फुसके बार – २० जानेवारी २०१६ - रोहित वेमुला आणि जिवानिशी गेलेल्याचे खेळणे करणे - राजकारण्यांचा आवडता फड

Submitted by Rajesh Kulkarni on 19 January, 2016 - 11:36

रोहित वेमुला आणि जिवानिशी गेलेल्याचे खेळणे करणे
राजकारण्यांचा आवडता फड

.
हैद्राबाद विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी रोहित वेमुला याची आत्महत्या ही नि:संशय दु:खद व दुर्दैवी घटना आहे. ज्या डॉ. आंबेडकरांच्या नावाने स्थापलेल्या संघटनेचा तो सदस्य होता, अशा रोहितने त्यांचे निर्धाराने झगडण्याचे तत्व न अंगिकारता हे दुर्दैवी पाऊल का उचलावे यात मी जात नाही.

या निमित्ताने त्याच्या दलित असण्याचे भांडवल करत आंदोलने सुरू झाली आहेत, आणखी किती दिवस ‘दलितां’नी ‘सवर्णा’कडून अन्याय सहन करायचा वगैरे वल्गना करणे चालू आहे.

हा युवक आंदोलन चालवत होता. आंबेडकर स्टुडंट असोसिएशन नावाच्या संघटनेचा नेता होता. याकूब मेमनला फाशी देण्याला त्याच्या संघटनेने विरोध केला होता. काही जण तो याकूब मेमनच्या फाशीविरूद्ध नव्हे तर एकूणच फाशीच्या शिक्षेविरूद्ध आंदोलन करत होता अशी (त्याच्या वतीने) पळवाट काढत आहेत. त्यांना हे माहित नाही की फाशीची शिक्षा रद्द करा असे म्हणणारेही दहशतवाद किंवा तत्सम गुन्ह्याखाली झालेल्या गुन्ह्यांना फाशीतून वगळू नये असे म्हणतात. त्यामुळे असे म्हणण्याला काही अर्थ नाही. तर त्यावरून अभाविप आणि त्याच्या संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात भांडणे झाली होती. त्यांनी तेथील अभाविपच्या शाखेचा अध्यक्ष सुशीलकुमार याला त्याच्या होस्टेलच्या खोलीत मारहाण केल्याचा आरोप होता. मुळात मारहाण झालीच नव्हती इथपासून आरोप-प्रत्यारोप झाले.

तुम्ही एकदा पीएचडीसारख्या उच्चशिक्षणासाठी जाता तेव्हा त्याच्याशी संबंधित कामे करणे अधिक महत्त्वाचे आहे हे तुम्ही ठरवायला नको का? तुम्हाला शिष्यवृत्ती कशासाठी मिळत असते? एफटीआयआयचे विद्यार्थीदेखील त्यांच्या अभ्यासक्रमाचे सोडून काय काय करतात हेदेखील नुकतेच समोर आले. तुम्ही अशैक्षणिक किंवा सामाजिक गोष्टींशी संबंध नसलेल्या व अनेकदा राजकीय स्वरूपाच्या गोष्टी करणार आणि मग त्यात राजकीय हस्तक्षेप झाला की मग मात्र साळसुदपणे विद्यार्थ्यांवर किंवा दलितांवर अन्याय झाला म्हणून आरडाओरडा करणार. कोणी याबद्दल बोलेल काय?

रोहितच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही असे वाचण्यात आले. रोहित कोणत्या चळवळीत भाग घेतो याची त्याच्या घरच्यांना कल्पना होती का? त्यांनी त्याला चांगले शिकणे ही प्राथमिकता आहे असे समजावले होते का? त्याच्यावर झालेल्या कारवाईमुळे त्याची शिष्यवृत्ती बंद झाली. त्यामुळे त्याच्यापुढील अडचणी वाढल्या असणार. हॉस्टेलमधून काढल्यावर बाहेर राहण्याची जागा नाही, रोजच्या खर्चाची सोय कशी करायची, रोज कोणापुढे हात कसे पसरायचे यातून येणारी अस्वस्थता नक्कीच समजू शकतो. या महिनाअखेरीस रोहितचा वाढदिवस (असणार) होता. पण मला शिष्यवृत्ती मिळत नाहीये, मी तुम्हाला पार्टी कशी देऊ, असे तो मित्रांना म्हणाला. पण संघटना म्हणून चालवणा-यांनी आपली परिस्थिती कोणती आहे, कशी आहे याचे भान नको का ठेवायला? असे म्हटले की लगेच कोणी चळवळी करणे हा आमचा हक्कच आहे वगैरे म्हणायला नको. याकूब मेमनची फाशी तुमच्याशी संबंधित आहे का? तुमच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न आहे का? असेल तर हरकत नाही. पण मग त्याविरूद्ध मत असणारेही तुम्हाला भेटतील. तेव्हा मात्र डॉ. आंबेडकरांच्या नावाने स्थापन केलेल्या तुमच्या चळवळीच्या नावाचे भांडवल करू नका. स्वत:च्या दलित असण्याचे ‘भांडवल’ या भलत्याच मुद्द्यासाठी करू नका. तुम्ही केवळ तुम्हाला जे वाटते ते मांडत आहात हे कळू शकते, पण ‘भांडवल’ करण्याबद्दल जे लिहिले आहे ते तुम्ही विद्यार्थी नव्हे, तुमच्या नावाने इतर जण करत आहेत. तुमच्या आंदोलनात रोहित एकटाच होता का? त्याच्या आर्थिक परिस्थितीची व त्यामुळे त्याच्यावर आलेल्या ताणाची तुम्हाला माहिती नव्हती का? त्याला सांभाळून घेण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? तो असे काही पाऊल उचलेल याची आम्हाला माहितीच नव्हती असे आता म्हणत आहात, तर त्याच्या मृत्युला तुम्हीदेखील जबाबदार नाहीत का? जी आंदोलने करता ती तुम्हाला झेपतात का ते तरी पाहिलेत का? तेव्हा तुम्ही याकूब मेमनच्या फाशीविरूद्ध आंदोलन केलेत, तुमचा व्यक्तीगत प्रश्न आहे. ते तुम्ही ‘दलित’ म्हणून तर केले नाहीत ना? पण आता तुमच्या दलित असण्याचे भांडवल इतर जण करत आहेत.

काही लोक असे काही झाले की गेल्या काही वर्षांमध्ये किती हुशार दलितांनी आत्महत्या केल्या याची जंत्री देतात; एवढेच नाही तर त्यावरून स्वत:च्या अजेंड्याला सोयीस्कर निष्कर्ष काढतात. आणि कोणी अशा खोडसाळ व एकांगी पोस्ट आपल्याला पाठवल्या की आपण स्वत: त्यावर विचार न करता त्या प्रसारित/फॉरवर्डही करतो. तुम्हाला किती दलित दाखवू की जे अतिशय स्पर्धात्मक वातावरणातही प्रगती करतात. तिथे मात्र त्यांचे नाणे खणखणीत होते, म्हणून तिथले ‘सवर्ण’ त्यांना अडवू शकले नाहीत असे म्हणायचे, आणि ज्यांनी आत्महत्या केल्या ते मात्र याच ‘सवर्ण’ समाजाचे बळी? अहो, भेदाभेद कोठे होत नाही? मराठ्यांनी ब्राह्मणांचा करायचा, दलितांचा करायचा, जेथे करणे शक्य आहे तेथे ब्राह्मणांनी दलितांचा दुस्वास करायचा, दलितांनी ब्राह्मणांविरूद्ध उघडउघड बोलायचे, श्रीमंतांनी गरीबांचा करायचा, असे कित्येक प्रकार चालतात. माझ्या दारासमोर गाडी पार्क केल्यामुळे येण्याजाण्याला अडथळा निर्माण झाला म्हणून त्या गाडीच्या चाकातली हवा सोडली. तेव्हा माझ्यावर अॅट्रॉसिटीखाली कारवाई करेन असे दटावणारा एक नग मला भेटला होता. हे फारच किरकोळ उदाहरण झाले. पण तुमच्या ज्या भावना आहेत त्याची ही दुसरी बाजू माहित तरी आहे का? मागासवर्गीय असणे हेही अलीकडे हत्यार म्हणून वापरले जाते हे वास्तव माहित आहे का आणि ते मानता का? पण लगेच रोहितची आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेला खून आहे वगैरे वल्गना करण्यापर्यंत मजल जाते काही जणांची. या आंदोलनकर्त्यांवर दलित म्हणून डुख धरून परीक्षेत सतत नापास करण्याचे प्रकरण आहे की दलित आहेत म्हणून हॉस्टेलमध्ये त्यांच्याबरोबर खोलीत कोणी दुसरे रहायला तयार नाही? मग आत्महत्या केली या कारणाने लगेच त्यांचे दलित असणे कसे आठवते? लगेच त्याची आत्महत्या नव्हे, तो खून आहे वगैरे डायलॉगबाजी कशी आठवते?

बरे, आता याबाबतच्या तथ्यांवर नजर टाकू. रोहित, आंदोलनातील त्याचे सहकारी, विद्यापीठातील त्यांचे अध्यापक, मंत्री यांची जात काढणे मला प्रशस्त वाटत नाही. पण यात जातीय अँगल व जातीय अभिनिवेश आणणारे फार पाहिले आहेत म्हणून याचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे.

अभाविपच्या सुशील कुमार या स्थानिक अध्यक्षाने याकूब मेमन फाशी प्रकरणानंतर या आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनच्या सदस्यांना फेसबुकवर गुंड असे म्हटले. त्यावरून चिडून संघटनेचे तीसएक सदस्य कुमारच्या खोलीत गेले व त्याला मारहाण केली. कुमारकडून त्यांना गुंड म्हटल्याबद्दल लेखी माफीदेखील लिहून घेण्यात आली. हा प्रकार झालाच नाही असे कोणीही म्हणत नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. तरीही ज्यांना हे नाकारायचे आहे त्यांनी तसे खुशाल करावे.

मारहाणीच्या तक्रारीनंतर तेव्हाचे कुलगुरू शर्मा यांनी चौकशीनंतर संघटनेच्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यास नकार दिला. मात्र त्यांनी आणखी एक चौकशी समिती नेमली. त्याच सुमारास त्यांच्या जागी आताचे कुलगुरू अप्पाराव आले. त्यामुळे शर्मा यांनी नेमलेल्या चौकशी समितीचे पुढे काही झाले नाही.

दलितांमध्ये स्वाभिमान जागवण्याच्या आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनच्या उपक्रमांना नव्या कुलगुरूंनी दिलेल्या पाठिंब्याबाबतही रोहितने त्यांचे आभार मानले होते. अर्थात त्याच पत्रात वर म्हटल्याप्रमाणे त्याने उपरोधाने व रागाने फासासाठी दोर किंवा विषाची मागणी केली होती.

विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती एकदा काही कारणाने खंडित झाली की ती पूर्ववत होण्यास नोकरशाहीमुळे काही काळ लागतो. अनेकदा ही थकलेली शिष्यवृत्ती एकरकमीही मिळते असे विद्यापीठाचे लोक सांगतात.

सुइसाइड नोटमधली रोहितची भाषा पाहिली की तो एक विचारी मुलगा असल्याचे जाणवते. कुलगुरूंना लिहिलेल्य पत्रात माझ्यासाठी फास घ्यायला दोरीची सोय करा किंवा विष तरी आणून द्या असे म्हणणारा हा युवक प्रत्यक्ष आत्महत्या करण्याच्यावेळी लिहिलेल्या चिठ्ठीत मात्र कोणालाही दोष देऊ इच्छित नाही. (त्याच्या त्या चिठ्ठीत कोणालाही दोषी धरलेले नाही, म्हणून आम्ही त्याच्या आत्महत्येसाठी जबाबदार नाही असे म्हणणारेही काल टीव्हीवर पाहिले.) तो उगाचच या तीस जणांच्या घोळक्यात अडकला असे झाले असेल का? ज्याला आपण चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असणे म्हणतो. संवेदनशील असलेल्या त्याच्याबरोबर आक्रमक वृत्ती असलेल्यावरही कारवाई झाली तरी त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलण्याइतके ते एवढे मनाला लावून घेतले नाही? ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्यापैकी प्रशांत हा विद्यार्थी त्या तीसएक जणांच्या घोळख्याचा म्होरक्या होता. रोहितच्या मानाने त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे?

डॉ. आलोक पांडे यांच्यापुढे झालेल्या सुनावणीत संघटनेच्या या पाच जणांनी सुशीलकुमार याला मारहाण केल्याचा इन्कार केला. आम्हाला गुंड म्हणण्यावरून आम्ही सुशीलकुमारकडे गेलो व त्याच्याकडून लेखी माफीपत्र घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या चौकशी करताना पुढे आलेल्या पुराव्यांवरून व दिल्या गेलेल्या साक्षींवरून अगदी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याइतपत नाही तरी मारहाण झाली होती हे तथ्य समोर आले. एक उदाहरण म्हणून विचारतो, या मारहाणीत त्या सुशीलकुमारचा जीव गेला असता तर ‘दलितांनी एकाला मारले’ अशी त्याची बातमी झाली असती का?

सुशील कुमार याने दलितांबद्दल काढलेल्या काही अनुद्गारांचा उल्लेख एका ठिकाणी वाचण्यात आला. पण त्याचे संदर्भ व तपशील मिळत नाहीत.

या प्रकरणी सुशीलकुमारचे कोणी नातेवाईक आणि स्वत: हे विद्यार्थी यांनी परस्परांविरूद्ध न्यायालयात गेले आहेत. ते प्रकरण प्रलंबित आहे. ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्या पाच विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल याचा विचार करण्यासाठी संघटनेतील विद्यार्थ्यांची बैठक चालू असताना रोहित मधूनच म्हणजे दुपारी चारच्या सुमारास बैठक सोडून निघून गेला आणि संध्याकाळी सहाच्या सुमारास त्याच्यासाठी शोधाशोध केल्यावर त्याने आत्महत्या केल्याचे कळले. त्या बैठकीत असे काय झाले की रोहितने हे पाऊल उचलले? निराशाजनक सूर उमटला होता का, जसे की काहीही मार्ग निघू शकणार नाही? नक्की काय झाले हे कसे कळू शकेल? कोण सांगू शकेल?

या विद्यापीठात किती तरी इतर दलित विद्यार्थी असतील. त्यांच्या ‘दलित’ असण्यामुळे त्यांना विद्यापीठातील प्राध्यापकांकडून काही वेगळी म्हणजे भेदभावाची वागणूक मिळते का अशा स्वरूपाची काही चौकशी कोणी केली आहे का?

केंद्रिय मंत्री बंडारू दत्तात्रेय हे स्वत: मागासवर्गीय आहेत असे दिसते. याकूब मेमनच्या फाशीविरूद्ध आंदोलन करणा-या या संघटनेच्या विद्यार्थ्याना देशविरोधी संबोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र त्यांनी स्मृती इराणी यांच्या मंत्रालयाला पाठवले. ते पत्र कुलगुरूंना पाठवण्यात आले. त्यानंतर मंत्र्यांच्या पत्रावर काय कारवाई झाली हे विचारणारी तीन स्मरणपत्रे मंत्रालयाकडून कुलगुरूंना पाठवली गेली. आंदोलक व राजकारणी याला दबाव टाकणे म्हणत आहेत, तर मंत्रालय सर्वच पत्रव्यवहाराच्या बाबतीत तशी पद्धत असल्याचे म्हणत आहे. तेव्हा या प्रकरणाकडे जातीय दृष्टीकोनातून पाहणा-यांना दत्तात्रय यांचेही मागासवर्गीय असणे याबाबतीत चालणार नाही. कारण ते पडले भाजपचे मागासवर्गीय. म्हणजे बाटलेले. ते काय ‘दलितांचे’ हित पाहणार? दलितांचे ‘खरे’ हित पाहणा-याने कसे उठता बसता डॉ. आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करायला हवा. तरच काही जणांचे समाधान होते. वर म्हटल्याप्रमाणे चौकशी समितीमध्ये दलित प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व होते असे दिसते. रोहितच्याच एका पत्रात कुलगुरूंच्या भुमिकेबद्दल त्याने चांगले लिहिले होते. आता तर त्यांचाही बळी मागितला जात आहे.

विद्यालयांमधून होणारी राजकीय आंदोलने हा नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे. शिक्षणाशी संबंधित विषय सोडून कोणत्याप्रकारच्या आंदोलनांना कॉलेज-विद्यापीठांमध्ये परवानगी दिली जावी हा मुद्दा नेहमी चर्चिला जातो. पण त्यावर कधीही काही निर्णय किंवा एकवाक्यता होत नाही.

हैद्राबाद विद्यापीठात गेल्या पाच वर्षात रोहितसह पाच मुलांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही सर्वच मुले त्यांच्या कुटुंबातील प्रथमच शिकणारी अशी मुले आहेत असे कळते. हे सारे बळी आंदोलनापोटीच झाले आहेत का? की नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यामध्ये येणारी अडचण हे मोठे कारण असावे? मुंबई आयआयटीमध्येही काही दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत असे आपण वाचतो. या पार्श्वभुमीवर केवळ दलित असलेल्याच नव्हे, पण अभ्यासात कच्चे असलेल्या मुलांचे समुपदेशन करण्याची काही व्यवस्था आहे का? या मुलांच्या या व इतर अडचणी समजून घेण्याची अशी काही यंत्रणा असेल तर त्यांना केवळ त्यांच्या मित्रांच्या संगतीत वहावत जाण्याशिवाय इतर पर्याय उपलब्ध राहील. कॉलेजमध्येच विद्यार्थी कल्याण (वेलफेअर) समिती नेमून एखाद्या (सह्रदयी) प्राध्यापकाकडे याबाबतची जबाबदारी सोपवून दलित, इतर मागासवर्गीय, तसेच आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या मुलांकडे वैयक्तिक लक्ष ठेवून त्यांच्या समस्या समजून घेऊ शकेल. आताच्या प्रकरणातही प्रशासनाचा कारवाई झालेल्या विद्यार्थ्यांशी कारवाई होण्याआधी काही संवाद असेल की नाही माहित नाही, बहुधा नसेलच, कारवाईनंतर तर तो पूर्णपणे तुटला असणार. एखाद्या गरीब विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती पूर्णपणे व बराच काळ थांबल्यावर त्याच्यापुढे दुसरा काहीही सकारात्मक पर्याय न ठेवता येणे हे व्यवस्थेचेच अपयश नाही का? भारतातले विद्यार्थी परदेशात गेल्यावर तेथे त्यांचा रोजचा खर्च निघण्याइतपत कामे कॉलेजमार्फत वा विद्यापीठामार्फत त्यांच्यावर सोपवली जातात. आपल्याकडे असे होतकरू विद्यार्थी शोधून त्यांच्यासाठी काही व्यवस्था निर्माण करता येईल का?

अशा संवेदनशील मुद्द्यावर राजकारणी मोठ्या जोमाने राजकारण करतील यात शंका नाही. केजरीवाल व ओवैसी यांनी ते दाखवले आहेच. कॉंग्रेसच्या पप्पूकडून दुसरी काही अपेक्षा नव्हतीच. मायावती व ममता त्यांची पथके पाठवली आहेत. लालू-मुलायमही रिंगणात उडी न घेता मागे राहण्याचे पाप करणार नाहीत. दलितांच्या नावाने मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याची संधी कोण कसे सोडतील?

या निमित्ताने कवी अशोक वाजपायी यांनी त्यांना हैद्राबाद विद्यापीठाकडून मिळालेली डी.लिट. परत करण्याची घोषणा केली आहे. या मुलांवर कोणत्या कारणाने कारवाई केली गेली किंवा एकूण हे प्रकरण काय आहे याची त्यांना माहिती नाही आणि तरीही त्यांनी हे पाऊल उचलले आहे असे इंडिया टुडेवर ते सांगत आहेत. पुरस्कार किंवा पदवी परतीचा किडा चावलेले अनेक जण आपल्याला या विद्यापीठाकडून काही मिळाले होते का हे आता नक्कीच धुंडाळतील.

या सर्वात शक्यता आहे ती अशी की दबावामुळे कोणी तरी बकरा निश्चित शोधला जाईल. कदाचित चौकशीनंतर आणखी नवी तथ्ये समोर येतील. वर सुशीलकुमार याने दलितांविरूद्ध काही अनुद्गार काढल्याचा उल्लेख आहे. मी तर म्हणतो, ते जर खरे असेल, तर जरूर त्याच्याविरूद्ध कडक कारवाई करा. परंतु शक्यता अशी आहे की अशा प्रकारांवरून नेहमीच होणा-या राजकारणामुळे मूळ प्रश्नाकडे कोणाचेच लक्ष जाणारच नाही. कारण कोणाची तशी इच्छा नाही. दलितांसाठी काही तरी केल्याचे खोटे समाधान मात्र आंदोलकांना व त्याहीपेक्षा राजकारण्यांना मिळेल.

आज रोहित, उद्या आणखी कोणी. दलित किंवा दलित नसलेला. पुढचा विचार करून यावर कायमस्वरूपी विचार करून जे कोणी स्वभावाने हळवे जीव असतील, ते वाचवण्यासाठी प्रयत्न करायला सवड आहे कोणाला?

या पोस्टला फुसके बार म्हणवत नाही. पण या सदराचे नाव बदलेपर्यत तरी तसेच ठेवतो.
फुसके बार – २० जानेवारी २०१६

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोलिटिकल सर्कस सुरु झालेली आहे, इच्छुकांनी लाभ घ्यावा (आणि वान्नाबीजनी भाग घ्यावा)... Happy

ओ बायदवे, आज इंटर्नॅशनल पॉप्कॉर्न डे आहे, वाट ए कोइंसिडंस...

>>तुमचे प्रोफाईल. भारतीय नागरिकत्व आहे काय?<<
प्रोफायल मध्ये नाहि किंवा दुसर्‍या देशाचे नागरिकत्व आहे, असं लिहिलंय का?

असो, आता बाकिच्यांना खेळु द्या... Wink

प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत. पुन्हा विचारतो. शब्दफुलोरा टंकून बगल देऊ नका. Wink
भारतीय नागरिकत्व आहे का?

हो

When I read the news I was saddened not only because of Rohith's deat but also because in India the dalits are still looked down upon by high-caste people. University administrations have forgotten about academic freedom and they spend their time brown-nosing politicians. On the other hand politicians misuse their power and appoint third-rate academics to head the universities. Furthermore the author does not seem to understand the concept of academic freedom. He says that Rohith's family should have him that he is in the university to study and not be political. Does the author think that Rohith's studies suffered? If students and academics are not allowed to involve themselves in issues which are against their conscience then independent thinking will cease to exist which will be bad for the nation. Threats of suspensions etc. force students and staff to not think independently but trry to fit in which Rohith did not do and paid with his life. How sad.

लेखकाने घेतलेली सुस्पष्ट भूमिका आवडली. प्रत्यक्षात काय झाले व ते जगासमोर कसे आले हे वेगळे पण लेखातील काही काही प्रश्न नक्कीच मार्मिक आहेत असे वाटले.

दलित मुलांनी स्वतःच्या क्शिक्षणावर ल्कश केंद्रित करण्णे आणि स्वतःची आर्थिक बाजु बळकट करणे जास्त योग्य नाही का?युनिननचा उप्योग दलित मुलांना अधिकाअधिक शैक्शणिक फायदा मिळवुन देण्यासाठी केला असता तर ठिक होते. नको त्या फंदात पडायचे कशाला?

नको त्या फंदात पडायचे कशाला?
<<
हो नं.
बरं झालं मेला ते.
ती अभाविपची मुलं पहा, कशी हव्या त्याच फंदात पडतात. पण तेही बरोबरे. दलित नाहियेत ती. त्यांना चालतं.

अभाविप, एनएसयूआय, कम्युनिस्टांच्या विद्यार्थी शाखा वगैरे मधे काम करणारे वाया जातात का ? एक शंका आहे.

यूथ फॉर इक्वेलिटी, सोशल जस्टीस वगैरे विद्यार्थी आंदोलनातून पुढे आलेलं नेतृत्व आज एका राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवतंय. ते वाया गेले किंवा कसे ?

दलित असो किंवा अन्य कुणी त्यांना त्यांच्या विचारांसहीत शिकता येणार नाही का ?
स्त्री संघटनांच्याही विद्यार्थी शाखा आहेत. स्त्रियांनीही आधी शिकावं आणि हे धंदे बंद करावेत का ?

अहो दलितांच्या मुलांनी असे केलेले उच्चवर्णीयांना कसे पचेल त्यांच्या मुलांनीच हे सर्व करावे संघात जावे. राजकारणात उतरावे, असे यांचे म्हणणे आहे अजून तुमच्या लक्षात कसे येत नाही कापोचे दिमा?
यांच्या मुलांनी कितीही दंगे केले अभाविप काढले तरी ते कौतूकस्पद असते पण दलितांनी स्वतःच्या हक्काबाबत लढले तरी ते यांच्यासारख्यांना चालत नाही.

याकूबच्या फाशीबाबत ज्यांनी तो इश्यू नॅशनल मीडीयात पहिल्यांदा आणला आणि ज्या विचारवंतांना मुक्तपणे त्यावर विचार मांडू देण्यात आले ते सर्व देशद्रोही आहेत का ? असतील तर रोहीत ला ज्याप्रमाणे शिक्षा झाली तशी त्यांना होणार का ?

त्याने फाशीचीच शिक्षा नको अशी भूमिका घेतली होती ही पळवाट होती हे कशावरून ?
त्याने ओपन सीटवर प्रवेश घेतला होता, तो आईबरोबर राहत होता हे मुद्दे त्याच्याविरोधात जाणार आहेत. अ‍ॅट्रोसिटी लावणे, शिक्षा होणे हा मुख्य मुद्दा नाही. रोहीत सारख्यांना आपले (ऑड असलेले) विचार खुलेपणे मांडून शिक्षण घेता येईल का, समाजात वावरता येईल का , अशा विचारांच्या लोकांना देशद्रोही समजले जाणार का हा आहे.

पुढच्या सर्व घटना या मुद्यापासून भरकटणा-या आहेत. मूळ मुद्दा लावून धरणे महत्वाचे तरच त्याच्या लढ्याला अर्थ आहे. चुकीच्या कारणांसाठी त्याला निष्कासित केले गेले हा त्याचा मुद्दा होता.

नाहीतर नथुराम गोडसे कसा योग्य होता हे त्या वेळच्या मान्यतेप्रमाणे ऑड असणारे मत शाळा, कॉलेजातून मांडना-या चळवळीतले लोक केव्हाच शिक्षणसंस्थांच्या बाहेर फेकायला हवे होते...

रोहितने जसे याकूबच्या फाशीबाबत विरोध व्यक्त केला होता तसाच निर्भया काण्डवर आपल्या पुर्ण ग्रुप बरोबर कैंडिल मार्च पण काढला होता.

नाहीतर नथुराम गोडसे कसा योग्य होता हे त्या वेळच्या मान्यतेप्रमाणे ऑड असणारे मत शाळा, कॉलेजातून मांडना-या चळवळीतले लोक केव्हाच शिक्षणसंस्थांच्या बाहेर फेकायला हवे होते... >११११

फुले,आंबेडकर विचारधारेला मानने आणि ते बोलुन दाखवने म्हणजे नको त्या फंदात पडणे आसते का?>> मग काय कसली म्हणून शिस्त नाही, बरोबर अंतर ठेऊन संचलन करता येत नाही, निमूटपणे आदेश पाळता येत नाहीत. आम्ही मोठ्या मनाने स्कॉलरशिपा देतोय त्या घ्या आणि गप बसा आंदोलने करायची हिम्मतच कशी होते यांची?
बायदवे, हैद्राबाद विद्यापीठाच्या चौकशी समितीला त्या अभाविपच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा काहीच पुरावा मिळाला नाही, पण ते एक असो.
अजून एक बायदवे, स्मॄतीताईंच्या मिनिस्ट्रीने विद्यापीठावर 'स्मरणपत्रे' पाठवली पण आता त्याच म्हणताहेत की हा विद्यापीठाचा अंतर्गत मामला आहे आणि त्यात त्यांची मिनिस्ट्री हस्तक्षेप करु शकत नाही, तसा कायदाच आहे म्हणे, का ही ही हां स्मृ!

रोहित यान्च्या निधनाने मन खुप अस्वस्थ झाले.... सम्पुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषीन्ना शासन अशी किमान अपेक्षा. प्रकरणात राजकारण शिरलेले आहे तर चौकशी निष्पक्ष होणार का याबाबत प्रामाणिक शन्का आहेत.

विद्यार्थी दशेत असताना तुम्ही इतर अनेक गोष्टी करतातच... आवान्तर वाचन, चित्रपट बघणे, नाटकात भाग घेणे, गाण्याची आवड जोपासणे, कविता / गझला रचणे, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतीला धावणे, ट्रेकीन्ग, किव्वा एखादा क्रिडाप्रकारात स्वत:ला पुर्णत: झोकवणे अशा तुम्हाला आवडणार्‍या अनेक गोष्टी तुम्ही करतच असतात.

मी आणि माझ्या अनेक सहकार्‍यान्नी अभ्यासाच्या वेळी अभ्यास केला आणि जोडीला इतरही कार्य केले... आपापल्या कुवतीनुसार वेळ देणे आलेच... त्यामुळे व्यक्तीमत्व चौफेर बनण्यास मदत होते असे मी मानतो.

शिकलेले लोक राजकारणात येत नाही म्हणुन आपण नेहेमीच ओरडतो... रोहित घडत असताना काही ठोस भुमिका स्विकारत होता तर त्याला तसे करण्याचा पुर्ण अधिकार आहे... आपण प्रोत्साहन द्यायचे.

देशद्रोही याकूब मेमन ची अंत्ययात्रा काढायला सरकार परवाणगी देते परंतू एका दलित विद्यार्थ्याची अंत्ययात्रा मात्र लॉ न ऑर्डरसाठी आव्हान असेल असे सरकारला वाटते? Uhoh

वा वा काय सरकार निवडून दिले आहे.. खरच.

"रोहीत वेमूला" आत्महत्या राजकीय दबावातून आणि हस्तक्षेपातूनच झाली.

रोहीत वेमूला प्रकरण घडण्याची सुरुवात मुज्जफरबाद दंगलीची फ्लिम विद्यापीठात दाखवू नका म्हणून ABVP ने फ्लिम दाखवीण्याचा कार्यक्रम उधळला या घटनेने झाली.याकूब मेनन फाशी प्रकरणाचा संबध नाही.फाशी समर्थन म्हणजे राष्ट्रवाद नाही.तर फाशी विरोध म्हणजे देशद्रोह नाही.रोहीत वेमूला फाशी विरोधक होता असे गृहीत घेवून त्याला देशद्रोही म्हणने
हे ABVP व RSS चे नाटक आहे.याकूब मेनन प्रकरण तपास अधिकारी फाशी विरोधी होते त्यांना बीजेपी देशद्रोही म्हणणार काय? सरदार पटेल सोबत RSS ने करार केला त्यात RSS ने अट टाकली की, ते स्वातंत्र्य दिन,तिरंगा ध्वज, अशोक चक्र,घटना मान्य करणार नाही.आजही आरएसएस मानत नाही. मग तुम्हाला
देशद्रोही म्हटले तर चालेल काय?
रोहीत वेमूला ने व त्याच्या मित्राने ABVP च्या शशि कुमार ला बेदम मारले नव्हते वाद झाला होता व या पुढे असे करणार नाही असे शशी कुमारने माफी पत्र कुलगुरुना दिले होते.शशी कुमार स्पोंडयालीसीस ऑपरेशन साठी दवाखान्यात होता,मारल्याने नव्हे.
रोहीत वेमूला डॉ.बाबासाहेब आंबेडकर असोसिएशन चा होता.तर शशी कुमार बीजेपी व आरएसएस च्या विद्यार्थी विंग अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (ABVP)चा.म्हणून बीजेपी ABVP ची बाजू घेत आहे.
रोहीत वेमूला ची फेलोशिप रक्कम कुलगुरुनी अधिकार नसतांना सहा महीने थांबवली.कँटिन, हॉस्टल,ग्रंथालय
बंद केले. निलंबन केले.HRD मंत्रालयाला अधिकार नसताना ५ पत्रे करवाइ साठी विद्यापीठाला दीड महिन्यात लिहिली. कारवाइ साठी दबाव टाकला.
हा अधिकार UGC ला आहे. बीजेपी चे मंत्री बंडारू दतात्रय ने रोहीतला देशद्रोही ठरविले व रोहीत वर करवाइ साठी HRD मंत्रालयाला पत्र लिहिले व HRDने कुलगुरुला रोहीत वर करवाइ करा म्हणून एक महिन्यात ५ पत्रे लिहिली. HRD मंत्री स्मृति इरानी आहेत. या सर्व राजकीय दबावातून आणि हस्तक्षेपातून रोहीत वेमूला ने आत्महत्या केली.
ही हत्त्या आहे.रोहीतने शेवटच्या पत्रात कोणाचे नाव घेतले नसले , तरी आत्महत्त्येला कारणीभूत ठरलेली
परिस्थिती लिहिली आहे.ही परिस्थिती कोणी निर्माण केली? ही घटना गंभीर आहे,बीजेपी ने राजकारण करु
नये.संबधीतांवर करवाइ करावी. दूसरी बाजू शांत बसणार नाही.पलटवार करू शकतो.

प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, ABP माझा टीवी, दि १९ जानेवारी २०१६ ,
शब्दांकन - प्राचार्य म ना कांबळे,पुणे

ते सुशीलकुमारसुद्धा २६ वर्षांचे आहेत बरं का.
Kumar, who joined the university in 2007 for an Integrated MA and MPhil course, said that on August 2 last year,....

खरतर २००४ ते २०१४ या दहा वर्षाच्या काळात ह्या हैद्राबाद विद्यापिठात रोहीत वेमुलाला धरुन आणखी आठ दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्यावेळी आंध्रा आणि केंद्रात कॉंग्रेजचे सरकार होते, त्यावेळी ह्या राहुल गांधीला नाही जावेसे वाटले कधी. आणि आता सत्ता गेल्यावर मृताच्या टाळु वरचे लोणी खायला हे राहुल नावाचे महाशय सर्वात आधी तिथे हजर. तिच गोष्ट केजरीवालची रामलिला मैदानावर स्वत:च्या मनोरंजना साठी एका शेतकर्‍याला या इसमाने फासावर लटकु दिले व वर निर्लज्जपणे 'लटक गया' म्हणत त्या मृत्युचेही राजकारण केले. त्यावेळी केजरिवालला ती हत्या वाटली नाही.

Pages