हिंदू-मुस्लिमांच्या एकमेकांकडून असलेल्या किमान अपेक्षा
.
दररोजच्या आयुष्यात हिंदूचे मुस्लिमांबद्दल कोणते आक्षेप असतात? यावर होत असलेल्या चर्चेत वारंवार कोणते मुद्दे आलेले दिसतात? याबाबतीतल्या माझ्या निरिक्षणावरून वारंवार पुढे येणारे पुढील मुद्दे वाटतात.
१) मुस्लिमांनी घराबाहेर पडताना आपला धर्म घरात ठेवावा. स्कल कॅप टाळावी. दाढी वाढवू नये. वाढवलीच तर ती धार्मिक पद्धतीची नसावी.
२) मुस्लिमांनी आवर्जून स्थानिक भाषेमध्ये बोलावे. त्या भाषेत पारंगत व्हावे. हिंदीसदृश्य भाषेत बोलून आपले ‘वेगळेपण’ दाखवू नये.
३) मुस्लिम स्त्रियांनी बुरखा वापरू नये.
४) मुस्लिम मुला-मुलींनी मदरशांमध्ये न शिकता इतरांप्रमाणे नेहमीच्या शाळांमधून शिकावे.
आणखी कोणते मुद्दे चर्चेत असतात असे वाटते?
वरीलप्रमाणे वागणारे मुस्लिम चांगले नसतात असे मला अजिबात म्हणायचे नाही. मुस्लिमांनी देशाच्या मुख्य धारेत सहभागी होण्यासाठी काय करावे वगैरे जड भाषा मी वापरत नाही. माझ्यासाठी येथे राहणारे सगळेच भारतीय आहेत. कोणाच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही, आम्ही आम्हाला हवे तसेच वागणार, किंबहुना कोणाला आमच्याकडून काही अपेक्षा बाळगण्याचा अधिकार दिलाच कोणी, असेही काहींचे मत असू शकेल याचीही मला कल्पना आहे.
आता मुस्लिमांच्या नजरेतून हिंदूंबद्दल अपेक्षा कोणत्या असतील असे वाटते? अर्थात वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांच्या धर्तीवरच हिंदूंबद्दलही अनेक गोष्टी सांगता येतील.
+++++++++++++++
काही दळभद्री लोकांना या पोस्टमध्ये काही भलताच अजेंडा दिसला आहे. एकाचे उदाहरण खाली दिलेच आहे. नसलेले अजेंडे दिसणार्या अशा दिव्यदृष्टीच्या अशा लोकांनी येथे फिरकले नाही तरी चालेल.
संभाळुन लिहा.
संभाळुन लिहा.
अखिलेश मूर्ख आहे. राममंदीराचा
अखिलेश मूर्ख आहे. राममंदीराचा मुद्दा आता उकरुन काढणं ही भाजपाची खेळी आहे. त्याला बळी न पडता पावले उचलली पाहिजेत. मतांचं ध्रुवीकरण टाळलं तर उप्र मधेही भाजपाचा बिहार होईलच.
बनवा एक्दाचे राममंदीर. मग काय
बनवा एक्दाचे राममंदीर.
मग काय मूद्दाच राहणार नाही मत मागण्यासाठी. सर्वपक्षांनी मिळुन ठराव पास करायला हवा.
यांचेच दात यांच्याच घशात घालायचे.
पण मराठी मुस्लिमाला अनेक
पण मराठी मुस्लिमाला अनेक पिढ्या महाराष्ट्रात वाढलेल्या असल्या तरी मराठी बोलणे मान्य नाही.
<<
भिवंडी निजामपुर महानगरपालिकेत मुख्य प्रशाकीय इमारतीत अगदी दर्शनी बाजुला मुख्य प्रवेशदाराच्या वरच उर्दुत महानगरपालिकेचे नाव का लिहावे लागले?
भिवंडीत रस्त्यांवरच्या अनेक पाट्यांवर स्थनीक भाषा म्हणून उर्दुत नावे का लिहावी लागली आहेत?
आता तर सगळी कडे गुजराती
आता तर सगळी कडे गुजराती सुध्दा दिसत आहे. मग तीही का लिहावी लागली ?
आता तर सगळी कडे गुजराती
आता तर सगळी कडे गुजराती सुध्दा दिसत आहे. >> नव्याने कुठे दिसत आहे? जिथे आधिपासुन कधीच गुजराती वस्ती नव्हती आणि आता नगरपालिकेची दुसरी अधिकृत भाषा गुजराती आहे अशा जागा दाखवा. त्यांचा सुद्धा निषेध करण्यात येईल.
तो झाला, की मग "मुळ" मुद्द्यावर येऊन आपले मत वाचायला आवडेल.
नव्यानेच दिसत आहे. डोळ्यावरुन
नव्यानेच दिसत आहे. डोळ्यावरुन चष्मा काढा
आता नगरपालिकेची दुसरी अधिकृत
आता नगरपालिकेची दुसरी अधिकृत भाषा गुजराती आहे अशा जागा दाखवा. > उल्हासनगरात सिंधी दुसरी अधिकृत भाषा आहे. काय बोलणार यावर >?
काय बोलणार यावर >> जगात
काय बोलणार यावर >>
जगात कुठेही राहणा-या सिंधी भाषिकांची सिंधी ही फार पुर्वीपासुन मातृभाषा आहे.
ती लादलेली नाही. जबरदस्ती नाही. सिंधी उल्हासनगरचे मुळ निवासी नाही. ते तिथे स्थलांतरीत झाल्यानंतर त्यांना वाटले असेल त्यांच्य मातृभाषेत व्यवहार व्हावा तर ते योग्यच आहे. जोपर्यंत असे करताना मराठी डावलली जात नाही तोपर्यंतच.
सिंधी / गुजराती लोकांनीही महाराष्ट्रात राहताना मराठी शिकुन येथिल भाषेत व संस्कॄतीत मिसळुन रहायला हवे.
महाराष्ट्रात इतर ठिकाणी राहणारे सर्व मराठी मुस्लीम हे मुळचे इथलेच आहेत. त्यांची मातृभाषा इथलीच मराठी किंवा तिची एखादी डायलेक्ट आहे. उर्दु ही भिवंडीत उगम पावलेली किंवा आपोआप विकसीत झालेली भाषा नाही. ती लादलेली आहे. बाहेरुन आलेली आहे. येथिल सर्व उर्दु भाषीक हे अचानक फाळणीसारख्या आपत्तीमुळे बाहेरुन इथे येउन स्थाईक झालेले नाहीत. ते मुळचे येथिलच मराठी आहेत.
>>>उर्दु ही भिवंडीत उगम
>>>उर्दु ही भिवंडीत उगम पावलेली किंवा आपोआप विकसीत झालेली भाषा नाही. <<<
ज्यांनी ती भाषा "लादली"
ज्यांनी ती भाषा "लादली" त्यांना जाऊन सांगणार की फक्त इथेच "जागृती" करणार? @ स्पॉक.
सिंधी / गुजराती लोकांनीही
सिंधी / गुजराती लोकांनीही महाराष्ट्रात राहताना मराठी शिकुन येथिल भाषेत व संस्कॄतीत मिसळुन रहायला हवे.
हो? सांगता का मग त्यांना तसं? मारवाडी राहिले तुमच्या यादीत. मुद्दाम मोडकी तोडकी हिंदी बोलतात ते.
<<
भिवंडीत रस्त्यांवरच्या अनेक
भिवंडीत रस्त्यांवरच्या अनेक पाट्यांवर स्थनीक भाषा म्हणून उर्दुत नावे का लिहावी लागली आहेत? >> अरेच्चा, अजुनही, म्हणजे २०१४ नंतरही आहेत ??
उर्दु ही भिवंडीत उगम पावलेली
उर्दु ही भिवंडीत उगम पावलेली किंवा आपोआप विकसीत झालेली भाषा नाही. ती लादलेली आहे. बाहेरुन आलेली आहे. >
उर्दु भारतीय भाषा आहे रशियावरून अथवा इंग्लंड वरुन आयात केलेली भाषा नाही. भारतात भारतीय भाषा नाही वापरणार तर काय परदेशीभाषा वापरणार? स्वतः ऑफिस मधे मराठीच आवर्जुन बोलतात का? इंग्रजी सारखी परकिय भाषा का वापरतात? मराठी बोला
राहिले भिवंडीचे तर सत्ता शिवसेनेची येऊन सुद्धा जर उर्दु ठेवली असेल तर जाब त्यांना विचारण्याची थोडी हिंमत बाळगा.
सिंधी आणि गुजराथी लोक कोणत्या
सिंधी आणि गुजराथी लोक कोणत्या धर्माचे असतात?
अरे वा. भाषेवरून मुद्दे
अरे वा.
भाषेवरून मुद्दे मिळाले नाही तर धर्मावर घसरले. अरे रे रे अजुन किती खाली घसरणार देव जाणे
महाम्होपाध्याय, धाग्याचा
महाम्होपाध्याय,
धाग्याचा विषयच धर्माचा आहे. धर्मावरून भाषेवर कोण घसरले आहे ते पाहायला हवे आहे. भाषेवरून धर्मावर काय घसरायचंय? धागाच धर्माबाबत आहे.
जयंत आणि दिमा, मुळ मुद्द्यावर
जयंत आणि दिमा,
मुळ मुद्द्यावर बोलत असताना "तुम्ही" सिंधी / गुजराती मधे आणलेत. मी नव्हे.
त्यांचा निषेध करुन झालेला आहे.
आता "मुळ" मुद्द्याकडे येणार का? "तुमचा" मुळ मुद्दा असा होता की "सर्व" मराठी मुस्लीम निष्पापणे मराठीतच बोलतात. त्या संदर्भात मी भिवंडीचे उदाहरण दिले होते. तर तुम्हीच मल उलटे जाब विचारत आहात शिवसेनेला विचारा , सिंधी मारवाड्यांना जाउन सांगा म्हुणन. ते सगळे करु आपण नंतर.
आधी "तुमच्या" मुळ मुद्यावर बोला. फाटे न फोडता.
निषेध करून झाला? अरे बापरे
निषेध करून झाला? अरे बापरे कधी कुठे कसा
उपकारच झाले म्हणायचे
सगळे महाराष्ट्रीय मुस्लिम
सगळे महाराष्ट्रीय मुस्लिम मराठी बोलतात हे खरे नाही, तसेच अजिबात कोणीच बोलत नात हेही खरे नाही. अनेक मुस्लिम मराठी साहित्यिकही आहेत.
स्पॉक महान पेशन्स आहे तुमचा
स्पॉक
महान पेशन्स आहे तुमचा
भाषेचा विषय तुम्ही काढलेला
भाषेचा विषय तुम्ही काढलेला स्पॉक
आता तुमच्या पुढारींसारखे पलटी काय मारत आहे. ? आणि जर उर्दु भारतीय मानत नाही तर तुमच्या गझलकारांना गझला पाडणे बंद करायला सांगा कसे
उर्दु उर्दु म्हणून बोलणारे
उर्दु उर्दु म्हणून बोलणारे आणि प्रत्येक गोष्टीत इतरांना पाकिस्तानात पाठवणार्याचे "दद्दा" आज पाकिस्तानात जाणार आहे
याची वाच्यता आधी कुठेच केली नव्हती 
धर्म म्हणजे कपडे भाषा केशभुषा
धर्म म्हणजे कपडे भाषा केशभुषा असते का फक्त?
तो तर आपल्या डोक्यात असतो
मुळात भाषेचा विषय कोणी काढला
मुळात भाषेचा विषय कोणी काढला हे वरचे काही प्रतिसाद वाचल्यावर स्पष्ट होते आहे.
उर्दूबाबत - उर्दू भारतात निर्माण झालेली भाषा असून ती हिंदीपासून निर्माण झालेली आहे. उर्दू भाषा म्हणजे फक्त गझल नव्हे.
कोणीही जगात कोणत्याही भाषेत बोलावे. त्याच्यावर बंधन असण्याचे काय कारण? अनेक स्थानिक मुसलमान बोलतात तेव्हा ऐकत राहावेसे वाटते इतके छान उर्दू उच्चार आणि शब्दयोजना असते. मराठीत मुली जसा 'अय्या' हा उच्चार करतात तश्या मुस्लिम मुली किंवा स्त्रिया 'हाय अल्ला' म्हणतात. हे 'हाय अल्ला' ऐकायला व पाहायला अतिशय सुंदर असते. तसेच मुसलमान इतरही भाषा बोलत असतात. कोकणात तर देसाई, इनामदार नावाची मंडळी बाटून मुसलमान झालेली असली तरी आजही नवरात्र बसवतात.
हिंदू मुस्लिमांनी एकमेकांकडून कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात ह्यात भाषेबाबतची अपेक्षा येऊच नये खरे तर!
(टीप - पुन्हा एकदा नोंदवतो की धाग्याचा विषय वादोत्पादक आहे)
दुपारची करमणूक मस्त होतेय ...
दुपारची करमणूक मस्त होतेय ... भूकबिक लागली, तर हे पॉपकोर्न खाऊन घ्याल ...
हिंदू-मुस्लिमांच्या
हिंदू-मुस्लिमांच्या एकमेकांकडून असलेल्या किमान अपेक्षा<<<<<<<
हिंदूकडुन असलेल्या किमान अपेक्षा
हिदू धर्मियांनी त्यांच्या जात बांधवांशी मानसकिने वागावे
आपल्याच जात(धर्म )बांधवावर चालवलेले अन्याय अत्याचार थांबवावेत
हिंदूधर्मिय म्हणुन घेण्यापेक्षा भारतिय म्हणुन घ्यावे
धर्माचे जे काही प्रदर्शन करायचे ते घरात करावे.शासकिय कामकाजाच्या ठिकाणी करु नये.
मुस्लिमांबद्दल मांडलेले चारही मुद्दे शहराच्यां ठिकाणी गैरलागु वाटतात.
यात दुसर्यांना त्रासदायक ठरणारा एक ही मुद्दा नाही.
ही पण भिवंडीच का??
ही पण भिवंडीच का??
https://goo.gl/C81XE3
https://en.wikipedia.org/wiki/New_Delhi_railway_station#/media/File:New_...
(No subject)
शेन यांनी भाषेचा मुद्दा काढला
शेन यांनी भाषेचा मुद्दा काढला त्यांची नेहमीप्रमाणे स्पॉक यांनी तळी उचलली. योग्य उत्तर मिळाल्यावर त्यांच्याकडचे मुद्देच संपले म्हणून त्यांनी परत गाडी धर्मावर आणली
Pages