शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची कैफियत

Submitted by Rajesh Kulkarni on 29 December, 2015 - 08:40

शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची कैफियत
.
नुकताच माझ्या एका मित्राबरोबर दीर्घकाळ गप्पा मारण्याचा योग आला. त्याचे घर गावापासून ब-यापैकी दूर आहे. तेव्हा तेथे सुरक्षिततेचा काही प्रश्न येत नाही का अशी शंका होती. तो म्हणाला त्याने शस्त्रपरवाना घेतलेला आहे. पण कोणी समोर आलेच तर गोळी मारण्याची हिंमत होईल की नाही माहित नाही.

त्या निमित्ताने त्याने या परवान्याच्या भानगडींची गोष्ट सांगितली. परवाना घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला तो का हवा याची पडताळणी झाल्यावर सुमारे सत्तर हजार रूपयांचा डीडी काढून द्यावा लागतो. मग तुमच्या नावचे पिस्तुल की रिव्हॉल्वर भिवंडी की कुठल्या कारखान्यात बनवले जाते. ते तीन महिन्यात तयार होणे अपेक्षित असते. पण सहसा तसे होत नाही. मग डीडी दिलेला असूनही अर्जाची मुदत वाढवण्यासाठी काही हजारांचे शुल्क भरावे लागते. तुम्हाला परदेशी बनावटीचे पिस्तुल हवे असेल तर त्याची किंमत दोन-अडीच लाखांच्या घरात, म्हणजे बरीच अधिक.

असे करून एकदाचे पिस्तुल मिळाले की मग ज्या पोलिस स्टेशनमध्ये अर्ज दिलेला असतो तेथे तसे कळवायचे. मग आला प्रश्न गोळ्यांचा. कारण आधी भरलेले शुल्क केवळ पिस्तुलासाठी असते, गोळ्यांसाठी नाही. मग गोळ्यांसाठी वेगळा अर्ज. गोळ्यांसाठी पुन्हा भिवंडीला जाण्याची गरज नसते. त्या सरकारमान्य दुकानात मिळतात. त्यासाठी तुमच्याकडे शस्त्रपरवाना असावा लागतो.

सरकारी गोळी पंचावन्न रूपयांना मिळते. व त्या प्रत्येक गोळीचा म्हणजे ती गोळी कोठे वापरली याचा हिशोब द्यावा लागतो. त्यापेक्षा बाजारात असरकारी गोळ्या वीस रूपयांना मिळतात. मग त्या गोळ्या 'सरावा'साठी वापरता येतात.

सार्वजनिक ठिकाणी हे शस्त्र उघडपणे दिसेल अशा पद्धतीने कमरेला लावून फिरण्याची मुभा नसते. तसे केल्यास कोणीही नागरिक तुम्ही दहशत माजवत आहात अशी तक्रार करू शकतो.

असे प्राणघातक शस्त्र बाळगायचे तर काही प्राथमिक शिस्त पाळायला हवी हे सांगितले जाते. म्हणजे त्यासंबंधीची नियमावली दिली जाते. उदाहरणार्थ, कोणीही म्हणजे अगदी कोणी पोलिस अधिका-याने जरी ते शस्त्र मागितले तरी आधी त्यातल्या गोळ्या काढून मगच ते त्याच्याकडे द्यायचे.

आता निवडणूक जाहीर झाली या व अशा कारणांच्या वेळी आपल्याकडील शस्त्र पोलिसांकडे परत करावे जागते. निवडणुकीच्या काळात तुमच्या जीवाला धोका असण्याची परवानगी नसते. ते तेथे जमा करण्यासाठी शंभर रूपये पोलिसांना त्यांच्या मेहेरबानीसाठी विनापावतीचे द्यावे लागतात. नंतर ते शस्त्र परत घेतेवेळी शंभर रूपये चालत नाहीत. पाचशे रूपये द्यावे लागतात. अर्थात विनापावतीने. हे तात्पुरत्या काळासाठी शस्त्र परत करणे मोठे गंमतशीर असते. तुम्ही ते परत केलेले आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी तुम्हाला फोन केला जातो. तुम्ही जर परगावी असाल तर तेथेच कोणत्या तरी पोलिस स्टेशनमध्ये ते परत करण्याची अपेक्षा असते. तुम्ही परगावी असाल आणि ते शस्त्र घरी आहे असे सांगितले तरी पंचाईत. कारण मग तुम्हाला त्या शस्त्राची गरज नाही असे समजले जाते.

या सगळ्या कटकटींना कंटाळून त्याने शस्त्रपरवाना रद्द करण्यासाठी चौकशी केली. तेव्हा त्याला कळले की शस्त्रपरवाना परत करणे म्हणजे भरलेली रक्कम परत मिळवणे नव्हे. कारण ते पिस्तुल म्हणजे शस्त्र खास त्याच्यासाठीच तयार केलेले असते, त्यामुळे ते परत घेण्याची पद्धत नसते. तर मग त्या पिस्तुलाचे करायचे काय? आपणच ज्याच्याकडे शस्त्रपरवाना आहे व ज्याला पिस्तुल विकत घ्यायचे आहे अशी व्यक्ती शोधून तिला गाठायचे. व तिच्याशी व्यवहार करायचा. बाकी पोलिस खाते केवळ तुमचा परवाना रद्द करू शकते.

तर अशी ही कैफियत शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही नीलम्हैस दिसतेय. नीलगायीच्या शेजारचा पिंजरा की काय???????

नीलगायीला पिंज-यात ठेवले नाही तर गवळी तिला चरायला घेऊन जातील ही भिती आहे, म्हणुन.....

तसा पिंजरा खुप प्रशस्त आहे, इकडे तिकडे लवंडायला भरपुर जागा आहे, अर्थात नीलगायीला, तिच्या बैलासोबत. मी भेटायला गेलेले तेव्हा दोघेही निवांत लवंडले होते, अजिबात दाद दिली नाही माझ्या कॅमे-याला.

नीलऋन्मेष >> पटकन नितिन नील मुकेश झाल्याचा फील आला >>> त्यांनी नील वळू लिहायचेअसेल, पण बोटे न वळाल्याने समानार्थी......

धाग्याचं नाव बदलावे. एका ऋ ने दुसर्‍या रा चा धागा हायजॅक करुन बदला घेतलाच.

"शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची कैफियत " धाग्याच्या मालकाची कैफियत ! असे ठेवावे.

कापोचे,
मला पोळ्याला मस्तपैकी सजवणार असाल तर वळू काय बैल बनायलाही हरकत नाही माझी..
तसेही प्रसिद्धी साठी मी काहीही करू शकतो हे तुम्हाला माहीत आहेच Happy

नीलगर्ल>>>>>> Lol

नी नील वळू लिहायचेअसेल, पण बोटे न वळाल्याने समानार्थी......>>>> नाही हं काका. स्वतःच्या मनातलं सांगु नका. Happy

:हाहा:च
शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची कैफियत " धाग्याच्या मालकाची कैफियत ! असे ठेवावे. >>>हवा का झोका येऊन घाउक आयडीज उडायचे नैतर..

नाही हं काका. >>>> बाळ, मी आता त्याही पेक्षा मोठा झालो. >>>>
ॠ ला का का कापोचे असं म्हणायचं होतं पण कापोचे म्हणायचं राहून गेलं Wink

नीलगाय किंवा म्हैस : पण पेंटींग जबरदस्त आहे. विकायला ठेवलेय म्हणजे कॉपिराईटेड असावे. उगीच इथे तिथे परवानगीशिवाय पोस्ट करू नका!

ही नील म्हैस बघुन अनेक वर्षांपुर्वी आलेला भंसाळीचा शिणुमा आठवला. रणाबीर आणि सोनम. सगळ अस निळ्या रंगातच होत Proud

सावारिया Happy
भयंकर काळानिळा होता सिनेमा. शंकराने हलाहल पचवून त्याचा रंग निळा झाला तसा या चित्रपटाचा रंग स्टोरी आणि सोनम पचवून झाला असावा.

ह्या म्हशीच्या रुंदिमध्ये किमान १० सोनम्या तरी बसतील हो................ निदान लांबीरुंदी बघुन तरी बोलत आय मिन टायप्त जा हो....

Pages