हिंदू-मुस्लिमांच्या एकमेकांकडून असलेल्या किमान अपेक्षा

Submitted by Rajesh Kulkarni on 23 December, 2015 - 14:37

हिंदू-मुस्लिमांच्या एकमेकांकडून असलेल्या किमान अपेक्षा
.

दररोजच्या आयुष्यात हिंदूचे मुस्लिमांबद्दल कोणते आक्षेप असतात? यावर होत असलेल्या चर्चेत वारंवार कोणते मुद्दे आलेले दिसतात? याबाबतीतल्या माझ्या निरिक्षणावरून वारंवार पुढे येणारे पुढील मुद्दे वाटतात.

१) मुस्लिमांनी घराबाहेर पडताना आपला धर्म घरात ठेवावा. स्कल कॅप टाळावी. दाढी वाढवू नये. वाढवलीच तर ती धार्मिक पद्धतीची नसावी.

२) मुस्लिमांनी आवर्जून स्थानिक भाषेमध्ये बोलावे. त्या भाषेत पारंगत व्हावे. हिंदीसदृश्य भाषेत बोलून आपले ‘वेगळेपण’ दाखवू नये.

३) मुस्लिम स्त्रियांनी बुरखा वापरू नये.

४) मुस्लिम मुला-मुलींनी मदरशांमध्ये न शिकता इतरांप्रमाणे नेहमीच्या शाळांमधून शिकावे.

आणखी कोणते मुद्दे चर्चेत असतात असे वाटते?

वरीलप्रमाणे वागणारे मुस्लिम चांगले नसतात असे मला अजिबात म्हणायचे नाही. मुस्लिमांनी देशाच्या मुख्य धारेत सहभागी होण्यासाठी काय करावे वगैरे जड भाषा मी वापरत नाही. माझ्यासाठी येथे राहणारे सगळेच भारतीय आहेत. कोणाच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही, आम्ही आम्हाला हवे तसेच वागणार, किंबहुना कोणाला आमच्याकडून काही अपेक्षा बाळगण्याचा अधिकार दिलाच कोणी, असेही काहींचे मत असू शकेल याचीही मला कल्पना आहे.

आता मुस्लिमांच्या नजरेतून हिंदूंबद्दल अपेक्षा कोणत्या असतील असे वाटते? अर्थात वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांच्या धर्तीवरच हिंदूंबद्दलही अनेक गोष्टी सांगता येतील.

+++++++++++++++

काही दळभद्री लोकांना या पोस्टमध्ये काही भलताच अजेंडा दिसला आहे. एकाचे उदाहरण खाली दिलेच आहे. नसलेले अजेंडे दिसणार्‍या अशा दिव्यदृष्टीच्या अशा लोकांनी येथे फिरकले नाही तरी चालेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अनु सहमत,
आपण उल्लेखलेले मुद्दे योग्य प्रकारे मांडायला हवे होते.
इतर मुद्द्यांनी धाग्याचा टोनच बदलून टाकलाय.

घाईत मांडले. तसे मांडताना डोक्यात फार विचार नव्हते. मला मूळ धाग्यातले मुद्दे 'त्यांनी असे वागावे ही अपेक्षा' पेक्षा 'त्यांनी असे दिसावे' आणि 'त्यांनी असे बोलावे' असे वाटले.बुरखा हे पूर्ण चेहरा (कधीकधी डोळे पण )कव्हर करणारे वस्त्र, ए टी एम मध्ये हेलमेट न घालण्याबद्दल जो विचार असतो तोच इथे पण, पूर्ण चेहरा डोळे झाकणारे कोणतेही वस्त्र घालून कोणीही गुंड काहीही करु शकतील. (सेम अप्लाइज टु दुचाकी गाडीवर पूर्ण तोंड झाकणारा स्कार्फ गॉगल वाल्या महिला किंवा माणसे, पण नाईलाज आहे, ते नाही केले तर चेहर्‍यावर संध्याकाळी धुळीचे थर आणि ब्लॅकहेड असतात.)
मदरशांना जर चांगले बाहेरच्या जगात वावरलेले फिरलेले स्किल्ड टिचर्स मिळत नसतील तर जे उणेपुरे मिळत असतील ते त्यांच्या कुवतीने/इच्छेने संकुचित गोष्टी शिकवणार.
माझ्या अनेक मुस्लीम शिकलेल्या मैत्रिणी हौसेने सर्व प्रकारचे (फक्त पूर्ण अंगभर,म्हणजे पूर्ण ट्राउजर्,पूर्ण बाह्या आणि हेडस्कार्फ तो पण बाहेर इतका एकच निकष) कपडे घालतात, उकडीचे मोदक शिकतात, रेडीमेड नऊवारी नेसतात.सणावारांबद्दल विचारतात, आम्ही सगळ्या सणांच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो.
दंगलींमधल्या बातम्या/काही गावातल्या घटना आणि रोजचे जीवन,त्यात भेटणारी सामान्य सर्व धर्मांची माणसे ही दोन वेगळी समांतर विश्वे असावी असं वाटून जातं कधीकधी.

१) हिंदूंनी मिशी ठेवून, टिळा / गंध लावून, जान्हवे घालून घराबाहेर पडू नये. घरात हरकत नसावी स्मित

३) हिंदू स्त्रियांनी नवारी नेसू नये>>>>>>>>>>:हहगलो:

ॠन्मेष, मीअनु,
हरकत नाही. कसेही लिहिले तरी प्रत्येकजण आपल्याला हवा तोच अर्थ घेतो.
समाजात वावरताना चेहरा झाकावा लागणारा बुरखा ही एक सामाजिक जबरदस्ती आहे. प्रदुषण हे आजचे कारण. मूळ कारणाशी गल्लत नको.
दोन समाजांमध्ये दरी आहे. ती नाकारून फायदा नाही. त्यामुळे नेहमी ऐकू येणारे, बोलले जाणारे आक्षेप नोंदवले आहेत.

मी अनु हो तेच, हे दोन्ही मुद्दे सामाजिक आणि राष्ट्रीय सुरक्षिततेच्या द्रुष्टीकोणातून मांडायला हवे होते.

बाकी काय घालावे, काय खावे प्यावे, धार्मिक प्रथा परंपरा हे मुद्दे अगदीच नॉनपटणेबल आहेत. ढवळाढवळ करायचा हक्क नाहीये ईतरधर्मीयांना.

याऊपर त्यांचे सामाजिक प्रबोधन.. म्हणजे त्यांना योग्य शिक्षण मिळावे, त्या समाजाचा ऊत्कर्ष व्हावा, सामाजिक सुधारणा व्हाव्यात.. वगैरे वगैरे.. आणि अल्टीमेटली याचा देशालाही फायदा व्हावा अशी जर कोणाची प्रामाणिक इच्छा असली तरी या दोन धर्मातील तेढ पाहता हे हिंदूंनी सांगितले आणि ते तिथे मुसलमानांनी योग्य स्पिरीटमध्ये घेतले असे असते तर प्रश्नच नव्हता. आणि मुळात हे प्रॉब्लेम कमी अधिक प्रमाणात हिंदू धर्मातही आहेतच की.

ईथे आपल्या धर्मातील अनिष्ट प्रथा वा अंधश्रद्धांना विरोध करायला गेले की तुम्ही हिंदुद्वेष्टी आहात, तुम्हाला त्या लोकांमध्ये पण असे चालते ते दिसत नाही का वगैरे ऐकावे लागते, तर इथे परधर्मीय एकमेकांना सुधरवणार का Happy

आधी कठीण शब्द सोपे करायचे,
जान्हवी आणि नवरे असे ..
मग मालिकांतून अर्थ काढता येतील

दोन समाजांमध्ये दरी आहे. ती नाकारून फायदा नाही. त्यामुळे नेहमी ऐकू येणारे, बोलले जाणारे आक्षेप नोंदवले आहेत.>>> मुद्दा गंडलेला आहे. 'तुमच्या निरीक्षणानुसार' जर तुम्ही उद्धृत केलेल्या आक्षेपार्ह मुद्द्यांमुळे दोन समाजात दरी आहे असे तुमचे म्हणणे आहे कां?

navari असे गूगलून चक्क नऊवारी साडीबद्दलच्या लिंका दिसल्या. Rofl
देवा! कुठे नेऊन ठेवली आहे मराठी माझी..

जो पर्यन्त वरिल चार मुद्दे राष्ट्रिय सुरक्षेच्या किव्वा नागरिकान्च्या कर्त्यव्याच्या कामा आड येणार नसतील तर मला आक्षेप घेण्याचे काहीच प्रयोजन नाही.>>>> खरंय.

सईची आणि तुझी प्रत्यक्ष कडकडुन भेट होवो>>>>>>>> ऋन्मेऽऽष, आजकल पाँव जमींपर नही पडते मेरे.......

सर्वात महत्वाचा मुद्दा राहिलाय..

४ बायका आणि तलाक.

राकुंच्याकडून प्रेरणा घेऊन मी हिरवे बार हा स्वतंत्र लेख लिहित आहे. थोडे थांबावे.

नऊवारीला थोडक्या शब्दांत नवारीच बोलतात..
तुम्ही खुद्द मायबोलीलाच माबो बोलतात, आणि वर कुठे नेऊन ठेवलीय मराठी असेही म्हणतात. हे अनैथिकल आहे.

ऋन्मेष,
नऊ वार = ९ मीटर लांबीची साडी = ९ वारी. नेहेमी घालतात, ती 'गोल' साडी किंवा ५ वारी असते. थोडक्या शब्दात नवारी तुझ्याकडून पहिल्यांदा ऐकलं रे बाबा.

सईची आणि तुझी प्रत्यक्ष कडकडुन भेट होवो>>>>>>>> ऋन्मेऽऽष, आजकल पाँव जमींपर नही पडते मेरे.......

कडकडुन भेट (शिवाजी महाराज-अफझल खान, डेव्हीड-गॉलीयथ) म्हणजे (त्यात मिठी अदृश्य स्वरुपात गृहित धरतो) त्यात ह्याचा घुसमटुन जीव नाही का जाणार ?
(नसती पंचायत)- ह्याच्या ग्फ्रे चे पुढे काय ?

दीमा, स्पष्टी बद्दल धन्यवाद Happy
मला ते नऊ वारी पाच वारी प्रकरण माहीत होते. कारण आज्जी आमची नऊ वारी आणि आई पाचवारी.
पण मला वाटलेले की नऊवारीला नवारी लिहिलेले चालत असावे, काही हरकत नाही यापुढे नऊवारी असेच लिहीत जाईन.
मायबोलीवर येऊन सुधारलेला हा माझा सदुसष्टावा शब्द Happy

'नेसते' असे लिहिले तर ते त्यांचे मायबोलीवर येऊन सुधारलेले एकतिसावे वाक्य ठरले असते.

Pages