हिंदू-मुस्लिमांच्या एकमेकांकडून असलेल्या किमान अपेक्षा

Submitted by Rajesh Kulkarni on 23 December, 2015 - 14:37

हिंदू-मुस्लिमांच्या एकमेकांकडून असलेल्या किमान अपेक्षा
.

दररोजच्या आयुष्यात हिंदूचे मुस्लिमांबद्दल कोणते आक्षेप असतात? यावर होत असलेल्या चर्चेत वारंवार कोणते मुद्दे आलेले दिसतात? याबाबतीतल्या माझ्या निरिक्षणावरून वारंवार पुढे येणारे पुढील मुद्दे वाटतात.

१) मुस्लिमांनी घराबाहेर पडताना आपला धर्म घरात ठेवावा. स्कल कॅप टाळावी. दाढी वाढवू नये. वाढवलीच तर ती धार्मिक पद्धतीची नसावी.

२) मुस्लिमांनी आवर्जून स्थानिक भाषेमध्ये बोलावे. त्या भाषेत पारंगत व्हावे. हिंदीसदृश्य भाषेत बोलून आपले ‘वेगळेपण’ दाखवू नये.

३) मुस्लिम स्त्रियांनी बुरखा वापरू नये.

४) मुस्लिम मुला-मुलींनी मदरशांमध्ये न शिकता इतरांप्रमाणे नेहमीच्या शाळांमधून शिकावे.

आणखी कोणते मुद्दे चर्चेत असतात असे वाटते?

वरीलप्रमाणे वागणारे मुस्लिम चांगले नसतात असे मला अजिबात म्हणायचे नाही. मुस्लिमांनी देशाच्या मुख्य धारेत सहभागी होण्यासाठी काय करावे वगैरे जड भाषा मी वापरत नाही. माझ्यासाठी येथे राहणारे सगळेच भारतीय आहेत. कोणाच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही, आम्ही आम्हाला हवे तसेच वागणार, किंबहुना कोणाला आमच्याकडून काही अपेक्षा बाळगण्याचा अधिकार दिलाच कोणी, असेही काहींचे मत असू शकेल याचीही मला कल्पना आहे.

आता मुस्लिमांच्या नजरेतून हिंदूंबद्दल अपेक्षा कोणत्या असतील असे वाटते? अर्थात वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांच्या धर्तीवरच हिंदूंबद्दलही अनेक गोष्टी सांगता येतील.

+++++++++++++++

काही दळभद्री लोकांना या पोस्टमध्ये काही भलताच अजेंडा दिसला आहे. एकाचे उदाहरण खाली दिलेच आहे. नसलेले अजेंडे दिसणार्‍या अशा दिव्यदृष्टीच्या अशा लोकांनी येथे फिरकले नाही तरी चालेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ख्रिस्ती आणि शीख धर्मियांना "पास" मिळालाय का ?

नाही म्हणजे बुल्गॅनिन दाढी, ख्रिसमस सेलिब्रेशन्स, काही भागात सांताक्लॉज फिरणे, ख्रिसमस ट्री इ. वर कृपादृष्टी नाही झालेली दिसत.
आणि शीख धर्मियांबद्दल काय म्हणणे आहे ? त्यांना एकदा सांगून पहा की.
कि शीख धर्मियाची दाढी सेक्युलर आणि मुस्लिमांची धर्मांध असा काही (भग/फत)वा निघालाय ? सध्या वृत्तपत्रं आणि न्यूज चॅनेल्स पासून दूर असल्याने काही कल्पना नाही. कृपया अपडेट करावे ही नम्र विणंती.

बिस्मिल्ला करणे म्हणजे काय?>>>>>> रश्मींनी सांगितल्याप्रमाणेच आहे.श्रीगणेशा करणे, चांगली सुरुवात करणे.

मला ही पोस्ट निरर्थक वाटते. लोकांनी 'कोण कसे रहावे' हे ठरवू नये. दाढी वाढली असेल किंवा बुरखा घातला असेल आपण काही क्षणांसाठी संपर्कात येत असतो. एवढ्या क्षुल्लक गोष्टीचा विचार करून कुणीतरी वेळ वाया घालवत असेल तर तो रिकामटेकड़ा समजावा.

हिंदू-मुस्लिमांच्या एकमेकांकडून असलेल्या किमान अपेक्षा>>>>> प्यार बाटते चलो, प्यार बाटते चलो
क्या हिन्दु क्या मुसलमा हम सब है भाई भाई. प्यार बाटते चलो

मागे मी लिहीले होते त्याप्र्माणे अ‍ॅड करत जावे.

चाय बाटते चलो, रेशन बाटते चलो, सब्जी बाटते चलो, कॉपी बाटते चलो, खाना बाटते चलो, पानी बाटते चलो! हुश्श!

मी प्राजक्ता,
तुम्हाला या पोस्टचा अर्थच कळलेला नाही. तरीही तुम्ही असे लिहिता त्याबद्दल तुमचे खरोखर कौतुक वाटते. अभिनंदन.

कुलकर्णी साहेब,

इथे वाचून प्रतिसाद देणार्‍यांपैकी बहुतेकांना तुम्ही, 'तुम्हाला या पोस्टचा अर्थ कळलेला नाही' अशा अर्थाचे प्रतिसाद दिले आहेत. (बाकीच्यांना आधीच ते देऊन झालेत, म्हणून अध्यहृत आहेत असे समजू.)

जर तुम्ही काय म्हणताय हे मेजॉरिटी वाचकांना समजत नाहिये, तर तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते बापड्या अल्पमती वाचकांना थोडं अधिक समजवून सांगणार का?

दीड मायबोलीकर,
अमितव यांच्या दुसर्‍या कमेंटवर यावर मी याबद्दल आणखी लिहिलेच आहे. तरी कोणाच्या डोक्यात प्रकाश पडत नसेल तर मी त्याबाबत काही ठेका घेतलेला नाही. मेजॉरिटी लोकांना काय लिहिले अाहे ते समजत नाही आणि तरीही वाटेल त्या कमेंट्स करत बसतात, विषयांतर करत बसतात, ही नालायक मनोव्ृत्तीही येथे कोणाला दिसत नाही. मागे अनेकदा म्हटल्याप्रमाणे अशा रिकामटेकड्यांना आणि निर्बुद्धांना ब्लॉक करन्याची सोय येथे नाही, त्याचा गैरफायदा घेतला जात आहे.
वैयक्तिक कमेंट्स न करताना गंभीरपणे चर्चा करण्यास मी नेहमीच तयार आहे. तसा एकजण जरी मिळाला तरी पुरेसे आहे. पण या कमेंट्सच्या कचर्‍यात ते शोधण्याची इच्छाही होत नाही. एरवी बाकीच्यांनी येथे कमेंट तर सोडाच हजेरीही लावली नाही तरी मला काही फरक पडत नाही हे तर मी आधीच सांगितले आहे. निर्लज्जांसाठीचे निवेदन प्रत्येक वेळी टाकणे मी मध्यंतरी थांबवले होते, ते पुन्हा सुरू करेन.
तुम्हालाही हे दिसत नाही. तेव्हा सोडून द्या. तुमच्यासह सगळे बागडा.

कम ऑन.

अहो, वाचणारे सगळेच प्रतिसाद लिहित नाहीत. ज्यांनी लिहिले त्यांना तरी अधिक विस्कटून सांगा? नाहीतर त्यांचा व माझाही ग्रह पक्काच होतो.

तुम्ही वा मी, आपण लिहितो ते आपले स्वत:चे मत असते की नाही? मग त्या मताबद्दल उत्तर आल्यावर आपली जी चिडचिड होते, ती वैयक्तिक नसते का? तुमचं स्वतःचं डिस्क्लेमर वाचा बरं? ते वैयक्तिक नाहिये का?

दोन व्यक्ती एकमेकांशी बोलतात ते जनरलाईज कसे करायचे ते मला समजत नाही. आताही हा प्रतिसाद वैयक्तिक तुम्हालाच लिहितोय की नाही? हा कसा काय जनरलाईज करू?

स्वतःच्या डोक्यातला काळोख ईथे पसरवुन इतरांच्या डोक्यात पडलेल्या/न पडलेल्या प्रकाशाची उठाठेव कशाला करायची?? चर्चा करायची तर हिंदू वि. ईतर धर्म करा. की दरी फक्त हिंदु आणि मुसलमानामधेच आहे असे तुमचे निरीक्षण सांगते? आणि तुम्ही काढलेले निष्कर्ष किती हिंदुंशी चर्चा करुन काढलेत.? याबाबत तुमचे स्वत:चे मत काय?? आधी विचारलेला प्रश्न पुन्हा विचारतो की तुम्ही दिलेल्या ४ कारणामुळेच हिंदु-मुसलमान दरी पडते आहे कां?? चर्चे दरम्यान प्रश्न विचारले की तुम्ही समोरच्याची अक्कल काढुन गायब होता. त्यामुळे तुमच्यात आणि चर्चा करु पाहणार्‍यांच्यात दरी निर्माण होत आहे याची तुम्हाला जाणिव होते की नाही?

विट्ठल,
तुमच्या डोक्यातला प्रकाश पाहिलेलाच आहे.
मी चार मुद्दे उदाहरणादाखल मांडलेले अाहेत, जे सर्वात जास्त चर्चिले जातात. तेव्हा तेवढ्यामुळेच दरी निर्माण होते का हे उलटे मलाच विचारण्याचा तुमच्यासारखा शहाणपणा मी प्रथमच पाहिलेला नाही. मी किती हिंदुंसी चर्चा करून निष्कर्ष काढला हा प्रश्नही त्याच लायकीचा. तेव्हा चर्चेच्या नावाखाली तुम्ही वाटेल ते विचाराल आणि तुमचे समाधान करायला मी माझा वेळ तुमच्यावर वाया घालवीन अशी अपेक्षा ठेवू नका.. वाचता येत असते आणि वाचलेले समजत असते, तर ही स्थिती झाली नसती. तेव्हा इथे फिरकला नाहीत तरी चालेल. एवढे सागूनही येथे माझ्या पोस्ट्सवर सातत्याने घाण करणारे अनेकजन अाहेत. पुन्हा येथे अालात तर तुम्ही त्यांच्यातलेच असे समजेन.

>> धार्मिक पद्धतीची दाढी >>>>>>>>> हाहा

अज्ञानापोटी उद्भवलेले हास्यनिवारण करण्याचा एक प्रयत्न
प्रेषित महंमद म्हणाले "मिशा शक्य तितक्या साफ करा आणि दाढी मुक्तपणे वाढू द्या"
इब्न उमर, हदीस ४९८.

तस्मात, मुस्लिम लोकांनी दाढी कशी राखावी ह्याकरता धर्माचे स्पष्ट आदेश आहेत. तेही थेट प्रेषिताच्या तोंडून आलेले.

भाषेबाबत मलाही आक्षेप आहेत. तमिळ मुस्लिम अस्खलित तमिळ बोलतो. मल्याळी मुस्लिम अस्खलित मल्याळी बोलतो. पण मराठी मुस्लिमाला अनेक पिढ्या महाराष्ट्रात वाढलेल्या असल्या तरी मराठी बोलणे मान्य नाही. मुस्लिम बापाने मुलाला मराठीत बोलतो म्हणून कानफटवला असल्याच्या कहाण्या ऐकल्या आहेत. आपण ऊर्वरित समाजापेक्षा वेगळे आहोत हे जाणीवपूर्वक जोपासण्याचा हा एक प्रयत्न आहे. बाकी चालीरीती वेगळ्या असणे हे स्वाभाविक आहे पण भाषेचा इतका तिटकारा का? उर्दू ही काही इस्लामची भाषा नव्हे. इस्लामला सर्वश्रेष्ठ वाटणारी एकमेव भाषा म्हणजे अरबी.
अशा प्रकारे मराठीशी फटकून रहाणे मुस्लिमांकरताच घातक आहे. त्यांना हवी ती भाषा बोलण्याचे कायद्याने पूर्ण स्वातंत्र्य आहे ही जाणीव आहे पण त्यांनी स्थानिक भाषा आपली मानली तर नक्की काय नुकसान आहे ते मला कळत नाही.

आपले अमुल्य विचार, अनुभव लोकान्पर्यन्त न्यावे म्हणुन आपण बाफ सुरु करतो असा माझा समज आहे.

वाचकान्नी प्रामाणिक शन्का विचारल्यास, उपस्थित केल्यास त्या शन्कान्चे निरसन करण्याची जबाबदारी लेखकाची आहे. वाचकान्च्या मनात शन्का निर्माण होणार असतील, मनात शन्का रहात असतील तर तुमच्या लिहीण्याचा उद्देश सफल होणार नाही आणि सन्वाद (communication) पुर्ण होणार नाही. नुकसान लिहीणार्‍याचे तसेच प्रामाणिक शन्का असणार्‍या दोघान्चेही होते...

उदय,

आपल्या वरील पोस्टीस अनुमोदन.

कुलकर्णी, कोणी मुद्दे विचारत असतील तर तुम्ही उत्तरे द्या तर Happy

shendenaxatra,,

भरपूर मराठी मुसलमान, मराठी बोलतात.

पण मराठी मुस्लिमाला अनेक पिढ्या महाराष्ट्रात वाढलेल्या असल्या तरी मराठी बोलणे मान्य नाही.
<<
अतीशय चुकीची समजूत

बहुते सर्वच महाराष्ट्रीयन मुसलमान अस्ख्लित व सुंदर मराठी अथवा लोकल बोली (उदा. आमची अहिराणी वा कोकणी) बोलणारे आहेत.

अलिकडच्या काळात नव्याने स्थलांतरित झालेल्या बिहारी व बंगाली मुस्लीमांकडून चांगली मराठी बोलण्याची अपेक्षाही करणे कठीण आहे. हीच परिस्थीती बिहारी भैया लोकांच्या बाबतीत आहे, त्यासाठी मुसलमानांकडेच बोट कसे काय दाखवले जाते हे समजत नाही.

दुसरी गोष्ट : आपणा मराठी लोकांची सवयच मुळात समोरच्याच्या तोंडाकडे पाहून दाढी दिसली मोडकीतोडकी हिंदी सुरु करायची आहे. आपणच मराठी बोलायला सुरुवात केली तर शुद्ध मराठीत उत्तर येतं. करून पहा.

बहुते सर्वच महाराष्ट्रीयन मुसलमान अस्ख्लित व सुंदर मराठी अथवा लोकल बोली (उदा. आमची अहिराणी वा कोकणी) बोलणारे आहेत.>>>>>>>>>>> खरंच आहेत.लहानपणी पाहिले/ऐकले होते.पण घरी / आपापसात बोलताना मरठीमिश्रित उर्दू बोलतात.हेही तितकंच खरंय.कदाचित जमातीचा पगडा असू शकेलही.

माझा तामिळनाडुतील छोट्या वास्त्यव्यातील अनुभव असा आहे की, आम्हाला तामीळ वाचता येत नाही फक्त बोलता येत / बोललेली समजते हे अभिमानाने सांगितले जात होते नव्या मुस्लीम पिढीकडुन.

त्याहीपेक्षा जस्त अभिमान आणि कौतुक ओसंडुन वाहत होते आम्हाला अजिबातच देवनागरी वाचता येत नाही हे सांगताना.

बाहेर आलेल्या लोकांना स्थानीक भाषा म्हणुन हिंदुस्थानीची ओळख करुन दिली जात होती आणि तिच शिकण्याचा आग्रह होत होता. यांच्या गावाची स्थानीक भाषा तामीळ नव्हती.

तस्मात, मुस्लिम लोकांनी दाढी कशी राखावी ह्याकरता धर्माचे स्पष्ट आदेश आहेत. तेही थेट प्रेषिताच्या तोंडून आलेले.

<<

हदीस किंव हदीथ हे 'आदेश' आहेत, हा थोडा चुकीचा समज वाटतो.

या धर्मात, एक कयामत का दिन असेल ज्या दिवशी सर्वांच्या पापपुण्याचा हिशोब परमेश्वर घेईल अशी कन्सेप्ट आहे. तेव्हा त्या दिवसापर्यंत "पुण्य" करत रहायचे, शक्य तितके 'पाक' वागायचे असा प्रयत्न धार्मिक मुसलमान करीत असतात.

पाप/चूक न करता कसे जगावे? तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे पैगंबरांनी जसे केले, वा वागले, तसे वागणे. हदीथमधे पैगंबरांच्या दैनंदिन वागण्याचे वर्णन आहे. किंवा अमुक प्रसंगी कसे वागावे याबद्दल त्यांनी केलेले मार्गदर्शन.

अजिबातच दाढी वा मिश्या न राखणारे अनेक मुसलमान पाहण्यात आहेत, व त्याप्रकारे दाढी न राखल्याने त्यांच्या मुसलमान असण्यात काही अडचण आल्याचे पाहण्यात नाही.

शीख धर्मातही दाढी राखण्याबद्दलचे आदेश आहेतच की.

अनेक मराठी मुस्लिमांना मराठी येतं. अनेक जण मराठीतून शिकले आहेत. आणि ते हा धागा वाचत असतील तर त्यांना काय वाटत असेल??? आवरा आता हे polarisation..कोणीतरी सतत पाहिजेच् का bashing साठी? कधी मुस्लिम कधी ब्राम्हण कधी दलित..

सांगली-मिरज-कोल्हापुर-रत्नागिरी या भागातले मुसलमान मराठीच बोलतात, खरं तर त्या भागातलीच बोलीभाषा बोलतात. कोंकणी मुसलमानांची स्वतःची अशी एक वेगळीच बोली आहे, ऐकायला प्रचंड गोड. कालच ईद निमित्त आमच्या ईथल्या मशिदीमधुन मराठीत 'प्रवचन' देत होते. पण लेखक महाशय बहुधा आपला मोहल्ला सोडुन बाहेर कुठे फिरले नसावेत. त्यामुळे त्यांचे निरीक्षण हे स्वतःपुरतेच असावे. आणि वर दुसर्‍याला 'ईथे येउ नका' असे बजावले की आपल्या पांडित्याची टिमकी वाजली म्हणुन खुष होत असावेत.

मराठी कुटुंबात जाणीवपूर्वक संस्कृतचं प्रेम जोपासलं तर ते संस्कृतीसंवर्धन, भाषाप्रेम.. आणि अर्धमागधी, पाली भाषेतून विकसित झालेली भाषा ग्रामीण , कम अस्सल !!

व्यवहारात सर्वत्र इंग्रजी भाषा वापरणारे लोक मुस्लुमाना मराठीच बोला हा आदेश बोलतात तेंव्हा हसू येते.

सनातनच्या पुस्तकातही दाढी मिशा कपडे यावर विवेचन आहे असे वाटते. त्याचे काय करणार ?

>>सनातनच्या पुस्तकातही दाढी मिशा कपडे यावर विवेचन आहे असे वाटते. त्याचे काय करणार ?

"सनातनचे पुस्तक" हे हिंदूंनी कसे वागावे ह्याकरता असणारा एकमेव संदर्भग्रंथ आहे का? मला वाटते तसे आजिबात नाही. उलट कुराण + हदिस हे समीकरण हे मुस्लिमांकरता मार्गदर्शक संदर्भग्रंथ मानले जाते हे निर्विवाद सत्य आहे तेव्हा हिंदूही तसलेच आहेत हा पूर्वग्रह नष्ट करता आला तर पहा. एकमेव प्रेषित, एकमेव धर्मग्रंथ हे हिंदू धर्मात आढळत नाही तेव्हा तो कर्मठपणा, ताठरपणाही ह्या धर्मात आढळणार नाही हे लक्षात घ्या. दोन्ही धर्म एकाच पारड्यात घालून तोलायची कसरत करू नका. तोंडघशी पडाल.

एकमेव प्रेषित, एकमेव धर्मग्रंथ हे हिंदू धर्मात आढळत नाही >>> देव पण एक नाही आणि लग्न आदि विधी सुद्धा सेम नाहीत. का बरं असं ? कधी धर्मसंस्थापकच नाही असं म्हणायचं, कधी धर्मसंस्थापक म्हणून भगवान श्रीकृष्णाकडे बोट दाखवायचं तर कधी आद्य शंकराचार्यांकडे, कधी धर्मग्रंथ म्हणून वेदांकडे बोट दाखवायचं तर कधी भगवदगीतेकडे, कधी वेद अपौरुषेय असल्याने वेद स्वर्निमित आहेत असं म्हणायचं, कधी हिंदू ही संस्कृती आहे असं म्हणायचं तर कधी हिंदू ही वे ऑफ लाईफ आहे असं म्हणायचं. नेमका हिंदू धर्म कोणता हे कुणी समजावून सांगेल का ?

फुसके बार प्रमाणे हा इश्यु ऑनर किलिंगसोबत घेतला असता तर विरोधाभास ठळक झाला असता. हिंदूने हिंदूशी लग्न केलं म्हणून ऑनर किलिंग आणि तरीही मुसलमान धर्माचा एक संस्थापक, एक धर्मग्रंथ हे वाईट.

धर्माच्या आजच्या व्याख्येप्रमाणे जे आक्षेप घेतले गेलेत / जातात तेच गुणवैशिष्ट्य म्हणून सांगण्याची आयडिया आवडली. धर्म जर एक आहे, तर काही तरी कॉमन असायला हवं ना ?

की वरिष्ठ जातींचा धर्म वेगळा आहे आणि कनिष्ठ जातींचा वेगळा ? या एकजिनसी नसलेल्या समाजाला बळंच हिंदू धर्म म्हटलं जातंय ?

मुस्लिमांच्या हिंदूबद्दल या अपेक्षा समजा !
मुस्लिमांच्या कारण लोक वैतागून धर्म सोडून गेले असतील. आपण गेलो , आता तरी सुधारणा होतील असं वाटत असेल त्यांना.

अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असताना उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याला मुस्लिमांनीही राम मंदिरासाठी 'कर सेवा' द्यावी, असं आवाहन करणं महागात पडलं आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या मंत्र्याची मंत्रिमंडळातून तडकाफडकी हकालपट्टी केली आहे.

अखिलेश सरकारमध्ये राज्य मंत्रिपदाचा दर्जा असलेले ओमपाल नेहरा यांनी बिजनौर येथील सभेत बोलताना अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत मुस्लिमांनीही सहकार्य करायला हवं, अशी इच्छा प्रदर्शित केली. मुस्लिमांना हिंदूशी सलोखा वाढवायचा असेल तर त्यांनी अयोध्या, मथुरा आणि काशीतील मशिदींवरील दावा सोडायला हवा. तेथील मंदिरांच्या उभारणीसाठी त्यांनी हिंदूंना साथ द्यायला हवी. अयोध्येत राम मंदिराची उभारणी सुरू झाल्यास त्यात मुस्लिमांनी 'कर सेवा' द्यायला हवी, असे आवाहनच त्यांनी केले. या विधानाची गंभीर दखल घेत अखिलेश यांनी नेहरा यांना थेट मंत्रिमंडळातून बाहेरचाच रस्ता दाखवला.

Pages