हिंदू-मुस्लिमांच्या एकमेकांकडून असलेल्या किमान अपेक्षा

Submitted by Rajesh Kulkarni on 23 December, 2015 - 14:37

हिंदू-मुस्लिमांच्या एकमेकांकडून असलेल्या किमान अपेक्षा
.

दररोजच्या आयुष्यात हिंदूचे मुस्लिमांबद्दल कोणते आक्षेप असतात? यावर होत असलेल्या चर्चेत वारंवार कोणते मुद्दे आलेले दिसतात? याबाबतीतल्या माझ्या निरिक्षणावरून वारंवार पुढे येणारे पुढील मुद्दे वाटतात.

१) मुस्लिमांनी घराबाहेर पडताना आपला धर्म घरात ठेवावा. स्कल कॅप टाळावी. दाढी वाढवू नये. वाढवलीच तर ती धार्मिक पद्धतीची नसावी.

२) मुस्लिमांनी आवर्जून स्थानिक भाषेमध्ये बोलावे. त्या भाषेत पारंगत व्हावे. हिंदीसदृश्य भाषेत बोलून आपले ‘वेगळेपण’ दाखवू नये.

३) मुस्लिम स्त्रियांनी बुरखा वापरू नये.

४) मुस्लिम मुला-मुलींनी मदरशांमध्ये न शिकता इतरांप्रमाणे नेहमीच्या शाळांमधून शिकावे.

आणखी कोणते मुद्दे चर्चेत असतात असे वाटते?

वरीलप्रमाणे वागणारे मुस्लिम चांगले नसतात असे मला अजिबात म्हणायचे नाही. मुस्लिमांनी देशाच्या मुख्य धारेत सहभागी होण्यासाठी काय करावे वगैरे जड भाषा मी वापरत नाही. माझ्यासाठी येथे राहणारे सगळेच भारतीय आहेत. कोणाच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही, आम्ही आम्हाला हवे तसेच वागणार, किंबहुना कोणाला आमच्याकडून काही अपेक्षा बाळगण्याचा अधिकार दिलाच कोणी, असेही काहींचे मत असू शकेल याचीही मला कल्पना आहे.

आता मुस्लिमांच्या नजरेतून हिंदूंबद्दल अपेक्षा कोणत्या असतील असे वाटते? अर्थात वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांच्या धर्तीवरच हिंदूंबद्दलही अनेक गोष्टी सांगता येतील.

+++++++++++++++

काही दळभद्री लोकांना या पोस्टमध्ये काही भलताच अजेंडा दिसला आहे. एकाचे उदाहरण खाली दिलेच आहे. नसलेले अजेंडे दिसणार्‍या अशा दिव्यदृष्टीच्या अशा लोकांनी येथे फिरकले नाही तरी चालेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ तात्यानु, कधी तुमी कुंपणाच्या अल्याड दिसता, कधी पल्याड. कधी कुंपणावर. काय करावं माणसानं? तुमचा आयडी शिप्टडुटीत येगयेगळी लोक चालवत्यात काय?
>>

मी कुंपनावरच आहे. निर्मल मनाने बघा!

धर्म सहीष्णू असणे म्हणजे काय ? प्लीज एक्स्प्लेन !

>>

कापोचे?

सहिष्णुताच माहिती नाही न एवढे प्रश्न विचारता? जाउद्या राव ... येवढा पेशन्स नाय माझ्यात.

जाउद्या राव ... येवढा पेशन्स नाय माझ्यात. >>>> काय म्हणता ? तुमच्या मानेवर बंदूक ठेवून बोलावलं कि काय असं वाटू लागलंय Proud

कुठलाच धर्म सहीष्णू नाही म्हणून कन्व्हर्ट व्हायचा प्रश्न नको तिथं विचारताय तर सहीष्णू धर्म म्हणजे नक्की काय ते नको का विचारायला ? की "निधर्मी" स्टेटस घेतलंय Already ?

अडाणी समजून विस्कटून सांगा हो !

ही चिटींग आहे तात्या तुम्हाला बी युटर्न मारण्याची सवय लागली. म्हणून म्हणतो तिकड राहू नका. वाण नाही पण गु-ण लागतोय Wink

Wink तात्या मोदींसारखेच निघाले.स्वत:च्या पाठिराख्यांनाच तोंडघशी पाडतात. मग त्यांना आम्ही पडलो नाय काई, रामदेवबाबानी शिकिवलेलं कायतरी करत हुतो असं म्हनावं लागतं.

ऑ? मी यु टर्न? हे घोर अनर्थ मैने कब कर दिया ...

Sad Sad

पण शेट,

तुमच्या सारखे उत्तम मित्र असतांना आपण योग्य रूळ पकडूच ... Wink

इस्कटून सांगू काय ?

धर्म सहीष्णू म्हणजे धर्माची शिकवण सहीष्णू की लोक ?
कारण तुम्ही निसरड्या जागेत टणाटण उड्या हाणायला लै येक्सपर्ट ! हाय का नाय ? तर आत्ताच तुमचा प्रश्न क्लिअर करा बघू , म्हंजी मंग मला असं म्हणायचं व्हतं अन तसं असलं काय बी नगं

हा बाकी तसं म्हण्तासा ... तर मी म्हणतु की माझ्या मते, धर्माची शिकवण सहिष्णू असायला पायजेल ...
इतर धर्मांबाबतबी.

आता ह्यो म्हणतो की माह्याच मार्गान कल्याण होईन, दुसऱ्या मार्गान शिकवणीन नै, म्हणजे आली असहिष्णुता.
आस म्हंटल की त्या धर्मातली मानस लगे लागतात दुसऱ्यांच कल्याण कराया.
अर्थात, ही एक अपेक्षा.

बाकी टंकू नंतर.

धर्माची शिकवण सहिष्णू असायला पायजेल ...
इतर धर्मांबाबतबी. >>> आता कसं ?? आणि स्वतःच्या धर्मातल्या लोकांशी हो ??

शिकवणीचं म्हणाल तर इस्लाम स्वतःच्या धर्मातल्या लोकांशी भेद करतो का ? इसाई धर्म करतो का ? जैन धर्म करतो का ? पारशी करतो का ?

लिंगायत धर्म करतो का ? महानुभाव धर्म करतो का ? शीख धर्म करतो का ?
आणि बौद्ध धर्म करतो का ?

यातला एकही धर्म पटला नाही म्हणता. ?
किमान एक एक उदाहरण देऊन सांगा की कसं ते...

मी कवा म्हणतलो हिंदू सहिष्णू? उगाच?

इसाई -> प्रोटेस्टंट का क्याथोलिक का काय ते ...
इस्लाम -> शिया सुन्नी आदिक ...
जैन तर स्वतःच्या लोकांवरच इतके बंधन घालून टाकतात की मलाच गुदमरायला होत.
पारशी नाय करत ... पण ते कन्व्हर्ट होऊन नाई देत म्हणून त्यांना पास Wink

लिंगायत, महानुभाव ह्यो पंथ, धर्म कधी झाले? बघा म्हंटल होत न मला माहिती नाही सगळी ... Happy
धम्मातही आहेच हीनयान, महायान इति आदी ... म्हणजे काय तर मी माझीच उपासना पद्धती श्रेष्ठ Proud

तस्मात

मी माझ्यापुरता तरी अथेइस्ट झालेलो आहो. सर्व धर्मास आपुन दुरून नमस्कार करतो Wink

मनुस्मृती या एका ग्रंथाच्या आधारावर हे सगळे चालले असेल तर त्यात अनेक ओळी नंतरच्या काळात घुसवण्यात आल्या आहेत असा काही इतिहास संशोधकांचा अंदाज आहे अहे कुठेतरी वाचले होते.
नुसते वेगवेगळ्या कामाप्रमाणे वेगळे गृप करा असे सांगितले असेल तर त्यात काय चुकले, त्या काळाच्या मानाने?
त्या गृप्स मधे भेदभाव करा उचनिच करा असे सांगितले असेल तर से सांगितलेले वाक्य मुळ पुस्तकात होते की नंतरच्या बदललेल्या समाजाने स्वतःच्या फायद्यासाठी घातले त्याचे संशोधन व्हायला हवे.

किती हिंदू रोज ५ वेळा मनुस्मृतीला प्रार्थना करतात? त्याचा आदर्श ठेवतात?
हे जे काही भेदभाव आहे तो धर्मापेक्षा एखाद्या सामाजाचा त्या वेळचा आरसा आहे. धर्माचा नव्हे.

प्रोटेस्टंट का क्याथोलिक , हीनयान, महायान

आणि जातीव्यवस्थेतला भेदभाव, शिक्षा हे एकाच तराजूत का ?
नाही म्हणजे सहीष्णूता तोलणार कशी हा प्रश्न पुन्हा शिल्लक !

आता उत्तर पटलं तर येईन इकडे, तुमचं चालू द्या !

आताच इस्लाम मधील परंपरांबद्दल बोलल्याबद्दल केरळ मधील एका फोटोग्राफरचा स्टूडीओ जाळण्याची घटना घडली.
असे जर कोणी मनुस्मॄतीबद्दल बोलले तर असेच होईल का? अजिबात नाही.

धर्म सहिष्णू असणे म्हणजे काय? म्हणजे, एखादा नवा धर्म भारतात आला तर त्याला विनातक्रार सामावून घेणे. त्या समाजाला आपल्या पद्धतीने रीतीरिवाज पाळण्याची मुभा देणे. एक मोठे उदाहरण हे पारशी लोकांचे. पारशी धर्म (झोरास्ट्रियन) हा मूळ इराणमधला. जेव्हा इस्लामचा वरवंटा त्या देशावर फिरला तेव्हा तिथून त्या धर्माचे उच्चाटन झाले. काही लोक आश्रयासाठी भारतात गुजराथेतील एका बंदरापर्यंत प्रवास करुन आले. तिथे त्यांचे स्वागत झाले. त्यांनी तिथेच आपले घरदार बसवले. नंतर इंग्रजांचे राज्य आल्यावर त्यातलेच अनेक मुंबईला आले. तिथे उद्योगधंद्यात चमक दाखवून मोठे श्रीमंत झाले. टाटा, गोदरेज ही त्यातली काही उदाहरणे.
पारशी लोकांवर भारतीय लोकांनी अत्याचार केले नाहीत. त्यांना स्वातंत्र्य दिले. उलट इस्लामने त्यांना त्यांच्या हक्काच्या ठिकाणीच आक्रमण करुन चिरडून टाकले. इराणमधे पारशी धर्म जवळपास संपला आहे.
हे अनेक ईश्वर मानणार्‍या धर्माच्या सहिष्णूपणाचे एक ठळक उदाहरण.

शेंडेनक्षत्र, पोस्टमधील शांत भाषा आवडली.
मात्र तुम्हाला माझ्या पोस्ट्स कळालेल्या दिसत नाहीत. नाहीतर या पोस्टची आवश्यकता नसावी.

पारशी लोक हे व्यापारी म्हणून पुढे आले... भारतीय हिंदू आळशी लोक हे व्यापारौदीमात कारखानदारीत पुढे नव्हते. तसेच पारशीही सत्तेच्या स्पर्धेत नव्हते. त्यामुळे पारशी लोक व हिंदू लोक यात रिसोर्सेसचे शेअरिंग नव्हते. म्हणून सहजीवन झाले.

याउलट इस्लाम व इंग्रजही सत्तेच्या स्पर्धेत आले. त्यामुळे हिंदु राजे ,मुसलमान व इंग्रज यात सत्तेसाठी स्पर्धा झाली.

पारशीही चूक नव्हते व मुसलमानही चूक नव्हते. कुणाला व्यापार आवडला , कुणाला सत्ताकारण .

मुसलमान , ख्रिअचन नव्हते किंवा आले नसते तरी हिंदू राजे व त्यांचे सैन्य एकमेकांच्या उरावर बसत होतेच.

विनाकारण यात धर्म हा मुद्दा आणु नये. हिंदुनी त्रास दिला नाही म्हणून पारशी पुढे आले वगैरे गाढवी वल्गना करु नयेत.

मूठभर लोक व किमान साधने यांच्या जिवावर पारश्यानी व्यापार व उद्योग काबीज केला.

मूठभर लोक व किमान साधने यांच्या जिवावर मुस्लिम ख्रिस्चनानी सत्ता काबीज केली.

दोघेही अभिनंदनासच पात्र आहेत. आळशी लोकाना हेही नाही अन तेही नाही.

परवा कुणीतरी भाजपाचा मनुष्य बोलला ... आठशे वर्षात पहिला हिंदू राजा की पंतप्रधान आला इ .

अगदी खरं बोलला तो भगव्या... गेल्या आठशे वर्षात देशाची प्रगती झाली तेंव्हा मोघलाई , इंग्रज व काँग्रेस हा अहिंदू सत्ताकाळ होता, हेच अप्रत्यक्षरीत्या त्याने मान्य केले.

ईस्लाम मधल्या चांगल्या गोष्टी काही लोकांना दिसतात पण,

१. जग भरात अतिरेकी कायवायांना पैसा हेच लोक पुरवत असतात
२. जक्कात देऊनही पाकिस्तानातील कसाब सारखे युवक थोड्याश्या पैश्यासाठी अतीरेकी संघटनाकडेच वळतात !
त्यांच्या रिहॅब साठी कोणीही काहीही करत नाही
३. हज , उमरा साठी शासना कडुन सबसीडी जगातल्या ५० मुस्लिम देशात दिली जात नाही ती फक्त भारतात
दिली जाते,
४. अशी मदत घेऊन हज उमरा करणे हे ईस्लामच्या तत्वात बसत नाही, पण भारतातल्या को णी ही ह्याला
विरोध केलेला नाही. अशी मदत घेऊन केलेली ह्ज ही अल्ला पर्यंत पोहोचु शकेल काय ?
हि सबसीडी भारतातल्या जमा केलेल्या जनतेच्या पैश्यातुनच दिली जाते. तरी ह्या मुसलमानांनी
भारतीय लोकांविरुद्धच जिहाद पुकारलेला आहे ?

५. ह्याच सबसीडीमुळे पाकिस्तानातील लोक ही भारतीय मुसल मानावर जळतात,

Pages