रोहित वेमुला आणि जिवानिशी गेलेल्याचे खेळणे करणे
राजकारण्यांचा आवडता फड
.
हैद्राबाद विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी रोहित वेमुला याची आत्महत्या ही नि:संशय दु:खद व दुर्दैवी घटना आहे. ज्या डॉ. आंबेडकरांच्या नावाने स्थापलेल्या संघटनेचा तो सदस्य होता, अशा रोहितने त्यांचे निर्धाराने झगडण्याचे तत्व न अंगिकारता हे दुर्दैवी पाऊल का उचलावे यात मी जात नाही.
या निमित्ताने त्याच्या दलित असण्याचे भांडवल करत आंदोलने सुरू झाली आहेत, आणखी किती दिवस ‘दलितां’नी ‘सवर्णा’कडून अन्याय सहन करायचा वगैरे वल्गना करणे चालू आहे.
हा युवक आंदोलन चालवत होता. आंबेडकर स्टुडंट असोसिएशन नावाच्या संघटनेचा नेता होता. याकूब मेमनला फाशी देण्याला त्याच्या संघटनेने विरोध केला होता. काही जण तो याकूब मेमनच्या फाशीविरूद्ध नव्हे तर एकूणच फाशीच्या शिक्षेविरूद्ध आंदोलन करत होता अशी (त्याच्या वतीने) पळवाट काढत आहेत. त्यांना हे माहित नाही की फाशीची शिक्षा रद्द करा असे म्हणणारेही दहशतवाद किंवा तत्सम गुन्ह्याखाली झालेल्या गुन्ह्यांना फाशीतून वगळू नये असे म्हणतात. त्यामुळे असे म्हणण्याला काही अर्थ नाही. तर त्यावरून अभाविप आणि त्याच्या संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात भांडणे झाली होती. त्यांनी तेथील अभाविपच्या शाखेचा अध्यक्ष सुशीलकुमार याला त्याच्या होस्टेलच्या खोलीत मारहाण केल्याचा आरोप होता. मुळात मारहाण झालीच नव्हती इथपासून आरोप-प्रत्यारोप झाले.
तुम्ही एकदा पीएचडीसारख्या उच्चशिक्षणासाठी जाता तेव्हा त्याच्याशी संबंधित कामे करणे अधिक महत्त्वाचे आहे हे तुम्ही ठरवायला नको का? तुम्हाला शिष्यवृत्ती कशासाठी मिळत असते? एफटीआयआयचे विद्यार्थीदेखील त्यांच्या अभ्यासक्रमाचे सोडून काय काय करतात हेदेखील नुकतेच समोर आले. तुम्ही अशैक्षणिक किंवा सामाजिक गोष्टींशी संबंध नसलेल्या व अनेकदा राजकीय स्वरूपाच्या गोष्टी करणार आणि मग त्यात राजकीय हस्तक्षेप झाला की मग मात्र साळसुदपणे विद्यार्थ्यांवर किंवा दलितांवर अन्याय झाला म्हणून आरडाओरडा करणार. कोणी याबद्दल बोलेल काय?
रोहितच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही असे वाचण्यात आले. रोहित कोणत्या चळवळीत भाग घेतो याची त्याच्या घरच्यांना कल्पना होती का? त्यांनी त्याला चांगले शिकणे ही प्राथमिकता आहे असे समजावले होते का? त्याच्यावर झालेल्या कारवाईमुळे त्याची शिष्यवृत्ती बंद झाली. त्यामुळे त्याच्यापुढील अडचणी वाढल्या असणार. हॉस्टेलमधून काढल्यावर बाहेर राहण्याची जागा नाही, रोजच्या खर्चाची सोय कशी करायची, रोज कोणापुढे हात कसे पसरायचे यातून येणारी अस्वस्थता नक्कीच समजू शकतो. या महिनाअखेरीस रोहितचा वाढदिवस (असणार) होता. पण मला शिष्यवृत्ती मिळत नाहीये, मी तुम्हाला पार्टी कशी देऊ, असे तो मित्रांना म्हणाला. पण संघटना म्हणून चालवणा-यांनी आपली परिस्थिती कोणती आहे, कशी आहे याचे भान नको का ठेवायला? असे म्हटले की लगेच कोणी चळवळी करणे हा आमचा हक्कच आहे वगैरे म्हणायला नको. याकूब मेमनची फाशी तुमच्याशी संबंधित आहे का? तुमच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न आहे का? असेल तर हरकत नाही. पण मग त्याविरूद्ध मत असणारेही तुम्हाला भेटतील. तेव्हा मात्र डॉ. आंबेडकरांच्या नावाने स्थापन केलेल्या तुमच्या चळवळीच्या नावाचे भांडवल करू नका. स्वत:च्या दलित असण्याचे ‘भांडवल’ या भलत्याच मुद्द्यासाठी करू नका. तुम्ही केवळ तुम्हाला जे वाटते ते मांडत आहात हे कळू शकते, पण ‘भांडवल’ करण्याबद्दल जे लिहिले आहे ते तुम्ही विद्यार्थी नव्हे, तुमच्या नावाने इतर जण करत आहेत. तुमच्या आंदोलनात रोहित एकटाच होता का? त्याच्या आर्थिक परिस्थितीची व त्यामुळे त्याच्यावर आलेल्या ताणाची तुम्हाला माहिती नव्हती का? त्याला सांभाळून घेण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? तो असे काही पाऊल उचलेल याची आम्हाला माहितीच नव्हती असे आता म्हणत आहात, तर त्याच्या मृत्युला तुम्हीदेखील जबाबदार नाहीत का? जी आंदोलने करता ती तुम्हाला झेपतात का ते तरी पाहिलेत का? तेव्हा तुम्ही याकूब मेमनच्या फाशीविरूद्ध आंदोलन केलेत, तुमचा व्यक्तीगत प्रश्न आहे. ते तुम्ही ‘दलित’ म्हणून तर केले नाहीत ना? पण आता तुमच्या दलित असण्याचे भांडवल इतर जण करत आहेत.
काही लोक असे काही झाले की गेल्या काही वर्षांमध्ये किती हुशार दलितांनी आत्महत्या केल्या याची जंत्री देतात; एवढेच नाही तर त्यावरून स्वत:च्या अजेंड्याला सोयीस्कर निष्कर्ष काढतात. आणि कोणी अशा खोडसाळ व एकांगी पोस्ट आपल्याला पाठवल्या की आपण स्वत: त्यावर विचार न करता त्या प्रसारित/फॉरवर्डही करतो. तुम्हाला किती दलित दाखवू की जे अतिशय स्पर्धात्मक वातावरणातही प्रगती करतात. तिथे मात्र त्यांचे नाणे खणखणीत होते, म्हणून तिथले ‘सवर्ण’ त्यांना अडवू शकले नाहीत असे म्हणायचे, आणि ज्यांनी आत्महत्या केल्या ते मात्र याच ‘सवर्ण’ समाजाचे बळी? अहो, भेदाभेद कोठे होत नाही? मराठ्यांनी ब्राह्मणांचा करायचा, दलितांचा करायचा, जेथे करणे शक्य आहे तेथे ब्राह्मणांनी दलितांचा दुस्वास करायचा, दलितांनी ब्राह्मणांविरूद्ध उघडउघड बोलायचे, श्रीमंतांनी गरीबांचा करायचा, असे कित्येक प्रकार चालतात. माझ्या दारासमोर गाडी पार्क केल्यामुळे येण्याजाण्याला अडथळा निर्माण झाला म्हणून त्या गाडीच्या चाकातली हवा सोडली. तेव्हा माझ्यावर अॅट्रॉसिटीखाली कारवाई करेन असे दटावणारा एक नग मला भेटला होता. हे फारच किरकोळ उदाहरण झाले. पण तुमच्या ज्या भावना आहेत त्याची ही दुसरी बाजू माहित तरी आहे का? मागासवर्गीय असणे हेही अलीकडे हत्यार म्हणून वापरले जाते हे वास्तव माहित आहे का आणि ते मानता का? पण लगेच रोहितची आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेला खून आहे वगैरे वल्गना करण्यापर्यंत मजल जाते काही जणांची. या आंदोलनकर्त्यांवर दलित म्हणून डुख धरून परीक्षेत सतत नापास करण्याचे प्रकरण आहे की दलित आहेत म्हणून हॉस्टेलमध्ये त्यांच्याबरोबर खोलीत कोणी दुसरे रहायला तयार नाही? मग आत्महत्या केली या कारणाने लगेच त्यांचे दलित असणे कसे आठवते? लगेच त्याची आत्महत्या नव्हे, तो खून आहे वगैरे डायलॉगबाजी कशी आठवते?
बरे, आता याबाबतच्या तथ्यांवर नजर टाकू. रोहित, आंदोलनातील त्याचे सहकारी, विद्यापीठातील त्यांचे अध्यापक, मंत्री यांची जात काढणे मला प्रशस्त वाटत नाही. पण यात जातीय अँगल व जातीय अभिनिवेश आणणारे फार पाहिले आहेत म्हणून याचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे.
अभाविपच्या सुशील कुमार या स्थानिक अध्यक्षाने याकूब मेमन फाशी प्रकरणानंतर या आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनच्या सदस्यांना फेसबुकवर गुंड असे म्हटले. त्यावरून चिडून संघटनेचे तीसएक सदस्य कुमारच्या खोलीत गेले व त्याला मारहाण केली. कुमारकडून त्यांना गुंड म्हटल्याबद्दल लेखी माफीदेखील लिहून घेण्यात आली. हा प्रकार झालाच नाही असे कोणीही म्हणत नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. तरीही ज्यांना हे नाकारायचे आहे त्यांनी तसे खुशाल करावे.
मारहाणीच्या तक्रारीनंतर तेव्हाचे कुलगुरू शर्मा यांनी चौकशीनंतर संघटनेच्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यास नकार दिला. मात्र त्यांनी आणखी एक चौकशी समिती नेमली. त्याच सुमारास त्यांच्या जागी आताचे कुलगुरू अप्पाराव आले. त्यामुळे शर्मा यांनी नेमलेल्या चौकशी समितीचे पुढे काही झाले नाही.
दलितांमध्ये स्वाभिमान जागवण्याच्या आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनच्या उपक्रमांना नव्या कुलगुरूंनी दिलेल्या पाठिंब्याबाबतही रोहितने त्यांचे आभार मानले होते. अर्थात त्याच पत्रात वर म्हटल्याप्रमाणे त्याने उपरोधाने व रागाने फासासाठी दोर किंवा विषाची मागणी केली होती.
विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती एकदा काही कारणाने खंडित झाली की ती पूर्ववत होण्यास नोकरशाहीमुळे काही काळ लागतो. अनेकदा ही थकलेली शिष्यवृत्ती एकरकमीही मिळते असे विद्यापीठाचे लोक सांगतात.
सुइसाइड नोटमधली रोहितची भाषा पाहिली की तो एक विचारी मुलगा असल्याचे जाणवते. कुलगुरूंना लिहिलेल्य पत्रात माझ्यासाठी फास घ्यायला दोरीची सोय करा किंवा विष तरी आणून द्या असे म्हणणारा हा युवक प्रत्यक्ष आत्महत्या करण्याच्यावेळी लिहिलेल्या चिठ्ठीत मात्र कोणालाही दोष देऊ इच्छित नाही. (त्याच्या त्या चिठ्ठीत कोणालाही दोषी धरलेले नाही, म्हणून आम्ही त्याच्या आत्महत्येसाठी जबाबदार नाही असे म्हणणारेही काल टीव्हीवर पाहिले.) तो उगाचच या तीस जणांच्या घोळक्यात अडकला असे झाले असेल का? ज्याला आपण चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असणे म्हणतो. संवेदनशील असलेल्या त्याच्याबरोबर आक्रमक वृत्ती असलेल्यावरही कारवाई झाली तरी त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलण्याइतके ते एवढे मनाला लावून घेतले नाही? ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्यापैकी प्रशांत हा विद्यार्थी त्या तीसएक जणांच्या घोळख्याचा म्होरक्या होता. रोहितच्या मानाने त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे?
डॉ. आलोक पांडे यांच्यापुढे झालेल्या सुनावणीत संघटनेच्या या पाच जणांनी सुशीलकुमार याला मारहाण केल्याचा इन्कार केला. आम्हाला गुंड म्हणण्यावरून आम्ही सुशीलकुमारकडे गेलो व त्याच्याकडून लेखी माफीपत्र घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या चौकशी करताना पुढे आलेल्या पुराव्यांवरून व दिल्या गेलेल्या साक्षींवरून अगदी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याइतपत नाही तरी मारहाण झाली होती हे तथ्य समोर आले. एक उदाहरण म्हणून विचारतो, या मारहाणीत त्या सुशीलकुमारचा जीव गेला असता तर ‘दलितांनी एकाला मारले’ अशी त्याची बातमी झाली असती का?
सुशील कुमार याने दलितांबद्दल काढलेल्या काही अनुद्गारांचा उल्लेख एका ठिकाणी वाचण्यात आला. पण त्याचे संदर्भ व तपशील मिळत नाहीत.
या प्रकरणी सुशीलकुमारचे कोणी नातेवाईक आणि स्वत: हे विद्यार्थी यांनी परस्परांविरूद्ध न्यायालयात गेले आहेत. ते प्रकरण प्रलंबित आहे. ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्या पाच विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल याचा विचार करण्यासाठी संघटनेतील विद्यार्थ्यांची बैठक चालू असताना रोहित मधूनच म्हणजे दुपारी चारच्या सुमारास बैठक सोडून निघून गेला आणि संध्याकाळी सहाच्या सुमारास त्याच्यासाठी शोधाशोध केल्यावर त्याने आत्महत्या केल्याचे कळले. त्या बैठकीत असे काय झाले की रोहितने हे पाऊल उचलले? निराशाजनक सूर उमटला होता का, जसे की काहीही मार्ग निघू शकणार नाही? नक्की काय झाले हे कसे कळू शकेल? कोण सांगू शकेल?
या विद्यापीठात किती तरी इतर दलित विद्यार्थी असतील. त्यांच्या ‘दलित’ असण्यामुळे त्यांना विद्यापीठातील प्राध्यापकांकडून काही वेगळी म्हणजे भेदभावाची वागणूक मिळते का अशा स्वरूपाची काही चौकशी कोणी केली आहे का?
केंद्रिय मंत्री बंडारू दत्तात्रेय हे स्वत: मागासवर्गीय आहेत असे दिसते. याकूब मेमनच्या फाशीविरूद्ध आंदोलन करणा-या या संघटनेच्या विद्यार्थ्याना देशविरोधी संबोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र त्यांनी स्मृती इराणी यांच्या मंत्रालयाला पाठवले. ते पत्र कुलगुरूंना पाठवण्यात आले. त्यानंतर मंत्र्यांच्या पत्रावर काय कारवाई झाली हे विचारणारी तीन स्मरणपत्रे मंत्रालयाकडून कुलगुरूंना पाठवली गेली. आंदोलक व राजकारणी याला दबाव टाकणे म्हणत आहेत, तर मंत्रालय सर्वच पत्रव्यवहाराच्या बाबतीत तशी पद्धत असल्याचे म्हणत आहे. तेव्हा या प्रकरणाकडे जातीय दृष्टीकोनातून पाहणा-यांना दत्तात्रय यांचेही मागासवर्गीय असणे याबाबतीत चालणार नाही. कारण ते पडले भाजपचे मागासवर्गीय. म्हणजे बाटलेले. ते काय ‘दलितांचे’ हित पाहणार? दलितांचे ‘खरे’ हित पाहणा-याने कसे उठता बसता डॉ. आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करायला हवा. तरच काही जणांचे समाधान होते. वर म्हटल्याप्रमाणे चौकशी समितीमध्ये दलित प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व होते असे दिसते. रोहितच्याच एका पत्रात कुलगुरूंच्या भुमिकेबद्दल त्याने चांगले लिहिले होते. आता तर त्यांचाही बळी मागितला जात आहे.
विद्यालयांमधून होणारी राजकीय आंदोलने हा नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे. शिक्षणाशी संबंधित विषय सोडून कोणत्याप्रकारच्या आंदोलनांना कॉलेज-विद्यापीठांमध्ये परवानगी दिली जावी हा मुद्दा नेहमी चर्चिला जातो. पण त्यावर कधीही काही निर्णय किंवा एकवाक्यता होत नाही.
हैद्राबाद विद्यापीठात गेल्या पाच वर्षात रोहितसह पाच मुलांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही सर्वच मुले त्यांच्या कुटुंबातील प्रथमच शिकणारी अशी मुले आहेत असे कळते. हे सारे बळी आंदोलनापोटीच झाले आहेत का? की नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यामध्ये येणारी अडचण हे मोठे कारण असावे? मुंबई आयआयटीमध्येही काही दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत असे आपण वाचतो. या पार्श्वभुमीवर केवळ दलित असलेल्याच नव्हे, पण अभ्यासात कच्चे असलेल्या मुलांचे समुपदेशन करण्याची काही व्यवस्था आहे का? या मुलांच्या या व इतर अडचणी समजून घेण्याची अशी काही यंत्रणा असेल तर त्यांना केवळ त्यांच्या मित्रांच्या संगतीत वहावत जाण्याशिवाय इतर पर्याय उपलब्ध राहील. कॉलेजमध्येच विद्यार्थी कल्याण (वेलफेअर) समिती नेमून एखाद्या (सह्रदयी) प्राध्यापकाकडे याबाबतची जबाबदारी सोपवून दलित, इतर मागासवर्गीय, तसेच आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या मुलांकडे वैयक्तिक लक्ष ठेवून त्यांच्या समस्या समजून घेऊ शकेल. आताच्या प्रकरणातही प्रशासनाचा कारवाई झालेल्या विद्यार्थ्यांशी कारवाई होण्याआधी काही संवाद असेल की नाही माहित नाही, बहुधा नसेलच, कारवाईनंतर तर तो पूर्णपणे तुटला असणार. एखाद्या गरीब विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती पूर्णपणे व बराच काळ थांबल्यावर त्याच्यापुढे दुसरा काहीही सकारात्मक पर्याय न ठेवता येणे हे व्यवस्थेचेच अपयश नाही का? भारतातले विद्यार्थी परदेशात गेल्यावर तेथे त्यांचा रोजचा खर्च निघण्याइतपत कामे कॉलेजमार्फत वा विद्यापीठामार्फत त्यांच्यावर सोपवली जातात. आपल्याकडे असे होतकरू विद्यार्थी शोधून त्यांच्यासाठी काही व्यवस्था निर्माण करता येईल का?
अशा संवेदनशील मुद्द्यावर राजकारणी मोठ्या जोमाने राजकारण करतील यात शंका नाही. केजरीवाल व ओवैसी यांनी ते दाखवले आहेच. कॉंग्रेसच्या पप्पूकडून दुसरी काही अपेक्षा नव्हतीच. मायावती व ममता त्यांची पथके पाठवली आहेत. लालू-मुलायमही रिंगणात उडी न घेता मागे राहण्याचे पाप करणार नाहीत. दलितांच्या नावाने मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याची संधी कोण कसे सोडतील?
या निमित्ताने कवी अशोक वाजपायी यांनी त्यांना हैद्राबाद विद्यापीठाकडून मिळालेली डी.लिट. परत करण्याची घोषणा केली आहे. या मुलांवर कोणत्या कारणाने कारवाई केली गेली किंवा एकूण हे प्रकरण काय आहे याची त्यांना माहिती नाही आणि तरीही त्यांनी हे पाऊल उचलले आहे असे इंडिया टुडेवर ते सांगत आहेत. पुरस्कार किंवा पदवी परतीचा किडा चावलेले अनेक जण आपल्याला या विद्यापीठाकडून काही मिळाले होते का हे आता नक्कीच धुंडाळतील.
या सर्वात शक्यता आहे ती अशी की दबावामुळे कोणी तरी बकरा निश्चित शोधला जाईल. कदाचित चौकशीनंतर आणखी नवी तथ्ये समोर येतील. वर सुशीलकुमार याने दलितांविरूद्ध काही अनुद्गार काढल्याचा उल्लेख आहे. मी तर म्हणतो, ते जर खरे असेल, तर जरूर त्याच्याविरूद्ध कडक कारवाई करा. परंतु शक्यता अशी आहे की अशा प्रकारांवरून नेहमीच होणा-या राजकारणामुळे मूळ प्रश्नाकडे कोणाचेच लक्ष जाणारच नाही. कारण कोणाची तशी इच्छा नाही. दलितांसाठी काही तरी केल्याचे खोटे समाधान मात्र आंदोलकांना व त्याहीपेक्षा राजकारण्यांना मिळेल.
आज रोहित, उद्या आणखी कोणी. दलित किंवा दलित नसलेला. पुढचा विचार करून यावर कायमस्वरूपी विचार करून जे कोणी स्वभावाने हळवे जीव असतील, ते वाचवण्यासाठी प्रयत्न करायला सवड आहे कोणाला?
या पोस्टला फुसके बार म्हणवत नाही. पण या सदराचे नाव बदलेपर्यत तरी तसेच ठेवतो.
फुसके बार – २० जानेवारी २०१६
शिवराळ सदस्यांच्या
शिवराळ सदस्यांच्या प्रतिक्रिया टाळून इतरांच्या वाचतो आहे. त्यामुळे असभ्य भाषेत लिहीणारे आयडी काय लिहीत आहेत याची कल्पना नाही. त्यांनी गैरसमज पसरवले हे वर दिलेल्या लिंक्समधून आता स्पष्ट झालेले आहे. तिथल्या प्रोफेसरांनी झालेली कारवाई अन्याय्य आहे हे सांगितलेले आहे.
बीजेपीत मागासवर्गीय मंत्री आहे म्हणून तो भलेच करील आणि जे नाहीत ते वाट्टोळं करतील हा कुठला नवा शोध आहे हे कळत नाही. असे असेल तर मागच्या टर्ममधे दलितांचे काय काय भले झाले हे पण सांगायला हवे होते. इथेही पुन्हा हवेतले बार काढलेले आहेत. काल्पनिक कथा, जर तर यावर अशा संवेदनशील घटनांमधे घाईत निष्कर्ष काढून लेख पाडण्याचा वेग पाहता न्यायाधिशांनी शिकवणी लावावी.
ज्या मुलाचा मृत्यू झालेला आहे त्याला दोषी ठरवणारं लिखाण आपण करत आहोत, त्याच वेळी ज्याच्या मुळे मृत्यू झाला त्याचं सर्वच खरं मानून चालत आहोत, एकदा तरी फेरविचार करावा असं वाटलं नाही का ? थोडंसं थांबून आणखी काय खुलासे येतात हे जाणून घेणे हे शहाण्याचे काम आहे. तसे न करता आपल्याला आवडेल असे निष्कर्ष काढता येण्याइतका मालमसाला हाती लागला की दलितांना झोडप, मरण पावलेल्यावर आरोपाची राळ उठव आणि तसं वाटू नये म्हणून असं असेल तर मलाही वाईट वाटते अशा वाक्यांची पेरणी करायची हे धंदे कळत नसतील का वाचणा-याला ? की मांजर डोळे बंद करून दूध पितं म्हणून इतरांना दिसत नाहीये ते ?
हा विद्यार्थी ओपन सीटवर आला आहे. त्याला शिष्यवृत्ती कुठून मिळणार ? त्याने काढलेल्या संघटनेत फक्त दलितांचे नाही तर इतरांचेही कार्यक्रम होत त्यामुळेच अल्पावधीत तो विद्यार्थीप्रिय होऊन निवडून आला. एबीव्हीपी ने कार्यक्रम उधळला तर ते गुंड नाहीत आणि याने पोस्टर फाडले (?) म्हणून तो गुंड, देशद्रोही ? त्यासाठी सरकार लक्ष घालतं ? दबाव आणतं ? त्याला एकट्याला गाठून वीस वीस कार्यकर्ते शिवीगाळ करतात, बाबासाहेबांबददल अपशब्द वापरतात त्यामुळे नीट उत्तरे देत असताना हा बिथरून उर्मट उत्तरे देतो, ते व्हिडीओ शूटींग हे पूर्णपणे दाखवित नाहीत. अर्धवट पणे शेअर करतात. या घटना का लपवायच्या ?
कारन गुंडगिरीला सुरूवात कुणी केली हे कळून येतं.
ज्याने मारहाण केली असा आरोप केला त्याचं तथ्य रवीशकुमारने स्पष्ट केलं आहे. सिक्युरीटीच्या गाडीतून त्याला खाली ओढून घेताना खांद्यावर खरचटल्याचे निशाण आले असावेत असं पहिल्यांदा सांगितलं गेलं. सिक्युरिटीच्या समोर त्याच्याकडून माफीनामा लिहून घेतला गेला. त्याला गुंड, देशद्रोही म्हटल्याचे पुरावे असल्याने माफीनामा दिला गेला.
माफीनामा लिहीताना तो व्यवस्थित असतो आणि तिथून गेल्यानंतर त्याला मारहाण कशी काय होते ? याबाबत रोहीतचं म्हणणं ऐकायचंच नाही हा कुठला न्याय ? एकीकडे केंद्राचा दबाव एकीकडे पहिल्या मेडीकल रिपोर्टमधे मारहाणीची चिन्हे नाहीत.
अचानक रिपोर्ट बदलतो , ते कसं काय ?
तो मेलेला नाही हे सत्य आहे ना ? मेला असता तर या काल्पनिक प्रश्नावर कशाला काथ्याकूट करायचाय ? हे असले काल्पनिक प्रश्न महत्वाचे की रोहीतवर झालेला अन्याय महत्वाचा ?
या प्रश्नाचे राजकारण का करू नये याचं कारण सांगता येईल का ? ज्यांना असं वाटतंय त्यांचा इतिहास काय आहे ? आजच बरं कायमस्वरूपी सोल्युशन काढायचं सुचायला लागलं. खैरलांजी प्रकरणाच्या मागे भाजपाचा एक आमदार होता त्याला नागपूर वरून आदेश देऊन बडतर्फ केलं का आजवर ?
कसल्या गप्पा हाणता खुशाल भाजपाचा मंत्री दलितांचं भलं करेल म्हणून. आधी प्रूव्ह करा आणि मग बोला. या प्रकरणात काय भलं केलंय ते समजलंच आहे.
रोहीत वेमुलाच्या हत्याप्रकरणी
रोहीत वेमुलाच्या हत्याप्रकरणी काय झाले याबद्दलचा हा लेख.
https://www.facebook.com/photo.php?fbid=1026347647426741&set=a.175452742...
हीच माहिती सर्वत्र मिळते आहे. असं असताना सुशीलकुमारला मारहाण झालीच हे कशाच्या आधारे म्हटले गेले आहे हे कळत नाही. सतीश वाघमारे यांचा दिव्य मराठीत आलेला लेख अशा अनेक आत्महत्यांवर प्रकाश टाकतो.
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-satish-waghmare-article-about-s...
प्रा. वाघमारे यांच्या या लेखातल्या काही विचारांशी मी सहमत नाही. पण घटनाक्रम योग्य आहे. एका डॉक्टर मुलाला फेल केलं गेलं त्याने आत्महत्या केल्यानंतर गवगवा झाल्याने पेपर पुन्हा तपासले गेले तेव्हां तो उत्तम मार्कांनी उत्तीर्ण झाल्याचे आढळून आले. एव्हढी मोठी चूक कशी होते ?
रोहीत च्या आत्महत्येनंतर त्या विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेतले गेले. जर ते दोषी होते तर हे पाऊल का उचलले गेले ? मोदी तर नियमांवर ठाम असण्याबद्दल प्रसिद्ध आहेत.
तसेच सुशीलकुमारने सुरक्षा अधिका-यासमोर माफीनामा लिहून दिलेला आहे. त्यावेळी तो एकटा होता असे एका जबाबात म्हटले गेले आहे. मग नंतरच्या तक्रारीत दोन साक्षीदार त्याने कुठून आणले ?
हैद्राबाद विद्यापीठातील दलित शि़क्षक आणि स्टाफची यादी मोदींनी कशासाठी मागवली आहे ? उत्तर प्रदेशात रोहीत च्या आत्महत्येवरून मोदी गो बॅक या घोषणा देणा-या विद्यार्थ्यांना निलंबित केले गेले आहे. २००५ साली मनमोहनसिंग विद्यापीठात नेहरुंच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी गेले असताना एआयएसयू आणि डीएसयू या विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांनी मनमोहन मुर्दाबाद, मनमोहन चले जाव अशा घोषणा देत असताना मनमोहन सिंग कार्यक्रमानंतर या विधार्थ्यांना भेटण्यासाठी थांबून राहीले. त्यांच्याशी बोलले आणि त्यांच्यावर कारवाई करू नका अशा सूचना देऊन मगच गेले.
रोहीत च्या केस मधे मात्र इराणी बाईंनी पाच पाच स्मरणपत्रे पाठवली. या मंत्रालयाच्या आपसातील पत्रव्यवहारात त्याला देशद्रोही असे संबोधले गेले आहे. जर याकूबच्या फाशीवरून तो देशद्रोही आहे तर ज्या दूरदर्शन वाहीन्यांनी चर्चा घडवून त्यात व्फाशीविरोधी मते मांडणा-या विचारवंतांना बोलावले त्या वाहीन्यांसहीत त्या विचारवंताविरुद्ध काय कारवाई केली गेली हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. मार्कंडेय काटजू . पी बी सावंत, शत्रुघ्न सिन्हा. महेश भट्ट इ. अनेक लोक आहेत. हे अद्याप मोकळे कसे ?
रोहीतचे शब्द होते की याकूबला फाशी देण्यापेक्षा त्याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली जावी आणि होता होईल तेव्हढी माहिती त्याच्याकडून काढली जावी.
अशा संवेदनशील इश्यूवर कुठलेही निष्कर्ष काढताना संयम बाळगणे आवश्यक होते, त्यातूनही ज्याने आत्महत्या केली त्यालाच दोषी ठरवताना अधिक जबाबदारीने आरोप केले जाणे गरजेचे होते. टीव्हीवरच्या चर्चा हे तुमच्या आरोपांचे संदर्भ कसे असू शकतात ?
------------------------------------------------------------------------------------------------------------
इतर मुद्दे :
ऐसी अक्षरे या संस्थळावर हाच लेख प्रकाशित झाला असता तिथे लेखाच्या अक्षरशः चिंधड्या उडालेल्या दिसल्या. तिथे लेखकाची अवस्था ततप्प अशी झालेली आहे. त्या लेखावर संस्थळाच्या मालकापासून, व्यवस्थापक, संपादक मंडळ आणि इतर सदस्य यांना अर्वाच्य शिवीगाळ करण्यात आल्याने लेख वाचनमात्र झाला.
मी या संस्थळावर नसतानाही या लेखकाने विनाकारण मायबोलीवरचे ते तुम्हीच का असे भलत्याच सदस्याला संबोधले आहे हे तिथल्या लिंकवर जाऊन वाचताना आढळले आहे. त्याबाबत त्यांनी खात्री केली आहे का किंवा कसे हे जाणून घ्यायचे आहे.
सदर संस्थळावर फुसके बार हे सदर एकाच धाग्यावर एकाखाली एक असे चालवावे असे अनेकदा सांगूनही न ऐकल्याने फुसके बारचा प्रत्येक धागा वाचनमात्र करण्यात येत असल्याचे दिसते. असे केल्याने त्या लेखावर कुणीच येऊ शकत नाही. मायबोलीवर देखील अशा पद्धतीने पावले उचलल्यास लेखावर कुणीही कमेण्ट देऊ शकत नाही.
एक विद्यार्थी जिवानिशी जातो आणि यांना तो दलित असण्याशी काही घेणंदेणं नाही एव्हढंच तुणतुणं वाजवून कुणाला तरी डिफेण्ड करण्यात धन्यता वाटतेय.
कपोचे, तुमची दुसरीकडची
कपोचे,
तुमची दुसरीकडची हेरगिरी काहीही कामाची नाही. तुमच्यासारखेच नाव न सांगता दुस-यावर आरोप करणारे भेकड तेथेही आहेत. माझी ततपप जाऊदे, तुमचे वस्त्रहरण, लज्जाहरण झालेलेही तुम्हाला कळलेले नाही.
वाघमारे वगैरेंचे जगभरचे लेख घ्या, पण दलित असण्याशी संबंध नसलेली घटना तुम्हाला तुमच्या विचार करण्याच्या विक्ृत पद्धतीने तशीच कशी दिसते, हेही सगळ्यांसमोर आहे. माझ्या पोस्टमध्ये इतरही अनेक मुद्दे आहेत, ते तुमच्या समजण्याच्या पलीकडचे आहेत. तुम्ही फक्त दलित दलित खेळत बसा.
"एक विद्यार्थी जिवानिशी जातो आणि यांना तो दलित असण्याशी काही घेणंदेणं नाही एव्हढंच तुणतुणं वाजवून कुणाला तरी डिफेण्ड करण्यात धन्यता वाटतेय." स्वत:ला समजत असेल तर आता त्याच्या दलित असण्यावरून अातापर्यंत माझ्यावर नाहीनाही ते आरोप केलेत. आता इथपर्यंत मजल आलेली दिसते. मी कोणालाच डिफेंड केलेले नाही. पण तेही तुम्हाला कळायचे नाही. तेव्हा तुमच्या गरळ टाकण्याचे धंदे चालू राहू देत.
तेव्हा तुमचा तमाशा चालुद्या. जेवढे हे वाढवाल, तेवढे स्वत:चे हसे करून घेता अाहात.
विक्ृतांवर वेळ घालवण्याची माझी अजिबात इच्छा नाही, हे आधीच सांगितले आहे. कमरेचे सोडून दुस-यावर आरोप करणा-यांशी तर नाहीच नाही.
कापोचे यांनी मुद्देसुद उत्तर
कापोचे यांनी मुद्देसुद उत्तर देऊन सुध्दा धागाकर्ता का बिथरला? उत्तरे नाही म्हणून की जाहीर निघाली म्हणून
कृपया स्पष्ट करावे.
Rohith Vemula: The student
Rohith Vemula: The student who died for Dalit rights
In his death, Rohith Vemula has emerged as a symbol of protest against injustice and indignity.
The 26-year-old PhD student killed himself on Sunday inside the campus of Hyderabad Central University.
Mr Vemula was a member of the Ambedkar Students' Association, which fights for the rights of Dalit (formerly known as untouchable) students on the campus.
He was one of five Dalit students who were protesting against their expulsion from the university's housing facility.
The five faced allegations last year that they attacked a member of the Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) - the student wing of India's ruling Bharatiya Janata Party.
They all denied the charge and the university cleared them in an initial inquiry, but reversed its decision in December.
P Vijay, a close friend of Mr Vemula, described him as a "hard-working and a brilliant student and a kind-hearted soul".
Mr Vijay added that "he used to spend most of his time in the university's library".
"I cannot believe what has happened. He was a source of inspiration for others. But he was also very sensitive and was depressed over what was happening around him."
Mr Vemula was studying for his PhD in sociology. A keen reader of revolutionary literature, he aspired to become a writer.
http://www.bbc.com/news/world-asia-india-35349790?SThisFB
हैदराबाद। हैदराबाद सेंट्रल
हैदराबाद। हैदराबाद सेंट्रल यूनिवर्सिटी में आत्महत्या करने वाले रोहित वेमुला पहले दलित पीएचडी स्कॉलर नहीं हैं। पिछले 10 वर्षों में 8 दलित इसलिए आत्महत्या कर चुके हैं क्योंकि वे जाति की राजनीति को सहन नहीं पाये थे। हैदराबाद के शिक्षाविदों का मानना है कि हैदराबाद विश्विद्यालय में हो रही आत्महत्याएं निचले समुदाय के छात्रों के खिलाफ मौजूद भेदभाव को स्पष्ट करती हैं।
शिव्या इग्नोर करण्यात आल्या
शिव्या इग्नोर करण्यात आल्या आहेत.
राकुनां रोहित वेमुलाला न्याय
राकुनां रोहित वेमुलाला न्याय मिळेपर्यन्त हा धागा चालवायची इच्छा आहे वाटते
कारण जोपर्यन्त रोहित ला न्याय मिळत नाही पर्यन्त आन्दोलनं चालुच राहणार आहेत.
आन्दोलन कर्ते शांत होणार नाहीत.
जगभरातुन या गोष्टीचा निषेध होत आहे.
दलित असण्याशी संबंध नसलेली
दलित असण्याशी संबंध नसलेली घटना तुम्हाला तुमच्या विचार करण्याच्या विक्ृत पद्धतीने तशीच कशी दिसते, हेही सगळ्यांसमोर आहे.>>
काय मस्तं निष्कर्ष आहे.
जणू पूर्ण जगात अख्ख्या कपोचे यांनाच ही घटना अशी दिसते.
बाकी सगळ्यांनी राकु म्हणतात म्हणून मान्यच करून टाकलंय की ही घटना म्हणजे 'एका विद्यार्थ्याची आत्महत्या' यापलीकडे काही नाही.
कपोचे , जाऊ द्या!
राकुवॉलवर तेच पक्षकार, तेच दोन्ही बाजूंचे वकील आणि तेच न्यायाधीश!
तुम्ही आपली केस रफादफा करून टाका बरं!
मी त्यांना ते विकृत आहेत,
मी त्यांना ते विकृत आहेत, वेडसर आहेत असे शब्द न वापरता माझे मुद्दे मांडतो आहे. विशेष म्हणजे त्यांची पोस्टच मी वाचत नाहीये. त्यामुळे त्यांनी शिव्या देऊनही काहीच फायदा नाही. त्यांनीच एकदा इथे लिहीलेलं होतं की ऐसी अक्षरे वर माझं मस्त चाललेलं आहे म्हणून क्लरीफाय केलं एकदा.
असो,
अभाविप हे ज्या संघटनेचं अपत्य आहे त्या संघटनेबद्दल अमेरिकेत काय म्हटलं जातंय ?
http://www.liveind24.com/hi/america-enlisted-rss-in-one-of-the-biggest-t...
फायनली काय ठरले, की भाजप
फायनली काय ठरले,
की भाजप सरकार ही केस हरेपर्यंत एक एक दलित प्रोफेसर राजीनामा देत राहील. (साहित्तिक फॉरमॅट यु नो, इट वर्क्स यु सी).
मेलेले देशद्रोही असतात असं
मेलेले देशद्रोही असतात असं सध्या तरी ठरलेलं आहे.
ते नसतात असं सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. व्यापम फॉरमॅट यू क्नो ? इट वर्क्स. ना रहेगा बास ..
लई मज्जा येईल ना जेम्स
लई मज्जा येईल ना जेम्स बाँड,
भाजप काय केस हरत नाय, पण साईड इफेक्ट म्हणून सगळ्या युनिवर्सिट्या क्लीन अँड क्लिअर होतील!
चकाचक!
अस नाय अस नाय. जे घडेल ते
अस नाय अस नाय. जे घडेल ते मान्य करायला काय हरकत आहे.
आणी घडलय ते पण !
पण तुमच्या माझ्या इथे डोकेफोड केलेल्या चर्चेने काही घडत असत तर बिचार्या साहित्तेकांना नी प्रोफेसरांना रोजीरोटीची कामं सोडावी लागली नसती. बघा विचार करुन.
असं तुम्हाला वाटतं. असं
असं तुम्हाला वाटतं.
असं अजिबात नाही आहे.
सध्या सोशल मिडीया हे आपल्या मतांचा प्रसार करायचे एकदम प्रभावी माध्यम आहे.
मी आज माबोवर टाकलेली पोस्ट उद्या चार व्हॉट्स अॅप ग्रूपमधून मलाच फॉरवर्ड होते.
त्यातल्या एखाद्या ग्रूपला माबो काय हे माहितही नसतं.
(मूळात भांडण पण तो अभाविप वाला फेबुवर रोहित आणि आंबेडकर असोशिएशनच्या मुलांना गुंडा म्हणाला म्हणून सुरू झालं किंवा वेगळ वळण मिळालेलं होतं ना?)
आज फेबु/वॉट्सॅप अशी माध्यमे आहेत म्हणूनच मोठ्या प्रसारमाध्यमांनी दडवून ठेवलेली गुपिते क्षणात लोकांसमोर येतात.
इथे आपण वादविवाद केला तर वाचणार्या चार टाळक्यांच्या डोक्यात प्रकाश पडून त्यांच्यात सजगता येते.
अगदी एक दोन वर्षांपूर्वी संस्थळांवर केलेल्या वादविवादाला 'फुकटची मगजमारी' ता पलीकडे दुसरा अर्थ नव्हता. पण आता चित्र पालटलेय. एखाद्याची कुठल्यातरी संस्थळावर्/फेबु वर लिहिलेली पोस्ट एखादी छोटी का होईना क्रांती घडवू शकते.
डॉक, खरचं तुम्हाला, इथे आपण
डॉक, खरचं तुम्हाला,
इथे आपण वादविवाद केला तर वाचणार्या चार टाळक्यांच्या डोक्यात प्रकाश पडून त्यांच्यात सजगता येते.
अस वाटतय का प्रामाणिकपणे,
काही काही आयडी (कोणतीही बाजु हं) फक्त आणी फक्त अशाच धाग्यांच्या प्रतिक्षेत असतात. म्हणुन मायबोली किंवा तत्सम संस्थळ आता फक्त आपला राग प्रत्यक्षात आजुबाजुला कोणावर काढता येत नाही ( मुन्नाभाई एमबीबीएस मधला सुनील दत्त चोराला मारणार्यांना जे लेक्चर देतो ते आठवा) तो इथे पडद्याआड राहुन कसाही काढता येतो. शिव्याशाप नावडत्यावर चिखलफेक, शिवीगाळ किंवा आगलावु धागे, प्रतिसाद, टाँट या साठी वापरली जाय आहेत, आणी काही जणांनी तो समज पक्का केलाय.
खरं सांगु पुर्वी खुप वाटायच सिस्ट्मचा राग यायचा अस करणार्या लोकांचा पण राग यायचा पण आता खरच कोडगा झालोय काहीच वाटत नाही सगळे स्वार्थी, मेलेल्या मढ्याचे लोणी खाणारे, मी का टेन्शन घेवु माझं बरं चाल्लय ना बस तर मग.
असे तावातावाने भांड्णार्यांना एकच प्रश्न विचारावा वाटतो, "अच्छा अस्स झाल तर, बर मग मी काय करु? "
एखादा विषय तुमच्या किती क्लोज
एखादा विषय तुमच्या किती क्लोज टू हार्ट आहे आणि तुम्ही किती इनवॉल्व आहात यावर आहे सगळं.
पूर्वी वर्तमानपत्रात लेख लिहून आणि जाहिर भाषणे देऊन लोक सिस्टीमविरुद्धच्या 'असंतोषाचे जनक' होऊ शकत असत.
संस्थळांवर आणि फेबुवर योग्य पोस्ट लिहिणारे असा असंतोषन/ जाणीवा निर्माण करू शकतात असे माझे तरी मत आहे.
संस्थळांवरच्या जाहिर चर्चांत भाग घेतल्याने माझी काही बाबतीतली ठाम मते निश्चितच बदलली आहेत.
इतरांचीही बदलू शकतात यावर माझा विश्वास आहे.
जेम्स बॉण्ड जर एखाद्या
जेम्स बॉण्ड
जर एखाद्या विशिष्ट जातीच्या लोकांचेच नियमित बळी जाऊनही निर्भयाप्रमाणे इतर कुणालाच आंदोलन करावंसं वाटत नसेल आणि उलट त्यांच्याच बद्दल कोल्हेकुई होणार असेल तर कोडगे व्हायची वेळ कुणावर आली आहे असं समजायचं ? अशी बाजू मांडली कि हल्ली इकडे यावंसंच वाटत नाही किंवा तत्सम शेरेबाजी ही सुद्धा त्यातल्या छुप्या अर्थासहीत सवयीची होत जाते.
कारण असा त्रागा करणारांना आरक्षण बंद झाले पाहीजे, अमूक अमूक लोक असे असे असतात असे धागे निघाले की असा वैताग व्यक्त करावासा वाटत नसतो.
साती, मी म्हणतो ते जाउु द्या.
साती,
मी म्हणतो ते जाउु द्या. यात दलित असण्याचा भाग कोठून येतो ते तुम्ही सांगा. तुम्ही सिद्ध करा. सांगा कोणते मुद्दे आहेत.
अमेरिकेतल्या कुठल्या तरी पोस्टवरून हे दलित असल्याशी संबंधित असल्याचा दावा करणारे हे अतिशय मोठे विद्वान आहेत, तेही तुमच्या पाठिंब्यामुळे आधीच धन्य झाले अाहेत. अाता जमल्यास फक्त तथ्यांचा भाग होऊन जाउु दे. तो काही महत्त्वाचा नाहीच नाही तरी.
तो दलित होता यापेक्षा तो
तो दलित होता यापेक्षा तो आंबेडकर्,फुले यांना आदर्शमानत होता ही पोटदुखी होती.
इराणीबाईंनी सांगितलं म्हणजे
इराणीबाईंनी सांगितलं म्हणजे पुरेसं आहे. केस फाईल.
बाकी त्या विद्यापीठातले शिक्षक, विद्यार्थी, स्टाफ काय म्हणतात हे कशाला बघायचं ? पोलीस तपासाची कशाला वाट पहायची ? रवीश कुमारसाख्यांचं मुद्देसूद रिपोर्टिंग कशाला बघायचं ?
तो दलित असण्या नसण्याचा संबंध आहे कि नाही या मुद्द्यावरच चर्चा झाली पाहीजे, नाही का ?
अभाविपच्या सांगण्यावरून त्याचा छळ झाला, त्यांनी गुंडगिरीला सुरूवात केली, केंद्र सरकारने हस्तक्षेप केला हे सगलं गौण आणि दलित असण्याशी काय संबंध या भलत्याच मुद्यावर चर्चा केली म्हणजे केंद्र सरकारचं कोंबडं झाकलं जाईल. दलित असण्याचा संबंध नसताना आंदोलन का करता या मुद्यावर चर्चा व्हायला पाहीजे नाही का ?
सुशीलकुमारला मारहाणच झाली नसताना त्याची वकिली आणि रोहीतच्या वॉलवर लिहीलेलं सगळं खरंच समजून चाललात म्हणजे (शिवीगाळ करून मागची पोस्ट पहा) काय ? मेला तो गुंड, वाचला तो बिचारा अशा पद्धतीने चर्चा व्हायला पाहीजे. संदर्भ - टीव्हीवरच्या बिनडोक चर्चा !
मग तपास तरी कशाला व्हायला पाहीजे ?
दलित असण्याचा संबंध येईल ना तपासात. आधीच त्याबद्दल निकाल द्यायचा म्हणजे आपले जज्जेस वगैरे कुचकामी म्हटले पाहीजेत.
http://indianexpress.com/arti
http://indianexpress.com/article/india/india-news-india/rohith-got-call-...
Replying to the letter from police, Rohith said: “I deny the allegations made by Susheel Kumar which are false. I humbly request you not to proceed against me because I will be affected unduly for appearing in the case and my career will be spoilt. I belong to SC community and implicating me in a criminal offence amounts to atrocity on an SC person.” Rohith was scared that police wanted to detain or arrest him and, therefore, had summoned him to the police station instead of visiting the university to record his statement. When his room was sealed on December 18, Rohith moved his belongings to a friend’s room and the five suspended students sought permission to use the rooms till the next court hearing on January 18. The warden did not agree, but the students continued to live in friends’ rooms until they were asked to leave the hostel on January 4. - See more at: http://indianexpress.com/article/india/india-news-india/rohith-got-call-...
http://scroll.in/article/802174/exclusionary-and-humiliating-campus-cult...
http://www.huffingtonpost.in/2016/01/21/rohith-vemula-suicide_n_9024128....
मी म्हणतो ते जाउु द्या. यात
मी म्हणतो ते जाउु द्या. यात दलित असण्याचा भाग कोठून येतो ते तुम्ही सांगा
<<
मूळात भांडण पण तो अभाविप वाला फेबुवर रोहित आणि आंबेडकर असोशिएशनच्या मुलांना गुंडा म्हणाला म्हणून सुरू झालं किंवा वेगळ वळण मिळालेलं होतं ना?
<<
प्रवचनकारांनी लोक काय म्हणताहेत हे वाचले तर बरे असते.
वरील दोन्ही पोस्टींचे टाईमस्टँप वाचलेत तरी पुरेल.
- "Please serve 10 mg of
- "Please serve 10 mg of Sodium Azide to all Dalit students at the time of admission. With direction to use when they feel like reading Ambedkar."
- "Supply a nice rope to the rooms of all Dalit students."
http://www.ndtv.com/opinion/what-rohith-vemulas-friends-told-me-in-hyder...
http://www.nationaldastak.com
http://www.nationaldastak.com/news-view/view/rohit-close-friend-ramjee-i...
जातिगत भेदभाव का शिकार हुआ रोहित, पढ़िए करीबी दोस्त रामजी का इंटरव्यू
याकूब मेमनच्या फाशीच्या
याकूब मेमनच्या फाशीच्या आंदोलनावरून त्याला देशद्रोही ठरवण्यात आलं होतं तर याबद्दल काय म्हणायचं ?
http://navbharattimes.indiatimes.com/india/supreme-court-deputy-registra...
हा जातीयवाद नाही तर काय आहे ?
त्या इडीयट बॉक्सवरच्या पॅनेलिस्टना काय शिक्षा केली हा प्रश्न का टाळायचा ? या प्रश्नांची उत्तरे न देता एकच तुणतुणं लावलं तर ऐसी अक्षरे वर झाली ती फजिती होणारच.
जे उठसूठ इतरांना देशद्रोहाची आणि देशप्रेमाची सर्टीफिकेटं वाटतात आणि ज्यांच्याशी भांडण झालं म्हणून गेलेल्या बद्दल अत्यंत हिणकस कमेण्ट्स नेटवर सर्वत्र दिसताहेत त्यांच्याबाबतच्या या बातम्या काय सांगतात ?
http://zeenews.india.com/news/nation/isi-funded-rss-leaders-pandeys-conf...
http://indianexpress.com/arti
http://indianexpress.com/article/india/india-news-india/rohit-vemula-sui...
Hyderabad University’s Dalit staff told: ‘you’re being watched’
Dalit officers and teachers are in a state of fear as the message sent to them is "be very careful. You are taking us for granted."
- See more at: http://indianexpress.com/article/india/india-news-india/rohit-vemula-sui...
रोहीतच्या सुसाईड नोट मधे
रोहीतच्या सुसाईड नोट मधे खाडाखोड आढळल्याने शंकाकुशंकांना उत आलेला आहे. त्यातच हॉस्टेलमधून बॅन असताना तो तिथे कसा पोहोचला याचे उत्तर मिळत नाही. व्यापम घोटाळ्याची आठवण इथे झाल्याशिवाय राहत नाही.
गेल्या वर्षी चेन्नई येथील पेरीयार - आंबेडकर स्टडी सर्कल बंद करण्याचा निर्णय घेऊन आंदोलनं केल्यावर तो फिरवण्यात आलेला होता.
अशी केस हिस्ट्री असताना फालतू मुद्द्यांवर फोकस कशाला पाहीजे ?
रोहीतच्या नोटमधल्या खाडाखोडीबाबत फॉरेन्सिक लॅबचा अहवाल यायचा आहे.
http://www.hindustantimes.com/india/forensics-to-analyse-struck-out-para...
एव्हढं सगळं प्रलंबित असताना , या गोष्टींची वाट बघणारे ते मूर्ख असतात कि काय ?
इथे ती नोट
इथे ती नोट आहे.
http://www.ndtv.com/india-news/in-rohith-vemulas-suicide-note-a-scratche...
राकु, इथे आणि अन्यत्रही
राकु, इथे आणि अन्यत्रही इतरांनी इतके पुरावे दिल्यानंतर तुम्हाला नेमका कुठला पुरावा अपेक्षित आहे ज्याने 'रोहित दलित होता म्हणून हे सगळं झालं' हे पटेल हे मला समजत नाही आहे.
मूळात तुम्हाला एखादी गोष्ट पटल्या न पटल्याने एखादी वस्तुस्थिती बदलणार आहे का हे ही मला समजत नाही आहे.
इथे सगळ्यांचा प्रयत्न 'तुम्ही या प्रकरणात खोलवर शिरून माहिती न घेतलेल्यांची दिशाभूल करू नये' असाच आहे.
तुम्हाला रोहित दलित होता म्हणून हे सगळं झालं हे पटवून घ्यायचंच नाहीये म्हटल्यावर पटवण्यात अर्थच नाही.
मला तर तुम्ही फेसबुक आणि काही मराठी संस्थळे यांवर वारंवार या मुद्द्याची चर्चा करून 'दलित इश्यू' किती फोल आहे हे सगळ्यांना पटवण्याचा प्रयत्न जीवापाड चालवलेला आहे हे मात्र दिसत आहे.
त्यामधून आणि तुमच्या मागच्या एक दोन लेखांमधून (१ जानेवारीचा महारांचा संघर्ष आणि आरक्षणासंबंधी एक पोस्ट होती त्यावरून) तुम्ही नेमक्या दलितांसंबंधींच्या इश्यूंवर अपाथी निर्माण करायचे काम करताय असे मात्र नक्की जाणवतेय.
बाकी बर्याच बाबतीत संतुलित भूमिका घेणारे तुम्ही याबाबतीत मात्र इतके बायस्ड का हे मला अजिबात समजत नाही.
Pages