हिंदू-मुस्लिमांच्या एकमेकांकडून असलेल्या किमान अपेक्षा

Submitted by Rajesh Kulkarni on 23 December, 2015 - 14:37

हिंदू-मुस्लिमांच्या एकमेकांकडून असलेल्या किमान अपेक्षा
.

दररोजच्या आयुष्यात हिंदूचे मुस्लिमांबद्दल कोणते आक्षेप असतात? यावर होत असलेल्या चर्चेत वारंवार कोणते मुद्दे आलेले दिसतात? याबाबतीतल्या माझ्या निरिक्षणावरून वारंवार पुढे येणारे पुढील मुद्दे वाटतात.

१) मुस्लिमांनी घराबाहेर पडताना आपला धर्म घरात ठेवावा. स्कल कॅप टाळावी. दाढी वाढवू नये. वाढवलीच तर ती धार्मिक पद्धतीची नसावी.

२) मुस्लिमांनी आवर्जून स्थानिक भाषेमध्ये बोलावे. त्या भाषेत पारंगत व्हावे. हिंदीसदृश्य भाषेत बोलून आपले ‘वेगळेपण’ दाखवू नये.

३) मुस्लिम स्त्रियांनी बुरखा वापरू नये.

४) मुस्लिम मुला-मुलींनी मदरशांमध्ये न शिकता इतरांप्रमाणे नेहमीच्या शाळांमधून शिकावे.

आणखी कोणते मुद्दे चर्चेत असतात असे वाटते?

वरीलप्रमाणे वागणारे मुस्लिम चांगले नसतात असे मला अजिबात म्हणायचे नाही. मुस्लिमांनी देशाच्या मुख्य धारेत सहभागी होण्यासाठी काय करावे वगैरे जड भाषा मी वापरत नाही. माझ्यासाठी येथे राहणारे सगळेच भारतीय आहेत. कोणाच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही, आम्ही आम्हाला हवे तसेच वागणार, किंबहुना कोणाला आमच्याकडून काही अपेक्षा बाळगण्याचा अधिकार दिलाच कोणी, असेही काहींचे मत असू शकेल याचीही मला कल्पना आहे.

आता मुस्लिमांच्या नजरेतून हिंदूंबद्दल अपेक्षा कोणत्या असतील असे वाटते? अर्थात वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांच्या धर्तीवरच हिंदूंबद्दलही अनेक गोष्टी सांगता येतील.

+++++++++++++++

काही दळभद्री लोकांना या पोस्टमध्ये काही भलताच अजेंडा दिसला आहे. एकाचे उदाहरण खाली दिलेच आहे. नसलेले अजेंडे दिसणार्‍या अशा दिव्यदृष्टीच्या अशा लोकांनी येथे फिरकले नाही तरी चालेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे वाद घालणार्‍या सर्व लोकांना सतश्री अकालतक्ख, ईद मुबारक, दसर्‍याच्या शुभेच्छा, शरणं गच्छामी, नाताळच्या शुभेच्छा व सुबुध्दी मिळो हि ईश्वराल्लाशु चरणी प्रार्थना!! लवकर बरे व्हा व मनुष्याधर्माचे अनुयायी व्हा!!

कांपो , माझा देव तुम्ही त्यांच्या देवाच्या दावणीला का बांधला व त्याचे अवमूल्यन केले ? तुमचा निषेध. त्याचा स्वतंत्र उल्लेख पायजेल हाय

रा कु ,

देशाच राष्ट्रगीत वाजत असताना त्याचा किमान सन्मान करावा असा संकेत असताना अशी अपेक्षा
मुस्लिम बांधवांकडुन ठेवता येईल का ?

<<<<< ४) मुस्लिम मुला-मुलींनी मदरशांमध्ये न शिकता इतरांप्रमाणे नेहमीच्या शाळांमधून शिकावे. >>>

हा मुद्दा गैर लागु आहे,

कारण आताच झालेल्या सर्वेक्षणात भारत व पाकिस्तानात तयार झालेल्या अतिरेक्यात सुशिक्षीत, चांगल्या पगारावर काम करणारे युवक, मध्यम वयीन तरुण जास्त आहेत.

राजस्थान मधुन अटक झालेला आएसआएसचा गुर्गा महोम्मद सिराझुद्दीन हा आयोसी मध्ये मॅनेजर पोस्ट वर होता.

Proud

बघा... नायतर तुम्ही ! नुसतेच नथुरामाचे गाडगे घेउन अखंद भारत जप करत बसलेत .... डिवोशन काय असते ते शिका त्यांच्याकडुन.

आमच सोडा हो मोगा मिंया,

तुम्ही कधी तुमच डिव्होशन दाखवणार ? का तुमचे वांझोटे पराक्रम फक्त बायको पुढेच ?

Pages