हिंदू-मुस्लिमांच्या एकमेकांकडून असलेल्या किमान अपेक्षा
.
दररोजच्या आयुष्यात हिंदूचे मुस्लिमांबद्दल कोणते आक्षेप असतात? यावर होत असलेल्या चर्चेत वारंवार कोणते मुद्दे आलेले दिसतात? याबाबतीतल्या माझ्या निरिक्षणावरून वारंवार पुढे येणारे पुढील मुद्दे वाटतात.
१) मुस्लिमांनी घराबाहेर पडताना आपला धर्म घरात ठेवावा. स्कल कॅप टाळावी. दाढी वाढवू नये. वाढवलीच तर ती धार्मिक पद्धतीची नसावी.
२) मुस्लिमांनी आवर्जून स्थानिक भाषेमध्ये बोलावे. त्या भाषेत पारंगत व्हावे. हिंदीसदृश्य भाषेत बोलून आपले ‘वेगळेपण’ दाखवू नये.
३) मुस्लिम स्त्रियांनी बुरखा वापरू नये.
४) मुस्लिम मुला-मुलींनी मदरशांमध्ये न शिकता इतरांप्रमाणे नेहमीच्या शाळांमधून शिकावे.
आणखी कोणते मुद्दे चर्चेत असतात असे वाटते?
वरीलप्रमाणे वागणारे मुस्लिम चांगले नसतात असे मला अजिबात म्हणायचे नाही. मुस्लिमांनी देशाच्या मुख्य धारेत सहभागी होण्यासाठी काय करावे वगैरे जड भाषा मी वापरत नाही. माझ्यासाठी येथे राहणारे सगळेच भारतीय आहेत. कोणाच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही, आम्ही आम्हाला हवे तसेच वागणार, किंबहुना कोणाला आमच्याकडून काही अपेक्षा बाळगण्याचा अधिकार दिलाच कोणी, असेही काहींचे मत असू शकेल याचीही मला कल्पना आहे.
आता मुस्लिमांच्या नजरेतून हिंदूंबद्दल अपेक्षा कोणत्या असतील असे वाटते? अर्थात वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांच्या धर्तीवरच हिंदूंबद्दलही अनेक गोष्टी सांगता येतील.
+++++++++++++++
काही दळभद्री लोकांना या पोस्टमध्ये काही भलताच अजेंडा दिसला आहे. एकाचे उदाहरण खाली दिलेच आहे. नसलेले अजेंडे दिसणार्या अशा दिव्यदृष्टीच्या अशा लोकांनी येथे फिरकले नाही तरी चालेल.
भारतातील जातियतेला लावला तर
भारतातील जातियतेला लावला तर वरिष्ठ जातीतील लोकांना भेदभाव आणि अत्याचाराबद्दल जवाबदार ठरवले तर त्या लोकांच्या पोटात का दुखु लागते
>>
ठरवलं तर ? आय्यो, कधीच ठरवून झालंय न? काय पण काय
आणि पोटात दुखू लागतंय तर इनो द्यायचं त्यांना!
रथयात्रावाले विकास यात्री
रथयात्रावाले विकास यात्री झालेत > काय सांगतात ? ऐकावे ते नवलच.
मग विकासयात्रींनी मंदीर वही बनायेंगे ची हाक कशाला दिली? विकासरथाचे टायर पंक्चर झाले का
रथाचे चाक पंक्चर होते मका
रथाचे चाक पंक्चर होते
मका वाटल लाकडाची चाक असतात रथाले.
अहो आधुनिक रथ आहे ना विकासाचा
अहो आधुनिक रथ आहे ना विकासाचा "मेक इन इंडीया"वाला
मग तो लाकडाचा कसा असेल?
काय तात्या दिमाग कि बत्ती जलाओ मिंटोफ्रेश खाओ
पण भारतीय मुस्लीम, इतरत्रच्या
पण भारतीय मुस्लीम, इतरत्रच्या घटनामुळे उद्विग्न होऊन इथे गोंधळ घालतो, तेव्हा, तुमच ९२च आर्ग्युमेंट टिकत नाही हो >> सहमत. तुमच्या प्रतिसादामधिल 'उद्विग्न' हा शब्द बरंच काही सांगुन जातो.
जगभरात जेव्हा वहाबी वारे जोरात वाहत होते, तेव्हा भारतीय मुसलमान बर्यापैकी अलिप्त होता. जातीय दंगलीसारख्या घटना या दरम्यान घडल्याही, पण त्यामुळे असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनात कधिच नव्हती. मशिद पाडणे आणि त्यानंतरच्या दंगली यामुळे संपूर्ण देशातील मुस्लमानांमधे असुरक्षिततेचं वातावरण पैदा झालं आणि हा समाज अधिकच घेट्टो मधे गेला. 'आता अस्तित्व टिकवायचं तर कडवं बनलंच पाहिजे' हा विचार रुजवण्यासाठी वहाबींना पोषक जमिन मिळाली. दुर्दिवाने मुस्लिम समाजात विचारवंताची कमतरता आहे. त्यामुळे वहाबी विचाराधारा जोमात पसरली. इतरत्र होणार्या घटनांमुळे (उदा. आझाद मैदान प्रकरण)ईथे प्रतिसाद उमटणे हा अत्यंत घातक आणि चुकीचा प्रकार घडतो आहे हे मान्य आणि भारतीय मुस्लिमांनी ते कतई करता नये.
इतरत्र होणार्या घटनांमुळे
इतरत्र होणार्या घटनांमुळे (उदा. आझाद मैदान प्रकरण)ईथे प्रतिसाद उमटणे हा अत्यंत घातक आणि चुकीचा प्रकार घडतो आहे हे मान्य आणि भारतीय मुस्लिमांनी ते कतई करता नये.व >> याला +१००००
चला, सहमती होऊन राहिली आच
चला, सहमती होऊन राहिली
आच नाय चालायचं ...
जे हो गया त्याचं माप त्याच्या पदरात घालून ...
पुढ काय करायचं?
Tuljapur hun akkalkot la jat
Tuljapur hun akkalkot la jat astanacha anubhav
Ratri Ushir zalyamule Amhri Driver chayach olakhichya kutumbakade mukkam karnyache tharavale , Jeur yethe
Ratri Pohachayla ushir jhalyane barach andhar padla hota
Tyamule Amhi tya yajmanache chehare vyavastit pahu shaklo nahi
Tyach diwshi gavchi jatra (shankarachi ) aslyane puranpoli, amti, bhat, asa bet hota amhi potbhar jewle
sakali amchya lakshat ale ki he yajman ek muslim kutumba ahe
छान.
छान.
त्यामानाने अनेक ईश्वरवादी
त्यामानाने अनेक ईश्वरवादी सौम्य, सहिष्णू असतात. इतिहासाकडे पाहिले तरी हे स्पष्ट दिसेल. >>>
कुठला इतिहास सहीष्णू आहे ? एक दोन उदाहरणं द्याल का ? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत चोखा मेळा आणि इतर संतांना जे सहन करावं लागलं त्याला सहीष्णूता म्हणायचंय का ? की गावकूसाबाहेरच्या लोकांनी सहन केलं त्याला सहीष्णूता म्हणायचंय ? की शंबूकाच्या हत्येला सहीष्णूता म्हणायचं की कर्णाच्या वाट्याला आलेल्या अवहेलनेला असहीष्णूता म्हणायचंय ? की मनुस्मृती आणि इतर स्मृतींनी शूद्र-अतिशूद्रांना ठोठावलेल्या धार्मिक शिक्षांना सहीष्णूता म्हणायचंय ?
की हे सहन करूनही याच समाजव्यवस्थेत राहणा-यांना सहीष्णू म्हणायचंय तुम्हाला ? ज्यांनी सहन केलं त्यांच्या सहनशीलतेमुळे जे काही स्ट्रक्चर टिकून आहे त्याला तुम्ही हिंदू धर्म म्हणत आहात काय ? ज्यांना सहन करता आलेलं नाही ते मुसलमान झाले असतील तरी हे स्ट्रक्चर कित्येक शतकं बदललेलं नाही त्याला सहीष्णूता म्हणायचं ? महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, राजा राममोहन राय असे लोक झाले नसते तर भारत, पाकिस्तान , अफगाणिस्तान मधे नेमका काय फरक असता बरं ?
ज्याला तुम्ही हिंदू धर्म म्हणताय त्याबाबत मागच्या प्रतिसादांमधे काही प्रश्न विचारलेले आहेत. माझे प्रतिसाद स्कीप केले नसतेत तर बगलमारू प्रतिसादांवरची ही चर्चा इथपर्यंत पोहोचलीच नसती. गैरसोयीचे प्रतिसाद स्कीप केले की संपलं नाही का ? त्या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने पुढचे प्रश्न विचारायचे राहून गेलेले आहे.
पुन्हा पुन्हा गोल घुमके तिथेच येण्या ऐवजी ............
भारी पोस्ट कापोचे.
भारी पोस्ट कापोचे.
कापोचे, कोणता धर्म सहिष्णू
कापोचे,
कोणता धर्म सहिष्णू आहे ते सांगून टाका ... म्हणजे मी तिकड कन्व्हर्ट होऊन जातो
योग्य प्रश्न पण ही लोक उत्तर
योग्य प्रश्न पण ही लोक उत्तर देणार नाही कारण ते सोईस्कर नाही. त्यांच्या सोईचे जे आहे तेच बरोबर बाकीचे सर्व वेडे असे त्यांचे म्हणणे आहे.
म्हणजे मी तिकड कन्व्हर्ट होऊन
म्हणजे मी तिकड कन्व्हर्ट होऊन जातो > सांगितला तर होशीला का कन्वर्ट. आधी स्टॅम्प पेपरवर लिहून द्या.
तोंडाचा बाता नको
सांग की आधी
सांग की आधी
तात्या, कन्वर्ट कशाला होता ??
तात्या, कन्वर्ट कशाला होता ?? त्यापेक्षा सहिष्णु व्हा .
कापोचे +१११११
कापोचे +१११११
सहिष्णू होणे त्यांच्याकडून
सहिष्णू होणे त्यांच्याकडून शक्य नाही हे त्यांना कळले म्हणून तर कन्वर्ट होत आहे बरोबर ना तात्या
मी हायच की सहिष्णू ... आमचे
मी हायच की सहिष्णू ... आमचे परममित्र सर्वधर्मीय हायेती!! आणि त्या सर्वांसोबत उत्तम पंगती होतात.
आमचा माबो आयडी अजून
आमचा माबो आयडी अजून सुरवातीपासून जिवंत आहे
---> म्हणजेच मी सहिष्णू आहे
चला ... तुम्ही सुरु ठेवा
चला ... तुम्ही सुरु ठेवा चर्चा. मी आता श्रीखंड पुरी हादडायला चाललोय.
तेव्हा ... तुम्हीदेखील सुट्ट्या एन्जॉय करा!
तात्या तुम्ही तरी द्या माझ्या
तात्या
तुम्ही तरी द्या माझ्या प्रश्नांची उत्तरं.
तुमच्या प्रश्नाचा अर्थ कुठलाही धर्म सहीष्णू नाही असा आहे की आजवरच्या आयुष्यात तुम्हाला सहीष्णू धर्मच सापडलेला नाही अस काहीसं आहे ? की हिंदू धर्म सहीष्णू आहे इतरांपेक्षा असं म्हणायचंय की जगात कुठेही सहीष्णू लोक नाहीत फक्त भारतातच आहेत असं म्हणायचं आहे ? स्पष्ट बोला की राव, का लाजताय ?
आजवरच्या आयुष्यात तुम्हाला
आजवरच्या आयुष्यात तुम्हाला सहीष्णू धर्मच सापडलेला नाही अस काहीसं आहे
>>
मलातरी सापडला नाहीये! म्हणुनतर विचारतोय न?
मुस्लिमांनी बाहेर येऊन कुठला
मुस्लिमांनी बाहेर येऊन कुठला पेहराव करावा, दाढी ठेवावी की ठेवू नये यावरून त्यांच्याशी व्यवहार ठेवतांना अडचण का व्हावी ? समोरची व्यक्ती तिची ओळख मुसलमान आहे हे तिच्या केशभूषा, वेशभूषेतून करून देत असेल तर त्रास होण्याचं कारण काय ? तिची ही आयडेण्टिटी तुमच्या सहीष्णूतेची परीक्षा पाहते कि काय ?
बरं दुस-याला सल्ले देतांना, त्याच्याकडून अपेक्षा ठेवत असतांना मात्र आपण सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर दहा दिवस गणपती बसवायचे, नऊ दिवस नवरात्रीचे मंडप टाकायचे, विसर्जन मिरवणुका काठिकाणी, दहीहंडीला रस्ते अडवून भिंतीच्या भिंती लावायच्या, रहदारी बंद करून टाकायची, वारीला रस्ते बंद करून टाकायचे, दिवाळीला रस्त्यावर फटाके उडवायचे................ याला मुस्लीम कधी आक्षेप घेत नाहीत याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे.
की हे सगळं "मुख्य प्रवाहात" येतं ? आणि दाढ्या ठेवणं "हटके" ठरतं ? हिंदूंनी आपला धर्म घरात ठेवावा अशी अपेक्षा त्यांनी ठेवली तर चालवून घेणार की पाकिस्तानात पाठवणार ? ( काका गेले होते वाटतं हिंदुस्थानातून पाठवण्यात येणा-या धार्मिक / राजकीय गुन्हेगारांची यादी घेऊन पाकच्या शेरीफ कडे..)
मलातरी सापडला नाहीये!
मलातरी सापडला नाहीये! म्हणुनतर विचारतोय न? >> माझ्या पोस्टसचा हा विषय आहे का ? तुम्ही मला विचारताय म्हणून विचारलं.
इथे हिंदू धर्म सहीष्णू आहे अशा अर्थाच्या पोस्ट्स आहेत, त्यावरच्या माझ्या शंका मी विचारलेल्या आहेत, त्याचा निचरा आधी करू.. आधी या धाग्याच्या विषयानुरूप जे प्रश्न विचारलेले आहेत त्याचा निचरा आधी करू.
कुठला धर्म जास्त सहीष्णू हा वेगळा प्रश्न आहे, त्यावर त्यानंतर वेगळी चर्चा करू , कसें ? भरकटत जाण्याला ब्रेक लावायलाच हवा ना कुणी तरी ? पटतें नां ?
(No subject)
कापोचेंच्या पोस्टचं पहिलं
कापोचेंच्या पोस्टचं पहिलं वाक्य :
" "त्यामानाने अनेक ईश्वरवादी सौम्य, सहिष्णू असतात. इतिहासाकडे पाहिले तरी हे स्पष्ट दिसेल." " >>>
(डबल अवतरण चिन्हे कारण त्यांनीही कोणाला तरी उद्ढ्रुत केलंय.)
शेवटचे वाक्य : "पुन्हा पुन्हा गोल घुमके तिथेच येण्या ऐवजी "
तात्यांचा प्रश्न : "कोणता धर्म सहिष्णू आहे ते सांगून टाका ... म्हणजे मी तिकड कन्व्हर्ट होऊन जातो"
आता तात्या गोल गोल घुमताहेत की शेंडेनक्षत्रांच्या अनुमानावर काट मारताहेत काही कळेना.
आता तात्या गोल गोल घुमताहेत
आता तात्या गोल गोल घुमताहेत की शेंडेनक्षत्रांच्या अनुमानावर काट मारताहेत काही कळेना.
>>
त्यावरच्या माझ्या शंका मी विचारलेल्या आहेत, त्याचा निचरा आधी करू.. आधी या धाग्याच्या विषयानुरूप जे प्रश्न विचारलेले आहेत त्याचा निचरा आधी करू.
>>
काय राव ... समद इस्कटून सांगाव लागत! कोण म्हणतोय हिंदू धर्म सहिष्णू आहे?
तुमी सुरु ठेवा आता पुढे.
कोण म्हणतोय हिंदू धर्म
कोण म्हणतोय हिंदू धर्म सहिष्णू आहे? >> कोण तरी म्हणतंय म्हणून पोस्टावं लागलंय ना भौ ?
तुम्ही नाही म्हणताय तर मग त्यांना परस्पर उत्तर मिळालं. पण तुम्ही मला प्रश्न विचारला म्हणून तो माझ्या पोस्टचा विषय आहे का असाही प्रश्न विचारला होता हो !
आता तुम्ही निचरा करून टाकलाच आहे तर तुमच्या प्रश्नाकडे वळू.
धर्म सहीष्णू असणे म्हणजे काय ? प्लीज एक्स्प्लेन !
ओ तात्यानु, कधी तुमी
ओ तात्यानु, कधी तुमी कुंपणाच्या अल्याड दिसता, कधी पल्याड. कधी कुंपणावर. काय करावं माणसानं? तुमचा आयडी शिप्टडुटीत येगयेगळी लोक चालवत्यात काय?
Pages