फुसके बार – २० जानेवारी २०१६ - रोहित वेमुला आणि जिवानिशी गेलेल्याचे खेळणे करणे - राजकारण्यांचा आवडता फड

Submitted by Rajesh Kulkarni on 19 January, 2016 - 11:36

रोहित वेमुला आणि जिवानिशी गेलेल्याचे खेळणे करणे
राजकारण्यांचा आवडता फड

.
हैद्राबाद विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी रोहित वेमुला याची आत्महत्या ही नि:संशय दु:खद व दुर्दैवी घटना आहे. ज्या डॉ. आंबेडकरांच्या नावाने स्थापलेल्या संघटनेचा तो सदस्य होता, अशा रोहितने त्यांचे निर्धाराने झगडण्याचे तत्व न अंगिकारता हे दुर्दैवी पाऊल का उचलावे यात मी जात नाही.

या निमित्ताने त्याच्या दलित असण्याचे भांडवल करत आंदोलने सुरू झाली आहेत, आणखी किती दिवस ‘दलितां’नी ‘सवर्णा’कडून अन्याय सहन करायचा वगैरे वल्गना करणे चालू आहे.

हा युवक आंदोलन चालवत होता. आंबेडकर स्टुडंट असोसिएशन नावाच्या संघटनेचा नेता होता. याकूब मेमनला फाशी देण्याला त्याच्या संघटनेने विरोध केला होता. काही जण तो याकूब मेमनच्या फाशीविरूद्ध नव्हे तर एकूणच फाशीच्या शिक्षेविरूद्ध आंदोलन करत होता अशी (त्याच्या वतीने) पळवाट काढत आहेत. त्यांना हे माहित नाही की फाशीची शिक्षा रद्द करा असे म्हणणारेही दहशतवाद किंवा तत्सम गुन्ह्याखाली झालेल्या गुन्ह्यांना फाशीतून वगळू नये असे म्हणतात. त्यामुळे असे म्हणण्याला काही अर्थ नाही. तर त्यावरून अभाविप आणि त्याच्या संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात भांडणे झाली होती. त्यांनी तेथील अभाविपच्या शाखेचा अध्यक्ष सुशीलकुमार याला त्याच्या होस्टेलच्या खोलीत मारहाण केल्याचा आरोप होता. मुळात मारहाण झालीच नव्हती इथपासून आरोप-प्रत्यारोप झाले.

तुम्ही एकदा पीएचडीसारख्या उच्चशिक्षणासाठी जाता तेव्हा त्याच्याशी संबंधित कामे करणे अधिक महत्त्वाचे आहे हे तुम्ही ठरवायला नको का? तुम्हाला शिष्यवृत्ती कशासाठी मिळत असते? एफटीआयआयचे विद्यार्थीदेखील त्यांच्या अभ्यासक्रमाचे सोडून काय काय करतात हेदेखील नुकतेच समोर आले. तुम्ही अशैक्षणिक किंवा सामाजिक गोष्टींशी संबंध नसलेल्या व अनेकदा राजकीय स्वरूपाच्या गोष्टी करणार आणि मग त्यात राजकीय हस्तक्षेप झाला की मग मात्र साळसुदपणे विद्यार्थ्यांवर किंवा दलितांवर अन्याय झाला म्हणून आरडाओरडा करणार. कोणी याबद्दल बोलेल काय?

रोहितच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही असे वाचण्यात आले. रोहित कोणत्या चळवळीत भाग घेतो याची त्याच्या घरच्यांना कल्पना होती का? त्यांनी त्याला चांगले शिकणे ही प्राथमिकता आहे असे समजावले होते का? त्याच्यावर झालेल्या कारवाईमुळे त्याची शिष्यवृत्ती बंद झाली. त्यामुळे त्याच्यापुढील अडचणी वाढल्या असणार. हॉस्टेलमधून काढल्यावर बाहेर राहण्याची जागा नाही, रोजच्या खर्चाची सोय कशी करायची, रोज कोणापुढे हात कसे पसरायचे यातून येणारी अस्वस्थता नक्कीच समजू शकतो. या महिनाअखेरीस रोहितचा वाढदिवस (असणार) होता. पण मला शिष्यवृत्ती मिळत नाहीये, मी तुम्हाला पार्टी कशी देऊ, असे तो मित्रांना म्हणाला. पण संघटना म्हणून चालवणा-यांनी आपली परिस्थिती कोणती आहे, कशी आहे याचे भान नको का ठेवायला? असे म्हटले की लगेच कोणी चळवळी करणे हा आमचा हक्कच आहे वगैरे म्हणायला नको. याकूब मेमनची फाशी तुमच्याशी संबंधित आहे का? तुमच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न आहे का? असेल तर हरकत नाही. पण मग त्याविरूद्ध मत असणारेही तुम्हाला भेटतील. तेव्हा मात्र डॉ. आंबेडकरांच्या नावाने स्थापन केलेल्या तुमच्या चळवळीच्या नावाचे भांडवल करू नका. स्वत:च्या दलित असण्याचे ‘भांडवल’ या भलत्याच मुद्द्यासाठी करू नका. तुम्ही केवळ तुम्हाला जे वाटते ते मांडत आहात हे कळू शकते, पण ‘भांडवल’ करण्याबद्दल जे लिहिले आहे ते तुम्ही विद्यार्थी नव्हे, तुमच्या नावाने इतर जण करत आहेत. तुमच्या आंदोलनात रोहित एकटाच होता का? त्याच्या आर्थिक परिस्थितीची व त्यामुळे त्याच्यावर आलेल्या ताणाची तुम्हाला माहिती नव्हती का? त्याला सांभाळून घेण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? तो असे काही पाऊल उचलेल याची आम्हाला माहितीच नव्हती असे आता म्हणत आहात, तर त्याच्या मृत्युला तुम्हीदेखील जबाबदार नाहीत का? जी आंदोलने करता ती तुम्हाला झेपतात का ते तरी पाहिलेत का? तेव्हा तुम्ही याकूब मेमनच्या फाशीविरूद्ध आंदोलन केलेत, तुमचा व्यक्तीगत प्रश्न आहे. ते तुम्ही ‘दलित’ म्हणून तर केले नाहीत ना? पण आता तुमच्या दलित असण्याचे भांडवल इतर जण करत आहेत.

काही लोक असे काही झाले की गेल्या काही वर्षांमध्ये किती हुशार दलितांनी आत्महत्या केल्या याची जंत्री देतात; एवढेच नाही तर त्यावरून स्वत:च्या अजेंड्याला सोयीस्कर निष्कर्ष काढतात. आणि कोणी अशा खोडसाळ व एकांगी पोस्ट आपल्याला पाठवल्या की आपण स्वत: त्यावर विचार न करता त्या प्रसारित/फॉरवर्डही करतो. तुम्हाला किती दलित दाखवू की जे अतिशय स्पर्धात्मक वातावरणातही प्रगती करतात. तिथे मात्र त्यांचे नाणे खणखणीत होते, म्हणून तिथले ‘सवर्ण’ त्यांना अडवू शकले नाहीत असे म्हणायचे, आणि ज्यांनी आत्महत्या केल्या ते मात्र याच ‘सवर्ण’ समाजाचे बळी? अहो, भेदाभेद कोठे होत नाही? मराठ्यांनी ब्राह्मणांचा करायचा, दलितांचा करायचा, जेथे करणे शक्य आहे तेथे ब्राह्मणांनी दलितांचा दुस्वास करायचा, दलितांनी ब्राह्मणांविरूद्ध उघडउघड बोलायचे, श्रीमंतांनी गरीबांचा करायचा, असे कित्येक प्रकार चालतात. माझ्या दारासमोर गाडी पार्क केल्यामुळे येण्याजाण्याला अडथळा निर्माण झाला म्हणून त्या गाडीच्या चाकातली हवा सोडली. तेव्हा माझ्यावर अॅट्रॉसिटीखाली कारवाई करेन असे दटावणारा एक नग मला भेटला होता. हे फारच किरकोळ उदाहरण झाले. पण तुमच्या ज्या भावना आहेत त्याची ही दुसरी बाजू माहित तरी आहे का? मागासवर्गीय असणे हेही अलीकडे हत्यार म्हणून वापरले जाते हे वास्तव माहित आहे का आणि ते मानता का? पण लगेच रोहितची आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेला खून आहे वगैरे वल्गना करण्यापर्यंत मजल जाते काही जणांची. या आंदोलनकर्त्यांवर दलित म्हणून डुख धरून परीक्षेत सतत नापास करण्याचे प्रकरण आहे की दलित आहेत म्हणून हॉस्टेलमध्ये त्यांच्याबरोबर खोलीत कोणी दुसरे रहायला तयार नाही? मग आत्महत्या केली या कारणाने लगेच त्यांचे दलित असणे कसे आठवते? लगेच त्याची आत्महत्या नव्हे, तो खून आहे वगैरे डायलॉगबाजी कशी आठवते?

बरे, आता याबाबतच्या तथ्यांवर नजर टाकू. रोहित, आंदोलनातील त्याचे सहकारी, विद्यापीठातील त्यांचे अध्यापक, मंत्री यांची जात काढणे मला प्रशस्त वाटत नाही. पण यात जातीय अँगल व जातीय अभिनिवेश आणणारे फार पाहिले आहेत म्हणून याचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे.

अभाविपच्या सुशील कुमार या स्थानिक अध्यक्षाने याकूब मेमन फाशी प्रकरणानंतर या आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनच्या सदस्यांना फेसबुकवर गुंड असे म्हटले. त्यावरून चिडून संघटनेचे तीसएक सदस्य कुमारच्या खोलीत गेले व त्याला मारहाण केली. कुमारकडून त्यांना गुंड म्हटल्याबद्दल लेखी माफीदेखील लिहून घेण्यात आली. हा प्रकार झालाच नाही असे कोणीही म्हणत नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. तरीही ज्यांना हे नाकारायचे आहे त्यांनी तसे खुशाल करावे.

मारहाणीच्या तक्रारीनंतर तेव्हाचे कुलगुरू शर्मा यांनी चौकशीनंतर संघटनेच्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यास नकार दिला. मात्र त्यांनी आणखी एक चौकशी समिती नेमली. त्याच सुमारास त्यांच्या जागी आताचे कुलगुरू अप्पाराव आले. त्यामुळे शर्मा यांनी नेमलेल्या चौकशी समितीचे पुढे काही झाले नाही.

दलितांमध्ये स्वाभिमान जागवण्याच्या आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनच्या उपक्रमांना नव्या कुलगुरूंनी दिलेल्या पाठिंब्याबाबतही रोहितने त्यांचे आभार मानले होते. अर्थात त्याच पत्रात वर म्हटल्याप्रमाणे त्याने उपरोधाने व रागाने फासासाठी दोर किंवा विषाची मागणी केली होती.

विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती एकदा काही कारणाने खंडित झाली की ती पूर्ववत होण्यास नोकरशाहीमुळे काही काळ लागतो. अनेकदा ही थकलेली शिष्यवृत्ती एकरकमीही मिळते असे विद्यापीठाचे लोक सांगतात.

सुइसाइड नोटमधली रोहितची भाषा पाहिली की तो एक विचारी मुलगा असल्याचे जाणवते. कुलगुरूंना लिहिलेल्य पत्रात माझ्यासाठी फास घ्यायला दोरीची सोय करा किंवा विष तरी आणून द्या असे म्हणणारा हा युवक प्रत्यक्ष आत्महत्या करण्याच्यावेळी लिहिलेल्या चिठ्ठीत मात्र कोणालाही दोष देऊ इच्छित नाही. (त्याच्या त्या चिठ्ठीत कोणालाही दोषी धरलेले नाही, म्हणून आम्ही त्याच्या आत्महत्येसाठी जबाबदार नाही असे म्हणणारेही काल टीव्हीवर पाहिले.) तो उगाचच या तीस जणांच्या घोळक्यात अडकला असे झाले असेल का? ज्याला आपण चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असणे म्हणतो. संवेदनशील असलेल्या त्याच्याबरोबर आक्रमक वृत्ती असलेल्यावरही कारवाई झाली तरी त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलण्याइतके ते एवढे मनाला लावून घेतले नाही? ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्यापैकी प्रशांत हा विद्यार्थी त्या तीसएक जणांच्या घोळख्याचा म्होरक्या होता. रोहितच्या मानाने त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे?

डॉ. आलोक पांडे यांच्यापुढे झालेल्या सुनावणीत संघटनेच्या या पाच जणांनी सुशीलकुमार याला मारहाण केल्याचा इन्कार केला. आम्हाला गुंड म्हणण्यावरून आम्ही सुशीलकुमारकडे गेलो व त्याच्याकडून लेखी माफीपत्र घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या चौकशी करताना पुढे आलेल्या पुराव्यांवरून व दिल्या गेलेल्या साक्षींवरून अगदी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याइतपत नाही तरी मारहाण झाली होती हे तथ्य समोर आले. एक उदाहरण म्हणून विचारतो, या मारहाणीत त्या सुशीलकुमारचा जीव गेला असता तर ‘दलितांनी एकाला मारले’ अशी त्याची बातमी झाली असती का?

सुशील कुमार याने दलितांबद्दल काढलेल्या काही अनुद्गारांचा उल्लेख एका ठिकाणी वाचण्यात आला. पण त्याचे संदर्भ व तपशील मिळत नाहीत.

या प्रकरणी सुशीलकुमारचे कोणी नातेवाईक आणि स्वत: हे विद्यार्थी यांनी परस्परांविरूद्ध न्यायालयात गेले आहेत. ते प्रकरण प्रलंबित आहे. ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्या पाच विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल याचा विचार करण्यासाठी संघटनेतील विद्यार्थ्यांची बैठक चालू असताना रोहित मधूनच म्हणजे दुपारी चारच्या सुमारास बैठक सोडून निघून गेला आणि संध्याकाळी सहाच्या सुमारास त्याच्यासाठी शोधाशोध केल्यावर त्याने आत्महत्या केल्याचे कळले. त्या बैठकीत असे काय झाले की रोहितने हे पाऊल उचलले? निराशाजनक सूर उमटला होता का, जसे की काहीही मार्ग निघू शकणार नाही? नक्की काय झाले हे कसे कळू शकेल? कोण सांगू शकेल?

या विद्यापीठात किती तरी इतर दलित विद्यार्थी असतील. त्यांच्या ‘दलित’ असण्यामुळे त्यांना विद्यापीठातील प्राध्यापकांकडून काही वेगळी म्हणजे भेदभावाची वागणूक मिळते का अशा स्वरूपाची काही चौकशी कोणी केली आहे का?

केंद्रिय मंत्री बंडारू दत्तात्रेय हे स्वत: मागासवर्गीय आहेत असे दिसते. याकूब मेमनच्या फाशीविरूद्ध आंदोलन करणा-या या संघटनेच्या विद्यार्थ्याना देशविरोधी संबोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र त्यांनी स्मृती इराणी यांच्या मंत्रालयाला पाठवले. ते पत्र कुलगुरूंना पाठवण्यात आले. त्यानंतर मंत्र्यांच्या पत्रावर काय कारवाई झाली हे विचारणारी तीन स्मरणपत्रे मंत्रालयाकडून कुलगुरूंना पाठवली गेली. आंदोलक व राजकारणी याला दबाव टाकणे म्हणत आहेत, तर मंत्रालय सर्वच पत्रव्यवहाराच्या बाबतीत तशी पद्धत असल्याचे म्हणत आहे. तेव्हा या प्रकरणाकडे जातीय दृष्टीकोनातून पाहणा-यांना दत्तात्रय यांचेही मागासवर्गीय असणे याबाबतीत चालणार नाही. कारण ते पडले भाजपचे मागासवर्गीय. म्हणजे बाटलेले. ते काय ‘दलितांचे’ हित पाहणार? दलितांचे ‘खरे’ हित पाहणा-याने कसे उठता बसता डॉ. आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करायला हवा. तरच काही जणांचे समाधान होते. वर म्हटल्याप्रमाणे चौकशी समितीमध्ये दलित प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व होते असे दिसते. रोहितच्याच एका पत्रात कुलगुरूंच्या भुमिकेबद्दल त्याने चांगले लिहिले होते. आता तर त्यांचाही बळी मागितला जात आहे.

विद्यालयांमधून होणारी राजकीय आंदोलने हा नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे. शिक्षणाशी संबंधित विषय सोडून कोणत्याप्रकारच्या आंदोलनांना कॉलेज-विद्यापीठांमध्ये परवानगी दिली जावी हा मुद्दा नेहमी चर्चिला जातो. पण त्यावर कधीही काही निर्णय किंवा एकवाक्यता होत नाही.

हैद्राबाद विद्यापीठात गेल्या पाच वर्षात रोहितसह पाच मुलांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही सर्वच मुले त्यांच्या कुटुंबातील प्रथमच शिकणारी अशी मुले आहेत असे कळते. हे सारे बळी आंदोलनापोटीच झाले आहेत का? की नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यामध्ये येणारी अडचण हे मोठे कारण असावे? मुंबई आयआयटीमध्येही काही दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत असे आपण वाचतो. या पार्श्वभुमीवर केवळ दलित असलेल्याच नव्हे, पण अभ्यासात कच्चे असलेल्या मुलांचे समुपदेशन करण्याची काही व्यवस्था आहे का? या मुलांच्या या व इतर अडचणी समजून घेण्याची अशी काही यंत्रणा असेल तर त्यांना केवळ त्यांच्या मित्रांच्या संगतीत वहावत जाण्याशिवाय इतर पर्याय उपलब्ध राहील. कॉलेजमध्येच विद्यार्थी कल्याण (वेलफेअर) समिती नेमून एखाद्या (सह्रदयी) प्राध्यापकाकडे याबाबतची जबाबदारी सोपवून दलित, इतर मागासवर्गीय, तसेच आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या मुलांकडे वैयक्तिक लक्ष ठेवून त्यांच्या समस्या समजून घेऊ शकेल. आताच्या प्रकरणातही प्रशासनाचा कारवाई झालेल्या विद्यार्थ्यांशी कारवाई होण्याआधी काही संवाद असेल की नाही माहित नाही, बहुधा नसेलच, कारवाईनंतर तर तो पूर्णपणे तुटला असणार. एखाद्या गरीब विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती पूर्णपणे व बराच काळ थांबल्यावर त्याच्यापुढे दुसरा काहीही सकारात्मक पर्याय न ठेवता येणे हे व्यवस्थेचेच अपयश नाही का? भारतातले विद्यार्थी परदेशात गेल्यावर तेथे त्यांचा रोजचा खर्च निघण्याइतपत कामे कॉलेजमार्फत वा विद्यापीठामार्फत त्यांच्यावर सोपवली जातात. आपल्याकडे असे होतकरू विद्यार्थी शोधून त्यांच्यासाठी काही व्यवस्था निर्माण करता येईल का?

अशा संवेदनशील मुद्द्यावर राजकारणी मोठ्या जोमाने राजकारण करतील यात शंका नाही. केजरीवाल व ओवैसी यांनी ते दाखवले आहेच. कॉंग्रेसच्या पप्पूकडून दुसरी काही अपेक्षा नव्हतीच. मायावती व ममता त्यांची पथके पाठवली आहेत. लालू-मुलायमही रिंगणात उडी न घेता मागे राहण्याचे पाप करणार नाहीत. दलितांच्या नावाने मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याची संधी कोण कसे सोडतील?

या निमित्ताने कवी अशोक वाजपायी यांनी त्यांना हैद्राबाद विद्यापीठाकडून मिळालेली डी.लिट. परत करण्याची घोषणा केली आहे. या मुलांवर कोणत्या कारणाने कारवाई केली गेली किंवा एकूण हे प्रकरण काय आहे याची त्यांना माहिती नाही आणि तरीही त्यांनी हे पाऊल उचलले आहे असे इंडिया टुडेवर ते सांगत आहेत. पुरस्कार किंवा पदवी परतीचा किडा चावलेले अनेक जण आपल्याला या विद्यापीठाकडून काही मिळाले होते का हे आता नक्कीच धुंडाळतील.

या सर्वात शक्यता आहे ती अशी की दबावामुळे कोणी तरी बकरा निश्चित शोधला जाईल. कदाचित चौकशीनंतर आणखी नवी तथ्ये समोर येतील. वर सुशीलकुमार याने दलितांविरूद्ध काही अनुद्गार काढल्याचा उल्लेख आहे. मी तर म्हणतो, ते जर खरे असेल, तर जरूर त्याच्याविरूद्ध कडक कारवाई करा. परंतु शक्यता अशी आहे की अशा प्रकारांवरून नेहमीच होणा-या राजकारणामुळे मूळ प्रश्नाकडे कोणाचेच लक्ष जाणारच नाही. कारण कोणाची तशी इच्छा नाही. दलितांसाठी काही तरी केल्याचे खोटे समाधान मात्र आंदोलकांना व त्याहीपेक्षा राजकारण्यांना मिळेल.

आज रोहित, उद्या आणखी कोणी. दलित किंवा दलित नसलेला. पुढचा विचार करून यावर कायमस्वरूपी विचार करून जे कोणी स्वभावाने हळवे जीव असतील, ते वाचवण्यासाठी प्रयत्न करायला सवड आहे कोणाला?

या पोस्टला फुसके बार म्हणवत नाही. पण या सदराचे नाव बदलेपर्यत तरी तसेच ठेवतो.
फुसके बार – २० जानेवारी २०१६

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निनाद१, तुमचा खोडसाळपणा करण्याचा धंदा स्पष्टपणे दिसला आहे.
मुखवटा, विशिष्ठ लोक, कुलकर्णी वगैरे उल्लेखातून सगळे दिसले आहे. तुम्ही त्या प्रकाश बाळ पिलावळीतले अाहात. 'खोडसाळपणा' हा धर्म असलेले. Good for nothing. फार लिहित नाही.

तुम्ही कुणाच्या पिल्लावळीतले आहे ते ही ठाऊक आहे. खरे काय आहे ते ठाऊक न करून घेता एका विशिष्ट अजेंड्यावरून तुमचा लेख पाडण्याचा धंदा आहे.

तुमचा तोच धंदा आहे. जे लिहिले अहे त्यावर कमेंट न करता दुस-याचे अजेंडे शोधण्यात, दुस-यांना लेबले लावण्यात, नावावरून अनुमान काढण्यात तुमच्यासारखी पिलावळ प्रवीण असते.

तुमचे धंदे इतरांवर चिटकवू नका. आधी चष्मा असल्यास डोळयावर चढवून नीट वाचा बिपिन यांनी काय लिहिले. मग उर बडवत फिरा.

Vishwambhar Choudhari यांच्या फेसबूकवरून
6 mins ·
हैद्राबाद प्रकरणी उपस्थित होणारे प्रश्न
१. रोहित देशद्रोही होता तर त्याच्यावर खटला का भरला नाही? खटला भरायला हवा होता.
२. तो देशद्रोही आहे असं अभाविपचं मत असेल तर त्यांनी त्याच्या श्रद्धांजलीचे कार्यक्रम का घेतले?
३. विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांच्या भांडणात बंडारू दत्तात्रेय यांनी एवढा रस का घेतला?
४. स्मृती इराणी या विद्वान मंत्रिणबाईनी सहा आठवड्यात विद्यापीठाला पाच पत्र लिहून एवढा पाठपुरावा का केला? आत्महत्त्येला प्रवृत्त केल्याबद्दल बंडारू दत्तात्रेय आणि कुलगुरू अप्पाराव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला, स्मृती इराणी यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही?
५. विद्यापीठ स्वायत्त आहे आणि सरकारच्या नियंत्रणात नाही असं स्मृती इराणी यांचं म्हणण असेल तर त्यांनी दीड महिन्यात विद्यापीठाला पाच पत्रं कोणत्या अधिकारात लिहिली?

अर्थात. लेखात इतके प्रश्न उचलले ज्याची उत्तरे मायबोलीकरांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मायबोलीकरांची किमान ५ प्रश्नाची उत्तरे नक्की द्यायला हवी.

गजेंद्र सिंगच्या मृत्युवर आवर्जुन ट्विट करून राजकारण करणार्‍या पंतप्रधानांना रोहीतच्या बातमीवर २ शब्द लिहावेसे वाटले नाही? का? यात त्यांची विद्यार्थीसंघटना, केंद्रीय मंत्री यांच्यावर आरोप आहे म्हणून ?

निनाद१ | 20 January, 2016 - 17:13

माझ्यामते आहे. कारण "जर-तर" या शब्द खेळामधून आपण भलतेच काहीतरी जस्टिफाईड करायला निघाला आहात हे कळले. धागा कुठल्या विषयावर आणि आनि आपण जरतर लावून कुठला विषय छेडलात आणि त्यातून पण कायद्यामधे अमुक जातीचा असल्याने सवलत मिळाली असती वगैरे वाक्य आपणच लिहिली आहे.
कायद्यासमोर सर्व समान असताना सुध्दा आपण नको तिथे जात घुसवण्याची गरज होती का? याचे आत्मपरिक्षण करा. मग पुढचे बोलू.

अमुक जातीला कायद्याच्या शिक्षेत सवलत आणि इतरांना भार असे व्हायला भारतात राजेशाही नाही आहे तर लोकशाही आहे इतके लक्षात असू द्या

निनाद१ आता आक्षेपार्ह शब्दप्रयोग बाजुला ठेवत शांतपणे समजुन घ्यायची तयारी असल्यास सुरुवातीपासून काय झाले याचे तर्कशुद्ध विश्लेषण करु.

(१) प्रथम मूळ लेखातले वाक्य -
या मारहाणीत त्या सुशीलकुमारचा जीव गेला असता तर ‘दलितांनी एकाला मारले’ अशी त्याची बातमी झाली असती का?

(२) त्यावर तुमचा प्रतिसाद -
हो नक्कीच झाली असती. आणि इथे कुलकर्णीं सकट काही विशिष्टांचा वेगळाच भलताच सुर लागला असता.

(३) त्यावर माझा प्रतिसाद -
नाही. असे झाले नसते.
व माझा मुद्दा स्पष्ट करण्याकरिता मी दिलेली बातमीची लिंक.

(४) त्यावर तुमचे आक्षेपार्ह शब्द वगळता असलेला प्रतिसाद -
कायद्यात जातीचा काहीच फायदा होत नाही. अश्या नीच पातळीच्या अपराधीच्या समर्थनात सामुहिक आंदोलन कधीच होणार नाही.

आता या सर्व क्रमवारीत तुमच्याकडून प्रतिसाद देताना एक बाब निसटली गेली ती अशी की, {(१)या मारहाणीत त्या सुशीलकुमारचा जीव गेला असता तर ‘दलितांनी एकाला मारले’ अशी त्याची बातमी झाली असती का? - (२) हो नक्कीच झाली असती. आणि इथे कुलकर्णीं सकट काही विशिष्टांचा वेगळाच भलताच सुर लागला असता. } या तर्कानुसार इथे मी दिलेल्या लिंकमध्ये प्रत्यक्षात गुन्हेगाराच्या जातीचा उल्लेख करून त्या जातीचा तो गुन्हेगार आहे अशी बातमी झालेलीच नाही. समजा तशा पद्धतीने बातमी देवून किंवा बातमीपश्चात अमूक एक जातीचा गुन्हेगार अमक्या दिवशी उन्मादात असे वागला, त्यांचे त्या दिवशीचे ट्रेनने फुकट फिरणे बंद करा अशा पद्धतीचा जनक्षोभ इतर जाती संघटनांकडून झाला असता तर एक प्रकारे ते त्या संपूर्ण जातीलाच (अथवा जात गटालाच, कारण दलित हा अनेक जातींचा गट आहे तसेच सवर्ण हाही अनेक जातीचा एक गट आहे) आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्यासारखे झाले असते आणि अशा वेळी आरोपीच्या एकट्याच्या विरोधातली झळ संपूर्ण जातीला किंवा जातगटालाच सोसावी लागली जाऊन त्या जातीच्या / जातगटाच्या संघटनांना नाईलाजास्तव संघर्षात उतरावेच लागले असते. अर्थातच आरोपीला फायदाच झाला असता.

आता एक वेगळे उदाहरण घेऊ संतोष माने या एसटी चालकाने बेदरकारपणे बस चालवून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी घडवुन आणली. जर संतोष माने या व्यक्तिविरोधात जनक्षोभ उसळला तर त्याची झळ त्याला एकट्यालाच पोचेल आणि त्याचा बचाव केवळ त्याला स्वतःला व त्याच्या मोजक्या हितचिंतकांनाच (कुटुंबिय / मित्र / नातेवाईक आणि अर्थातच वकील) करावा लागेल. याउलट सगळे एसटीचालकच वाईट आहेत असा सूर लावत एसटीचालकांच्या विरोधात जर जनक्षोभ उसळला तर नाईलाजाने एसटीचालक संघटनेलाही जनक्षोभाविरोधात उतरावे लागेल ज्याचा कळत नकळत फायदा संतोष मानेला होईल.

याकरिताच आरोपी कुठल्या जातीचा आहे याचा उल्लेख न करता तो केवळ आरोपी आहे म्हणून त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई व्हावी असा आग्रह धरला पाहिजे. दलिताने मारले / दलिताला मारले किंवा सवर्णाने मारले / सवर्णाला मारले असा उल्लेख करून आपण घडलेल्या घटनेला अनेकवचनी द्वेषाचा रंग देत जातो जो की अतिशय अस्वीकारार्ह आहे. ती विशिष्ट व्यक्ति मारली गेली किंवा ती विशिष्ट व्यक्ति अपराधी आहे एवढा आणि केवळ इतकाच बातमीचा आणि संबंधित प्रतिक्रियांचा स्कोप असला पाहिजे.

याशिवाय,
>>>> बिपिन तुमचे म्हणणे काय आहे? निर्भया प्रकरण काय आहे ते ठाऊक तरी आहे का? इथे आरोपिंना पकडून शिक्षा देखील झाली <<<<
या विधानावर माझे मत असे की, निर्भया प्रकरण रात्री बसमध्ये घडले त्याचप्रमाणे मी लिंक दिलेले प्रकरण त्याही आधी सात वर्षे चालत्या ट्रेनमध्ये घडले. दिल्लीतली बसवाहतूक ही सार्वजनिक + खासगी ठेकेदारी तत्त्वावर चालते तर रेल्वेसेवा ही पूर्णपणे सार्वजनिक तत्त्वावर चालते. रेल्वेत अधिक जास्त सुरक्षितता अपेक्षित आहे. जिच्या असण्यावरच त्या घटनेमुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले. सबब, हे प्रकरण देखील निर्भया प्रकरणा इतकेच गंभीर आहे. आरोपींना शिक्षा लवकरात लवकर होऊ शकली कारण जनक्षोभाचे दडपण नव्हते, आणि जे कुठल्याही प्रकरणात नसावेच आणि अशा दडपणाशिवाय न्यायालयांनी द्रुतगतीने न्यायनिवाडा करावा ही खरी अपेक्षित आदर्श व्यवस्था.

१) प्रथम मूळ लेखातले वाक्य -
या मारहाणीत त्या सुशीलकुमारचा जीव गेला असता तर ‘दलितांनी एकाला मारले’ अशी त्याची बातमी झाली असती का?

(२) त्यावर तुमचा प्रतिसाद -
हो नक्कीच झाली असती. आणि इथे कुलकर्णीं सकट काही विशिष्टांचा वेगळाच भलताच सुर लागला असता.

>>>

इथे सुरुवात आपण केली म्हणून जर तर ची भाषा मी ही केली त्याला तुमचा आक्षेप का?

अनेकवचनी द्वेषाचा रंग देत जातो जो की अतिशय अस्वीकारार्ह आहे. ती विशिष्ट व्यक्ति मारली गेली किंवा ती विशिष्ट व्यक्ति अपराधी आहे एवढा आणि केवळ इतकाच बातमीचा आणि संबंधित प्रतिक्रियांचा स्कोप असला पाहिजे.>>>>>>>>>

बरोबर. पण जिथे निर्भयाचे आरोपी ६ हिंदू असताना एकालाच इतर धर्मिय म्हणून काही राजकिय संघटना प्रोजेक्ट करून पोस्टर फिरवतात, जिथे मत मागायला खुद्द पंतप्रधान जातीचा उल्लेख जाहीर सभांमधे करतात तेव्हा हा "स्कोप" कुठे जातो ? जस्टिफाईड करताना सगळीकडे करा. नुसते एके ठिकाणी करू नका.
खोट्या फेसबुकिय बांग्लादेशी अत्याचाराच्या पोस्टीमधे खांबाला बांधलेला ब्राह्मण आहे असे लिहितात तेव्हा का तो फक्त माणूस नसतो? अशा वेळी तो स्कोप कुठे जातो?

मायबोलीवर एखादा लेख पाडत असेल तर त्याला चार चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात. तरीही तो त्या सर्वांना फाट्यावर मारून लेख पाडतच असेल तर मग चांगल्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत. तसंच एखादा लेख पाडताना त्यात पुरावे, संदर्भ कुठल्या घटनांचे हवेत , कुठल्या नकोत हे एक दोनदा सांगितले जाते. पण मी नेक्स्ट टू बराक ओबामा असल्याने मला काय गरज असा पवित्रा असलेल्यांना ते कसे मागायचे ?

तरीही मायबोली प्रशासनाने धागे काढण्याच्या या व्यसनाला आवर का घातला नाहीत याची कारणे उघड आहेत. अनेकांना धागे काढावेसे वाटत नाहीत. प्रतिसाद देण्यासाठी कुणी धागे काढतंय का याची वाट पाहणारेही काही असतात. धागे काढणा-यांमधे काही जणांना मायबोली हा आपला ब्लॉग आहे असे वाटते. त्यांच्या घरात हळदीचा डब्बा कुठे ठेवलाय इथपासून ते पाणी गेल्यावर ज्या ड्रममधे पाणी भरून ठेवतात त्याला जमिनीपासून किती सेमी अंतरावर भोक आहे हे सुद्धा सर्वांना ठाऊक असते. अर्थात स्पर्धा ही सर्व क्षेत्रात असणार. तशीच इथेही. नव्या उमेदीचे स्पायडरमॅन आले की ते धागे विणणे सुरू करतात.

अर्थात काहींना मात्र सुटका झाल्याचा आनंद होऊ शकतो. कारन धागा काढण्यातला एक तोटा म्हणजे आपल्याच धाग्यावर आपणच मूर्खात निघताना पाहून आणि त्याबाबत काही न करता आल्यामुळे येणारे नैराश्य !
त्यावरही काही जण ड्युआय काढणे, वाहत्या पानांवर स्त्रैण प्रतिसाद देणे, वाहते पान काढणे असे उपाय करून पडलो तरी नाक वरच असे वागू शकतात.

पुढे पुढे धागाकर्ता कोण आहे आणि त्याने काय लिहीलय याला महत्व न देता , नव्या विषयावरचा धागा काढणारा लिपीक असे समजून लोक आपली मतं मांडणे सुरू करतात. धागाकर्ता अधूनमधून आपण काहीतरी लिहीले पाहीजे म्हणून अरेच्चा, हे मला माहीतच नव्हतं पण... असे म्हणून प्रतिसाद देऊ पाहतो. पण मुळातच धागाकर्त्याचा वकूब ध्यानात आल्याने त्याने काही लिहीले तरी ते फार गंभीरपणे घेताना कुणी दिसत नाही. त्याच्या लिखाणाच्या चिंधड्या एक दोन प्रतिसादातच होताना पाहून जुने पहिलवान मनातून आनंदित होत असतात. आपल्यामागची संक्रांत इकडे गेली याचा आनंद असतोच, पण त्याची खात्री करण्यासाठी प्रत्येक वेळा ते उकसवणारे प्रतिसाद टाकत असतात.

आता ही बॅटन खाली ठेवता येत नाही हे नव्या कोळ्याला समजून येईल तेव्हां त्याला नवा स्पायडरमॅन यायची वाट पहावी लागेल. पंचतंत्र कि इसापनीती मधे एक गोष्ट आहे ना त्या माणसाच्या डोक्यावर एक चक्र असते ते फिरत असते आणि त्यामुळे त्याला प्रचंड वेदना होत असतात. जेव्हां दुसरा कुणी ते स्विकारायला तयार होईल तेव्हांच त्याची सुटका होत असते. तसंच...

तर एव्हढं बोलून धाग्याच्या विषयाकडे वळतो.

इथे सुरुवात आपण केली म्हणून जर तर ची भाषा मी ही केली त्याला तुमचा आक्षेप का? <<<<

सुरुवात मी नाही केली. क्रमवारीनुसार पहिले वाक्य { या मारहाणीत त्या सुशीलकुमारचा जीव गेला असता तर ‘दलितांनी एकाला मारले’ अशी त्याची बातमी झाली असती का?} मूळ धागालेखकाचे आहे तर

दुसरे वाक्य { हो नक्कीच झाली असती. आणि इथे कुलकर्णीं सकट काही विशिष्टांचा वेगळाच भलताच सुर लागला असता} तुमच्या प्रतिसादातले आहे.

मी फक्त तुम्ही वर्तविलेली शक्यता खोडून काढली व त्याकरिता एक दाखला दिला.

बरोबर. पण जिथे निर्भयाचे आरोपी ६ हिंदू असताना एकालाच इतर धर्मिय म्हणून काही राजकिय संघटना प्रोजेक्ट करून पोस्टर फिरवतात, जिथे मत मागायला खुद्द पंतप्रधान जातीचा उल्लेख जाहीर सभांमधे करतात तेव्हा हा "स्कोप" कुठे जातो ? जस्टिफाईड करताना सगळीकडे करा. नुसते एके ठिकाणी करू नका.
खोट्या फेसबुकिय बांग्लादेशी अत्याचाराच्या पोस्टीमधे खांबाला लटकलेला ब्राह्मण आहे असे लिहितात तेव्हा का तो फक्त माणूस नसतो? अशा वेळी तो स्कोप कुठे जातो?<<<<

निश्चितच अशा ठिकाणी जो अनेकवचनी द्वेषाचा रंग दिला गेलाय तोही तितकाच अनावश्यक आहे.

बायद्वे निनाद१ मी अजुनही तुम्हाला कुठेही अनुचित शब्दांनी संबोधलेले नाहीये तरी तुम्ही माझ्याकरिता जी अनुचित संबोधने वापरलीत त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून तुमच्यातल्या सभ्यतेचा प्रत्यय देणार का?

नक्कीच मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही काढलेल्या मुद्द्यांवरून त्यावेळेला तोच निष्कर्ष निघत होता.
राहिले धागाकर्ता काय बोलतो ते त्याबद्दल आधीच लिहिले आहे.

जिथे एका विद्यार्थ्याला मुद्दामुन देशद्रोही वगैरे ठरवले जाते ते ही राजकिय संघटनांकडून का? कोण देशभक्त कोण देशद्रोही हे ठरवणारे हे कोण? सरकार विरुध्द आवाज उठवणे हे जर देशद्रोही असेल तर या आधीच्या सर्व सरकरांनाविरुध्द आवाज उठवणारे देशद्रोही होते का?

अरे जरा शांत बसा त्या धाग्याकर्ताला त्या प्रश्नांची उत्तरे देऊ देत ना...

उत्तराची वाट पाहीपर्यन्त चंद्रच्या जंप मारो पोस्ट तैयार..

तर धाग्याचा विषय असा होता कि... नेमकं काय म्हणायचंय हे कुणालाच क्लिअर नाही.

त्यामुळे नेमकं काय घडलंय यावर आपण बोलूयात.

रोहीतची आत्महत्या हे सत्य आहे. त्याचे अंत्यसंस्कार घरच्यांनाही न सांगता झाले हे ही सत्य आहे.
सुशीलकुमारचा जीव गेलेला नाही हे सत्य आहे. त्याच्यावर जुनाट व्याधीचे ऑपरेशन झाले आहे हे ही सत्य आहे. डॉक्टरांना आणि मेडीकल ऑफीसरला मारहाणीच्या खुणा मिळाल्या नाहीत हे ही सत्य आहे.

रोहीत चा कार्यक्रम एबीव्हीप्णे उधळून लावला होता हे सत्य आहे. तो कार्यक्रम होता मुह्जफ्फरपूरच्या दंगलींबाबतचा. दंगल घडवणा-या सुजाण नागरीकांबद्दल जिव्हाळा असल्याने या संघटनेने हा कार्यक्रम उधळून लावला असावा. कदाचित ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांना देशद्रोही म्हणण्याचा परवाना त्यांना असावा.

याकूबच्या फाशीवरून की एकंदर फाशीच नसावी यावरून पुढचा वाद झाला यावर मतांतरे आहेत. त्यात अमूक एकच सत्य आहे असं म्हणता येत नाही.

त्याच्या निलंबनाबाबत कुठलाही संदेह नाही. त्यात काही लोकांनी खूपच रस घेतला. हे सर्व सुशीलकुमारच्या सांगण्यावरून झाले हे नाकारण्यात अर्थ नाही. रोहीत ने ज्या साठी माफी लिहून घेतलेली आहे त्याचे डिटेल्स अद्याप आपल्याला माहीत नाहीत. त्याने स्वतः कुणावर अ‍ॅट्रोसिटी ची कारवाई केली हे क्लिअर नाही. जर त्याच्यामागे एखादे संघटन होते तर तो आत्महत्या करणार नाही. यावरून त्याने आयसोलेशन मधे निव्वळ चार पाच मित्रांच्या सहाय्याने लढा दिला इतकंच समजतं. तो कुठल्याही मीडीयामधे रिफ्लेक्ट झालेला नाही. त्यामुळे जनतेचा पाठिंबा मिळाला नाही, जसा एफटीआयआय च्या केस मधे मिळाला.

त्याला ओपन सीटमधे प्रवेश मिळालेला असल्याने त्याला शिष्यवृत्ती मिळाली होती की फेलोशिप हे आधी तपासून मग लिहायला हवे होते. ..

धाग्याबाबत सध्या एव्हढेच.

प्रतिसादाबाबत...
(लिहावे का खरंच ? बघूया मूड टिकला तर )

निनाद१ | 20 January, 2016 - 04:06

Vishwambhar Choudhari यांच्या फेसबूकवरून
6 mins ·
हैद्राबाद प्रकरणी उपस्थित होणारे प्रश्न
१. रोहित देशद्रोही होता तर त्याच्यावर खटला का भरला नाही? खटला भरायला हवा होता.
२. तो देशद्रोही आहे असं अभाविपचं मत असेल तर त्यांनी त्याच्या श्रद्धांजलीचे कार्यक्रम का घेतले?
३. विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांच्या भांडणात बंडारू दत्तात्रेय यांनी एवढा रस का घेतला?
४. स्मृती इराणी या विद्वान मंत्रिणबाईनी सहा आठवड्यात विद्यापीठाला पाच पत्र लिहून एवढा पाठपुरावा का केला? आत्महत्त्येला प्रवृत्त केल्याबद्दल बंडारू दत्तात्रेय आणि कुलगुरू अप्पाराव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला, स्मृती इराणी यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही?
५. विद्यापीठ स्वायत्त आहे आणि सरकारच्या नियंत्रणात नाही असं स्मृती इराणी यांचं म्हणण असेल तर त्यांनी दीड महिन्यात विद्यापीठाला पाच पत्रं कोणत्या अधिकारात लिहिली?<<<<<<<<<

हे ते प्रश्न..

निनाद१,
एवढेच का तुमचे मुद्दे? पत्रांचा व त्यामागच्या कारणांचा उल्लेख पोस्टमध्येच केला आहे. तुम्हाला तो दिसला नसेल. टीव्हीवरही सांगत आहेत. काही माध्यमे मात्र त्याकडे दुर्लक्ष करत दबाव दबाव म्हणून ओरड करत अाहेत.
पंतप्रधानानांनी दोन शब्द बोलावेत ही तुमची अपेक्षा आहे, पण म््ृताला श्रद्धांजली वाहिली तरी तुम्हाला प्रॉब्लेम?
तेव्हा या प्रश्नांना काही अर्थ नाही.

कुलकर्णी एक तर तुम्ही समजून घेत नाही अन्यथा वेड घेऊन पेडगावला जात आहे.

उद्या तुमची सोशल मिडीया ग्रुप वर भांडण झाली तर तुम्ही तिथेच सोडवणार की राजकिय पक्षाकडे जाणार? मग राजकिय पक्षाच्या गुंडांनी या नेत्यांनी समोरच्या व्यक्तीवर दबाव आणला त्याच्या घरी जाऊन राडे केले, इ. केले आणि जर त्या व्यक्तीने आत्महत्या केली तर तेव्हा तुम्ही काय म्हणणार कुणाचे बरोबर?

एबीव्हीपी च्या गुंडांनी रूमच्या बाहेर हत्या केली आणि नंतर आत्महत्येचा आभास निर्माण केला अशा अर्थाची पोस्ट वाचली.

आता तुम्हाला मुद्दा थोडा समजू लागला अाहे असे दिसते. पेडगावला जाणे वगैरे मी तुमच्याबद्दल बोलत नाही. तर आता सांगा, यातला एक ग्रुप दलित असेल, व त्यातल्या एका कोणी आत्महत्या केली तर ती दलिताची आत्महत्या ठरेल का?
येथे भांडण कशाबद्दल होते, वगैरे थोडावेळ बाजुला ठेवा.
दुसरे म्हणजे हेच माझा अजेंडा, विशिष्ठ लोक वगैरे टाळून लिहिता आले असते का?

घरासमोर गाडी लावली म्हणून डायरेक्ट अ‍ॅट्रोसिटीची धमकी दिली म्हणजे ज्याच्याशी हा प्रेमळ संवाद झाला तो अत्यंत प्रेमाने समजावून सांगत असतानाही उगीचच त्या व्यक्तीला राग आला आणि धमकी दिली असेल का ? लोक आपले व्यक्तिगत अनुभव प्रमाण म्हणून का सांगतात ? इतरांना उलटे अनुभव आलेले असतात.

कायद्याची भाषा रस्त्यात वगैरे कोण करतं आणि आपली चूक असल्यावर उलटे युक्तीवाद कोण करतं ?
खरंच विषयाशी संबंधित नाही हे.

अ‍ॅट्रोसिटीच्या किती केस मधे शिक्षा झाल्या आणि किती खोट्या केसेस होत्या हे कसं कळणार ?
जिवंत जाळलं गेलं, रेप झाले तरी न्याय मिळत नाही म्हणून आकडेवारीनुसार एकीकडे आक्रोश आहे आणि एकीकडे खोट्या केसेस, खोट्या केसेस, खोट्या केसेस असा आक्रोश चालू आहे.

हेकेखोरांकडे लक्ष देण्यात अर्थच नाही म्हणा..

हत्या करून देखावा निर्माण केला गेला. ज्यांनी हे केलं त्यांनी रोहीत देशद्रोही आहे अशा अर्थाचा प्रचार सुरू केला. त्यानुसार आदेशानुसार विविध ठिकाणी लेख पाडण्याचे काम सुरू झाले आहे. या लेखकांना लेखामागे ३०० रू मिळतात अशी बातमी आहे.

एका कोणी आत्महत्या केली तर ती दलिताची आत्महत्या ठरेल का?>>>
का नाही ठरणार जर तुम्ही दलित असल्यामुळे त्रास देत असाल त्याबरोबरच्या दलित मुलांवर कारण नसताना कारवाई करत असाल वर राजकिय दबाव आणून मानसिक खच्चीकरण पध्दतशीर पणे करत असाल तर नक्कीच बोलायला हवे

यात वाद, मारहाण ही कोणी दलित आहे यावरून झालेली नाही हे द्ृष्टीआड का करता? यात या विद्यार्थ्यांना दलित म्हणून कोठे वाईट वागणूक मिळाली आहे? तीस जण कुमार याच्या खोलीत गेले. सगळे त्यांच्या संघटनेचे म्हणजे दलित होते का माहित नाही. चौकशीमध्ये यांनी मारहाण केल्याचे नाकारले. पण चौकशीत हॉस्पितलमध्ये दाखल करण्याइतकी नाही तरी मारहाण झाली हे सिद्ध झाले. तेव्हा या संघटनेचे विद्यार्थी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का? सुशीलकुमार याने झालेल्या मारहाणीचा बागुलबुवा करून हॉस्पितलमध्ये दाखल करावे लागल्याचा खोटा दावा केल्याचे समोर आले. पण तो दावाही चौकशीसमितीसमोरच उघडा पडला. वाईटाला वाईट जरूर म्हणा,पण रोहितवर केलेल्या कारवाईव्यतिरिक्त त्याच्यावर मंत्री, कुलगुरू वगैरेंनी किंवा कोणी त्याला धमकावल्याच्या घटना घडल्याचे समोर अाले आहे काय? तेव्हा राजकीय दबाव,खच्चीकरण वगैरेचा संबंध कोठे येतो? तो त्याचे संशोधन चालू करू शकत होता, त्यासाठी लायब्ररीत जाणे आवश्यक आहे, ते करू शकत होता. एरवी कॉलेजमध्ये रस्टिकेट केल्यावर यातले काय करू दिले जाते? हॉस्टेलमध्ये मारहाण केल्याचे सिद्ध झाले म्हणून त्याला हॉस्टेलमधून काढले असेल. कोणी याबाबतीत वस्तुनिष्ठ विचार करणार आहे का की केवळ मानसिक खच्चीकरण करणे, दलित असल्यामुळेच त्रास देणे वगैरे अपप्रचार करणार आहेत?
असो. आता कपोचे येथे आलेले आहेत. त्यामुळे मला घाबरणे भाग आहे. कारण त्यांच्या कमेंट्सवरून ही पोस्त कदाचित ओबामाकडच्या हनुमानाचाही संबंध लागेल. त्याची चुणूक त्यांनी माझ्या एका छोट्या अनुभवावरून भलताच निष्कर्ष काढून दाखवलेलीच आहे. त्यामुळे ही अखेरची पोस्ट. बाकी मला जे म्हणायचे होते, ते वर व मूळ पोस्टमध्ये लिहिले आहेच.

लेखाचे लेखक तेव्हां त्या खोलीत होते का ?
त्या रोहीतचा खून झालेला आहे. अभाविपच्या कार्यकर्त्याचा नाही. माफी सुरक्षा अधिका-यांपुढे देण्यात आलेली आहे. तेव्हां व्हाईस चॅन्सेलर स्वतः उपस्थित होते. पोलीस कमिशनर देखील उपस्थित होते. स्वतः जज्ज साहेबांनी दुस-या दिवशी येऊन खात्री करून घेतली आहे.

मंत्री, कुलगुरू वगैरेंनी किंवा कोणी त्याला धमकावल्याच्या घटना घडल्याचे समोर अाले आहे काय? >> इतके ढळढळीत पत्र लिहिलेले दिसले नाही तुम्हाला ? Uhoh वर एचआरडीने ४-५ पत्र लिहून या मुलांवर काय कारवाई केली याचा जाब विचारलेले पत्र पण तुम्हाला दिसत नाही का? नुसत्या कॉलेज मधून रस्टीगेट केल्यावर कोणी आत्महत्या करेल का? यामागे अजुन काही कारण असतीलच ना ज्या प्रेशरमुळे त्याने हा निर्णय घेतला.?
सुशील ने कांगावा केला हे दिसत नाही? कांगावा करून समोरच्याचे करिअरच उध्वस्त करण्याचा खेळ सुशीलने खेळला होता हा ही दिसत नाही का तुम्हाला? ते प्रकरण बाहेर कोणी नेले? सुशीलनेच. कॉलेजमधेच ते ठेवले असते तर इतका वाद झाला नसताच. यावरून काय शोध लावणार आहात आपण? याला खच्चीकरण नाही तर काय म्हणावे ?
राहिला अप्रचार हे काम भाजप्यांची आहे. दादरीप्रकरणात काय काय अप्रचार केलेला त्यांच्या पेड आर्मीने आणि इथल्या रिकामटेकड्यांनी सगळे जगजाहीर आहे. शेवटी काय बीफ निघाले का?

तुम्ही पुन्हा दादरी/बीफ वगैरे येथे संबंध नसलेले लिहिलेत.
"नुसत्या कॉलेज मधून रस्टीगेट केल्यावर कोणी आत्महत्या करेल का? यामागे अजुन काही कारण असतीलच ना ज्या प्रेशरमुळे त्याने हा निर्णय घेतला.?" अजून कारणे काय आहेत ते सांगा ना. तेच मी विचारतो आहे. मंत्र्यांचे पत्र वगैरेचाच परिणाम हॉस्टेलवरून काढून टाकण्यात झाला आहे ना? का क्रम न पाहता सोयीप्रमाणे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पाहणार आहात? घटनांचा क्रम तरी पहा. मग त्यानंतर खच्चीकरण वगैरे कशासाठी? त्याला नंतर कोणी धमकावत होते का? शिवाय 'दलित' असण्यावरून. जी कारणे शोधाल, त्यात त्याच्या संबंधातली मिटींग चालू असताना तो ती सोडून का गेला याचाही शोध घ्यायचा प्रयत्न करा.
मी मूळ पोस्टमध्ये व वरही मला सुशीलकुमारबद्दल प्रेम नाही हे सांगितले आहे तरी तुम्ही पुन्हा तेच लिहित आहात.
संबंधित प्रकरणात सुशीलकुमारवर खोटे आळ घेतले म्हणून कारवाई होईल का, याबद्दल काही तज्ज्ञ म्हणताहेत की मारहाण झाल्याचे चौकशी समितीपुढे स्पष्ट झाले आहे. सुशीलकुमारने ते वाढवून सांगितले हे स्पष्ट झालेले आहेच.
तुम्ही विचारत असलेले सगळे मुद्दे मूल पोस्तमध्येच अाहेत. तुमचा अभिनिवेश सोडून वाचाल, तर तुमची तुम्हालाच उत्तरे मिळतील व पुढे चर्चा होऊ शकेल. अर्थात हे सारे अाता उपलब्ध असलेल्या माहितीवरचे आहे.
असो.

Pages