शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची कैफियत

Submitted by Rajesh Kulkarni on 29 December, 2015 - 08:40

शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची कैफियत
.
नुकताच माझ्या एका मित्राबरोबर दीर्घकाळ गप्पा मारण्याचा योग आला. त्याचे घर गावापासून ब-यापैकी दूर आहे. तेव्हा तेथे सुरक्षिततेचा काही प्रश्न येत नाही का अशी शंका होती. तो म्हणाला त्याने शस्त्रपरवाना घेतलेला आहे. पण कोणी समोर आलेच तर गोळी मारण्याची हिंमत होईल की नाही माहित नाही.

त्या निमित्ताने त्याने या परवान्याच्या भानगडींची गोष्ट सांगितली. परवाना घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला तो का हवा याची पडताळणी झाल्यावर सुमारे सत्तर हजार रूपयांचा डीडी काढून द्यावा लागतो. मग तुमच्या नावचे पिस्तुल की रिव्हॉल्वर भिवंडी की कुठल्या कारखान्यात बनवले जाते. ते तीन महिन्यात तयार होणे अपेक्षित असते. पण सहसा तसे होत नाही. मग डीडी दिलेला असूनही अर्जाची मुदत वाढवण्यासाठी काही हजारांचे शुल्क भरावे लागते. तुम्हाला परदेशी बनावटीचे पिस्तुल हवे असेल तर त्याची किंमत दोन-अडीच लाखांच्या घरात, म्हणजे बरीच अधिक.

असे करून एकदाचे पिस्तुल मिळाले की मग ज्या पोलिस स्टेशनमध्ये अर्ज दिलेला असतो तेथे तसे कळवायचे. मग आला प्रश्न गोळ्यांचा. कारण आधी भरलेले शुल्क केवळ पिस्तुलासाठी असते, गोळ्यांसाठी नाही. मग गोळ्यांसाठी वेगळा अर्ज. गोळ्यांसाठी पुन्हा भिवंडीला जाण्याची गरज नसते. त्या सरकारमान्य दुकानात मिळतात. त्यासाठी तुमच्याकडे शस्त्रपरवाना असावा लागतो.

सरकारी गोळी पंचावन्न रूपयांना मिळते. व त्या प्रत्येक गोळीचा म्हणजे ती गोळी कोठे वापरली याचा हिशोब द्यावा लागतो. त्यापेक्षा बाजारात असरकारी गोळ्या वीस रूपयांना मिळतात. मग त्या गोळ्या 'सरावा'साठी वापरता येतात.

सार्वजनिक ठिकाणी हे शस्त्र उघडपणे दिसेल अशा पद्धतीने कमरेला लावून फिरण्याची मुभा नसते. तसे केल्यास कोणीही नागरिक तुम्ही दहशत माजवत आहात अशी तक्रार करू शकतो.

असे प्राणघातक शस्त्र बाळगायचे तर काही प्राथमिक शिस्त पाळायला हवी हे सांगितले जाते. म्हणजे त्यासंबंधीची नियमावली दिली जाते. उदाहरणार्थ, कोणीही म्हणजे अगदी कोणी पोलिस अधिका-याने जरी ते शस्त्र मागितले तरी आधी त्यातल्या गोळ्या काढून मगच ते त्याच्याकडे द्यायचे.

आता निवडणूक जाहीर झाली या व अशा कारणांच्या वेळी आपल्याकडील शस्त्र पोलिसांकडे परत करावे जागते. निवडणुकीच्या काळात तुमच्या जीवाला धोका असण्याची परवानगी नसते. ते तेथे जमा करण्यासाठी शंभर रूपये पोलिसांना त्यांच्या मेहेरबानीसाठी विनापावतीचे द्यावे लागतात. नंतर ते शस्त्र परत घेतेवेळी शंभर रूपये चालत नाहीत. पाचशे रूपये द्यावे लागतात. अर्थात विनापावतीने. हे तात्पुरत्या काळासाठी शस्त्र परत करणे मोठे गंमतशीर असते. तुम्ही ते परत केलेले आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी तुम्हाला फोन केला जातो. तुम्ही जर परगावी असाल तर तेथेच कोणत्या तरी पोलिस स्टेशनमध्ये ते परत करण्याची अपेक्षा असते. तुम्ही परगावी असाल आणि ते शस्त्र घरी आहे असे सांगितले तरी पंचाईत. कारण मग तुम्हाला त्या शस्त्राची गरज नाही असे समजले जाते.

या सगळ्या कटकटींना कंटाळून त्याने शस्त्रपरवाना रद्द करण्यासाठी चौकशी केली. तेव्हा त्याला कळले की शस्त्रपरवाना परत करणे म्हणजे भरलेली रक्कम परत मिळवणे नव्हे. कारण ते पिस्तुल म्हणजे शस्त्र खास त्याच्यासाठीच तयार केलेले असते, त्यामुळे ते परत घेण्याची पद्धत नसते. तर मग त्या पिस्तुलाचे करायचे काय? आपणच ज्याच्याकडे शस्त्रपरवाना आहे व ज्याला पिस्तुल विकत घ्यायचे आहे अशी व्यक्ती शोधून तिला गाठायचे. व तिच्याशी व्यवहार करायचा. बाकी पोलिस खाते केवळ तुमचा परवाना रद्द करू शकते.

तर अशी ही कैफियत शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजडुक्करे मारायची युक्ती सापडली नाहीय पण राजस्थान टाईम्स मध्ये त्यांना पळवायची युक्ती छापुन आलीय. शेताच्या मध्ये लाऊड्स्पिकर ठेवुन त्यावर यो यो हनी सिंगची गाणी जोरात वाजवली तर म्हणे डुक्करे आणि इतर उपद्रवी प्राणी पळून जातात. सकाळी उठल्यावर मात्र आधी प्लेअर बंद् करावा लागतो. नाहीतर शेतमजुरही पळून जायचा धोका असतो.

अरेरे. मग तुम्हाला इतिहासाची काडीचीही माहिती नसेल आणि तुमच्याकडे ईंपोर्टेड जर्मन खोडरबर तर नसेलच.
असते तर तुम्ही लगेच ज खोडून न केले असते.
आम्हा तज्ञ मोडी वाचकांकडे हे दोन्ही असते.

नको साधना, डब्यतली डुक्करे पण पळून जातील.. मग खायचे काय लोकांनी ?

खरे तर शस्त्र वर्रुन गांडीव, त्यावरुन धनुष्य, मग धनुष मग त्याचे सासरेबुवा शिवाजीराव गायकवाड पण ते तर ( सो कॉल्ड ) सुपरस्टार मग त्यांच्यावर्रून खर्राखर्रासुप्प्प्र्रास्स्टार असा हा बीबी जायला हवा होता. तरच ते ल्लॉज्जिक्क्ल ठरले असते.. फाटे फोडताहात नुसते.

खरे तर शस्त्र म्हटल्या म्हटल्या बरोबर लगेच गांडीव नाही काही
परवानाची जोडी शमा
शस्त्र आणि शमा असं एकत्र म्हटल्यावर शमी
त्या झाडावर शस्त्र ठेवणारे पांडव आणि मग अर्जुन आणि त्याचे गांडीव
मग धनुष मग त्याचे सासरेबुवा शिवाजीराव गायकवाड पण ते तर ( सो कॉल्ड ) सुपरस्टार मग त्यांच्यावर्रून खर्राखर्रासुप्प्प्र्रास्स्टार

अहो मला थोडीतरी माहिती असती तर मी असे धडाधड प्रतिसाद टायपत सुटले असते का हाती लागेल त्या धाग्यावर? कुठला म्हणून धागा सोडला नाहीये मी....... मिळेल त्या विषयावर टायपायला आपल्या त्या ह्यांचे काय जातेय

घ्या, आता ज्यांना माहित आहे त्यांनीच प्रतिसाद द्यायचे असा नियम काढताहात कि काय ! ओस पडेल मायबोली अश्याने.

अहो टायपायचे माहीत झाले कि बस्स, इथे विषय पण माहीत असला पाहिजे असे बंधन कुठाय? बस प्रत्येक धागा आपल्याला हव्या त्या विषयाकडे वळवायचे कसब बोटी हवे. उदा. धागा बालसंगोपन असो वा वृद्धदेखभाल, पहिल्या १० १२ पोस्टीनंतर गाडी आपसूक स्वजो नैतर शाखाकडे वळली कि गंगेत घोडे न्हाले. एकदा गाडी तिकडे वळली कि धागाकरत्याचासुद्धा धागा आपणच काढला यावर विश्वास बसतनाही. तो धाग्याकडे वळत नाही. राकू आले का परतोनी?

Rofl
अरे काय गोंधळ चालवलाय तुम्ही लोकांनी. Lol

मध्येच तो धाग्याला धरुनचा प्रतिसाद वाचून वाटलं 'हे काय मधीच?' नंतर कळलं. Lol

हि साधना ना अशीच आहे. बस, कसब करत गाडी चक्क घोड्याकडे नेली.. विषय डुक्कराचा चालू होता ना !

मोकळे सोडू नका अजिब्बात.. बांधून ठेवा.. बायांनो केसांना.

ती द्रौपदी बघा, रक्ताने माखलेल्या हातानेच वेणी घालायची असा हट्ट धरुन बसली होती. महासंहारक बाई ती.

भारी आहे धागा आणि प्रतिक्रिया...:D

ती निल गाय निळा पो टाकते का???

नई हो नई, पो हिरवाच टाकते, फक्त पो कि लेंडी ते माहीत नाही.

खरेच कि, बायांमुळे महाभारत घडले या युक्तिवादाच्या समर्थनीय अजून एक कारण सापडले. स्वतःचा अपमान तिने मूग गिळतत तसा गुपचूप गिळला असता तर ते अगदी लेडीलाइक झाले असते.

अपमान झाल्याझाल्या मुग गिळता येत होत म्हणजे त्या काळी मुग स्वस्त होते का? भाजीत , वरणात वगैरे न वापरता थेट गिळलेच जात होते.
यावरुन ऐतिहासीक काळात भारतात किती सुशासन होते याची कल्पना यावी.

कॉलिंग मोगा..
कॉलिंग मोगा..
कॉलिंग मोगा..
कॉलिंग मोगा..
कॉलिंग मोगा..
कॉलिंग मोगा..

मोगा मोड ऑन

मूग स्वस्त होते म्हणूनच त्या काळच्या राज्यकर्त्यांना मुगल असे म्हणत. प्रजेला ते प्रिय असल्यानेच त्यांचे असे नाव पडले. आजकालचे डाळीचे भाव पाहता मुगलांचे शासन हे कैकपटीने चांगले होते.

म्हण मुगावरून पडलीय म्हणजे तेव्हा तूर नव्हती हे आपोआप सिद्ध होते. तूर शक्य तितकी महाग करून मुगाला परत जुने वैभव द्यायचा प्रयत्न सुरु आहे. पण काही लोकांना हे पसंत नाही.

माझा भाऊ शस्त्र म्हणुन सायकलची चैन वापरायचा ती कशी फिरवुन वापरायची याचे तंत्र त्यालाच जमायचे एका वेळेस चार-पाच जणांना लोळवायचा. चैन ठेवायची जागा पॅटचा खिसा.
अजुनही आमच्या घराकडे वा़कडी नजर करुन बघायची हिंमत करत नाही कोणी.

Pages