शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची कैफियत
.
नुकताच माझ्या एका मित्राबरोबर दीर्घकाळ गप्पा मारण्याचा योग आला. त्याचे घर गावापासून ब-यापैकी दूर आहे. तेव्हा तेथे सुरक्षिततेचा काही प्रश्न येत नाही का अशी शंका होती. तो म्हणाला त्याने शस्त्रपरवाना घेतलेला आहे. पण कोणी समोर आलेच तर गोळी मारण्याची हिंमत होईल की नाही माहित नाही.
त्या निमित्ताने त्याने या परवान्याच्या भानगडींची गोष्ट सांगितली. परवाना घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला तो का हवा याची पडताळणी झाल्यावर सुमारे सत्तर हजार रूपयांचा डीडी काढून द्यावा लागतो. मग तुमच्या नावचे पिस्तुल की रिव्हॉल्वर भिवंडी की कुठल्या कारखान्यात बनवले जाते. ते तीन महिन्यात तयार होणे अपेक्षित असते. पण सहसा तसे होत नाही. मग डीडी दिलेला असूनही अर्जाची मुदत वाढवण्यासाठी काही हजारांचे शुल्क भरावे लागते. तुम्हाला परदेशी बनावटीचे पिस्तुल हवे असेल तर त्याची किंमत दोन-अडीच लाखांच्या घरात, म्हणजे बरीच अधिक.
असे करून एकदाचे पिस्तुल मिळाले की मग ज्या पोलिस स्टेशनमध्ये अर्ज दिलेला असतो तेथे तसे कळवायचे. मग आला प्रश्न गोळ्यांचा. कारण आधी भरलेले शुल्क केवळ पिस्तुलासाठी असते, गोळ्यांसाठी नाही. मग गोळ्यांसाठी वेगळा अर्ज. गोळ्यांसाठी पुन्हा भिवंडीला जाण्याची गरज नसते. त्या सरकारमान्य दुकानात मिळतात. त्यासाठी तुमच्याकडे शस्त्रपरवाना असावा लागतो.
सरकारी गोळी पंचावन्न रूपयांना मिळते. व त्या प्रत्येक गोळीचा म्हणजे ती गोळी कोठे वापरली याचा हिशोब द्यावा लागतो. त्यापेक्षा बाजारात असरकारी गोळ्या वीस रूपयांना मिळतात. मग त्या गोळ्या 'सरावा'साठी वापरता येतात.
सार्वजनिक ठिकाणी हे शस्त्र उघडपणे दिसेल अशा पद्धतीने कमरेला लावून फिरण्याची मुभा नसते. तसे केल्यास कोणीही नागरिक तुम्ही दहशत माजवत आहात अशी तक्रार करू शकतो.
असे प्राणघातक शस्त्र बाळगायचे तर काही प्राथमिक शिस्त पाळायला हवी हे सांगितले जाते. म्हणजे त्यासंबंधीची नियमावली दिली जाते. उदाहरणार्थ, कोणीही म्हणजे अगदी कोणी पोलिस अधिका-याने जरी ते शस्त्र मागितले तरी आधी त्यातल्या गोळ्या काढून मगच ते त्याच्याकडे द्यायचे.
आता निवडणूक जाहीर झाली या व अशा कारणांच्या वेळी आपल्याकडील शस्त्र पोलिसांकडे परत करावे जागते. निवडणुकीच्या काळात तुमच्या जीवाला धोका असण्याची परवानगी नसते. ते तेथे जमा करण्यासाठी शंभर रूपये पोलिसांना त्यांच्या मेहेरबानीसाठी विनापावतीचे द्यावे लागतात. नंतर ते शस्त्र परत घेतेवेळी शंभर रूपये चालत नाहीत. पाचशे रूपये द्यावे लागतात. अर्थात विनापावतीने. हे तात्पुरत्या काळासाठी शस्त्र परत करणे मोठे गंमतशीर असते. तुम्ही ते परत केलेले आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी तुम्हाला फोन केला जातो. तुम्ही जर परगावी असाल तर तेथेच कोणत्या तरी पोलिस स्टेशनमध्ये ते परत करण्याची अपेक्षा असते. तुम्ही परगावी असाल आणि ते शस्त्र घरी आहे असे सांगितले तरी पंचाईत. कारण मग तुम्हाला त्या शस्त्राची गरज नाही असे समजले जाते.
या सगळ्या कटकटींना कंटाळून त्याने शस्त्रपरवाना रद्द करण्यासाठी चौकशी केली. तेव्हा त्याला कळले की शस्त्रपरवाना परत करणे म्हणजे भरलेली रक्कम परत मिळवणे नव्हे. कारण ते पिस्तुल म्हणजे शस्त्र खास त्याच्यासाठीच तयार केलेले असते, त्यामुळे ते परत घेण्याची पद्धत नसते. तर मग त्या पिस्तुलाचे करायचे काय? आपणच ज्याच्याकडे शस्त्रपरवाना आहे व ज्याला पिस्तुल विकत घ्यायचे आहे अशी व्यक्ती शोधून तिला गाठायचे. व तिच्याशी व्यवहार करायचा. बाकी पोलिस खाते केवळ तुमचा परवाना रद्द करू शकते.
तर अशी ही कैफियत शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची.
राकू - तुम्ही दिलेली माहीती
राकू - तुम्ही दिलेली माहीती साफ खोटी आहे असे दोघांनी लिहीले आहे. त्याचा प्रतिवाद करायचा नाही का तुम्हाला.
आणि ही जर माहीती खोटी असेल तर तुम्हाला असे खोटे पसरवून काय मिळते? आत्ता पर्यंतच्या ९०+ जिलब्यांमधे अजुन काय काय खोटे लिहीले आहे?
डब्यात सोमवार गुरुवारच नेणार
डब्यात सोमवार गुरुवारच नेणार ना>>
आम्ही सामान्य व्यक्ति डब्यात अन्न/जेवण नेतो, बाकी 'ऋ' असल्यमुळे तो "सोमवार" आणि "गुरुवार" पण डब्यात नेउ शकतो. तेही असो..
बाकी दिSSलवाSSले चा धंदा काय म्हणतोय.??
(No subject)
अरे आवरा रुन्म्या.. तू लगे
अरे आवरा
रुन्म्या.. तू लगे रहो..
रुन्म्या.. तू लगे
रुन्म्या.. तू लगे रहो..
>>>
हो, अश्या चर्चांमधूनच मी नवीन धाग्यांचा कच्चा माल काढतो
धाग्यांचा कच्चा माल काढतो
धाग्यांचा कच्चा माल काढतो >>>
अरेरे म्हणजे धागे पक्का माल आहेत असं म्हणायचय कि काय?
डब्यातून डुक्कर नेलं... एवढा
डब्यातून डुक्कर नेलं... एवढा मोठा डबा कसा काय नेला म्हणे.. म्हणजे अगदी दुकराचं पिल्लू जरी असेल तरी केव्हढा मोठ्ठा डबा लागेल..
याक रुन्या डुक्कर खातोस ?
याक
रुन्या डुक्कर खातोस ?
पऴ पाकिस्तानात 
माझा कॉलेजमध्ये एक मुसलमान
माझा कॉलेजमध्ये एक मुसलमान मित्र होता. तसा अगदी खास असा नाही पण डब्बामित्र होता
बरं झालं क्लियर केलं. अम्ही डब्बामित्र म्हण्जे काही तरी वेगळचं समझलो होतो.
विनोदी लेखन मधे हलवा धागा
विनोदी लेखन मधे हलवा धागा

राकू - तुम्ही दिलेली माहीती
राकू - तुम्ही दिलेली माहीती साफ खोटी आहे असे दोघांनी लिहीले आहे. त्याचा प्रतिवाद करायचा नाही का तुम्हाला.
आणि ही जर माहीती खोटी असेल तर तुम्हाला असे खोटे पसरवून काय मिळते? आत्ता पर्यंतच्या ९०+ जिलब्यांमधे अजुन काय काय खोटे लिहीले आहे?>>>>>>>>+++१
अरे उद्याचं सेलिब्रेशन आजच
अरे उद्याचं सेलिब्रेशन आजच केलंस काय? >> ऋ च्या आजच्या पोस्ट वाचून असंच वाटतंय.
डब्यात सोमवार गुरुवारच नेणार ना>>
आम्ही सामान्य व्यक्ति डब्यात अन्न/जेवण नेतो, बाकी 'ऋ' असल्यमुळे तो "सोमवार" आणि "गुरुवार" पण डब्यात नेउ शकतो. >>
रुन्या डुक्कर खातोस ? >> त्यात काय मी पण खाल्लाय लहानपणी.
रानडुकरे शेतात घुसली की
रानडुकरे शेतात घुसली की अतोनात नुकसान करतात. ही रानडुकरे शेतात रात्री घुसतात आणि खाणे कमी आणि धुडगूसच जास्त घालतात. त्यामुळे आमच्याकडे शेताभोवती इलेक्ट्रिक तारांचे कुंपण घालतात आणि रात्री त्यात इलेक्ट्रिक करंट सोडतात. शेतात येता-जाता त्याला स्पर्श होऊन इलेक्ट्रिक शॉकने डुकरे मरतात. अन्यथा या रानडुकरांना अफाट ताकद असते. एक रानडुक्कर सहज १५-२० गड्यांच्या झुंडीच्या नाकी दम आणू शकते. माझ्या बालपणी एकदा आमच्या मामांच्या शेतात घुसलेल्या रानडुकराची शिकार करण्यात शेतावरच्या गड्यांना कसेबसे यश आले. पण त्या शिकारीची चर्चा गावाला महिनाभर पुरली.
मग त्याच्या मांसाची एक मेजवानी नातेवाईकांना देण्यात आली!
यम्पी व महाराष्ट्रात शेतीस
यम्पी व महाराष्ट्रात शेतीस नुकसान देणार्या नीलगाय व रानडुक्कर यांच्या शिकारीस हापिशली परवानगी हाये. Section 12 of the Wildlife Protection Act, 1972.
नीलगायीची शिकार?? म्हणजे गो
नीलगायीची शिकार??
म्हणजे गो हत्याच की हो !
काही जणांना कचराकुंडी डुक्कर
काही जणांना कचराकुंडी डुक्कर वाटतात आणि रात्रभर विचार करत बसतात.>>>>:हहगलो: आईग!
बरं झालं क्लियर केलं. अम्ही
बरं झालं क्लियर केलं. अम्ही डब्बामित्र म्हण्जे काही तरी वेगळचं समझलो होतो.>>>>:हहगलो: काय हे! हा ऋ काहीही लिहीतो, अगदी जानुचा नेटभाऊ आहे.:हाहा:
विनोदी लेखन मधे हलवा
विनोदी लेखन मधे हलवा धागा>>>>> +११११११
(No subject)
डब्यातून डुक्कर नेलं. >>>
डब्यातून डुक्कर नेलं. >>>
ऋन्म्या कोंबडीवड्यात काय असतं रे ?
एकदा शाळेत आम्ही मुलं जेवायला
एकदा शाळेत आम्ही मुलं जेवायला बसलो असताना एका मित्राने डब्बा उघडला तो काय ? आतून एका गेंड्याने टुणकन उडी मारली. त्याचं असं झालं ..
त्याच्या काकांनी छ-याच्या बंदुकीने एकदा चार पाच गेंड्यांची शिकार केली होती. त्यातलाच एक गेंडा या मित्राला मीठ मसाला चोळून डब्यावर दिला होता. पण खरंतर तो अर्धमेला झाला होता. डब्यातली चपाती खाऊन त्याला हुषारी वाटली आणि झाकण काढताच तरतरीत होऊन त्याने टुणदिशी उडी मारली. मग सगळेच म्हटले की मुक्या प्राण्यांवर दया करावी. मग आमच्यातला एक ब्रह्मे नावाच्या मुलाने आपली ल्युना काढली आणि पटदिशी त्याला जंगलात सोडून आला. आजही गेंडा हा विषय निघाला की ही हृद्य आठवण निघून आम्ही साहे गहीवरतो.
असंबद्ध कशी? शस्त्राचा उल्लेख
असंबद्ध कशी?
शस्त्राचा उल्लेख होताच गांडीवाचा होणार, गांडीवाचा उल्लेख होताच अर्जुनाचा होणार, अर्जुनाचा उल्लेख होताच मेरे करन अर्जुन आयेंगे हे ओघाने येणारच, आणि करन-अर्जुन आल्यावर शाहरूख धाग्यात कुठून आला म्हणून कोणी रडारड करणार असेल तर त्याला काय>>>>>>>> अशक्य हसले.मामीच्या लिस्टमध्ये टाका धागा.
विनोदी लेखन मधे हलवा
विनोदी लेखन मधे हलवा धागा>>>>> +११११११
(No subject)
नीलगायीची शिकार?? म्हणजे गो
नीलगायीची शिकार??
म्हणजे गो हत्याच की हो !
मराठीत नीलगाय आणि इंग्रजीत ब्लु बुल हे नाव धारण करणारा हा प्राणी दिसायला थोडाफार घोड्यासारखा आहे आणि चक्क हरणाच्या कुळातला आहे. राणीच्या बागेत दोन नीलगायी आहेत, पाहुन या.
राणीच्या बागेत दोन नीलगायी
राणीच्या बागेत दोन नीलगायी आहेत, पाहुन या.
>>
येस्स! मी आणू का फोटो काढून, माझा रोजचा घरी जायचा रस्ता राणीच्या बागेतूनच जातो. जरा वाट वाकडी केली की थेट नीलगायीच्या पिंजर्यात.
ड्ब्यातून तर आणणार नाही ना !
ड्ब्यातून तर आणणार नाही ना !
(No subject)
उगाच रस्त्यावरच्या गायींवर
उगाच रस्त्यावरच्या गायींवर निळ फेकून फोटो काढू नकोस. नील गायी बघितल्या नील गायी बघितल्या
जरा वाट वाकडी केली की थेट
जरा वाट वाकडी केली की थेट नीलगायीच्या पिंजर्यात. > अजून जरा वाट वाकडी कर तर सिंहाच्या पिंजर्यात पण पोहचशील. नविन वर्षात प्रयत्न करून बघ
Pages