खडकी व भीमा कोरेगावच्या लढाया

Submitted by Rajesh Kulkarni on 1 January, 2016 - 13:52

खडकी व भीमा कोरेगावच्या लढाया

खडकीची लढाई ५ नोव्हेंबर १८१७ रोजी झाली. मराठ्यांचे सैन्य २८,००० तर इंग्रजांचे ३,०००.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मराठ्यांचे ५०० तर इंग्रजांचे ८६.

त्यानंतर लगेचच भीमा कोरेगावची लढाई. १ जानेवारी १८१८.
पेशव्यांचे सैन्य २५,००० तर इंग्रजांचे ८००. मराठ्यांचे सैन्य इतके अधिक असले तरी त्यांनी २,००० सैनिक इंग्रजांच्या सैनिकांशी लढायला पाठवले.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये इंग्रजांचे २७५ तर मराठ्यांचे ५०० ते ६००.

इंग्रजांच्या सैन्याने १२ तास मराठ्यांच्या सैन्याचा मुकाबला केला. परंतु इंग्रजांची आणखी मोठी फौज येईल या भितीने मराठ्यांच्या सैन्याने त्यादिवशी माघार घेतली. मराठ्यांच्या सैन्यात बरेचसे अरब होते. तर इंग्रजांकडून लढणारे बरेचसे महार.

भीमा कोरेगावची लढाई सुरू झाल्यावर अरबांचीच सरशी होत होती. त्यांच्या ताब्यात सापडलेल्या इंग्रज अधिका-याचा त्यांनी शिरच्छेद केला. तेव्हा मनोबल खचलेल्या इंग्रजांच्या सैनिकांनी शरण जाण्याची बोलणी करण्याचा आग्रह धरला. तेव्हा मराठ्यांच्या ताब्यात सापडलेल्याची अशीच (शिरच्छेदाची) गत होईल अशी भीती इंग्रज अधिका-यांनी त्यांना घातली. त्याचा परिणाम इंग्रजांचे उरलेसुरले सैन्य त्वेषाने लढण्यात व त्यांनी दोन हजाराच्या - पंचवीस हजाराच्या नव्हे - सैन्याला थोपवून धरण्यात झाला. अर्थात हा पराक्रमही मोठा आहेच.

याच पद्धतीने खडकीच्या लढाईतही २८,००० विरूद्ध ३,००० असा विषम सामना असतानाही मराठ्याचे सैन्य कसे पराभूत झाले याचीही मिमांसाही करता येईल.

वरील माहिती इंटरनेटवर अगदी सहजपणे उपलब्ध आहे.

माझ्या मनात खालील प्रश्न उभे राहतात.

१) वरीलप्रमाणे ८०० विरूद्ध २,००० अशी परिस्थिती असताना भीमा-कोरेगावच्या या लढाईला ५०० विरूद्ध २५,००० असे स्वरूप का दिले गेले?

२) या लढाईच्या आधी मराठ्यांची शक्ती क्षीण होत गेलेली स्पष्ट दिसत होती. मराठा साम्राज्य आज ना उद्या बुडणार हे दुस-या बाजीरावाच्या एकूण कर्तृत्वावरून दिसत होतेच. तरीही खडकीच्या लढाईत हरले ते मराठे व जिंकले ते इंग्रज. मात्र भीमा कोरेगावच्या लढाईत जिंकले ते महार व हरले ते अरब नव्हेत तर मराठे (ब्राह्मण), असे का? शिवाय एवढेच नाही, तर महार सैनिकांनी पेशवाई बुडवली असा प्रचार का?

३) अलीकडे भीमा कोरेगावच्या लढाईनंतर तेथे उभारलेल्या विजयस्तंभाच्या ठिकाणी दर वर्षी दलित जमतात ते त्या युद्धात मरण पावलेल्या महार जवानांची स्मृती जागवण्यासाठी. या जवानांच्या पराक्रमाबद्दल शंका नाही, पण तो काही त्यांनी पेशव्यांच्या जुलुमी राजवटीविरूद्धचा विद्रोह नव्हता की बंड नव्हते. तरीही या पराक्रमाला जातीय रंग का दिला जातो?

४) इंग्रजांच्या बाजुने लढलेल्या व मरण पावलेल्या महार सैनिकांचे आज स्मरण केले जाते मात्र इंग्रजांच्या विरूद्ध म्हणजे मराठ्यांच्या बाजुने लढताना मारले गेलेल्या महारांच्या सैनिकांचे विस्मरण का?

५) भीमा कोरेगावच्या लढाईच्यावेळी पुण्यावर इंग्रजांचा कब्जा झालेला होताच. तर मग या लढाईच्या निमित्ताने महारांनी पेशवाई बुडवली असा अतिरंजित प्रचार का केला जातो?

६) १९२७मध्ये डॉ. आंबेडकरांनी तेथील स्मारकाला भेट दिली होती व तेव्हापासून त्या लढाईला अस्पृश्यतेविरूद्धचा लढा असे नाव दिले होते. पण ते खरोखर तसे आहे का?

७) या लढाईच्या वेळीच मराठा साम्राज्य जवळजवळ संपलेलेच होते. या लढाईच्या आधी महार त्याच पेशव्यांच्या बाजूने इंग्रजांविरूद्ध लढलेले होते. शिवाय त्यानंतर आलेल्या इंग्रजांच्या राजवटीतही महारांच्या स्थितीत काही फार फरक पडलेला नव्हता असेही वाचण्यात येते. तेव्हा या लढाईवरून आजही समाजात दुष्प्रचार केला जातो व तेव्हाच्या ‘ब्राह्मण’ पेशवाईविरूद्ध आजही वातावरणनिर्मिती करण्यासाठी या घटनेचा उपयोग केला जातो, असे म्हणणे चुकीचे ठरेल का?

८) या लढाईपूर्वी पुण्यात झालेल्या एका तात्कालिक कारणामुळे त्यांना दिलेल्या वागणुकीमुळे महार चिडलेले होते. त्यांना दिलेल्या अमानुष वागणुकीचे समर्थन करणे शक्य नाही. भीमा कोरेगावच्या लढाईत इंग्रजांना साथ देणे ही त्याविरूद्धची प्रतिक्रिया होती. या लढाईनंतर इंग्रजांच्या अंमलातही त्यांच्या परिस्थितीत फार फरक पडला नाही याचा उल्लेखही वर केला आहेच.

तरी जातीय आधाराव्यतिरिक्त या लढाईचे मूल्यमापन कोणी करू शकेल काय?

पुराणातली नव्हे तर इतिहासातली वांगी (वानगी) इतिहासातच राहिली असती तरी हरकत नव्हती, पण ती वर्तमानातही येऊ पहात आहे(त).

सतराव्या शतकातील काही घटनांवरून चाललेल्या अस्मितांचा घोळ आजही होताना आपण पाहतो. या एकोणिसाव्या शतकातल्या घटनेचेही तसेच होऊ नये एवढी अपेक्षा.

प्रतिक्रिया देताना जातीय अभिनिवेश नको ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेशव्यांनी माघार घेतली हा उल्लेख विकीपीडीयाच्या पेजवर गेल्या दोन दिवसांपासून दिसू लागलेला आहे. त्या आधी तिथे वेगळी माहीती होती.

या पेजचं एडीटिंग ३१ डिसेंबरलाही केलं गेलं आहे आणि १ जानेवारीला संध्याकाळी ४ जानेवारीपर्यंत ते चालूच होतं. हे बदल अनडू होऊ शकत नाहीत असा मेसेज येतो.

तुमच्या माहीतीचा स्त्रोत कुठला ?

मी तारखांबाबतची माहिती तेथून घेतली आहे. बाकी प्रत्यक्ष स्तंभही मागे पाहिलेला आहे. इतरही अनेक संदर्भ इंटरनेटवर मिळतात.

कुठून घेतली आहे. हिंदुतवावाद्यांची पेजेस सोडून अन्य कुठे २०००० च्या ऐवजी २००० सैन्य होते हे तपशील सापडले हे सांगणार का ?

पेशव्यांच्या सैन्यातले हरले तर अरब, जिंकले तर ? असा प्रश्न तुमच्याकडून विचारायचा राहून गेला, ते अभिनिवेशापोटी तर नाही ना ? समजा हरवलं ५०० महार सैनिकांनी आणि त्या विजयाचा आनंद साजरा केला गेला तर अस्वस्थ होण्याचं कारण काय ?

ब्राह्मणांनी गर्वाने पेशव्यांचा इतिहास सांगायचा, राजपूतांनी त्यांच्या राजाचा सांगायचा असा प्रत्येक जातीने आपला इतिहास सांगायचा यात जातीयवाद नाही का ? की देशभक्ती दिसते यात ?
या राजांच्या काळात ज्यांचा इतिहास पुसला गेला, नष्ट केला गेला, त्यांचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी या शौर्याचा उल्लेख केला तर त्यावर इतकी आगपाखड करण्याचे कारण कळालेले नाही.

हे सर्व जाऊ द्या.
विकीपीडीयाचे ते पेज हाच तुमचा स्त्रोत असेल तर या धाग्याला काहीही अर्थ नाही.

http://self.gutenberg.org/articles/battle_of_koregaon

विकीपीडीयाच्या त्या पेजवर बदल करण्याआधी कुठली माहीती होती हे या लिंकवर कळून येईल. या लिंकवर विकीपीडीयाचा संदर्भ देऊन तिथली माहीती कॉपी पेस्ट करण्यात आलेली दिसून येईल. दोन्ही मधे काय फरक आहे ते स्पष्टच आहे.

गुटेनबर्ग डॉट ओरजी असा पत्ता असल्याने इथल्या कुणी खोडसाळपणा करण्याचा प्रश्नच मिटला, नाही का ?
ज्या माहीतीचा आधार घेऊन तुम्ही इतके प्रश्न विचारले आहेत तिच्याबद्दलची ही माहीती..

जुन्या ऑफिसमध्ये माझा एक श्रीलंकन मित्र होता. त्याला मी एकदा चिडवायला म्हटलेले की आमच्या रामाने तुमच्या रावणाला वानरसेनेच्या जीवावर हरवलेले.... पुढचा कितीतरी वेळ तो बावळटसारखा हसत बसलेला... थोड्यावेळाने मीच त्याला काहीतरी बावळटसारखे बोललोय हे लक्षात आले Happy

सहज आठवले म्हणून लिहिले, यात काही गहन अर्थ वा उपरोध वा टोमणा वगैरे शोधायला जाऊ नका. Happy

कपोचे,
तुम्ही दिलेल्या लिंकमध्येही सैन्याने inexplicably माघार घेतल्याचा उल्लेख आहे.
शिवाय लढाईच्यावेळीच पुण्यावर इंग्रजांचा कब्जा होता अशी निरिक्षणे अाहेत व त्या संबंधीचे प्रश्न आहेत, तेव्हा केवळ विकीवरील माहितीवर जाऊ नका.

कपोचे हे संकेतस्थळही काँट्रिब्युटरीच आहे. आणि त्यात इम्प्रूव्हमेंटची सोय आहे आहे आणि तसे आवाहनही आहे.

विकीच्या त्या पेजवर कुणी कुठले बदल केले हे पाहता येतंय. आयपी अ‍ॅड्रेसेस देखील आहेत.

त्यावरून ३१ डिसेंबरला २०००० च्या ऐवजी २०००, पेशवा आर्मीच्या ऐवजी मराठा आर्मी असे किरकोळ बदल केले गेले आहेत. तर सप्टेंबरला २०१५ ला मेजर बदल केले गेले आहेत. २०१३ पूर्वीच्या या पेजवरची जी माहीती होती ती हास्यास्पद वाटेल असे बदल झाले आहेत. मात्र संदर्भ व अन्य गोष्टी जुळत नाहीत. अन्य एका ठिकाणी मूळ पेजवर काय माहीती होती हे दिसते. तसेच विकीवर देखील बदल करण्यापूर्वी काय माहीती होती हे दिसून येते.

पेशव्यांनी माघार घेतली हे बरोबर. पण त्याआधी रात्रभर केवळ ५०० सैनिकांनी लढून २०००० सैन्याला थोपवून धरले ही माहीती अन्यत्र आहे. हे ज्यांना सह्न होत नाही त्यांनी ते बदललं हे उघड आहे. जे शहीद झालेत त्यांची नावे विजयस्तंभावर आहेत. तसे शासकीय रेकॉर्ड असल्याचे पूर्वी वाचलेले आहे.

अशा बदलत राबणा-या संस्थळांवरची माहीती आपल्या लिखाणाचा स्त्रोत आहे हा मुख्य मुद्दा आहे महाराज. इतिहास या विषयात पडून नाहक वेळ घालवायचा नसल्याने इतकेच.

लबाड व रक्तपिपासू पेशवाई त्यांच्या कर्माने , बहुजनांच्या संघर्षाने व नारायणरावाच्या भुताच्या शापाने संपली.

त्यानंतरच्या इंगेअजी सत्तेतूनच आजच्या लोकशाहीची सुरुवात झाली.

हिंदु राजे व पेशवे यांनी नेहमी मोघल व इंग्रजानी लुटले म्हणुन बोंबा मारल्या , प्रत्यक्षात लुटण्यालुबाडण्यात हेही तितकेच अग्रेसर होते.

पेशवाईने या निमित्त्याने अखेरचे आचके दिले.

अर्थात , युद्धात हरुनही दुसरा बाजीराव सुमारे आठ लाख रु वार्षिक पेन्शन इंग्रजांकडुन खात होता.... हरल्यावरही इतकी पेन्शन ! म्हणजे सत्तेतच असते तर यानी किती अगणित प्रमाणात लुटले असते , याची कल्पना येते... नंतर वारसासाठी या पेशव्याने अजुन दोन चार लग्ने केली. पण अपत्यप्राप्ती झाली नाही. ( नाना हा दत्तकपुत्र )

हा रेफरंस घ्या तुमच्या माहितीसाठी. खडकी आणि भीमा कोरेगावच्या लढाईचे उत्तम वर्णन केले आहे.

https://archive.org/stream/historyofmaratha03kincuoft/historyofmaratha03...

आपली उगाच एक पिंक:

----------

General Smith followed him ; but, fearing that the Maratha army might slip past him into the Konkan and overwhelm the small English detachment there under Colonel Prother, he directed Colonel Burr to send reinforcements to Colonel Prother and to call in from Sirur the 2nd Battalion of the 1st Regiment. Colonel Burr acted on these instructions, and, on receiving their orders, the 2nd Battalion of the 1st Regiment, five hundred strong, and three hundred irregular horse, accompanied by two guns and twenty-four English artillerymen, set out for Poona at 8 p.m. on the 31st December, 1817.

---------

पुढे किंक्लेड असेही सांगतो की बाजीरावाचे २५ हजार घोडदळ होते, पण प्रत्यक्ष युद्धात ३०० च्या ३ तुकड्यांनी (पायदळ) हल्ला चढवला. १ आणि २ जानेवारीला इतक्याच लोकांमध्ये युद्ध झाले, आणि नंतर पेशव्याने हल्ला केला नाही तर निघून गेला. बर्र आणि मंडळी परत गेली शिरूरला. ह्या प्रतिकारामुळे बाजीराव दुसरा खचला असे इंग्रज लिहितात तर दुसऱ्या बाजीरावास तिथे युद्ध करायचेच नव्हते तर त्याला पुणे परत जिंकायचे होते असे मराठा इतिहासकार लिहितात.

शेवटी इतिहास जिंकणारे लिहित असतात. त्यामुळे पेशवा का निघून गेला की त्याला निघून जायचे होते; ह्यास काही अर्थ राहत नाही. पेशवा हरला हे अंतिम सत्य Wink

बाकी राजकारण आणि अस्मितांचा खेळ हो.

लबाड व रक्तपिपासू पेशवाई त्यांच्या कर्माने , बहुजनांच्या संघर्षाने व नारायणरावाच्या भुताच्या शापाने संपली.
>>

मस्त वाक्य Biggrin !! बहुजनांनी संघर्ष करून पेशवाई संपवली आणि इंग्रजांना सत्ता का दिली हा मला आजतागायत पडलेला प्रश्न Wink

----------
त्यानंतरच्या इंगेअजी सत्तेतूनच आजच्या लोकशाहीची सुरुवात झाली.

हिंदु राजे व पेशवे यांनी नेहमी मोघल व इंग्रजानी लुटले म्हणुन बोंबा मारल्या , प्रत्यक्षात लुटण्यालुबाडण्यात हेही तितकेच अग्रेसर होते.
----------

ह्यास संपूर्ण अनुमोदन. मुद्दलात स्वातंत्र्य समता आदिक पाश्चात्य मुल्यांची ओळख भारतिय उपखंडात इंग्रजी सत्तेमुळेच झाली. आधुनिक शिक्षण मिळाले आणि लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवल्या गेली.

१८५७चा स्वातंत्र्यलढा म्हणजे संस्थानिकांनी केलेलं बंड! हे माझे मत बनत चालले आहे.

इंग्रज पेशव्याला पेन्शन का देत होते ?
>>

परत महाराष्ट्रात जाऊन युद्ध पुकारू नये म्हणून Wink तसे पाहता इंग्रज चांगले होते. सगळे संस्थानिक त्यांच्या उरावर भार सोपवून ऐश करत राहिले.

नानासाहेबाचे चुकलेच. राज्य गेले ... पेशवा खिताब नाकारला राजा ऑफ बिठूर हा खिताब दिला म्हणून येड्यासारखा युद्ध करत सुटला. मस्त राहायचं असत ८ लाखाची पेन्शन खात.

काय मोगा बरोबर का नाय?

>>>बहुजनांनी संघर्ष करून पेशवाई संपवली आणि इंग्रजांना सत्ता का दिली हा मला आजतागायत पडलेला प्रश्न<<<

Biggrin

बहुजनांच्या संघर्षाने
>> हा तुकडा वगळता अनुमोदन. बहुजनांना संघर्षाची पेरणा मिळण्याइतके आत्मभान कोठे होते त्या कालात. ? लढाया तर पगारी सैन्यावरच चालत.

नारायणरावाच्या भुताच्या शापाने ही तर अंधश्रद्धा झाली. हो, त्या घटनेच्या कॉन्सिक्वेन्सने पैस्थिती डिटोरिअ‍ॅट होत जाऊन पाया खचला असे म्हणता येईल.

कपोचे,

नेमकं काय म्हणायचं ते नाही उमगल. म्हणून इतकच लिहितोय. महार मंडळीनच्या सैनिकी कौशल्याबाबत तिथे लिहिलंय.

निर्विवाद सत्य आहे ते Happy

३०० च्या तीन तुकड्या होत्या हे कुठून घेतलंय ? लिंक किंवा संदर्भ मिळेल का ?
बरं ते हरत असताना२५०००० चं सैन्य गंमत बघत का उभे राहीले ? केवळ ५०० च्या सैन्याला घाबरून त्यांनी माघार का घेतली असावी ?

की पुरते पराभूत झाल्यानंतर तह वगैरे होऊन पेन्शन चालू झाली असावी ?
पेशव्यांचं सैन्य पुण्यात परत येऊ नये म्हणून नाकाबंदी करण्यात येत होती ना ? पेशव्यांनी मार्ग बदलून शिरूरकडून येण्यामागचे कारण वगैरे कळाले तर पुढे चर्चा करता येईल.

अवांतर आहे. नंतर योग्य तो धागा पाहून ही पोस्ट तिकडे हलवण्यात येईल.

प्रो. देवपूरकरांना परत बोलवावे. त्यांच्या गजला मायबोलीवरच्या उत्कृष्ट गजला होत्या. शिवाय गजलेविषयीची त्यांची मतं नेहमी अचूक असत.

वर दिलीय लींक. त्यात किंक्लेडने लिहिलंय तस. बाकी बाजीरावाने माघार का घेतली हा सगळ्यांनाच अनुत्तरीत प्रश्न आहे Happy

तीनशेच्या संख्येने तीन ग्रुप्समधे नऊशे सैनिक हरत असताना आणि पाचशेच लोक समोर दिसत असताना पंचवीस हजार सैन्य हाताची घडी घालून गंमत बघत उभे राहील हे पटते का ?
तुम्ही तो सारा इतिहास वाचलेला आहे का ?

तात्या याचे उत्तर तुम्ही खडकीच्या लढाईत बाजीरावाने स्वतःच्या लढवय्याचा -बापू गोखल्यांचा जो आणि ज्या पद्धतीने पोपट केला त्यावरून येईल. अभ्यास वाढवा. मेहनत करा. दंडबैठका काढा . '२१ अपेक्षित' वर विसम्बून राहू नका. ::फिदी:

कपोचे,
बाजीराव व त्याचे २५हजारचे सगळे सैन्य प्रत्यक्ष लढाईच्या ठिकाणी नव्हतेच. त्याच्याकडचे २,००० तिकडे पाठवले गेले होते.
त्यामुळे बाजीरावाने माघार घेण्याचे का ठरवले याचा उलगडा होत नाही वगैरे वर काही जणांनी म्हटलेले योग्य नाही. कारण यात बाजीरावाने माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता.
मुळात ही लढाई दोन्ही बाजूंकडून ठरवून केलेली नव्हती, दोन्ही बाजूंनी तेवढाच गोंधळ होता, याचेही अनेक उल्लेख आहेत. दोन गट अचानक एकमेकांसमोर आल्यावर ज्याला flash लढाई म्हणतात तसे तिचे स्वरूप दिसते.

तात्या याचे उत्तर तुम्ही खडकीच्या लढाईत बाजीरावाने स्वतःच्या लढवय्याचा -बापू गोखल्यांचा जो आणि ज्या पद्धतीने पोपट केला त्यावरून येईल.

>>

पादुकानंद स्वामी,

नाही माहिती Wink बापू गोखल्याचे सैन्य दलदलीत फसले एवढेच माहिती आहे. बाकी सल्ल्याबद्दल धन्यवाद, तेच करत असतो Happy

कापोचे,

मामला मलातरी नाही पटला. २५ हजार सैन्य काय करत होत आणि त्याने का हल्ला केला नाही हे प्रश्न तुम्हास माहिती असतील तर सांगून टाका. आम्हास इतिकीच माहिती.

हा आता किंक्लेडचा लिखाण तुम्हास मान्य नसेल तर आपली माघार बर.

तुम्ही लिंक दिलेली आहे म्हणून तुम्हाला शंका विचारतोय.
किंक्लेडने मराठी इतिहासकारांकडून संदर्भ घेतले असावेत असं म्हटलंय. पटले तर मान्य करूयात की..

पेशव्यांच्या बाजूने काहींनी पुस्तके देखील लिहीलेली आहेत. पण ती एकांगी वाटतात.
राकु
२००० सैन्य पुढे पाठवून बाकीचे सैन्य कुठे होते याचा खुलासा व्हावा,

Pages