवल’ करण्याबद्दल जे लिहिले आहे ते तुम्ही विद्यार्थी नव्हे, तुमच्या नावाने इतर जण करत आहेत. तुमच्या आंदोलनात रोहित एकटाच होता का? त्याच्या आर्थिक परिस्थितीची व त्यामुळे त्याच्यावर आलेल्या ताणाची तुम्हाला माहिती नव्हती का? त्याला सांभाळून घेण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? तो असे काही पाऊल उचलेल याची आम्हाला माहितीच नव्हती असे आता म्हणत आहात, तर त्याच्या मृत्युला तुम्हीदेखील जबाबदार नाहीत का? जी आंदोलने करता ती तुम्हाला झेपतात का ते तरी पाहिलेत का? तेव्हा तुम्ही याकूब मेमनच्या फाशीविरूद्ध आंदोलन केलेत, तुमचा व्यक्तीगत प्रश्न आहे. ते तुम्ही ‘दलित’ म्हणून तर केले नाहीत ना? पण आता तुमच्या दलित असण्याचे भांडवल इतर जण करत आहेत.

काही लोक असे काही झाले की गेल्या काही वर्षांमध्ये किती हुशार दलितांनी आत्महत्या केल्या याची जंत्री देतात; एवढेच नाही तर त्यावरून स्वत:च्या अजेंड्याला सोयीस्कर निष्कर्ष काढतात. आणि कोणी अशा खोडसाळ व एकांगी पोस्ट आपल्याला पाठवल्या की आपण स्वत: त्यावर विचार न करता त्या प्रसारित/फॉरवर्डही करतो. तुम्हाला किती दलित दाखवू की जे अतिशय स्पर्धात्मक वातावरणातही प्रगती करतात. तिथे मात्र त्यांचे नाणे खणखणीत होते, म्हणून तिथले ‘सवर्ण’ त्यांना अडवू शकले नाहीत असे म्हणायचे, आणि ज्यांनी आत्महत्या केल्या ते मात्र याच ‘सवर्ण’ समाजाचे बळी? अहो, भेदाभेद कोठे होत नाही? मराठ्यांनी ब्राह्मणांचा करायचा, दलितांचा करायचा, जेथे करणे शक्य आहे तेथे ब्राह्मणांनी दलितांचा दुस्वास करायचा, दलितांनी ब्राह्मणांविरूद्ध उघडउघड बोलायचे, श्रीमंतांनी गरीबांचा करायचा, असे कित्येक प्रकार चालतात. माझ्या दारासमोर गाडी पार्क केल्यामुळे येण्याजाण्याला अडथळा निर्माण झाला म्हणून त्या गाडीच्या चाकातली हवा सोडली. तेव्हा माझ्यावर अॅट्रॉसिटीखाली कारवाई करेन असे दटावणारा एक नग मला भेटला होता. हे फारच किरकोळ उदाहरण झाले. पण तुमच्या ज्या भावना आहेत त्याची ही दुसरी बाजू माहित तरी आहे का? मागासवर्गीय असणे हेही अलीकडे हत्यार म्हणून वापरले जाते हे वास्तव माहित आहे का आणि ते मानता का? पण लगेच रोहितची आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेला खून आहे वगैरे वल्गना करण्यापर्यंत मजल जाते काही जणांची. या आंदोलनकर्त्यांवर दलित म्हणून डुख धरून परीक्षेत सतत नापास करण्याचे प्रकरण आहे की दलित आहेत म्हणून हॉस्टेलमध्ये त्यांच्याबरोबर खोलीत कोणी दुसरे रहायला तयार नाही? मग आत्महत्या केली या कारणाने लगेच त्यांचे दलित असणे कसे आठवते? लगेच त्याची आत्महत्या नव्हे, तो खून आहे वगैरे डायलॉगबाजी कशी आठवते?

बरे, आता याबाबतच्या तथ्यांवर नजर टाकू. रोहित, आंदोलनातील त्याचे सहकारी, विद्यापीठातील त्यांचे अध्यापक, मंत्री यांची जात काढणे मला प्रशस्त वाटत नाही. पण यात जातीय अँगल व जातीय अभिनिवेश आणणारे फार पाहिले आहेत म्हणून याचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे.

अभाविपच्या सुशील कुमार या स्थानिक अध्यक्षाने याकूब मेमन फाशी प्रकरणानंतर या आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनच्या सदस्यांना फेसबुकवर गुंड असे म्हटले. त्यावरून चिडून संघटनेचे तीसएक सदस्य कुमारच्या खोलीत गेले व त्याला मारहाण केली. कुमारकडून त्यांना गुंड म्हटल्याबद्दल लेखी माफीदेखील लिहून घेण्यात आली. हा प्रकार झालाच नाही असे कोणीही म्हणत नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. तरीही ज्यांना हे नाकारायचे आहे त्यांनी तसे खुशाल करावे.

मारहाणीच्या तक्रारीनंतर तेव्हाचे कुलगुरू शर्मा यांनी चौकशीनंतर संघटनेच्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यास नकार दिला. मात्र त्यांनी आणखी एक चौकशी समिती नेमली. त्याच सुमारास त्यांच्या जागी आताचे कुलगुरू अप्पाराव आले. त्यामुळे शर्मा यांनी नेमलेल्या चौकशी समितीचे पुढे काही झाले नाही.

दलितांमध्ये स्वाभिमान जागवण्याच्या आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनच्या उपक्रमांना नव्या कुलगुरूंनी दिलेल्या पाठिंब्याबाबतही रोहितने त्यांचे आभार मानले होते. अर्थात त्याच पत्रात वर म्हटल्याप्रमाणे त्याने उपरोधाने व रागाने फासासाठी दोर किंवा विषाची मागणी केली होती.

विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती एकदा काही कारणाने खंडित झाली की ती पूर्ववत होण्यास नोकरशाहीमुळे काही काळ लागतो. अनेकदा ही थकलेली शिष्यवृत्ती एकरकमीही मिळते असे विद्यापीठाचे लोक सांगतात.

सुइसाइड नोटमधली रोहितची भाषा पाहिली की तो एक विचारी मुलगा असल्याचे जाणवते. कुलगुरूंना लिहिलेल्य पत्रात माझ्यासाठी फास घ्यायला दोरीची सोय करा किंवा विष तरी आणून द्या असे म्हणणारा हा युवक प्रत्यक्ष आत्महत्या करण्याच्यावेळी लिहिलेल्या चिठ्ठीत मात्र कोणालाही दोष देऊ इच्छित नाही. (त्याच्या त्या चिठ्ठीत कोणालाही दोषी धरलेले नाही, म्हणून आम्ही त्याच्या आत्महत्येसाठी जबाबदार नाही असे म्हणणारेही काल टीव्हीवर पाहिले.) तो उगाचच या तीस जणांच्या घोळक्यात अडकला असे झाले असेल का? ज्याला आपण चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असणे म्हणतो. संवेदनशील असलेल्या त्याच्याबरोबर आक्रमक वृत्ती असलेल्यावरही कारवाई झाली तरी त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलण्याइतके ते एवढे मनाला लावून घेतले नाही? ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्यापैकी प्रशांत हा विद्यार्थी त्या तीसएक जणांच्या घोळख्याचा म्होरक्या होता. रोहितच्या मानाने त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे?

डॉ. आलोक पांडे यांच्यापुढे झालेल्या सुनावणीत संघटनेच्या या पाच जणांनी सुशीलकुमार याला मारहाण केल्याचा इन्कार केला. आम्हाला गुंड म्हणण्यावरून आम्ही सुशीलकुमारकडे गेलो व त्याच्याकडून लेखी माफीपत्र घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या चौकशी करताना पुढे आलेल्या पुराव्यांवरून व दिल्या गेलेल्या साक्षींवरून अगदी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याइतपत नाही तरी मारहाण झाली होती हे तथ्य समोर आले. एक उदाहरण म्हणून विचारतो, या मारहाणीत त्या सुशीलकुमारचा जीव गेला असता तर ‘दलितांनी एकाला मारले’ अशी त्याची बातमी झाली असती का?

सुशील कुमार याने दलितांबद्दल काढलेल्या काही अनुद्गारांचा उल्लेख एका ठिकाणी वाचण्यात आला. पण त्याचे संदर्भ व तपशील मिळत नाहीत.

या प्रकरणी सुशीलकुमारचे कोणी नातेवाईक आणि स्वत: हे विद्यार्थी यांनी परस्परांविरूद्ध न्यायालयात गेले आहेत. ते प्रकरण प्रलंबित आहे. ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्या पाच विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल याचा विचार करण्यासाठी संघटनेतील विद्यार्थ्यांची बैठक चालू असताना रोहित मधूनच म्हणजे दुपारी चारच्या सुमारास बैठक सोडून निघून गेला आणि संध्याकाळी सहाच्या सुमारास त्याच्यासाठी शोधाशोध केल्यावर त्याने आत्महत्या केल्याचे कळले. त्या बैठकीत असे काय झाले की रोहितने हे पाऊल उचलले? निराशाजनक सूर उमटला होता का, जसे की काहीही मार्ग निघू शकणार नाही? नक्की काय झाले हे कसे कळू शकेल? कोण सांगू शकेल?

या विद्यापीठात किती तरी इतर दलित विद्यार्थी असतील. त्यांच्या ‘दलित’ असण्यामुळे त्यांना विद्यापीठातील प्राध्यापकांकडून काही वेगळी म्हणजे भेदभावाची वागणूक मिळते का अशा स्वरूपाची काही चौकशी कोणी केली आहे का?

केंद्रिय मंत्री बंडारू दत्तात्रेय हे स्वत: मागासवर्गीय आहेत असे दिसते. याकूब मेमनच्या फाशीविरूद्ध आंदोलन करणा-या या संघटनेच्या विद्यार्थ्याना देशविरोधी संबोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र त्यांनी स्मृती इराणी यांच्या मंत्रालयाला पाठवले. ते पत्र कुलगुरूंना पाठवण्यात आले. त्यानंतर मंत्र्यांच्या पत्रावर काय कारवाई झाली हे विचारणारी तीन स्मरणपत्रे मंत्रालयाकडून कुलगुरूंना पाठवली गेली. आंदोलक व राजकारणी याला दबाव टाकणे म्हणत आहेत, तर मंत्रालय सर्वच पत्रव्यवहाराच्या बाबतीत तशी पद्धत असल्याचे म्हणत आहे. तेव्हा या प्रकरणाकडे जातीय दृष्टीकोनातून पाहणा-यांना दत्तात्रय यांचेही मागासवर्गीय असणे याबाबतीत चालणार नाही. कारण ते पडले भाजपचे मागासवर्गीय. म्हणजे बाटलेले. ते काय ‘दलितांचे’ हित पाहणार? दलितांचे ‘खरे’ हित पाहणा-याने कसे उठता बसता डॉ. आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करायला हवा. तरच काही जणांचे समाधान होते. वर म्हटल्याप्रमाणे चौकशी समितीमध्ये दलित प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व होते असे दिसते. रोहितच्याच एका पत्रात कुलगुरूंच्या भुमिकेबद्दल त्याने चांगले लिहिले होते. आता तर त्यांचाही बळी मागितला जात आहे.

विद्यालयांमधून होणारी राजकीय आंदोलने हा नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे. शिक्षणाशी संबंधित विषय सोडून कोणत्याप्रकारच्या आंदोलनांना कॉलेज-विद्यापीठांमध्ये परवानगी दिली जावी हा मुद्दा नेहमी चर्चिला जातो. पण त्यावर कधीही काही निर्णय किंवा एकवाक्यता होत नाही.

हैद्राबाद विद्यापीठात गेल्या पाच वर्षात रोहितसह पाच मुलांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही सर्वच मुले त्यांच्या कुटुंबातील प्रथमच शिकणारी अशी मुले आहेत असे कळते. हे सारे बळी आंदोलनापोटीच झाले आहेत का? की नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यामध्ये येणारी अडचण हे मोठे कारण असावे? मुंबई आयआयटीमध्येही काही दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत असे आपण वाचतो. या पार्श्वभुमीवर केवळ दलित असलेल्याच नव्हे, पण अभ्यासात कच्चे असलेल्या मुलांचे समुपदेशन करण्याची काही व्यवस्था आहे का? या मुलांच्या या व इतर अडचणी समजून घेण्याची अशी काही यंत्रणा असेल तर त्यांना केवळ त्यांच्या मित्रांच्या संगतीत वहावत जाण्याशिवाय इतर पर्याय उपलब्ध राहील. कॉलेजमध्येच विद्यार्थी कल्याण (वेलफेअर) समिती नेमून एखाद्या (सह्रदयी) प्राध्यापकाकडे याबाबतची जबाबदारी सोपवून दलित, इतर मागासवर्गीय, तसेच आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या मुलांकडे वैयक्तिक लक्ष ठेवून त्यांच्या समस्या समजून घेऊ शकेल. आताच्या प्रकरणातही प्रशासनाचा कारवाई झालेल्या विद्यार्थ्यांशी कारवाई होण्याआधी काही संवाद असेल की नाही माहित नाही, बहुधा नसेलच, कारवाईनंतर तर तो पूर्णपणे तुटला असणार. एखाद्या गरीब विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती पूर्णपणे व बराच काळ थांबल्यावर त्याच्यापुढे दुसरा काहीही सकारात्मक पर्याय न ठेवता येणे हे व्यवस्थेचेच अपयश नाही का? भारतातले विद्यार्थी परदेशात गेल्यावर तेथे त्यांचा रोजचा खर्च निघण्याइतपत कामे कॉलेजमार्फत वा विद्यापीठामार्फत त्यांच्यावर सोपवली जातात. आपल्याकडे असे होतकरू विद्यार्थी शोधून त्यांच्यासाठी काही व्यवस्था निर्माण करता येईल का?

अशा संवेदनशील मुद्द्यावर राजकारणी मोठ्या जोमाने राजकारण करतील यात शंका नाही. केजरीवाल व ओवैसी यांनी ते दाखवले आहेच. कॉंग्रेसच्या पप्पूकडून दुसरी काही अपेक्षा नव्हतीच. मायावती व ममता त्यांची पथके पाठवली आहेत. लालू-मुलायमही रिंगणात उडी न घेता मागे राहण्याचे पाप करणार नाहीत. दलितांच्या नावाने मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याची संधी कोण कसे सोडतील?

या निमित्ताने कवी अशोक वाजपायी यांनी त्यांना हैद्राबाद विद्यापीठाकडून मिळालेली डी.लिट. परत करण्याची घोषणा केली आहे. या मुलांवर कोणत्या कारणाने कारवाई केली गेली किंवा एकूण हे प्रकरण काय आहे याची त्यांना माहिती नाही आणि तरीही त्यांनी हे पाऊल उचलले आहे असे इंडिया टुडेवर ते सांगत आहेत. पुरस्कार किंवा पदवी परतीचा किडा चावलेले अनेक जण आपल्याला या विद्यापीठाकडून काही मिळाले होते का हे आता नक्कीच धुंडाळतील.

या सर्वात शक्यता आहे ती अशी की दबावामुळे कोणी तरी बकरा निश्चित शोधला जाईल. कदाचित चौकशीनंतर आणखी नवी तथ्ये समोर येतील. वर सुशीलकुमार याने दलितांविरूद्ध काही अनुद्गार काढल्याचा उल्लेख आहे. मी तर म्हणतो, ते जर खरे असेल, तर जरूर त्याच्याविरूद्ध कडक कारवाई करा. परंतु शक्यता अशी आहे की अशा प्रकारांवरून नेहमीच होणा-या राजकारणामुळे मूळ प्रश्नाकडे कोणाचेच लक्ष जाणारच नाही. कारण कोणाची तशी इच्छा नाही. दलितांसाठी काही तरी केल्याचे खोटे समाधान मात्र आंदोलकांना व त्याहीपेक्षा राजकारण्यांना मिळेल.

आज रोहित, उद्या आणखी कोणी. दलित किंवा दलित नसलेला. पुढचा विचार करून यावर कायमस्वरूपी विचार करून जे कोणी स्वभावाने हळवे जीव असतील, ते वाचवण्यासाठी प्रयत्न करायला सवड आहे कोणाला?

या पोस्टला फुसके बार म्हणवत नाही. पण या सदराचे नाव बदलेपर्यत तरी तसेच ठेवतो.
फुसके बार – २० जानेवारी २०१६

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्हाला आमची उत्तरे ठाऊक आहे. तुमचे प्रेमप्रकरणात मला काडीचा इंट्रेस्ट नाही. मी माहीती सांगितली
अप्रचाराचा मुद्दा तुम्ही काढला म्हणून तुम्हाला अप्रचार कसा केला जातो याचे उदाहरण दिले. ते तुम्हाला अर्थात पटणार नाही. कारण ते भाजपाविरोधी आहे.

http://tehelkahindi.com/arms-training-is-being-given-to-youth-by-hindu-r...

हे घ्या. अजुन एक उदाहरण आता इथे सरळ लिहिले आहे की या पवित्र मंदीरात मुस्लिम लोकांना प्रवेशबंदी आहे.
आता यावरून जर भडकाऊ मुस्लिम समुदायांनी त्यांच्या मशिदी दर्ग्यावर यासारखे लिहिले तर.? त्यावरून हल्ला माजला तर जवाबदार कोण ? ज्यांनी सुरुवात केली की ज्यांनी जशास तसे उत्तर दिले? उद्या हजीअलीच्या दर्ग्यावर असा फलक झळकला तर आपला आवडता पक्ष भाजपाची काय भुमिका असेल? या आधीही तोगडीया नावाच्या प्रकाराने असे केले होते. ते बरोबर की चुक तो मुद्दा जरी बाजुला ठेवला तरी इतरांनीही तशीच भाषा वापरली तर जवाबदारी कुणाची?

निनाद

जाऊ द्या ना. कुणाला सांगताय ?
त्यांचा मोठा रोल आहे हे प्रकरण दाबण्यात. हा लेख त्याचाच भाग आहे एक.

रोहीत वेमुलाची एक व्हिडीओ क्लिप एबीव्हीपी वाले (तेच ते श्रद्धांजली वाहीलेले) शेअर करीत आहेत. त्या क्लिपबद्दल स्वतः रोहीतची पोस्ट पहा.

https://www.facebook.com/photo.php?fbid=10156507622520037&set=a.11444752...

रोहीतचा खुलासा वाचण्यासाठी..
काय घडलं होतं दोन गटात ? रोहीत काय सांगतोय ?

rohit vemul_0.jpg

रोहित वेमुलाच्या फेसबुक वॉलवरून

https://www.facebook.com/notes/asa-hcu/injustice-and-social-boycott-agai...

इथे त्या सुशीलकुमार माफी प्रकरणात नेमकं काय झालं त्याबद्दलच्या चौकशीचा रिपोर्ट आणि त्यानंतरच्या कारवाईबद्दल सविस्तर लिहिलंय.

https://www.facebook.com/rohith352

धन्यवाद भम

राकुंच्या घाणेरड्या सवयीबद्दल जास्त बोलायची आवश्यकताच ठेवलेली नाही या लिंकने. आपल्याला आवडेल त्याच पद्धतीने निष्कर्ष काढून एकही संदर्भ न देता टाकलेले लेख याबद्दल कारवाई करण्याची वेळ आलेली आहे.

रोहितला श्रध्दांजली. एका दलित विद्यार्थ्याला आपले जिवन का संपवावे लागले याची सखोल चौकशी होणे जरुरी आहे.आंबेडकरी विचारधारा, आपल्या मताशी सहमत नसलेल्या विचारधारा बाळगणे हा जणु गुन्हा झालेला आहे.दादरीची घटना त्यानंतर हे प्रकरण माझ्या मते देश हा झपाट्याने गेल्या दोन वर्षात असहिष्णुतेकडे झुकत चालला आहे.रोहितसारखा आंबेडकरी विचारांचा विद्यार्थि आत्महत्या करेल असे मन मानत नाही.दलितांच्या नशिबी झुंजणे व लढणे हे आहे आणि ते होणारच.विरोधि पक्ष,सामाजिक संघटना ह्यांनी हे प्रकरण लावुन धरणे जरुरीचे आहे. सर्व लोकशाही मानणार्या, पक्षांनी एक होउन समाजातील अशा असहिष्णु घटनांविरूध्द संघर्ष करण्याची वेळ आली आहे.

कपोचे,
तुमची गटारगंगा चालूच आहे हे आता पाहिले.

तुमच्यासारखी दळभद्री व्यक्ती दुसरी नसेल. हा अनुभव मला तुमच्याकडून लागोपाठ तिस-यांदा येत आहे. दुस-यांनी टाकलेल्या तुकड्यांवर आरूढ होऊन त्यात काय लिहिले आहे हे न वाचताच माझ्यावर आरोप करण्याची तुमची घाणेरडी सवय मला पक्की माहित आहे.

तुम्ही आजतक टीव्हीची लिंक टाकली, त्यातील स्मरणपत्रांचा उल्लेख माझ्या मूळ पोस्टमध्येच आहेत. तरी हिरोगिरी करण्याचा तुमचा आव हास्यास्पद आहे.

आता स्वत: रोहितच्या फेबुवरील पोस्ट्स टाकल्या आहेत आणि ते सगळे खरेच आहे असा आव आणत आहात, तुम्हाला थोडी तरी शरम वाटायला हवी. त्याचे सगळेच खरे समजायचे तर त्या सुशीलकुमारचेही सगळे खरे समजा की. मीच स्वत: सुशीलकुमारने काही वावगे केले असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी असे म्हटलेले आहे.
मयेकरांनी जी लिंक दिलेली आहे त्यातला बहुतेक सगळा भाग इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेला आहे. यात विद्यार्थी स्वत:चा दलित म्हणून उल्लेख केलेला आहे, तसा तो प्रतिपक्षकडून कोणीही केलेला दिसत नाही. दिल्लीहून पत्रे जाण्याच्या आधीच चौकशीसमितीचा अहवाल जो फ्लिपफ्लॉप झाल्याबद्दल सांगितले आहे, त्यात पहिल्या चौकशीच्यावेळी सुशीलकुमार उपस्थित नसल्यामुळे तात्पुरता अहवाल दिला आहे. त्याप्रमाणे मारहाण झाली की नाही इथपासून नंतरच्या चौकशी समितीने मारहाण झाल्याचा उल्लेख असल्याचाही उल्लेख पोस्टमध्ये आहे. त्यातल्या कुलगुरू सर्मा, प्रा. पांडे यांच्या नावासह उल्लेख पोस्टमध्ये आहे. हे बदल अप्पाराव कुलगुरू होण्याच्या व मंत्र्यांनी पत्र लिहिण्याच्या आधीच झालेले दिसतात.

शिवाय हे कारवाई झालेल्या विद्यार्थ्यांचे निवेदन असल्यामुळे त्यात “He insisted Vice-Chancellor to take against Dalits, terming them as anti-national” असे उल्लेख आहेत. प्रत्यक्षात त्यांच्या दलित असल्यावरून कोणीही बोलल्याचे समोर आलेले नाही.

कारवाई मागे घेताना पुढील चौकशीपर्यंतच ती मागे घेतली गेल्याचा उल्लेख आहे. नंतर नवीन कुलगुरू अप्पा राव यांनी आधीचा चौकशी अहवाल कायम ठेवत कारवाईचे स्वरूपही तेच ठेवले.

रोहितचा भगवा रंग असलेली पोस्टर्स फाडण्याबद्दलचा उल्लेख असलेला एक व्हिडियो प्रसारित होतो आहे, परंतु तो अर्धवट असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे मी त्याचा कोठेही आधार घेतलेला नाही. तसे पथ्य मी पाळतोच. तुमच्या दळीद्री नजरेपुढे हा व्हिडिओ आलेला दिसत नाही तरी त्याआधीच सांगतो.

तेव्हा मयेकर यांनी दिलेल्या लिंकमधील जवळजवळ सगळ्या घटनांचा पोस्टमध्ये उल्लेख आहे. त्यातले तथ्य समजावून घेण्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्या डोक्यातल्या विकृतीला पूरक एवढेच उचलून नाचायला लागला आहात.

ही पोस्ट मारहाण किंवा त्याच्याशी संबंधित प्रकारांपेक्षा कितीतरी अधिक मुद्दे मांडते. हे सगळे पाहण्याची न तुमची योग्यता आहे न इच्छा.

मी या प्रकरणात सुशीलकुमारची बाजू घेत नाही हे पोस्टमध्येही दाखवले आहे व वरील कमेंट्समध्येही लिहिलेले आहे. आणखी एक मुख्य मुद्दा की हा वाद किंवा ही आत्महत्या रोहितच्या ‘दलित’ असण्यावरून झालेले नाहीत हा आहे व मुळात दलितांच्या केवळ या विद्यापीठातच नव्हे तर इतरत्रही होणा-या आत्महत्यांमागची कारणे काय असावीत वगैरेंचाही उहापोह केलेला अहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा त्याच्या दलित असण्यावरूनच्या राजकारणावरूनचा आहे. अर्णबची आजची टाईम्स नाऊवरची पूर्ण चर्चा ही राजकारणी या घटनेचे भांडवल कसे करत आहेत यावर होती. परंतु तुमच्या डोळ्यांच्या खाचा झालेल्या आहेत की काय असे वाटावे इतके तुम्ही या सर्वांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करता आणि केवळ तुमच्या मनातल्या विकृततेपोटी माझ्यावर आरोप करत राहता ही तुमची घाणेरडी सवय आहे. तुम्हाला यापूर्वी अनेकदा सांगितले आहे की माझ्यावर आरोप करण्यापेक्षा येथे काय लिहिले आहे त्याबद्दल लिहा. भले ते मी लिहिलेल्याच्या कितीही विरूद्ध असले तरी. पण तुम्हाला तुमची घाणेरडी सवय मोडवत नाही.

इतर ठिकाणी मी विचारलेल्या प्रश्नांना काही जणांनी तुमच्यासारखे घाण न करता काही सकारात्मक उत्तरे दिली आहेत. त्यात आयआयटी सारख्या संस्थांमध्ये गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी समुपदेशन करण्याची यंत्रणा असल्याचा उल्लेख आहे. परंतु हे प्रश्न इतके गुंतागुंतीचे आहेत की त्यावर आणखी प्रभावी उपाय योजले जाण्याची गरज असल्याचेही तेथे सांगितले गेले. तेव्हा सगळेच तुमच्यासारखे दळभद्री वृत्तीचे नसतात. इथेही सगळेच तुमच्यासारख्या दळभद्री वृत्तीचे नाहीत हे दिसेल. पाहिलेत तर.

तेव्हा तुमचे तोंड आता पुरेसे काळे झाल्याचे नीट न वाचता तुमच्यासारख्या माझ्यावर केवळ आरोप करण्यात रस असलेल्या मनोवृत्तीच्या माणसाला कळायचेही नाही. तेव्हा थोडी जरी शरम असेल तर येथे पुन्हा घाण करायला येऊ नका. परंतु निर्लज्जाला काहीही सांगून फायदा नसतो हेही मला एव्हाना कळले आहे.

तेव्हा कोणावर कारवाई करण्याची वेळ आलीच असेल तर ती तुमच्यासारख्या दळभद्री व्यक्तीवर आलेली आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.
यापुढे तुमच्यासारख्यावर एक सेकंदही घालवणार नाही. तुम्ही तुमच्या विक्ृतीचे गरळ ओकत बसा सगळीकडे.

थू तुमच्या असल्या विकृतीवर.

मी हा प्रतिसाद जसाच्या तसा अ‍ॅडमिनकडे सोपवत आहे.

तुमची भाषाच सांगतेय की तुम्हाला तुमच्या घरासमोर गाडी लावणा-याने कायदेशीर कारवाईची धमकी का दिली असावी. तुम्ही हीच गलिच्छ भाषा वापरलेली असणार. तुमच्याकडून दुसरी अपेक्षा करताही येणार नाही असे मला या पोस्टवरून वाटते. बाकी अ‍ॅडमिन जो काही निर्णय घेतील तो.

मिसळपाव आणि ऐसी अक्षरे या संस्थळावरून ज्याला हाकलून देण्यात आलेले आहे त्याने इतरांना शिकवायच्या भानगडीत पडू नये. अ‍ॅडमीन करतील शहानिशा.

तिथे कपट कारस्थान झाले हे सगळे व्यवस्थित समोर आल्याने लेखक बिथरला आहे. तोंड कुणाचे काळे झाले हे वाचक ठरवतील. गटारगंगा कुणाची हे सांगायला तज्ञाची आवश्यकता नाही.

मयेकरांनी दिलेल्या लिंकमधला मॅटर काय आहे हे ज्याच्या डोक्यावरून गेलेय त्याच्याशी कसली चर्चा ? ज्याला रोहितचा अंत्यविधी गुपचूप उरकला गेला हे संशयास्पद वाटत नाहि आणि ज्याने सुशीलकुमार मेला असता तर अशी अनाकलनीय भूमिका घेतलीये त्याचे वरचे विवेचन किती खोटारडे आहे हे मुद्दामून सांगण्याची गरज नाही. सुशीलकुमारला मारहाण झाल्याचा कांगावा व्यवस्थित समोर आलेला आहे. इथेच लेखातली हवा फुस्सदिशी गेली आहे.

तुम्ही कोण लागून गेला तुम्हाला महत्व देण्याइतके ? तुमच्यासाठी थोडी लिहीतात लोक इथे ? तुम्ही धागा काढायची कारकुनी करतात त्यामुळे अशा इश्युवरची सत्य बाजू समोर आणता येते.

कुठल्याही स्टेटमेण्टचे पुरावे द्यायचे नाहीत हे पहिल्यापासून दिसून आलेले आहे. म्हणून लेखक पैसे घेऊन लिहीतात असे लिहीले होते. संदर्भ द्यायचे नसतील तर कुणीही उठून काहीही लिहावे. नाही का ? स्वतःवर असे आरोप झाले म्हणून लेखक चवताळून उठलाय आणि रोज उठून बिनबुडाचे लिखाण करण्याने लोक प्रश्न विचारतात त्यांचे अपमान करायचे , ते चालवून घ्यायचे, नाही का ? असो.

अ‍ॅडमिन समर्थ आहेत.

जरूर पाठवा. त्यांनाही येथे सकारात्मक चर्चा करणा-यांशी मी कशी चर्चा करतो आणि तुम्ही काय करता हे पाहू दे. तुम्हीच काय करायचे ते करणार आणि वर माझ्याच पोस्टमधील एखादी गोष्ट (घरासमोर गाडी लावणा-याबद्दल) तुमच्या फायद्यासाठी वापरता हेही दिसेल. प्रत्येक वेळी मी जे लिहिले आहे त्याबद्दल न बोलता माझ्या हेतुबद्दल बोलण्याची तुमची सवयही अ‍ॅडमिनना दिसू दे.
येथे दिगोचि, उदय, बिपीनचंद्र, मयेकर हे त्यांना काही गोष्टी पटल्या न पटल्या तरी माझ्यावर काही आरोप न करता त्यांची मते कशी मांडतात आणि तुम्ही काय करता हेही दिसू देत अ‍ॅडमिनना.
निनाद१ यांच्याशीही सुरूवातीला वाद झाला तरी त्यांनी त्यांची भाषा बदलण्याची तयारी दाखवली की त्यांच्याशी माझी व बिपीनचंद्र यांची ब-यापैकी व्यवस्थित चर्चा झाली. भलेही त्यांना माझीमते पटली नसतील.
तुम्ही माझ्यावर "राजेश कुलकर्णी यांनीही या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावलेली आहे असे कळते." किंवा
"निनाद
जाऊ द्या ना. कुणाला सांगताय ?
त्यांचा मोठा रोल आहे हे प्रकरण दाबण्यात. हा लेख त्याचाच भाग आहे एक." वगैरे आरोप करत थेट लेखामागच्या हेतुवरच संशय घेणार. हेदेखील दिसू देत अ‍ॅडमिनना.
म्हणजे प्रत्येक वेळी खोडसाळपणाची सुरूवात कोण करते तेही त्यांना दिसेल.

Rajesh Kulkarni यांच्या गलिच्छ भाषेचा निषेध. त्यांच्या अनेक धाग्यात अशीच भाषा वापरलेली पहिली आहे.
admin कृपया लक्ष द्या.

ते आरोप मुद्दामच केलेते जसे तुम्ही रोहीत वर केलेले आहेत.

लाज वाटायला पाहीजे स्वतःवर आरोप झाले की पुरावे मागायला. तुम्हाला मागच्या एका धाग्यावर जितके समजावून सांगायचे तितके सांगितलेले आहे. तुम्हाला अशा इश्युवर संदर्भ देऊन लिखाण करावे लागते हे सांगितले होते. पुरावे द्यावे लागतात हे सांगितले होते. त्यावर तुमचे तुम्ही पुरावे शोधून घ्या असे उत्तर मिळाले. पुढे पाठपिरावा केला तेव्हां अपमान केला. माझाही आणि इतरांचाही.

वर माझे पटत नसेल तर इथे येत जाऊ नका असेही लिहीलेले आहे. आता पुन्हा तुम्ही या बोटाची थुंकी त्या बोटावर करत आहात. त्या सुशीलकुमारला मारहाण झाली आणि तो मेला असता हे पुराव्यानिशी सिद्ध करणे ही तुमची जबाबदारी आहे, पण मागच्या अनुभवांवरून तुम्हाला पुरावे मागण्यात अर्थ नाही हे कळून चुकलेले आहे.

तुमचे अनुभव म्हणजे जसे काही ओबामाला आलेले अनुभव अशा थाटात मांडताय. मलाही ब्राह्मणांचे अनेक वाईट अनुभव येत असतील. ते द्यावेत काय ? तुमच्या अनुभवाला पुराव्याची आवश्यकता नसेल तर मी तरी का मागे हटावे ?

बिनबुडाचे लिखाण कशाला म्हणतात हे तरी समजण्याची कुवत तुमच्यात आहे का याबद्दलच शंका आहेत. असो.
तुमच्यासारख्या मूर्खाशी चर्चा करण्यात अर्थ नाही.

पण हा सोशल इश्यु आहे आणि मायबोली हा पब्लीक प्लॅटफॉर्म आहे. इथून गैरसमज पसरवणारे लिखाण कराल तर त्याला विरोध होणार आणि प्रसंगी कायदेशीर कारवाईही होईल हे ध्यानात असू द्या.

मा. अ‍ॅडमिन

गेल्या काही दिवसांपासून हे महाशय विकृत असल्याप्रमाणे रोज वेगवेगळे धागे नेमाने काढत आहेत. त्याबद्दल तक्रार करायची नाही. टवाळखोर असल्याच्या तक्रारीबद्दलही तक्रार नाही. पण संवेदनशील विषयावर कुठलेही पुरावे न देता वाट्टेल ते बरळणे आणि पुरावे मागितले की माझ्या धाग्यावर येऊ नका , अपमान होईल अशी अडाणछाप भूमिका ते घेत आहेत. त्यांच्या शिवीगाळीमुळे त्यांना विरोध होत नाही.

आपण लक्ष घालावे ही विनंती.

पुन्हा एकदा सांगतो. याआधीही मिसळ पाव आणि ऐसी अक्षरेबद्दल सांगितलेले आहे. आताही सांगतो.
मिसळपाववरच्या अ‍ॅडमिननी तेथे टवाळक्या करणा-यांचीच बाजू घेतली. तुमच्यासारखेच टवाळखोर आणि तेही अधिक संख्येने मिसळपाववर होते.
ऐसी अक्षरेवर मी आताही नियमितपणे लिहित आहे. तेव्हा तुमचा शहाणपणा तुमच्याजवळ ठेवा. तेथे लेखकाच्या हेतुवरच शंका घेऊन वैयक्तिक आरोप करत नाहीत.
रोहितचा अंत्यविधी घाईत उरकला याबद्दलही वरील कमेंटमध्ये मी लिहिले आहे. तुम्हाला वाचता येत असेल तर दिसेल. शिवाय रोहितचा अंत्यविधी उरकणारे पोलिस हे तेलंगणचे, भाजपचे किंवा अभाविपचे नाहीत. हे समजण्याची तुमची योग्यता अाहे का?
रोहितच्या बाबतीत कपटकारस्थान झालेले असो वा नसो, त्याच्या दलित असण्यावरून हे प्रकरण वाढवण्याचा मुद्दा मुख्य आहे. त्याबाबतीत तुमच्याकडे काही बोलण्यासारखे नाही. तरी माझ्याविरूद्ध एकांगी आरोप करणे चालूच ठेवायचे.
तुम्हाला पुरावे मी कशाला देऊ? इंडियन एक्सप्रेसचा वर उल्लेख केलेलाच आहे. काही गोष्टी टीव्हीवरील चर्चेत पुढे आलेल्या असतात. तुमच्या समाधानासाठी काय सगल्या पुराव्यांची व संदर्भांची जंत्री देऊ? तुम्हाला माझ्या हेतुवरच संशय घेण्याची सवय अाहे म्हणल्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचाच नाही हेही स्पष्ट दिसते.
मला महत्त्व द्या असे मी तुम्हाला कधी म्हटले? येथे माझ्यासाठी लोक लिहितात असे मी कधी म्हटले? असे काहीतरी असंबद्ध लिहून तुमचे स्वत:च्या डोक्यावरचे नियंत्रण तुम्ही गमावल्याचे दिसते आणि आरोप करत आहात माझ्यावर. बळेबळेच येथे येऊन माझ्यावर आरोप करायचे ही सवय तुमचीच आहे ना? येथे आला नाहीत तरी चालेल हेही तुम्हाला याआधी अनेकदा सांगितलेले आहे.

अ‍ॅडमिन नक्कीच समर्थ आहेत. काड्या लावण्याचे काम कोण करते आणि वर त्यांच्याकडेच तक्रार कोण करते हे ते नक्की पाहतील.

सामान्यातल्या सामान्यांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत सर्वांना प्रश्न पडलाय की रोहीतला हॉस्टेलमधून बाहेर काढले गेले होते. सिक्युरिटीवाले त्याला आत येऊ देत नव्हते तर त्याने हॉस्टेलच्या आत जाऊन आत्महत्या कशी केली ?

रोहीत तिथे कसा पोहोचला याची चौकशी व्हायला हवी.

चौकशी करा की!
माझ्या पोस्टमध्येच मी लिहिले आहे की कारवाई झालेल्या विद्यार्थ्याबद्दलच मिटींग चाललेली असताना रोहित अचानक म्हणजे दुपारी चार वाजता तेथून निघून गेला. मिटींगमध्ये असे काय झाले की तो उठून गेला आणि त्याने असे पाऊल उचलले? वाचले का?
अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्याचा खून केला असे तुम्हाला वाटत असेल तर त्याचीही चौकशी करा की. माझि का त्याला हरकत असेल?

कुलकर्णी
एकदा तुम्ही शिव्या दिल्या ना ? आता चर्चा करू नका प्लीजच. तुमची लेव्हल लक्षात आलेली आहे. तुमच्याशी चर्चा होऊ शकत नाही. फक्त तुमच्या लिखाणातल्या चुका दाखवून देण्याचे काम (तुम्हाला नाही ) आम्ही करत राहूच. जसे ,

तुम्ही एकदा पीएचडीसारख्या उच्चशिक्षणासाठी जाता तेव्हा त्याच्याशी संबंधित कामे करणे अधिक महत्त्वाचे आहे हे तुम्ही ठरवायला नको का? तुम्हाला शिष्यवृत्ती कशासाठी मिळत असते? एफटीआयआयचे विद्यार्थीदेखील त्यांच्या अभ्यासक्रमाचे सोडून काय काय करतात हेदेखील नुकतेच समोर आले. तुम्ही अशैक्षणिक किंवा सामाजिक गोष्टींशी संबंध नसलेल्या व अनेकदा राजकीय स्वरूपाच्या गोष्टी करणार आणि मग त्यात राजकीय हस्तक्षेप झाला की मग मात्र साळसुदपणे विद्यार्थ्यांवर किंवा दलितांवर अन्याय झाला म्हणून आरडाओरडा करणार. कोणी याबद्दल बोलेल काय? >>>>> हे कुणी लिहीलेय वर लेखात ?

याला उत्तरही दिले गेलेय. लोकांनी वाचलेले देखील आहे ते. ज्याला समजायचे त्याला समजलेले आहे. ज्याला नाही समजले त्याच्याशी काय डोकं लावणार ?

रोहीत ला कुठली शिष्यवृत्ती मिळत होती ? त्याने राखीव जागेवर प्रवेश घेतला होता काय ? किमान एव्हढे माहीत असते तर हे बिनबुडाचे लिखाण झाले नसते. हे एक उदाहरण आहे.

दुसरे म्हणजे एबीव्हीपी पासून सगळे आंदोलनं करत असतातच. ते शैक्षणिक काम असते कि काय ? मुझफ्फरपूर दंगलीबद्दलचा व्हिडीओ आणि त्यासंबंधीचा कार्यक्रम त्याने घेतला तो एबीव्हीपी ने उधळला हे सगळ्याचे मूळ आहे त्याबद्दल काहीच नाही लेखात. त्याला दहा पंधरा विद्यार्थांनी घेराव घातला होता त्यात काही चुकीचे नाही. तो म्हणतो ते सगळं चूकच आणि आपले एबीव्हीपी वाले श्रीमान सत्यवादी.

एचआरडी मंत्रालयाने यापूर्वी पाच वेळा स्मरणपत्रे पाठवून विद्यार्थ्यांचे निलंबन झाल्याची उदाहरणे द्या, कुठल्या नियमात ते बसते ते दाखवा मग आपण पुढचे बोलू. तुमच्या शिव्या तुमच्याकडेच ठेवा, त्या मला लागत नाहीत.

शिष्यवृत्ती - त्याने ओपन सीटवर अ‍ॅडमिशन घेतली होती.
इथे बाकी प्रत्येकाने आपल्या म्हणण्यासाठी संदर्भ दिले आहेत ज्याला तुम्ही हिरोगिरी म्हणत आहात. अशा ठार वेड्या मानसिकतेशी कसली चर्चा ?

अच्छा आधीच प्रतिसाद एडीट करून आणखी शिव्या दिल्यात का ?
मायबोली सर्व्हर वर जागा आहे. नव्या पोस्टमधे देऊ शकला असता त्या शिव्या. तो प्रतिसाद अ‍ॅडमिनच्या विपूत आधीच पेस्ट केल्याने ही अ‍ॅडीशन कुठून आली हे त्यांना कोडे पडेल म्हणून ही पोस्ट !!

कपोचे,
"पण हा सोशल इश्यु आहे आणि मायबोली हा पब्लीक प्लॅटफॉर्म आहे. इथून गैरसमज पसरवणारे लिखाण कराल तर त्याला विरोध होणार आणि प्रसंगी कायदेशीर कारवाईही होईल हे ध्यानात असू द्या."

तुम्ही गैरसमज करून घेत असाल तर त्याला मी काही करू सकत नाही. तुमच्या विरोधाला मी काडीचीही किंमत देत नाही. तीच गोष्ट तुमच्या कायदेशीर कारवाईच्या धमकीची. काय करायचे ते करा. तुमचेच खरे स्वरूप व्यवस्थित पुढे येईल याची खात्री देतो.

चर्चा करायची नाही म्हणता तर मग माझ्या पोस्टमधले उतारे कशाला उद्ध््रत करत सुटलाय? राखीव किंवा खुल्या जागेतून प्रवेश मिळण्याचा आणि शिष्यव्ृत्तीचा काय संबंध? की तुम्हाला शिष्यव्ृत्ती नव्हे, स्टायपेंड म्हणायचे आहे? तेवढ्यासाठी बिनबुडाचे वगैरे कशाला म्हणता?
अभाविपचे कार्यकर्ते राजकीय उपक्रमात भाग घेतात तर त्याबद्दल त्यांच्यावर अनेकदा काही कारवाईही होते. पण त्यातला कोणी दलित असेल तर त्याच्यावर 'दलित' म्हणून कारवाई केल्याचा कांगावा कोणी करत नाही. येथेही सुशीलकुमारही मागासवर्गीय असल्याचे कोठे तरी वाचले. खरेखोटे माहित नाही. तो असेल आणि त्याच्यावर काही कारवाई झाली तर ती एका मागासवर्गीयावरील नसेल. हा मुद्दा समजतो का तुम्हाला? हेच रोहित व त्याच्या सहका-यांबद्दल लिहिले आहे. समजते का?
तुम्ही आजतकची लिंक दिली होती, त्यातल्या स्मरणपत्रांचा उल्लेख व त्यामागचे सरकारने दिलेले कारण यांचा उल्लेख मूळ पोस्टमध्येच दिल्याचे म्हटले होते. तेही तुमच्या लक्षात आलेले दिसत नाही.
मी आधीच म्हटले की अाता तुमच्यावर एक सेकंदही खर्च करणार नाही. तरी तुमचे चालूच असल्याने पुन्हा लिहावे लागले. आता मात्र थांबतो.

राजेश कुलकर्णी आणि सर्वांनाच ही शेवटची ताकीद आहे. तसेच या धाग्यावर लिहिले असले तरी ते सर्व मायबोलीला लागू आहे.

मायबोलीवर असभ्य भाषेत आणि वैयक्तिक पातळीवर उतरून दिलेले प्रतिसाद / लेखन दिसले तर त्या सदस्याचे खाते तत्काळ रद्द करण्यात येईल. तसेच हे करण्यास उद्युक्त करणार्‍या सदस्यांचे खाते देखील रद्द करण्यात येईल.

admin,
तुमच्या हस्तक्षेपाबद्दल धन्यवाद.
माझ्याबद्दल कोणी व्यक्तिगत पातळीवर कोणी लिहिले नसेल वा माझ्या हेतुबद्दलच कोणी शंका घेतली नसेल, तर मी कधी वावगे लिहिलेले नाही.
याबाबतीत माझे पूर्ण सहकार्य राहील.
मी कपोचे यांच्या कोणत्याही पोस्टवर काही कमेंट केल्याचे मला स्मरत नाही. त्यांनीही माझ्या पोस्टवर येऊ नये. म्हणजे वादाचा मुद्दाच राहणार नाही. कारण एखाद्या मुद्द्यावर मला काय वाटते ते लिहिण्याचे मला स्वातंत्र्य हवे, कपोचेंना ते आवडत नसेल, तर मी त्याबाबतीत काय करू शकेन?
संवेदनशील मुद्द्यावरून त्यांना काही आवडले नाही किंवा गैरसमज पसरवतो असे त्यांना वाटले तर कायदेशीर कारवाईची धमकी त्यांनी दिलेली आहे म्हणून ही विनंती करत आहे.
धन्यवाद.

कस्ला भारी प्रतिसाद आहे!!

मा. अ‍ॅडमिन,

राकु यांच्या बाजूने हस्तक्षेप केल्याबद्दल धन्यवाद बरं का!

_/||\_

माझ्याबद्दल कुणी शंका घेतली असे मी ठरवले की मला हवे तसे बोलायला मी मोकळा, असा नियम कुठे आहे, ते शोधतो आता Happy

I apologise for writing in English. I have lived overseas for 50 years and therefore am unable to find appropriate and correct words in Marathi. I have been following this stream with interest. Those who writehere must agree that we still speak in terms of us and them. Them being dalits. I regularly meet in our Marathi mandal people who hold deep prejudices against people who are not of their ilk.
Anyone who believes that Indian Univerisities are स्वायत्त lives in a fool's paradise. Indian politicans of the State and Central variety always interfere and appoint their people as vice-Chancellors and Professors. Pressure is applied to pass their sons and daughters and they are passed. I remember an instance many years ago when the CM's daughter passed her MBBS exams. Later as a practicing doctor she wasaccused of misdiagnosis. There was also some doubt raised of the validity of the medical degree of Devayani Khobragade. There may be several such examples.

अ‍ॅडमिन महोदय, धन्यवाद आपल्या हस्तक्षेपाबद्दल.

दुर्लक्ष करणे अशक्य झाल्याने आपल्याला तसदी दिली गेली.

दीमा,

दलित दलित म्हणून फार आमच्यावर अन्याय झालाय हा आक्रोश कसा लबाडपणाचा आहे हेच या लेखातून व्यक्त होतंय. हा एक नवा अजेण्डा आहे. मागे कोरेगाव भीमाची लढाई हे कसं थोतांड आहे असा एक विषय मांडला होता. त्या समर्थनार्थ कसलेही पुरावे नाहीत, संदर्भ नाहीत. म्हणून त्या वेळी हे सर्व कशाच्या आधारावर हे पुन्हा पुन्हा विचारलेले होते. तसेच संदर्भ दिले तर मान्य करायला अडचण नाही हे ही स्पष्ट केले होते.

आताही हे सर्व कशाच्या आधारावर हे विचारायचं धैर्य झालेलं नाही कारण मागच्या वेळी मिळालेली दुरुत्तरं !

http://www.maayboli.com/node/57012

इथे पहिली दोन पाने केवळ संदर्भ मागण्यात आणि समजावून सांगण्यात खर्ची पडलेली आहेत. पण मला कसे काय संदर्भ मागता हा अ‍ॅटीट्यूड पुढे दिसून आलेला आहे. संदर्भ इंटरनेटवर मिळतात हे उत्तर तर कहर आहे. पुढे जेव्हां सदस्यांनी स्वतःच ते शोधून घेतले तेव्हां हे दिसले नाही का ते दिसले नाही का ही भाषा तिथेही सुरू केली गेली आहे. तिथेही शिवीगाळ झालेली आहे. प्रत्येक धाग्यावर हा अनुभव येतोय.

आता इथेही जेव्हां सदस्यांनी स्वतःहूनच संदर्भ शोधायला सुरूवात केली तेव्हां मात्र आक्रस्ताळेपणे अर्णब गोस्वामी ने अमूक केलं नि तमूक केलं, तेव्हां डोळ्यांच्या खाचा झाल्या होत्या का असे अगम्य प्रतिसाद दिले गेले आहेत. तो जो कुठला शो आहे त्याचा उल्लेख जरी सुरुवातीला केला असता तर प्रतिसादकांचा रोख अर्णब गोस्वामी कडे वळाला असता. प्रत्येकाने राकु पाहतात तोच टीव्ही शो कसा काय पाहिला असेल ? काही जण तर टीव्ही पाहत देखील नाहीत.

सार्वजनिक ठिकाणी लेख लिहीताना आवश्यक असल्यास पुरावे देण्याची तयारी ठेवायला अडचण काय आहे ? मोठमोठे विद्वान देखील आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ संदर्भ देतात. त्याला इतरांनी फेकलेले तुकडे असा शब्दप्रयोग या लेखकमहाशयांनी केलेला आहे.

एचआरडी ने इतका रस घेऊन त्या विद्यार्थ्यांना निलंबित केले त्या मेडीकल रिपोर्टचा पाया किती ठिसूळ आहे हे त्या प्रकरणात दिसून आलेले आहे. पहिल्यांदा झालेल्या चौकशीत डॉक्टरांच्या पॅनेलने सांगितले आहे की सिक्युरिटीच्या जीपमधून खांद्याला धरून ओढताना खर्चटल्याचे मार्क्स आले असतील. मारहाण झाल्याचे निशाण नाहीत. तसंच मारहाणीमुळे पोटात दुखापत झाली असे कुठेही दिसत नाही.

पण वरून दबाव आल्यानंतर एकाएकी रिपोर्ट बदलतो यात जो बळी गेला त्याचे म्हणणे कुठेही ग्राह्य धरायचे नाही. धरले तर शिवीगाळ करायची. माझ्याच हेतूवर शंका घेता असा कांगावा करायचा. इथे लेख लिहीणा-याच्याच हेतूवर शंका घेतली जाईल की ज्याचा काही संबंध नाही त्याच्यावर शंका घेतली जाईल ?

रोहीतचा व्हिडीओ डॉ. आंबेडकरांनी शिकवलेल्या अँटीनॅशनल अ‍ॅक्टीव्हिटीज या शीर्षकाखाली शेअर केला जातोय. त्या संदर्भात त्याचा खुलासा दिला आहे. हे संदर्भ दिल्यानंतर लेखक महाशयांनी काय आदळआपट केली आहे ते वर आलेच आहे. यांना संदर्भासहीत लिहायला कुणी आडकाठी केलीय ?

रोहीतचे म्हणणे असे आहे की व्हिडीओ पूर्ण पणे शेअर करावा माझे काही म्हणणे नाही. जर केला तर दिसून येईल की मी सुरुवातीला व्यवस्थित उत्तरं देत होतो पण ज्या वेळी त्यांनी बाबासाहेबांबद्दल अपशब्द वापरले तेव्हां माझा संयम सुटला. म्हणून मी त्यांना दुरुत्तरे करत गेलो कारण त्यांच्याशी लॉजिकल होण्यात अर्थच नव्हता. त्याला देखील पंधरा वीस जणांनी घेरल्याचे सरळ दिसतेय.

या लेखात काढलेले निष्कर्ष बिनबुडाचे, अर्धवट माहीतीवर आणि पूर्वग्रहदूषित आहेत असे उपलब्ध माहीतीवरून दिसते. ते तसे नसतील तर शिव्या न देता अचूक संदर्भ देण्यात यावेत. मी म्हणतो म्हणून विश्वास ठेवा हे चालणार नाही.

लेखाचा मुख्य रोख ज्यावर आहे तो असा आहे की

दलितांनी एकाला मारले ही बातमी झाली असती का ?

अशा प्रकारची कोल्हेकुई वाढत चालली आहे. थोडक्यात दलित अत्याचार करत असतात पण त्यांच्यावर घाबरून जाऊन कारवाई होत नाही. मुस्लिमांबद्दल अशीच सुरूवात होऊन आज त्या समाजाची ओळख दहशतवादी अशी झालेली आहे त्यामुळे वेळीच या प्रकाराची दखल घेतली पाहीजे.

शीख समुदायाबद्दलही एकेकाली अकाली म्हणजे सर्वच दहशतवादी अशी इमेज करण्यात आलेली होती.

दलितांनी मारले असते तर हा प्रश्नच नाही. कारण मारहाण झाली कि नाही याबद्दल शंका असतानाच कारवाई झालेली आहे. सिस्टीम ज्यांच्या हातात आहे त्यांना न्याय मिळतोय म्हटल्यावर त्यांना कशाला संघर्ष करावा लागेल ? खैरलांजी प्रकरणात तपासास दिरंगाई. केस दाखल करण्यास दिरंगाई असे अनुभव आल्याने मोर्चे निघाले. त्या मोर्च्यावर अमानुष अत्याचार झाले ज्याची बातमी आलेली नाही. खैरलांजी मधे निर्भयाप्रमाणे निषेध व्यक्त झालेला नाही. अरुंधती राय सारख्या लिखिकेने यावर सविस्तर बोलले आहे.

खैरलांजीच नाही तर फक्त महाराष्ट्रात चार हजार प्रकरणे अद्याप न्यायासाठी प्रलंबित आहेत. ज्या प्रकरणात मोर्चे निघतात त्यासाठी कारवाई होते,

असे असताना दलित असल्याने अमूक झालं तमूक झालं असल्या फालतू पोस्टी आणि लेख लिहीणा-यांचा निषेध व्हावा तितका थोडा आहे. अशा रोगट मानसिकतेतून आलेल्या प्रचारकी लेखांचा प्रतिवाद हा होणारच. काल्पनिक केस कन्सिडर करून अन्यायग्रस्त असलेल्यांबद्दल , तशी आकडेवारी उपलब्ध असताना, ते कांगावा करतात असे अरण्यरूदन किमान तथ्यावर आधारीत तरी असावे .

रोहीत च्या आत्महत्येला राजकारण म्हणून नाकारणे हे कुणाला वाचवण्यासाठी ?

रवीशकुमारचा एनडीटीव्ही वरचा हा रिपोर्ट वस्तुनिष्ठ विश्लेषण कसं असावं याचा पाठ आहे. अत्यंत परखड शब्दात हा रिपोर्ट बारीक बारीक गोष्टींचा आढावा घेतोय.
https://www.youtube.com/watch?v=NP58znyJI3M

Pages