फुसके बार – २० जानेवारी २०१६ - रोहित वेमुला आणि जिवानिशी गेलेल्याचे खेळणे करणे - राजकारण्यांचा आवडता फड

Submitted by Rajesh Kulkarni on 19 January, 2016 - 11:36

रोहित वेमुला आणि जिवानिशी गेलेल्याचे खेळणे करणे
राजकारण्यांचा आवडता फड

.
हैद्राबाद विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी रोहित वेमुला याची आत्महत्या ही नि:संशय दु:खद व दुर्दैवी घटना आहे. ज्या डॉ. आंबेडकरांच्या नावाने स्थापलेल्या संघटनेचा तो सदस्य होता, अशा रोहितने त्यांचे निर्धाराने झगडण्याचे तत्व न अंगिकारता हे दुर्दैवी पाऊल का उचलावे यात मी जात नाही.

या निमित्ताने त्याच्या दलित असण्याचे भांडवल करत आंदोलने सुरू झाली आहेत, आणखी किती दिवस ‘दलितां’नी ‘सवर्णा’कडून अन्याय सहन करायचा वगैरे वल्गना करणे चालू आहे.

हा युवक आंदोलन चालवत होता. आंबेडकर स्टुडंट असोसिएशन नावाच्या संघटनेचा नेता होता. याकूब मेमनला फाशी देण्याला त्याच्या संघटनेने विरोध केला होता. काही जण तो याकूब मेमनच्या फाशीविरूद्ध नव्हे तर एकूणच फाशीच्या शिक्षेविरूद्ध आंदोलन करत होता अशी (त्याच्या वतीने) पळवाट काढत आहेत. त्यांना हे माहित नाही की फाशीची शिक्षा रद्द करा असे म्हणणारेही दहशतवाद किंवा तत्सम गुन्ह्याखाली झालेल्या गुन्ह्यांना फाशीतून वगळू नये असे म्हणतात. त्यामुळे असे म्हणण्याला काही अर्थ नाही. तर त्यावरून अभाविप आणि त्याच्या संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात भांडणे झाली होती. त्यांनी तेथील अभाविपच्या शाखेचा अध्यक्ष सुशीलकुमार याला त्याच्या होस्टेलच्या खोलीत मारहाण केल्याचा आरोप होता. मुळात मारहाण झालीच नव्हती इथपासून आरोप-प्रत्यारोप झाले.

तुम्ही एकदा पीएचडीसारख्या उच्चशिक्षणासाठी जाता तेव्हा त्याच्याशी संबंधित कामे करणे अधिक महत्त्वाचे आहे हे तुम्ही ठरवायला नको का? तुम्हाला शिष्यवृत्ती कशासाठी मिळत असते? एफटीआयआयचे विद्यार्थीदेखील त्यांच्या अभ्यासक्रमाचे सोडून काय काय करतात हेदेखील नुकतेच समोर आले. तुम्ही अशैक्षणिक किंवा सामाजिक गोष्टींशी संबंध नसलेल्या व अनेकदा राजकीय स्वरूपाच्या गोष्टी करणार आणि मग त्यात राजकीय हस्तक्षेप झाला की मग मात्र साळसुदपणे विद्यार्थ्यांवर किंवा दलितांवर अन्याय झाला म्हणून आरडाओरडा करणार. कोणी याबद्दल बोलेल काय?

रोहितच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही असे वाचण्यात आले. रोहित कोणत्या चळवळीत भाग घेतो याची त्याच्या घरच्यांना कल्पना होती का? त्यांनी त्याला चांगले शिकणे ही प्राथमिकता आहे असे समजावले होते का? त्याच्यावर झालेल्या कारवाईमुळे त्याची शिष्यवृत्ती बंद झाली. त्यामुळे त्याच्यापुढील अडचणी वाढल्या असणार. हॉस्टेलमधून काढल्यावर बाहेर राहण्याची जागा नाही, रोजच्या खर्चाची सोय कशी करायची, रोज कोणापुढे हात कसे पसरायचे यातून येणारी अस्वस्थता नक्कीच समजू शकतो. या महिनाअखेरीस रोहितचा वाढदिवस (असणार) होता. पण मला शिष्यवृत्ती मिळत नाहीये, मी तुम्हाला पार्टी कशी देऊ, असे तो मित्रांना म्हणाला. पण संघटना म्हणून चालवणा-यांनी आपली परिस्थिती कोणती आहे, कशी आहे याचे भान नको का ठेवायला? असे म्हटले की लगेच कोणी चळवळी करणे हा आमचा हक्कच आहे वगैरे म्हणायला नको. याकूब मेमनची फाशी तुमच्याशी संबंधित आहे का? तुमच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न आहे का? असेल तर हरकत नाही. पण मग त्याविरूद्ध मत असणारेही तुम्हाला भेटतील. तेव्हा मात्र डॉ. आंबेडकरांच्या नावाने स्थापन केलेल्या तुमच्या चळवळीच्या नावाचे भांडवल करू नका. स्वत:च्या दलित असण्याचे ‘भांडवल’ या भलत्याच मुद्द्यासाठी करू नका. तुम्ही केवळ तुम्हाला जे वाटते ते मांडत आहात हे कळू शकते, पण ‘भांडवल’ करण्याबद्दल जे लिहिले आहे ते तुम्ही विद्यार्थी नव्हे, तुमच्या नावाने इतर जण करत आहेत. तुमच्या आंदोलनात रोहित एकटाच होता का? त्याच्या आर्थिक परिस्थितीची व त्यामुळे त्याच्यावर आलेल्या ताणाची तुम्हाला माहिती नव्हती का? त्याला सांभाळून घेण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? तो असे काही पाऊल उचलेल याची आम्हाला माहितीच नव्हती असे आता म्हणत आहात, तर त्याच्या मृत्युला तुम्हीदेखील जबाबदार नाहीत का? जी आंदोलने करता ती तुम्हाला झेपतात का ते तरी पाहिलेत का? तेव्हा तुम्ही याकूब मेमनच्या फाशीविरूद्ध आंदोलन केलेत, तुमचा व्यक्तीगत प्रश्न आहे. ते तुम्ही ‘दलित’ म्हणून तर केले नाहीत ना? पण आता तुमच्या दलित असण्याचे भांडवल इतर जण करत आहेत.

काही लोक असे काही झाले की गेल्या काही वर्षांमध्ये किती हुशार दलितांनी आत्महत्या केल्या याची जंत्री देतात; एवढेच नाही तर त्यावरून स्वत:च्या अजेंड्याला सोयीस्कर निष्कर्ष काढतात. आणि कोणी अशा खोडसाळ व एकांगी पोस्ट आपल्याला पाठवल्या की आपण स्वत: त्यावर विचार न करता त्या प्रसारित/फॉरवर्डही करतो. तुम्हाला किती दलित दाखवू की जे अतिशय स्पर्धात्मक वातावरणातही प्रगती करतात. तिथे मात्र त्यांचे नाणे खणखणीत होते, म्हणून तिथले ‘सवर्ण’ त्यांना अडवू शकले नाहीत असे म्हणायचे, आणि ज्यांनी आत्महत्या केल्या ते मात्र याच ‘सवर्ण’ समाजाचे बळी? अहो, भेदाभेद कोठे होत नाही? मराठ्यांनी ब्राह्मणांचा करायचा, दलितांचा करायचा, जेथे करणे शक्य आहे तेथे ब्राह्मणांनी दलितांचा दुस्वास करायचा, दलितांनी ब्राह्मणांविरूद्ध उघडउघड बोलायचे, श्रीमंतांनी गरीबांचा करायचा, असे कित्येक प्रकार चालतात. माझ्या दारासमोर गाडी पार्क केल्यामुळे येण्याजाण्याला अडथळा निर्माण झाला म्हणून त्या गाडीच्या चाकातली हवा सोडली. तेव्हा माझ्यावर अॅट्रॉसिटीखाली कारवाई करेन असे दटावणारा एक नग मला भेटला होता. हे फारच किरकोळ उदाहरण झाले. पण तुमच्या ज्या भावना आहेत त्याची ही दुसरी बाजू माहित तरी आहे का? मागासवर्गीय असणे हेही अलीकडे हत्यार म्हणून वापरले जाते हे वास्तव माहित आहे का आणि ते मानता का? पण लगेच रोहितची आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेला खून आहे वगैरे वल्गना करण्यापर्यंत मजल जाते काही जणांची. या आंदोलनकर्त्यांवर दलित म्हणून डुख धरून परीक्षेत सतत नापास करण्याचे प्रकरण आहे की दलित आहेत म्हणून हॉस्टेलमध्ये त्यांच्याबरोबर खोलीत कोणी दुसरे रहायला तयार नाही? मग आत्महत्या केली या कारणाने लगेच त्यांचे दलित असणे कसे आठवते? लगेच त्याची आत्महत्या नव्हे, तो खून आहे वगैरे डायलॉगबाजी कशी आठवते?

बरे, आता याबाबतच्या तथ्यांवर नजर टाकू. रोहित, आंदोलनातील त्याचे सहकारी, विद्यापीठातील त्यांचे अध्यापक, मंत्री यांची जात काढणे मला प्रशस्त वाटत नाही. पण यात जातीय अँगल व जातीय अभिनिवेश आणणारे फार पाहिले आहेत म्हणून याचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे.

अभाविपच्या सुशील कुमार या स्थानिक अध्यक्षाने याकूब मेमन फाशी प्रकरणानंतर या आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनच्या सदस्यांना फेसबुकवर गुंड असे म्हटले. त्यावरून चिडून संघटनेचे तीसएक सदस्य कुमारच्या खोलीत गेले व त्याला मारहाण केली. कुमारकडून त्यांना गुंड म्हटल्याबद्दल लेखी माफीदेखील लिहून घेण्यात आली. हा प्रकार झालाच नाही असे कोणीही म्हणत नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. तरीही ज्यांना हे नाकारायचे आहे त्यांनी तसे खुशाल करावे.

मारहाणीच्या तक्रारीनंतर तेव्हाचे कुलगुरू शर्मा यांनी चौकशीनंतर संघटनेच्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यास नकार दिला. मात्र त्यांनी आणखी एक चौकशी समिती नेमली. त्याच सुमारास त्यांच्या जागी आताचे कुलगुरू अप्पाराव आले. त्यामुळे शर्मा यांनी नेमलेल्या चौकशी समितीचे पुढे काही झाले नाही.

दलितांमध्ये स्वाभिमान जागवण्याच्या आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनच्या उपक्रमांना नव्या कुलगुरूंनी दिलेल्या पाठिंब्याबाबतही रोहितने त्यांचे आभार मानले होते. अर्थात त्याच पत्रात वर म्हटल्याप्रमाणे त्याने उपरोधाने व रागाने फासासाठी दोर किंवा विषाची मागणी केली होती.

विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती एकदा काही कारणाने खंडित झाली की ती पूर्ववत होण्यास नोकरशाहीमुळे काही काळ लागतो. अनेकदा ही थकलेली शिष्यवृत्ती एकरकमीही मिळते असे विद्यापीठाचे लोक सांगतात.

सुइसाइड नोटमधली रोहितची भाषा पाहिली की तो एक विचारी मुलगा असल्याचे जाणवते. कुलगुरूंना लिहिलेल्य पत्रात माझ्यासाठी फास घ्यायला दोरीची सोय करा किंवा विष तरी आणून द्या असे म्हणणारा हा युवक प्रत्यक्ष आत्महत्या करण्याच्यावेळी लिहिलेल्या चिठ्ठीत मात्र कोणालाही दोष देऊ इच्छित नाही. (त्याच्या त्या चिठ्ठीत कोणालाही दोषी धरलेले नाही, म्हणून आम्ही त्याच्या आत्महत्येसाठी जबाबदार नाही असे म्हणणारेही काल टीव्हीवर पाहिले.) तो उगाचच या तीस जणांच्या घोळक्यात अडकला असे झाले असेल का? ज्याला आपण चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असणे म्हणतो. संवेदनशील असलेल्या त्याच्याबरोबर आक्रमक वृत्ती असलेल्यावरही कारवाई झाली तरी त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलण्याइतके ते एवढे मनाला लावून घेतले नाही? ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्यापैकी प्रशांत हा विद्यार्थी त्या तीसएक जणांच्या घोळख्याचा म्होरक्या होता. रोहितच्या मानाने त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे?

डॉ. आलोक पांडे यांच्यापुढे झालेल्या सुनावणीत संघटनेच्या या पाच जणांनी सुशीलकुमार याला मारहाण केल्याचा इन्कार केला. आम्हाला गुंड म्हणण्यावरून आम्ही सुशीलकुमारकडे गेलो व त्याच्याकडून लेखी माफीपत्र घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या चौकशी करताना पुढे आलेल्या पुराव्यांवरून व दिल्या गेलेल्या साक्षींवरून अगदी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याइतपत नाही तरी मारहाण झाली होती हे तथ्य समोर आले. एक उदाहरण म्हणून विचारतो, या मारहाणीत त्या सुशीलकुमारचा जीव गेला असता तर ‘दलितांनी एकाला मारले’ अशी त्याची बातमी झाली असती का?

सुशील कुमार याने दलितांबद्दल काढलेल्या काही अनुद्गारांचा उल्लेख एका ठिकाणी वाचण्यात आला. पण त्याचे संदर्भ व तपशील मिळत नाहीत.

या प्रकरणी सुशीलकुमारचे कोणी नातेवाईक आणि स्वत: हे विद्यार्थी यांनी परस्परांविरूद्ध न्यायालयात गेले आहेत. ते प्रकरण प्रलंबित आहे. ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्या पाच विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल याचा विचार करण्यासाठी संघटनेतील विद्यार्थ्यांची बैठक चालू असताना रोहित मधूनच म्हणजे दुपारी चारच्या सुमारास बैठक सोडून निघून गेला आणि संध्याकाळी सहाच्या सुमारास त्याच्यासाठी शोधाशोध केल्यावर त्याने आत्महत्या केल्याचे कळले. त्या बैठकीत असे काय झाले की रोहितने हे पाऊल उचलले? निराशाजनक सूर उमटला होता का, जसे की काहीही मार्ग निघू शकणार नाही? नक्की काय झाले हे कसे कळू शकेल? कोण सांगू शकेल?

या विद्यापीठात किती तरी इतर दलित विद्यार्थी असतील. त्यांच्या ‘दलित’ असण्यामुळे त्यांना विद्यापीठातील प्राध्यापकांकडून काही वेगळी म्हणजे भेदभावाची वागणूक मिळते का अशा स्वरूपाची काही चौकशी कोणी केली आहे का?

केंद्रिय मंत्री बंडारू दत्तात्रेय हे स्वत: मागासवर्गीय आहेत असे दिसते. याकूब मेमनच्या फाशीविरूद्ध आंदोलन करणा-या या संघटनेच्या विद्यार्थ्याना देशविरोधी संबोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र त्यांनी स्मृती इराणी यांच्या मंत्रालयाला पाठवले. ते पत्र कुलगुरूंना पाठवण्यात आले. त्यानंतर मंत्र्यांच्या पत्रावर काय कारवाई झाली हे विचारणारी तीन स्मरणपत्रे मंत्रालयाकडून कुलगुरूंना पाठवली गेली. आंदोलक व राजकारणी याला दबाव टाकणे म्हणत आहेत, तर मंत्रालय सर्वच पत्रव्यवहाराच्या बाबतीत तशी पद्धत असल्याचे म्हणत आहे. तेव्हा या प्रकरणाकडे जातीय दृष्टीकोनातून पाहणा-यांना दत्तात्रय यांचेही मागासवर्गीय असणे याबाबतीत चालणार नाही. कारण ते पडले भाजपचे मागासवर्गीय. म्हणजे बाटलेले. ते काय ‘दलितांचे’ हित पाहणार? दलितांचे ‘खरे’ हित पाहणा-याने कसे उठता बसता डॉ. आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करायला हवा. तरच काही जणांचे समाधान होते. वर म्हटल्याप्रमाणे चौकशी समितीमध्ये दलित प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व होते असे दिसते. रोहितच्याच एका पत्रात कुलगुरूंच्या भुमिकेबद्दल त्याने चांगले लिहिले होते. आता तर त्यांचाही बळी मागितला जात आहे.

विद्यालयांमधून होणारी राजकीय आंदोलने हा नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे. शिक्षणाशी संबंधित विषय सोडून कोणत्याप्रकारच्या आंदोलनांना कॉलेज-विद्यापीठांमध्ये परवानगी दिली जावी हा मुद्दा नेहमी चर्चिला जातो. पण त्यावर कधीही काही निर्णय किंवा एकवाक्यता होत नाही.

हैद्राबाद विद्यापीठात गेल्या पाच वर्षात रोहितसह पाच मुलांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही सर्वच मुले त्यांच्या कुटुंबातील प्रथमच शिकणारी अशी मुले आहेत असे कळते. हे सारे बळी आंदोलनापोटीच झाले आहेत का? की नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यामध्ये येणारी अडचण हे मोठे कारण असावे? मुंबई आयआयटीमध्येही काही दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत असे आपण वाचतो. या पार्श्वभुमीवर केवळ दलित असलेल्याच नव्हे, पण अभ्यासात कच्चे असलेल्या मुलांचे समुपदेशन करण्याची काही व्यवस्था आहे का? या मुलांच्या या व इतर अडचणी समजून घेण्याची अशी काही यंत्रणा असेल तर त्यांना केवळ त्यांच्या मित्रांच्या संगतीत वहावत जाण्याशिवाय इतर पर्याय उपलब्ध राहील. कॉलेजमध्येच विद्यार्थी कल्याण (वेलफेअर) समिती नेमून एखाद्या (सह्रदयी) प्राध्यापकाकडे याबाबतची जबाबदारी सोपवून दलित, इतर मागासवर्गीय, तसेच आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या मुलांकडे वैयक्तिक लक्ष ठेवून त्यांच्या समस्या समजून घेऊ शकेल. आताच्या प्रकरणातही प्रशासनाचा कारवाई झालेल्या विद्यार्थ्यांशी कारवाई होण्याआधी काही संवाद असेल की नाही माहित नाही, बहुधा नसेलच, कारवाईनंतर तर तो पूर्णपणे तुटला असणार. एखाद्या गरीब विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती पूर्णपणे व बराच काळ थांबल्यावर त्याच्यापुढे दुसरा काहीही सकारात्मक पर्याय न ठेवता येणे हे व्यवस्थेचेच अपयश नाही का? भारतातले विद्यार्थी परदेशात गेल्यावर तेथे त्यांचा रोजचा खर्च निघण्याइतपत कामे कॉलेजमार्फत वा विद्यापीठामार्फत त्यांच्यावर सोपवली जातात. आपल्याकडे असे होतकरू विद्यार्थी शोधून त्यांच्यासाठी काही व्यवस्था निर्माण करता येईल का?

अशा संवेदनशील मुद्द्यावर राजकारणी मोठ्या जोमाने राजकारण करतील यात शंका नाही. केजरीवाल व ओवैसी यांनी ते दाखवले आहेच. कॉंग्रेसच्या पप्पूकडून दुसरी काही अपेक्षा नव्हतीच. मायावती व ममता त्यांची पथके पाठवली आहेत. लालू-मुलायमही रिंगणात उडी न घेता मागे राहण्याचे पाप करणार नाहीत. दलितांच्या नावाने मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याची संधी कोण कसे सोडतील?

या निमित्ताने कवी अशोक वाजपायी यांनी त्यांना हैद्राबाद विद्यापीठाकडून मिळालेली डी.लिट. परत करण्याची घोषणा केली आहे. या मुलांवर कोणत्या कारणाने कारवाई केली गेली किंवा एकूण हे प्रकरण काय आहे याची त्यांना माहिती नाही आणि तरीही त्यांनी हे पाऊल उचलले आहे असे इंडिया टुडेवर ते सांगत आहेत. पुरस्कार किंवा पदवी परतीचा किडा चावलेले अनेक जण आपल्याला या विद्यापीठाकडून काही मिळाले होते का हे आता नक्कीच धुंडाळतील.

या सर्वात शक्यता आहे ती अशी की दबावामुळे कोणी तरी बकरा निश्चित शोधला जाईल. कदाचित चौकशीनंतर आणखी नवी तथ्ये समोर येतील. वर सुशीलकुमार याने दलितांविरूद्ध काही अनुद्गार काढल्याचा उल्लेख आहे. मी तर म्हणतो, ते जर खरे असेल, तर जरूर त्याच्याविरूद्ध कडक कारवाई करा. परंतु शक्यता अशी आहे की अशा प्रकारांवरून नेहमीच होणा-या राजकारणामुळे मूळ प्रश्नाकडे कोणाचेच लक्ष जाणारच नाही. कारण कोणाची तशी इच्छा नाही. दलितांसाठी काही तरी केल्याचे खोटे समाधान मात्र आंदोलकांना व त्याहीपेक्षा राजकारण्यांना मिळेल.

आज रोहित, उद्या आणखी कोणी. दलित किंवा दलित नसलेला. पुढचा विचार करून यावर कायमस्वरूपी विचार करून जे कोणी स्वभावाने हळवे जीव असतील, ते वाचवण्यासाठी प्रयत्न करायला सवड आहे कोणाला?

या पोस्टला फुसके बार म्हणवत नाही. पण या सदराचे नाव बदलेपर्यत तरी तसेच ठेवतो.
फुसके बार – २० जानेवारी २०१६

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राकुपंडित, भारी काम है बुवा तुमचं.

असल्या घटनांवर काँग्रेस /आप/ डावे काही बोलले तर बोलेंगे की बोलता है!
नाही बोललं तर 'बघा, यांना काही घेणं देणंच नाही देशातल्या दलितांबद्दल/विद्यार्थ्यांबद्दल/घटनांबद्दल.

आणि आदरणीय मोदी आणि त्यांचे भाऊबंध, बी जे पी तले इतर माणिक मोती यावर एक चकार शब्द बोलत नाही आहेत यावर तुमच्या भल्या मोठ्या फुसक्या नसलेल्या बारांत दारूकामाचा कणही दिसत नाही.

तुमच्यासारखे थोर्थोर विचारवंत बीजेपीचा अजेंडा चालवायला फुकटात मिळतात म्हणून तर देश प्रगतीपथावर चाललाय.

अ‍ॅट्रोसिटी लावणे, शिक्षा होणे हा मुख्य मुद्दा नाही. रोहीत सारख्यांना आपले (ऑड असलेले) विचार खुलेपणे मांडून शिक्षण घेता येईल का, समाजात वावरता येईल का , अशा विचारांच्या लोकांना देशद्रोही समजले जाणार का हा आहे.

कापोचे, हाच हक्क इतराना आहे का हां प्रश्न पडलाय. रोहितचे मित्र म्हणतायत की तो सुशील कुमार आम्हाला गुंड म्हणाला म्हणून आम्ही त्याला confront केलं व लेखी माफीनामा घेतला पण मारहाण केली नाही.

याचा अर्थ काय? आमच्याविरोधात कोणी काही बोलायचे नाही..बोलल्यास आम्ही जाब विचारायला येणार.. असा का? पुरोगामी लिबरल संघटना..capital punishment मिळालेल्या गुन्हेगाराच्या human right साठी झगडणारी- पण दुसरीकडे सोशल मिडीयावर कोणी केलेली टीका सहन होत नाही?
कापोचे please correct me if i have wrong info and i hope i am wrong..

याचा अर्थ काय? आमच्याविरोधात कोणी काही बोलायचे नाही..बोलल्यास आम्ही जाब विचारायला येणार.. असा का? पुरोगामी लिबरल संघटना..capital punishment मिळालेल्या गुन्हेगाराच्या human right साठी झगडणारी- पण दुसरीकडे सोशल मिडीयावर कोणी केलेली टीका सहन होत नाही?

>>
सनव +११११
हेच मला कधीपासुन अनेक वेगवेगळ्या घटनांबाबत वाटते आहे. आणि हेच म्हणायचे होते.

अरे कहां है मताचे स्वातंत्र्य?

त्या आधीच्या आठ आत्महत्यांही तितक्याच दुर्दैवी आहेत. त्या प्रकरणांत आतासारखा कोणा मंत्र्यांचा वा शिक्षणखात्याचा हस्तक्षेप होता का?

पर्साद, तुमचा जुना आयडी विदूषक होता, तो परफेक्ट होता. उगच बदललात.
*

तुमच्यासारखे थोर्थोर विचारवंत बीजेपीचा अजेंडा चालवायला फुकटात मिळतात म्हणून तर देश प्रगतीपथावर चाललाय.
<<
फुकटातच आहेत असे नक्की ठाऊकेय का तुम्हाला चक्रम?

त्या आधीच्या आठ आत्महत्यांही तितक्याच दुर्दैवी आहेत. त्या प्रकरणांत आतासारखा कोणा मंत्र्यांचा वा शिक्षणखात्याचा हस्तक्षेप होता का?
<<
<<

अगदि, अगदि
आत्महत्येत मंत्र्यांचा वा शिक्षणखात्याचा हस्तक्षेप असला तरच त्या आत्महत्येचे राजकारण करुन स्वत:ची राजकीय पोळी भाजून घ्यायची व इतर वेळा मुग गिळुन गप्प बसायचे.

कापोचे, हाच हक्क इतराना आहे का हां प्रश्न पडलाय. >>> नक्की ना?

सनव
तुम्ही देशद्रोही आहात हे मला माहीत आहे. तुमच्या कुटुंबात आयएसआय शी संबंधित कोण आहे हे ही मला ठाउक आहे. पुरावे नाहीत म्हणून बोलत नव्हते.

याचा अर्थ काय? आमच्याविरोधात कोणी काही बोलायचे नाही..बोलल्यास आम्ही जाब विचारायला येणार.. असा का? पुरोगामी लिबरल संघटना..capital punishment मिळालेल्या गुन्हेगाराच्या human right साठी झगडणारी- पण दुसरीकडे सोशल मिडीयावर कोणी केलेली टीका सहन होत नाही?
<<

अजिबात सहन होत नाही. अहो, त्या दोन मुलींना फेसबुकावर काही लिहिलं म्हणून सरकारी खाक्यात जेलीत घातलं नव्हतं का?

इथेही डायरेक्ट केंद्रीय मंत्र्यांनी हस्तक्षेप केला ना? तेव्हा हा 'इन्टॉलरन्स" दोन्हीकडून आहे.

लोकल भांडणं लोकल लेव्हलला न राहता व हँडल न होता विकृत पद्धतीने एस्केलेट केल्याबद्दल निषेध व चिडचिड आहे.

फेसबुकबद्दलच्या भांडणावरून याचा स्टायपेंड अडवण्याचा, होस्टेल डिनाय करण्याचा काय संबंध ?

रच्याकने. लोकांनी स्टायपेंड व स्कॉलरशिपमधला फरक समजून घेतला तर बरे होईल.

ही चित्रफित पाहील्यास या रोहीत वेमुलाचे हिंदु धर्माबद्दल विचार किती हुच्च होते ते दिसुन येते. >>

अच्छा खरे कारण हे आहे काय?

दीड मायबोलीकर | 20 January, 2016 - 12:02 नवीन
पर्साद, तुमचा जुना आयडी विदूषक होता, तो परफेक्ट होता. उगच बदललात.
<<

@दीड मायबोलीकर,
वयक्तिक शिविगाळ केल्याशिवाय तुमचा दिवस शुभ जात नाही का? आणि इब्लिस असण्यापेक्षा विदुषक केंव्हाही परवडला.

माझे पण हिंदु धर्माबद्दल विचार खुप हुच्च आहेत.
आणि माझ्या सारखे विचार करणारे हजारो आहेत जे वैदिक ब्राम्हणांना आवडत आही.
असे विचार असणारे दलित हे पण हिंदू मधेच गणले जातात.

रोहितचे अंत्यसंस्कार घाईने उरकण्यात आले याची कल्पना नव्हती. माध्यमांमध्ये एवढी चर्चा झाली, पण हा महत्त्वाचा मुद्दा का व कसा बाजुला ठेवला गेला?
काही जणांनी यावरून सवयीप्रमाणे संघ, नथुराम वगैरेचा उल्लेख केला आहे, त्याकडे लक्ष देत नाही.
प्रश्न असा आहे, की तुम्ही तुमचा अभ्यासक्रम सोडून इतर अशैक्षणिक व सामाजिक विषयाशी संबंधित काही करू इच्छिता त्यावरून तुम्हाला विरोध होणार. कुणाला पटो वा ना पटो, मुझफ्फरनगर हा मुद्दा, याकूब मेमनची फाशी, दलित-मुस्लिम एकता या सर्वांना राजकीय अंग आहे. वर विचारल्याप्रमाणे विद्यार्थ्यानी केलेल्या मारहाणीत कुमारचा म््रत्यु औढवला असता, तर त्याला दलितांनी एकाला मारले असे म्हटले असते का तुम्ही? (त्याने दलितांबद्दल काही आक्षेपार्ह म्हटल्याचाही उल्लेख केला आहे. ते माध्यमांमध्ये कोठे येत नसले तरी. तसे बोलण्याची किंवा विचार करण्याची त्याची व्ृत्ती असेल तर आत्महत्याप्रकरणी त्याच्यावर काय ती कारवाई होईलच, या अनुद्गारांबद्दलही त्याच्यावर कारवाई करा असे म्हटलेले अाहे. तेव्हा त्याची बाजू घेण्याचा प्रश्न नाही.) मग त्याची आत्महत्या एका 'दलिताची' कशी?
येथे रोहितच्या दुर्दैवी आत्महत्येबद्दल बोलत आहोत, केरळ, बंगालमध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांना ठार केलेले आहे. आभाविपच्या बाजुने किंवा विरूद्ध बोलण्याचा प्रश्न नाही. विद्यार्थी म्हणून तुम्ही काय करता आहात, हा प्रश्न विचारायचाच नाही का हे ठरवा.

न्यज मधे सांगत आहेत की त्या सुशिल ला मारहाण साठी हॉस्पिटल मधे अ‍ॅडमिट केलेले नव्हते तर त्याचे अ‍ॅपेंडिक्सचे ऑपरेशन होते.

तेव्हा हा 'इन्टॉलरन्स" दोन्हीकडून आहे.

राइट विंगर intolerant असतातच..हजार उदाहरणं आहेत समोर. पण लिबरल्सनाही intolerance शिवाय पर्याय नाही असं वाटणं घातक आहे(because they were the last hope).

escalation बद्दल सहमत आहे. हे भांडण मंत्रालयापर्यन्त जाणं आणि त्यात त्या मुलाचा जीव जाणं अक्षम्य आहेच.

शिवाय या विषयाला दलित अँगल देण्याची सवय ज्यांना आहे त्यांच्याबद्दल आक्षेप आहे. >
काय सांगतात प्रत्येक गोष्टीत नक्षली ब्रिगेडी ब्राह्मन आणणार्‍यांना सगळीकडे मुसळच दिसत असते

>>> डॉ. आलोक पांडे यांच्यापुढे झालेल्या सुनावणीत संघटनेच्या या पाच जणांनी सुशीलकुमार याला मारहाण केल्याचा इन्कार केला. आम्हाला गुंड म्हणण्यावरून आम्ही सुशीलकुमारकडे गेलो व त्याच्याकडून लेखी माफीपत्र घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या चौकशी करताना पुढे आलेल्या पुराव्यांवरून व दिल्या गेलेल्या साक्षींवरून अगदी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याइतपत नाही तरी मारहाण झाली होती हे तथ्य समोर आले. एक उदाहरण म्हणून विचारतो, या मारहाणीत त्या सुशीलकुमारचा जीव गेला असता तर ‘दलितांनी एकाला मारले’ अशी त्याची बातमी झाली असती का? <<<

लेखातल्या ह्या भागावर फारशी चर्चा झाल्याचे प्रतिसादांमध्ये दिसून येत नाही. ही चर्चा होणेही जास्त महत्त्वाचे आहे.

या मारहाणीत त्या सुशीलकुमारचा जीव गेला असता तर ‘दलितांनी एकाला मारले’ अशी त्याची बातमी झाली असती का? < >

हो नक्कीच झाली असती. आणि इथे कुलकर्णीं सकट काही विशिष्टांचा वेगळाच भलताच सुर लागला असता.

निनाद१,
येथे मला कोणावर वैयक्तिक आरोप करण्यात रस नाही. तुम्हीही तसे करू नये. तेव्हा " इथे कुलकर्णीं सकट काही विशिष्टांचा वेगळाच भलताच सुर लागला असता." वगैरे शहाणपणा तुमच्याजवळच ठेवा. कुलकर्णीसकट वगैरे म्हणता, मी तुमच्यासारखे माझे नाव लपवत नाही.

निनाद१

नाही. असे झाले नसते. खालील लिंकद्वारे दिसणारी बातमी वाचा.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik/--/articleshow...

या बातमीत जो गुन्हा घडलाय तो गुन्हा करणारे कुठल्या जातीचे आहेत हे अगदी स्पष्टपणे कळतंय पण तरीही घटनेचा तसा इश्यू झालेला नाहीये. खरं तर निर्भया प्रकरणाइतकंच हे प्रकरण देखील गंभीर आहे पण एकूणच या प्रकरणानंतर म्हणावा तसा जनक्षोभ झालेला नाहीये. तसा जनक्षोभ झाला असता तर अपराध्याला त्याच्या जातीचा फायदाच झाला असता. त्याच्या जातवाल्या संघटनांनी आमच्या जातीविरुद्ध रचलेला हा एक कट आहे असे म्हणत सामूहिक आंदोलने केली असती. त्यामुळे असा जनक्षोभ न उसळता शांततेत खटला चालविला जाऊन आरोपीला शिक्षा जाहीर झाली हे एक प्रकारे चांगलेच झाले.

ठळक केलेली वाक्ये ही जर तर ची शक्यता आहे. असेच घडले असते असे ठामपणे सांगता येत नसले तरी ओ जे सिंप्सन प्रकरणात गुन्हेगाराच्या क्रौर्याविरुद्ध जनक्षोभाची लाट उसळताच तितक्याच ताकदीने तो कृष्णवर्णीय असल्यानेच अपराधात गोवला गेलाय अशी सहानुभूतीची लाट देखील आल्याचे स्मरते. त्याच संदर्भाने मी माझा अंदाज / वैयक्तिक मत व्यक्त केले आहे.

कुलकर्णी स्वतःची हुशारी स्वतःच कडे ठेवा.

खरं तर निर्भया प्रकरणाइतकंच हे प्रकरण देखील गंभीर आहे पण एकूणच या प्रकरणानंतर म्हणावा तसा जनक्षोभ झालेला नाहीये>> बिपिन तुमचे म्हणणे काय आहे? निर्भया प्रकरण काय आहे ते ठाऊक तरी आहे का? इथे आरोपिंना पकडून शिक्षा देखील झाली
तसा जनक्षोभ झाला असता तर अपराध्याला त्याच्या जातीचा फायदाच झाला असता. त्याच्या जातवाल्या संघटनांनी आमच्या जातीविरुद्ध रचलेला हा एक कट आहे असे म्हणत सामूहिक आंदोलने केली असती>>>>
हे तुम्ही चुकिचा अर्थ काढला असे म्हणवे लागेल. कायद्यात जातीचा काहीच फायदा होत नाही इतकी समजण्याइतकी समज आपणास आहे असे धरून चालले तरी अश्या नीच पातळीच्या अपराधीच्या समर्थनात सामुहिक आंदोलन कधीच होणार नाही. तुमच्या माहीतीत किती अशी आंदोलने झाली जरा सांगू शकाल का? उलट आसुमल सारख्या लोकांच्या शिक्षेविरोधात आंदोलन झाली तेव्हा आवाज उठवला नाही आपण

निनाद१,

हा तर तुमचा मुर्खपणाच म्हणावा लागेल. कायद्यात जातीचा काहीच फायदा होत नाही इतकी समजण्याइतकी अक्कल आपणास आहे असे धरून चालले तरी अश्या नीच पातळीच्या अपराधीच्या समर्थनात सामुहिक आंदोलन कधीच होणार नाही. तुमच्या माहीतीत किती अशी आंदोलने झाली जरा सांगू शकाल का? उलट आसुमल सारख्या लोकांच्या शिक्षेविरोधात आंदोलन झाली तेव्हा कुठे झोपा काढत होतात का?

तुमच्या प्रतिसादातील ठळक केलेल्या शब्दांची गरज आहे का? हे शब्द प्रतिसाद संपादित करून वगळल्यास व्यवस्थित चर्चा पुढे नेता येईल अन्यथा दुर्लक्ष करावे लागेल.

माझ्यामते आहे. कारण "जर-तर" या शब्द खेळामधून आपण भलतेच काहीतरी जस्टिफाईड करायला निघाला आहात हे कळले. धागा कुठल्या विषयावर आणि आनि आपण जरतर लावून कुठला विषय छेडलात आणि त्यातून पण कायद्यामधे अमुक जातीचा असल्याने सवलत मिळाली असती वगैरे वाक्य आपणच लिहिली आहे.
कायद्यासमोर सर्व समान असताना सुध्दा आपण नको तिथे जात घुसवण्याची गरज होती का? याचे आत्मपरिक्षण करा. मग पुढचे बोलू.

अमुक जातीला कायद्याच्या शिक्षेत सवलत आणि इतरांना भार असे व्हायला भारतात राजेशाही नाही आहे तर लोकशाही आहे इतके लक्षात असू द्या

बिपिनचंद्र यांनी दिलेले उदाहरण बिगरदलितांच्या बाबतीत त्यांच्या जातीवरून इश्यु होत नाही हे स्पष्ट दाखवते. ते न समजता किंवा समजूनही तुम्ही आसुमलच्या बाबतीत खुसपट काढून विषयांतर करण्यात एक्सपर्ट अाहात हे दाखवलेत. आसुमलच्या बाबतीत त्याच्या भक्तांनी आदोलने केली त्यात जातीचा प्रश्न कोठे येतो?
तेव्हा तुमचे भलतेच चालू आहे हे स्पष्ट दिसते. चालू दे.

विषयांतर बिपिन यांनी केले त्यांनी तर महाराष्ट्र टाईम्सची लिंक देऊन याविरुध्द आंदोलन झाले असते इ. लिहिले
म्हणून तुमचा आसुमल आला कुलकर्णी कळल का.मुखवटा फाटण्याअगोदर आता मुखवटा काढा बाजूला .

जर तर बोलण्याला काही अर्थ नसतो फुकाच्या गप्पा असतात
सुशिलच्या बाबतित असे काही झालेच नसते याची जाणिव त्याला स्वता;ला पण असावी
तसे त्या चिठ्ठ्या-चपाट्यावरुन स्पष्टच दिसतच आहे त्यांच्या पाठीवर कोणा कोणाचे हात होते.

अरेरे किती गलिच्छ भाषा!

"दारु पिऊन गाडी चालवू नका" ह्या नियमाप्रमाणे "हातभट्टीची पिऊन प्रतिसाद लिहू नका" असा एक नविन नियम इथे लागू करण्याची नितांत गरज आहे.

Pages