शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची कैफियत

Submitted by Rajesh Kulkarni on 29 December, 2015 - 08:40

शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची कैफियत
.
नुकताच माझ्या एका मित्राबरोबर दीर्घकाळ गप्पा मारण्याचा योग आला. त्याचे घर गावापासून ब-यापैकी दूर आहे. तेव्हा तेथे सुरक्षिततेचा काही प्रश्न येत नाही का अशी शंका होती. तो म्हणाला त्याने शस्त्रपरवाना घेतलेला आहे. पण कोणी समोर आलेच तर गोळी मारण्याची हिंमत होईल की नाही माहित नाही.

त्या निमित्ताने त्याने या परवान्याच्या भानगडींची गोष्ट सांगितली. परवाना घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला तो का हवा याची पडताळणी झाल्यावर सुमारे सत्तर हजार रूपयांचा डीडी काढून द्यावा लागतो. मग तुमच्या नावचे पिस्तुल की रिव्हॉल्वर भिवंडी की कुठल्या कारखान्यात बनवले जाते. ते तीन महिन्यात तयार होणे अपेक्षित असते. पण सहसा तसे होत नाही. मग डीडी दिलेला असूनही अर्जाची मुदत वाढवण्यासाठी काही हजारांचे शुल्क भरावे लागते. तुम्हाला परदेशी बनावटीचे पिस्तुल हवे असेल तर त्याची किंमत दोन-अडीच लाखांच्या घरात, म्हणजे बरीच अधिक.

असे करून एकदाचे पिस्तुल मिळाले की मग ज्या पोलिस स्टेशनमध्ये अर्ज दिलेला असतो तेथे तसे कळवायचे. मग आला प्रश्न गोळ्यांचा. कारण आधी भरलेले शुल्क केवळ पिस्तुलासाठी असते, गोळ्यांसाठी नाही. मग गोळ्यांसाठी वेगळा अर्ज. गोळ्यांसाठी पुन्हा भिवंडीला जाण्याची गरज नसते. त्या सरकारमान्य दुकानात मिळतात. त्यासाठी तुमच्याकडे शस्त्रपरवाना असावा लागतो.

सरकारी गोळी पंचावन्न रूपयांना मिळते. व त्या प्रत्येक गोळीचा म्हणजे ती गोळी कोठे वापरली याचा हिशोब द्यावा लागतो. त्यापेक्षा बाजारात असरकारी गोळ्या वीस रूपयांना मिळतात. मग त्या गोळ्या 'सरावा'साठी वापरता येतात.

सार्वजनिक ठिकाणी हे शस्त्र उघडपणे दिसेल अशा पद्धतीने कमरेला लावून फिरण्याची मुभा नसते. तसे केल्यास कोणीही नागरिक तुम्ही दहशत माजवत आहात अशी तक्रार करू शकतो.

असे प्राणघातक शस्त्र बाळगायचे तर काही प्राथमिक शिस्त पाळायला हवी हे सांगितले जाते. म्हणजे त्यासंबंधीची नियमावली दिली जाते. उदाहरणार्थ, कोणीही म्हणजे अगदी कोणी पोलिस अधिका-याने जरी ते शस्त्र मागितले तरी आधी त्यातल्या गोळ्या काढून मगच ते त्याच्याकडे द्यायचे.

आता निवडणूक जाहीर झाली या व अशा कारणांच्या वेळी आपल्याकडील शस्त्र पोलिसांकडे परत करावे जागते. निवडणुकीच्या काळात तुमच्या जीवाला धोका असण्याची परवानगी नसते. ते तेथे जमा करण्यासाठी शंभर रूपये पोलिसांना त्यांच्या मेहेरबानीसाठी विनापावतीचे द्यावे लागतात. नंतर ते शस्त्र परत घेतेवेळी शंभर रूपये चालत नाहीत. पाचशे रूपये द्यावे लागतात. अर्थात विनापावतीने. हे तात्पुरत्या काळासाठी शस्त्र परत करणे मोठे गंमतशीर असते. तुम्ही ते परत केलेले आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी तुम्हाला फोन केला जातो. तुम्ही जर परगावी असाल तर तेथेच कोणत्या तरी पोलिस स्टेशनमध्ये ते परत करण्याची अपेक्षा असते. तुम्ही परगावी असाल आणि ते शस्त्र घरी आहे असे सांगितले तरी पंचाईत. कारण मग तुम्हाला त्या शस्त्राची गरज नाही असे समजले जाते.

या सगळ्या कटकटींना कंटाळून त्याने शस्त्रपरवाना रद्द करण्यासाठी चौकशी केली. तेव्हा त्याला कळले की शस्त्रपरवाना परत करणे म्हणजे भरलेली रक्कम परत मिळवणे नव्हे. कारण ते पिस्तुल म्हणजे शस्त्र खास त्याच्यासाठीच तयार केलेले असते, त्यामुळे ते परत घेण्याची पद्धत नसते. तर मग त्या पिस्तुलाचे करायचे काय? आपणच ज्याच्याकडे शस्त्रपरवाना आहे व ज्याला पिस्तुल विकत घ्यायचे आहे अशी व्यक्ती शोधून तिला गाठायचे. व तिच्याशी व्यवहार करायचा. बाकी पोलिस खाते केवळ तुमचा परवाना रद्द करू शकते.

तर अशी ही कैफियत शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीलगायीचा बैल मोठा झाला की सर्वांगाने निळा दिसायला लागतो. म्हणून त्याला ब्ल्यू बुल म्हणतात. तो फोटोतला लांबचा नीलबैल असू शकतो. साधारण तसाच दिसतो.

पुन्हा अवांतर .. अहो शस्त्र आले की शूटींग आले.. शूटींग आले की फोटो शूटींगही आलेच..
केले आणि टाकले फोटो ईथे.. नीलगाय तशीही अगोदरच आली होतीच.

शस्त्र परवान्यासंबंधी काहीतरी कळेल म्हणून इथे आले. अख्खा धागा एका दमात वाचून काढला. प्रचंड करमणूक झाली, पण परवान्यासंबंधी काहीच कळले नाही.

जाऊ दे. आपणा माबोकरांना 'शब्द' हेच शस्त्र.

आणि त्याचा परवाना म्हणजे.....
.
.
.
.
.
.

अ‍ॅडमीन? Proud Wink

नीलगाय /नीलबैल्/नीलवासरू यांचं काय 'नील' असतं? -> फर. फोटोतल्या पिंजर्‍यात मादी आहे, फिकट तपकिरी रंग असतो पूर्ण वाढ झाल्यावर. पूर्ण वाढ झालेला नर ग्रेईश ब्लू दिसतो, हरिणवर्गीय प्राणी आहे तो. बाकी हे नीलगाय नाव औरंगझेबाच्या काळात आले, तो या प्राण्याला नीलघोर (निळा घोडा) म्हणत असे.
यावरून असे सिद्ध होते कि जय मल्हारच्या टायटल ट्रॅकनुसार खंडोबाचे वाहन नीलगाय असणार (नेमक्या त्या अवताराच्या प्रकटदिनी नंदी बिझी असेल आणि कोणीतरी नोकरी इच्छूक हरणाने निळ्या कोल्ह्यापासून इन्स्पिरेशन घेऊन स्वतःमध्ये जेनेटिक बदल घडवले असावेत. खंडेराय भोळे असल्याने खपून गेले असेल)

Pages