सहिष्णू धागा

Submitted by प्रकु on 8 January, 2016 - 16:14

मित्रहो,

शिवशक्ती संगमच्या निमित्ताने काढलेल्या धाग्यावर अतिशय सुंदर आणि संयत शब्दात चर्चा झाली. अनेक प्रश्न तेथे उपस्थित करण्यात आले आणि त्याला सगळ्यांनी मिळून आपापल्या परीने उत्तरे दिली.
मुख्य कौतुक म्हणजे कोणीही विखारी प्रतिसाद न देता एक एक गोष्ट समजून घेतली.

या निमित्ताने विचारांची/माहितीची जी देवाणघेवाण झाली ती अप्रतिम होती. मायबोली सारख्या संकेतस्थळाचा याहून सुंदर उपयोग तो काय असू शकतो.

तोच धागा पकडून कैपोचे यांनी सुचवल्याप्रमाणे हा नवीन धागा येथे काढत आहे. याचा उद्देश मी खाली स्पष्ट करतो.

तत्पूर्वी एक स्वानुभव मला सांगावासा वाटतो.
मी सावरकरांचा निस्सीम भक्त होतो आणि आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांनी स्वतः लिहिलेले बरेच लिखाण मी वाचले. स्वातंत्र्य संग्रमातल्या इतर अनेक महापुरुषांबद्दल पुढे वाचनात आले.
यामधून एक विचारधारा निर्माण होत गेली ज्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातल्या जहाल मतवादी विचारांशी जास्त जवळीक होती.
याच बरोबर अजून एक विचारधारा नकळतपणे डेव्हलप होत गेली ज्यात मवाळ गट, गांधीजी यांच्याबद्दल तिरस्कार होता.

यातला 'तिरस्कार' हा शब्द महत्वाचा आहे. हा तिरस्कार उगाच आपला मनात येऊन बसलेला होता.

यावर घरात अनेकदा वडिलांशी वादविवाद करताना ते मला गांधीजींचे महात्म्य सांगण्याचा प्रयत्न करत. लाखो लोक त्यांच्या मागे गेले यात नक्कीच फार मोठा अर्थ आहे असे ते सांगत.
त्यावेळी मला ते फारसे पटत नसे.

पुढे जशी जशी प्रगल्भता वाढत गेली तसतसे मी एका थर्ड आय ने जगाकडे पाहू लागलो. ज्यामुळे मला हे लक्षात यायला लागले कि प्रत्येक माणूस हा त्या त्या वेळेला त्याच्या झालेल्या जडणघडणी प्रमाणे विचार करतो आणि निर्णय घेतो. अर्थात, त्याच्या जागी तो बरोबरच असतो.

सावरकर असो वं गांधीजी, कोणीहि मुद्दाम हून चला आता आपण भारत देशाला खड्ड्यात घालू म्हणून काम केले आहे का.? अर्थातच नाही. दोघांनी कार्य तर भारताच्या उन्नतीसाठीच केले. त्यांची कार्यपद्धती वेगळी होती. इतकेच..

मग आपल्या मनात 'तिरस्कार' असण्याचे कारण ते काय.?

यामध्ये असहमती असू शकते. मतभेद असू शकतात. पण तिरस्कार हा एक बिनगरचेचा घटक आहे.

तिरस्कार अज्ञानातून येतो. आणि मतभेद अभ्यासातून येतात.

या विचारातून मग मी गांधीजींचे चरित्र वाचण्याचे ठरवले. लकीली याच दरम्यान एकदा काकांच्या घरी गेलेलो असताना त्यांच्याकडे मला गांधीजींचे आत्मचरित्र मिळाले. मी ते त्यांच्याकडून घेऊन वाचायला सुरुवात केली.
लवकरच माझे गांधीजींबद्दल असलेले मत पूर्णपणे बदलले.
त्यांच्या काही गोष्टी मला पटल्या, काही नाही पटल्या. पण मनातला गांधीजींबद्दलचा आदर मात्र खूप वाढला. त्यांच व्यक्तिमत्व परिपूर्ण होतं. असं व्यक्तिमत्व जगात पुन्हा होणे नाही या मताला मी आलो.

मनातील पूर्वग्रह बाजूला ठेऊन त्यांच्या चष्म्यातून जग पाहताना खूप छान वाटले. (अजूनही माझे वाचन सुरु आहे. खंड पडलाय जरा, पण लवकरच पूर्ण होईल.)

अशा प्रकारे माझ्या मनातून तिरस्कार हद्दपार झाल्यावर मला एक मानसिक शांतता मिळाली. कोणीही काहिही बोलले तरी राग येईनासा झाला. मन शांत झाले. मी समोरच्याला माफ करायला शिकलो.

अस समोरच्याला एकदा अनकंडीशनली पूर्णपणे माफ करून टाकले कि आपल्या मनातली negativity जाते, याचा मी अनुभव घेतला. माफ करणे हे समोरच्या करता नव्हे तर आपल्या स्वतः करता गरजेचे असते असे मला लक्षात आले.

असो. तर या धाग्यावर हा अनुभव सांगण्याचे प्रयोजन असे कि आपण येथे परस्परविरोधी विचार असलेले लोक एकत्र येऊन, शांतपणे चर्चा करून समोरची बाजू समजून घेऊ. समोरच्याचे मत जसे आहे तसे का आहे त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून आपल्या मनातील तिरस्कार दूर होईल. एकमेकांकडून माहित नसलेल्या गोष्टी कळतील. जाणीवा वाढतील. सहिष्णुता वाढेल. आभ्यास वाढेल. आपल्या पैकी बहुतेकांनी कोणत्या तरी एकाच बाजूचा पण सखोल आभ्यास केलेला असेल. त्याचा एकमेकांना फायदा होईल.

दोन्ही बाजूंची सहमती बऱ्याच बाबतीत शक्य नाही हे तर आपल्याला माहितच आहे. हे गृहीत धरूनच आपण बोलूया. तिरस्कार नाहीसा होत गेला तरी या धाग्याचा उद्देश सफल होईल.
आपण एकमेकांशी असहमत असू, पण तरी एका बाजूने असू Happy

या धाग्यावर सावरकर, गांधी, आंबेडकर, कॉंग्रेस, भाजप, हिंदू, मुसलमान, इसाई कोणताही विषय वर्ज्य नाही.
फक्त हा धागा नावाप्रमाणे सहिष्णू राहू द्यावा. (या दोन वाक्यांवरून हा प्रयोग फारच धाडसी वाटतोय मला)
असो. वरून देव बघत आहे. जो आयडी असहिष्णुता दाखवेल त्याचा मृत्यू अटळ आहे.
कोणीही असहिष्णूता दाखवल्यास त्याला कृपया कोणतेही उत्तर देऊ नका. शांतता राखा.

याच उपक्रमाचाच एक भाग म्हणून आपण जमेल तसे आपापल्या आवडत्या नेत्यावर लेख लिहूया. म्हणजे माहितीची देवाण घेवाण होईल आणि विषय निघतील ..

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

>>>> तिथे बाकी चर्चाही आहेच. पण प्रकु संघाचे आहेत हा निष्कर्ष चुकीचा वाट्टोय का लोकहो? <<<<
दीडम्या... हो. मला तसे वाटतय. Wink
कारण अस्सल संघीष्ट सहसा "कोणा वावदुकाच्या" तोंडाला तोंड देत नाही अन त्याला/त्या मोजक्यांना शब्दाने पटविण्यात ज्यातुन शब्दान शब्द वाढतच जातो, आपला वेळ खर्चत नाही. Proud

च्चं!
अहो लिंबुकाका, म्हणजे परवाच्या संमेलनाला स्वयंसेवक म्हणून कमअस्सल लोक आले होते असे म्हणायचेय का?

(नाही म्हणजे तुम्ही होतात, प्रकु होते, ते हे होते, म्हणून विचारले.)

कारण अस्सल संघीष्ट सहसा "कोणा वावदुकाच्या" तोंडाला तोंड देत नाही अन त्याला/त्या मोजक्यांना शब्दाने पटविण्यात ज्यातुन शब्दान शब्द वाढतच जातो, आपला वेळ खर्चत नाही>>>> आणि हे तुम्ही लिहीताय? अहो निदान आधी विविध धाग्यावरील स्वतःच्या प्रतिसादांची लांबी तरी मोजायची होती, शब्दसंख्या नव्हे फुटपट्टीने!

सातीबै, स्वयंसेवक अस्सलच होते, पण तुम्हा लोकांच्या प्रश्नांच्या "फैरींना" उत्तरे देण्यायेवढे "संघिष्ट" नव्हते.
हे कसय? की एखादा मुलगा शाळेत जातो, तो बिगारीत अस्तो, दुसरा मुलगा शाळेत जातो, तो दहाव्वीत असतो, तिसरा मुलगा शाळेत जातो, तो शिक्षक अस्तो बिगारिचा, चौथा मुलगा शाळेत जातो, तो शिक्षक अस्तो दहाव्वीचा...
तर या चार मुलांमधे जो फरक आहे तितका फरक दीडलाख स्वयंसेवकांमधे असणारच यात नवल ते काय?
तुम्हाला आपला इथे कोणी चुकार हगारीबिगारीतला स्वयंसेवक सापडला तावडीत की धू धू धुवत सुटताय तुमची तीच ती विरली फाटकी धुणी त्यांच्या धाग्यावर तर ते हगारीबिगारीतले स्वयंसेवक तरी बिचारे काय करणार?

अन त्यापुढचे जे अस्तात ना, शिक्षक? तर ते काय करत नाहीत ते सांगितले मी तुम्हाला... Wink

एकमेव अ. से. आले नव्हते. प्रसे झाल्याने ते फक्त देशाबाहेर्ची निमंत्रणे स्वीकारतात. जमले ते क. से. होते.

प्रश्न काय लेव्हलचा स्वयंसेवक आहे यापेक्षा अस्सल स्वयंसेवक आहे की नाही असा आहे.
पहिलीतल्या मुलाला दहावीची उत्तरे येणार नाहीत हे मान्य पण त्यामुळे त्याच्या अस्सल विद्यार्थी असण्याला बाधा येत नाही,
नै का?

आगाऊ, हो, लिहितो मी फुटपट्टीने मोजण्याइतके, त्यावरुनच सिद्ध होते की मी "अस्सल संघीष्ट" नाहीच्चे....:डोमा:
स्वयंसेवक नक्की आहे, पण "आदेशाप्रमाणे" काम करणारा.....

>>>> पहिलीतल्या मुलाला दहावीची उत्तरे येणार नाहीत हे मान्य पण त्यामुळे त्याच्या अस्सल विद्यार्थी असण्याला बाधा येत नाही, नै का <<<<
अगदी बरोब्बर सातीबै.... तुलाच नेमके कळले बघ मर्म. Happy
पण नेमके इथे होते काय की दहावीच्या विद्यार्थ्याला विचारायचे प्रश्न "दिसला रे दिसला विद्यार्थी, भले पहिलितला का असेना" त्याला विचारत सुटतात.... दिसला रे दिसला स्वयंसेवक की झाडा फैरी प्रश्नांच्या झाडा सरबत्ती .... धुवा धुणी.. Lol
मग तिकडे पोस्टींचा काऊंटर वाढतोच आहे शंभर, दोनशे तिनशे....... Biggrin

ते पहिलीतले आहेत की दहावीतले हे आम्हाला कसं कळणार? आणि तुम्ही म्हणताय की ते पहिलीतले, म्हणजे त्यांना उत्तरं आली नाहीत असं तुम्ही म्हणताय. त्यांनी त्यांच्या मते समाधानकारक उत्तरं दिलीत.

लिंबूरामा,
मी वर विचारली आहे ती शंका वाचा जरा.
हे जर संघाचे अधिकृत माऊथपीस नसतील, तर यांनी संघाबद्दल लिहिण्याचे कारण नाही. अन असतील, तर तसे म्हणावे मग बोलू.
त्या प्रश्नाचे उत्तर येईल असं वाटतंय का तुम्हाला?
की अजून हागरी*तच आहात?

*हागरीबिगरी हा सभ्य व सांसदीय शब्द तुमचाच आहे.

आता तुम्ही आणि तुमच्या सहायकांनी इतकी मेहनत घेतलीय धागा वाहता व्हावा म्हणुन, मग धागा वाहता कसा नाही होणार! Lol

छे छे. लिंबूराम, प्रसाद. इ. लोक आमच्या सहायकांत येत नाहीत. खरे कष्ट तुम्हा लोकांचे. अगदी गगोवरून छुपे आदेश येऊन अ‍ॅक्टिव झालेले आयडीज छोटी का होईना झील तोडून जातात. नैका? Wink

>>>> हे जर संघाचे अधिकृत माऊथपीस नसतील, तर यांनी संघाबद्दल लिहिण्याचे कारण नाही. अन असतील, तर तसे म्हणावे मग बोलू. <<<<
ओके, पण त्या आधी तुम्ही "कुणाचे, कशाकरताचे" माऊथपीस आहात ते सांगण्याचि क्रुपा कराल का? Wink
अन कशाचे तरी माऊथपीस(?) असल्यावर(च) जाहिर मतप्रदर्शन करावे (अन्यथा मत मांडू नयेत) असा कोणता विचारस्वातंत्र्यावर घाला घालणारा कायदा निघालाय का? येऊ घातलाय का? (येईलही, कम्युनिस्टांचे तसे स्वप्नच अस्ते म्हणा... Lol )

जाऊद्या हो तुम्ही दिड मायबोलीकर,
मी साती यांना तो प्रतिसाद लिहिला, तुम्ही त्यांचे प्रवक्ते आहात का? Happy

आमचे मुखवटे फाटले म्हणे.

हेगडेवार , गोळवलकर , सावरकर , भगतसिंग , टिळक , शिवराय..... इतके फोटु संघात लहानपणी पाहिले आहेत.
गोडसॅ व हिटलर हेही इथले जिव्हाळ्याचे विषय.

पण दुकान चालूच रहावे म्हणावे म्हणून बाबासाहेब व बापूजी यांचेही फोटू चढवून झाले.

गझलगुरु , तुमच्या संघाचा नेमका चेहरा कोणता म्हणे ? स्वतःचे संस्थापक ,गुरुजी सोडुन याना इतरांचे मुखवटे का हवे आहेत ?

नासिर, मग कॉंग्रेज मो.क. गांधी, बाबासाहेब आंबेडकर व इतर यांचे जे फोटो तुमच्या म्हणण्याप्रमाणे मुखवटे लावते ते का बर? ह्या वरिल व्यक्तिंचा सध्याच्या कॉंग्रेज(आय) शी काय संबध?

त्यांनी शेण खाल्लं म्हणून संघासारख्या दुधात धुतलेल्या संस्कारी, राष्ट्रभक्त, पुरुष संघटनेलाही तेच करायची मुभा आहे का?

हे असलं लॉजिक तुम्ही देखिल लावावं? >>>

अय्यो, आता हे म्हणणार 'तुम्ही माबोवरच्या शीतावरून संघाच्या भाताची परीक्षा करू नका.' >>>

Happy माझ्या वतीने तुम्हीच एकमेकांना उत्तरे देउन टाकलीत का काय? "संघाचे अनेक लोक असे आहेत" असे जेव्हा वाक्य येते तेव्हा त्यात काहीतरी युनिक्/स्पेशल असले तर आवर्जून लिहीण्यासारखे असते. 'असे' लोक जर इतरही संघटना/पक्षात असतील तर मग एवढे आवर्जून लिहीण्याएवढे काय आहे?

संघ ओव्हरऑल कसा आहे मला माहीत नाही. माझ्या ओळखीत, मित्रपरिवारात जे आजी/माजी संघातील लोक आहेत, त्यातील बरेचसे लोक, व संघाशी अजिबात संबंध नसलेला इतर समाज यात जातीयवादात काहीही कमीजास्त नाही, एवढेच मला म्हणायचे आहे. बाकी त्यांच्या नेत्यांची अचाट वक्तव्ये ई. बाबतीत विरोध योग्यच आहे. माझाही आहे.

@ सनव

तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला इकडे उत्तर देऊन टाकतो.

सनवचा प्रश्न असा होता की आता शिवाशीव पाळत नाही, अस्पृश्यता मानत नाही, वेगळ भांडी , फुटका कप नाही अशी मॉडर्न पिढी आहे, तर मग त्यांनाही जातीयवादीच म्हणणार का ? आशय साधारण असा होता प्रश्नाचा. >>

माझ्या मते वरील सर्व गोष्टी म्हणजे जातीयवाद नव्हेत, तर जातीयवादाचे दृश्य रूप आहे. या गोष्टींचं मूळ जातीयवाद आहे. जातीयवाद वेगळा आणि जातीयवादातून येणा-या माणुसकीहीन वागणुकीच्या घटना वेगळ्या. त्या एकमेकांशी निगडीत आहेत. जातीयवादातून येणा-या घटनांमुळे जातीयवादाचे मोजमाप करता येत होते. दृश्य परिमाण आता दिसेनासे झाले याची अनेक कारणं आहेत.

प्रश्न असा आहे की त्यामुळे जातीयवाद बंद झाला का ?
नसेल तर त्याचे आजच्या काळातले रूप काय आहे ?

बाकी त्यांच्या नेत्यांची अचाट वक्तव्ये ई. बाबतीत विरोध योग्यच आहे. माझाही आहे.
<<
ज्या संघटनेचे नेते अशी अचाट वक्तव्ये करीत असतात, ज्यांचे अनुयायी अश्लाघ्य कृत्ये करतात, त्यांना थांबवण्याऐवजी जे नेते त्याकडे दुर्लक्ष करतात, साधी स्लॅप ऑन हॅंडही नाही. त्या संघटनेबद्दल सहानुभूती का ठेवावी म्हणे?

Pages