शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची कैफियत
.
नुकताच माझ्या एका मित्राबरोबर दीर्घकाळ गप्पा मारण्याचा योग आला. त्याचे घर गावापासून ब-यापैकी दूर आहे. तेव्हा तेथे सुरक्षिततेचा काही प्रश्न येत नाही का अशी शंका होती. तो म्हणाला त्याने शस्त्रपरवाना घेतलेला आहे. पण कोणी समोर आलेच तर गोळी मारण्याची हिंमत होईल की नाही माहित नाही.
त्या निमित्ताने त्याने या परवान्याच्या भानगडींची गोष्ट सांगितली. परवाना घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला तो का हवा याची पडताळणी झाल्यावर सुमारे सत्तर हजार रूपयांचा डीडी काढून द्यावा लागतो. मग तुमच्या नावचे पिस्तुल की रिव्हॉल्वर भिवंडी की कुठल्या कारखान्यात बनवले जाते. ते तीन महिन्यात तयार होणे अपेक्षित असते. पण सहसा तसे होत नाही. मग डीडी दिलेला असूनही अर्जाची मुदत वाढवण्यासाठी काही हजारांचे शुल्क भरावे लागते. तुम्हाला परदेशी बनावटीचे पिस्तुल हवे असेल तर त्याची किंमत दोन-अडीच लाखांच्या घरात, म्हणजे बरीच अधिक.
असे करून एकदाचे पिस्तुल मिळाले की मग ज्या पोलिस स्टेशनमध्ये अर्ज दिलेला असतो तेथे तसे कळवायचे. मग आला प्रश्न गोळ्यांचा. कारण आधी भरलेले शुल्क केवळ पिस्तुलासाठी असते, गोळ्यांसाठी नाही. मग गोळ्यांसाठी वेगळा अर्ज. गोळ्यांसाठी पुन्हा भिवंडीला जाण्याची गरज नसते. त्या सरकारमान्य दुकानात मिळतात. त्यासाठी तुमच्याकडे शस्त्रपरवाना असावा लागतो.
सरकारी गोळी पंचावन्न रूपयांना मिळते. व त्या प्रत्येक गोळीचा म्हणजे ती गोळी कोठे वापरली याचा हिशोब द्यावा लागतो. त्यापेक्षा बाजारात असरकारी गोळ्या वीस रूपयांना मिळतात. मग त्या गोळ्या 'सरावा'साठी वापरता येतात.
सार्वजनिक ठिकाणी हे शस्त्र उघडपणे दिसेल अशा पद्धतीने कमरेला लावून फिरण्याची मुभा नसते. तसे केल्यास कोणीही नागरिक तुम्ही दहशत माजवत आहात अशी तक्रार करू शकतो.
असे प्राणघातक शस्त्र बाळगायचे तर काही प्राथमिक शिस्त पाळायला हवी हे सांगितले जाते. म्हणजे त्यासंबंधीची नियमावली दिली जाते. उदाहरणार्थ, कोणीही म्हणजे अगदी कोणी पोलिस अधिका-याने जरी ते शस्त्र मागितले तरी आधी त्यातल्या गोळ्या काढून मगच ते त्याच्याकडे द्यायचे.
आता निवडणूक जाहीर झाली या व अशा कारणांच्या वेळी आपल्याकडील शस्त्र पोलिसांकडे परत करावे जागते. निवडणुकीच्या काळात तुमच्या जीवाला धोका असण्याची परवानगी नसते. ते तेथे जमा करण्यासाठी शंभर रूपये पोलिसांना त्यांच्या मेहेरबानीसाठी विनापावतीचे द्यावे लागतात. नंतर ते शस्त्र परत घेतेवेळी शंभर रूपये चालत नाहीत. पाचशे रूपये द्यावे लागतात. अर्थात विनापावतीने. हे तात्पुरत्या काळासाठी शस्त्र परत करणे मोठे गंमतशीर असते. तुम्ही ते परत केलेले आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी तुम्हाला फोन केला जातो. तुम्ही जर परगावी असाल तर तेथेच कोणत्या तरी पोलिस स्टेशनमध्ये ते परत करण्याची अपेक्षा असते. तुम्ही परगावी असाल आणि ते शस्त्र घरी आहे असे सांगितले तरी पंचाईत. कारण मग तुम्हाला त्या शस्त्राची गरज नाही असे समजले जाते.
या सगळ्या कटकटींना कंटाळून त्याने शस्त्रपरवाना रद्द करण्यासाठी चौकशी केली. तेव्हा त्याला कळले की शस्त्रपरवाना परत करणे म्हणजे भरलेली रक्कम परत मिळवणे नव्हे. कारण ते पिस्तुल म्हणजे शस्त्र खास त्याच्यासाठीच तयार केलेले असते, त्यामुळे ते परत घेण्याची पद्धत नसते. तर मग त्या पिस्तुलाचे करायचे काय? आपणच ज्याच्याकडे शस्त्रपरवाना आहे व ज्याला पिस्तुल विकत घ्यायचे आहे अशी व्यक्ती शोधून तिला गाठायचे. व तिच्याशी व्यवहार करायचा. बाकी पोलिस खाते केवळ तुमचा परवाना रद्द करू शकते.
तर अशी ही कैफियत शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची.
गलोल नामशेष झालेत असं
गलोल नामशेष झालेत असं म्हणताहेत ते.
ॠ, हे तुमचे छर्र्याच्या बंदुकी बद्दल
पूर्वज कि डायनासोर? +१
पूर्वज कि डायनासोर? +१

दीमा लिंक बद्दल धन्यवाद, ती
दीमा लिंक बद्दल धन्यवाद,
ती मी ज्युनिअर कॉलेजला असतानाची गोष्ट आहे. त्यांची बंदूक नक्की कशी होती हे मलाही माहीत नाही. छर्र्याची बंदूक हा मी माझ्या ओळखीचा शब्द वापरला आहे. पण येस आधीच्या पोस्टीत लिहिलेय की सश्याचीच शिकार केलेली आणि डुक्कर त्याने मरत नाही फारतर जखमी होतो.
@ खाद्यपदार्थात बॉम्ब हे खरे आहे. पिठाने बॉम्ब झाकतात बहुधा. तोंडाजवळच फुटल्याने डुक्कर मरते. तरी मी मामेभावांना विचारून कन्फर्म करू शकतो.
@ विजय आंग्रे : तुमची पोस्ट
@ विजय आंग्रे : तुमची पोस्ट वाचुन मागच्या महिन्यातल्या पेपरातली न्युज आठवली... कोणत्या तरी एस.टी. स्टँड वर फलाटावर थांबलेल्या एका बसच्या खाली मोठा फटाक्यासारखा आवाज झाला. बसच्या आजुबाजुला उभ्या असलेल्या प्रवाशांपैकी काही जनांच्या कपड्यांवर रक्ताचे शिंतोडे उडाले.. ते पाहुन बसमधील आणि स्टँडवरील प्रवशांची प्रचंड पळापळ झाली. पोलिस आले.. सदर बस बाजुला झाल्यानंतर बसखाली एक मेलेले कुत्रे दिसले ज्याला तोंडाचा पत्ताच नव्हता... शोधाशोध केल्यावर त्या कुत्र्याचे तोंड छिन्नविछिन्न अवस्थेत दुसर्या बसखाली सापडले.. पोलिसांनी माग काढला तेव्हा बस उभी असलेल्या फलाटावर एक बेवरस बॅग मिळाली त्यात ५-६ चरबीमधे गुंडाळलेले रानडुक्कर मारण्याचे बाँब होते ज्यातील एक बाँब चरबीच्या वासाने कुत्र्याने पळवुन खायचा प्रयत्न केला.. आणि... धडाम धुम..!!
ऋन्मेष, छर्र्याच्या बंदुकीला
ऋन्मेष,
छर्र्याच्या बंदुकीला एअर गन असे संबोधतात आणि ती फार फार तर पारवे टिपायला वापरतात. शहरात ज्या छोट्या मोठ्या जत्रा भरतात त्यात फुगे फोडायचा एक खेळ असतो लहान मुलांकरीता तिथे एअर गन वापरतात.
रानडूकरांच्या शिकारीकरीता 'दुनाल' बंदूक वापरतात सहसा. 'हाक्या घालणे' हा टिपीकल प्रकार आहे रानडुकरांच्या शिकारीच्या तयारीचा भाग म्हणून!
बाँबने डुकराची शिकार करतात हे
बाँबने डुकराची शिकार करतात हे खरे आहे.
लै लोकांना शिकारीत इंटरेस्ट
लै लोकांना शिकारीत इंटरेस्ट दिसतोय.
दुनाल बंदुक = शॉट गन. या गनचा
दुनाल बंदुक = शॉट गन.
या गनचा नेम फारसा धरायची गरज नसते.
हिच्यातून उडतात ते शॉट्स दोन प्रकारचे. लाईट असतात तो बर्ड शॉट, अन दुसरा मोठ्या शिकारीसाठीचा बकशॉट.
बॉम्बने डुकरेच काय पाण्यातले
बॉम्बने डुकरेच काय पाण्यातले मासेही मारतात. आमच्या गावी पाण्यात खुप कमी शक्तीचे बॉम्ब लावुन मोठे मासे मारलेले आहेत. धरणातुन मोठठाले मासे नदीत येतात त्यांना मारण्यासाठी हे करतात.
दीमा ओके. हो बाँबने डुकराची
दीमा ओके.
हो बाँबने डुकराची शिकार करतात ते माहित आहे. डुक्कराने तो खाद्यपदार्थ चावला की तोंडातच स्फोट होतो बाँबचा.
आता एकंदर सर्वच प्रकारच्या शिकारीवर बंदी आलीय.
हो, सर्व प्रकारच्या शिकारीवर
हो, सर्व प्रकारच्या शिकारीवर बंदी आलीय. तरीही शेतात, घराजवळ येणारे ससे रात्रीचे फासे लावुन पकडतात. माझे घर गावापासुन थोडे लांब असल्याने महिना दोन महिन्यात एखादा ससा फसतो बिचारा. मी हल्लीच खाल्लेय सश्याचे मटण. गावच्या म्हाळाला सांबर लागते, त्याची मात्र परवानगी मिळते. पण कह्दीकधी सांबराबरोबर डुक्करही मिळते. ते मग गुपचुप खाल्ले जाते. हे सगळे प्रकार गावी अतिशय गुपचुप केले जातात. बाहेरच्या माणसाला काहीही कळणार नाही.
नशीब डुक्करबॉम्बला अनुमोदन
नशीब डुक्करबॉम्बला अनुमोदन आले. अन्यथा मी इथे टाचणीने मुंगी मारली असे म्हटले असते तरी काहीही ऋ झाले असते.
बायदवे टाचणीने मुंगी मारून बघा मस्त खेळ असतो. लहानपणी खेळायचो. नंतर असले क्रूर प्रकार थांबवले.
नंतर असले क्रूर प्रकार
नंतर असले क्रूर प्रकार थांबवले.>> नशीब. चांगलं काम केलस. .
<<बायदवे टाचणीने मुंगी मारून
<<बायदवे टाचणीने मुंगी मारून बघा मस्त खेळ असतो. लहानपणी खेळायचो. नंतर असले क्रूर प्रकार थांबवले.>>
----- माझ्या वाईट सवयी या महाधाग्याच्या मालिकेत यावर एक धागा निघेल...
ऋ च्या घरी शब्द हेच शस्त्र पण
ऋ च्या घरी शब्द हेच शस्त्र
पण त्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही ही ॠ ची कैफियत
हो ना. बिच्चार्या टाचण्या.
हो ना. बिच्चार्या टाचण्या.
पुर्वज गलोल डायनासोर
पुर्वज गलोल डायनासोर
<<<<<<<त्यांची बंदूक नक्की
<<<<<<<त्यांची बंदूक नक्की कशी होती हे मलाही माहीत नाही. छर्र्याची बंदूक हा मी माझ्या ओळखीचा शब्द वापरला आहे. >>>>>>>>>
रुंन्मेस भाई - तुमचे हे बरे आहे. एखाद्या गोष्टी ची माहीती नसली की त्या ऐवजी आपल्याला जे माहीती आहे ते नाव ठोकुन द्यायचे.
<<<<<<<बायदवे टाचणीने मुंगी मारून बघा मस्त खेळ असतो. लहानपणी खेळायचो. नंतर असले क्रूर प्रकार थांबवले.>>>>>>>>
आता मोठेपणी माबो वर धागे काढुन बिचार्या माबोकरांच्या मेंदूला मुंग्या आणण्याचे क्रूर प्रकार चालू केलेत म्हणायचे
रानडुक्कर म्हणताय
रानडुक्कर म्हणताय का?
होळीनंतर रानडुकराच्या शिकारीला जायची प्रथा आहे ना?
नीधप, येस्स. शिकारीचा डुक्कर
नीधप, येस्स. शिकारीचा डुक्कर म्हणजे रानडुक्करच.
तरी बरे झाले हा उल्लेख केला, काही जणांना कचराकुंडी डुक्कर वाटतात आणि रात्रभर विचार करत बसतात..
राजेश कुलकर्णी, असंबद्ध चर्चा
राजेश कुलकर्णी,
असंबद्ध चर्चा झालेली आहे ह्या धाग्यावर. एक तक्राक करून टाका वीस, पंचवीस जणांची! तेवढे उडाले की मग तुम्ही एकटेच! मग मज्जा.
रात्रभर विचार करत बसतात..>>>
रात्रभर विचार करत बसतात..>>> कुणाचा डुकराचा?
होळीनंतर रानडुकराच्या
होळीनंतर रानडुकराच्या शिकारीला जायची प्रथा आहे ना?
>>
आता धार्मिक विषय निघालाच आहे तर,
माझा कॉलेजमध्ये एक मुसलमान मित्र होता. तसा अगदी खास असा नाही पण डब्बामित्र होता. त्याच्या डब्यात जवळपास रोजच मटणबोटी असायची आणि मी सुद्धा हड्डीला हपापलेलो असायचो. त्यामुळे बरेचदा त्याच्या डब्यात खाणे व्हायचे. सोमवार आणि गुरुवार माझ्याही डब्यात नॉनवेज असायचे तेव्हा मी सुद्धा माझा डबा त्याच्याशी शेअर करायचो. पण एकदा मी डब्यात डुक्कर नेलेला तेव्हापासून त्याने माझा डबा खाणे सोडले होते. कारण डुक्कर त्यांना निषिद्ध असते.
सोमवार आणि गुरुवार माझ्याही
सोमवार आणि गुरुवार माझ्याही डब्यात नॉनवेज असायचे>>>>>>>>
पण एकदा मी डब्यात डुक्कर नेलेला>>>>>

डब्यात डुक्कर डब्यात डुक्कर डब्यात डुक्कर>>>>>>
अरे काय लिहितोस काय एकेक. काय ह्या वर्षाचा कोटा पुर्ण करायचाय काय?
असंबद्ध चर्चा झालेली आहे ह्या
असंबद्ध चर्चा झालेली आहे ह्या धाग्यावर.
>>
असंबद्ध कशी?
शस्त्राचा उल्लेख होताच गांडीवाचा होणार, गांडीवाचा उल्लेख होताच अर्जुनाचा होणार, अर्जुनाचा उल्लेख होताच मेरे करन अर्जुन आयेंगे हे ओघाने येणारच, आणि करन-अर्जुन आल्यावर शाहरूख धाग्यात कुठून आला म्हणून कोणी रडारड करणार असेल तर त्याला काय बोलावे...
तो ऋन्मेऽऽष आहे. जेवणाच्या
तो ऋन्मेऽऽष आहे. जेवणाच्या डब्ब्यात डुक्करच काय, हत्तीदेखिल नेऊ शकतो.
अरे काय लिहितोस काय एकेक. काय
अरे काय लिहितोस काय एकेक. काय ह्या वर्षाचा कोटा पुर्ण करायचाय काय? -
हो न
उद्याचा दिवस आहे अजून
उद्या काय लिहशील रे !
अरे उद्याचं सेलिब्रेशन आजच
अरे उद्याचं सेलिब्रेशन आजच केलंस काय?
डब्यात डुक्कर म्हणजे डुकराचे
डब्यात डुक्कर म्हणजे डुकराचे मांस... आता आपण कोंबडीवडे खातो ते काय पिसांची कोंबडी खातो का.. अहो समजायची गोष्ट आहे ती.
आणि डब्यात सोमवार गुरुवारच नेणार ना, आदल्या वारीचे रविवार-बुधवारचे शिल्लक मांसम्हावरे..
आणि डब्यात सोमवार गुरुवारच
आणि डब्यात सोमवार गुरुवारच नेणार ना, आदल्या वारीचे रविवार-बुधवारचे शिल्लक मांसम्हावरे..>>>ओह ओके.
डब्यात डुक्कर म्हणजे डुकराचे मांस... आता आपण कोंबडीवडे खातो ते काय पिसांची कोंबडी खातो का.. अहो समजायची गोष्ट आहे ती.>>>>>>>>>>> हो रे. पण एकदम डब्यात डुक्कर नेलेला वाचुन हसायला आलं.
Pages