स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरतजी, माझ्याकडेही हाच मिक्सर ग्राइंडर गेले दीड वर्ष आहे. बेस्ट परफॉर्मन्स. इतरांच्या तुलनेत खरंच सुपर सायलेंट आहे. आमच्याकडेही ह्याचा नवीन मशीन वापरताना येणारा प्लास्टिकचा स्ट्राँग वास सहा-एक महिन्यानंतर नाहीसा झाला होता.

Does all jars have locking mechamism, especially chutney jar? I am looking for mixer grinder where all jars has locking and space saver design. If anyone has suggestions.

Looking for good quality stainless steel cookware also. Any pointers.

मी सांगितलेल्या मशीनच्या फक्त ब्लेंडिंग जारला लॉकिंग मेकॅनिझ्म आहे. ड्राय ग्राइंडिंग आणि चटणीवाल्याला नाही. पण त्याची गरज पडत नाही. झाकणं चांगल्या क्वालिटीची आहेत आणि फिट बसतात.

माझ्या आधीच्या मिक्सरच्या झाकणांच्या रबरच्या रिंग्ज सैल पडल्याने आणि झिजल्याने निरुपयोगी झाल्या होत्या.

होमशॉप १८ वर स्टीलच्या भांड्यांचे सेट असतात बरेचदा. त्यांची गाडीही फिरताना दिसलीय कुठे कुठे. म्हणजे लोक विकत घेत असावेत.

धन्यवाद.

होमशॉप १८ ची रिटर्न पॉलिसी कशी आहे वाचायला पाहिजे. अ‍ॅमॅझॉन व्हेरिफाइड ची नो हॅसल रिटर्नची सवय आहे. गेल्या महिन्यात चुकून एक गोष्ट अ‍ॅमॅझॉनपेक्षा १.५ हजारानी स्नॅपडिल्वर स्वस्त दिसली म्हणून घेतली आणि नेमकी रिटर्न करावी लागेल अशी वस्तू पाठवली. जो काय त्रास झाला त्यापेक्शा १.५ हजार जास्त देणे परवडले असते.

Punyat bidacha changalya praticha tava kuthe milel?khas aamboli kinva dosa banvanyasathi ha tava hava aahe.koni mahiti deu shakel ka?

हा नवा पाहुणा कालच किचनमधे दाखल झाला.

barbecue.jpg

मंडईजवळ भांड्यांची दुकाने आहेत तिथून शेगडी किंवा तांबट आळीतून अशाच प्रकारचं काही तरी घ्यायचं ठरवलं होतं. पण जमलं नाही. अ‍ॅमेझॉन वर हा किंमतीच्या दृष्टीने ठीक वाटला. यापेक्षा स्वस्त पर्याय प्रेस्टीजचा आहे, पण त्याचे फोल्डिंगचे पाय दगा देतील अशी भीती वाटली.

मेक : फेबर
मटेरियल : स्टील
यासोबत पाच शीग , एक मोठा चिमटा आणि दोन जाळ्या (स्टेनलेस स्टीलच्या ) येतात.
कोळसा मिळण्याची सोय असेल तर भानगडीत पडावे. आमच्याकडे लाकडी कोळसा आणि "आरती" चा उसाच्या चिपाडापासून बनवलेला कोळसा दोन्ही मिळू शकतात.

परवा एकीच्या स्वयंपाक घरात निधी या भारतीय कंपनीची स्वयपाकाची हार्ड अनोडा इझ्ड भांडी पाहिलि. मग साइट वर पण पाहिली ,त्या भांड्यांचे साईझ तर खूप मस्त आटोपशीर आहेतच पण कढइ आणि एक बसक्या ,गोल आकाराचे ,झाकण असलेले भांडे खूप गोड आहे .पटकन विकत घेऊन त्यात काही तरी शिजवावेसे वाटले.

कोणि वापरत असेल तर प्लीज सांगाल का चांगली क़्वालिटि आहे का?टिकतात का? आतले काळे आवरण खराब होते का कि टिकते खूप दिवस? किमती ठीक वाटल्या .

मला रोजच्या वापरासाठी पातेली टोप कढई घ्यायचे आहेत. अ‍ॅल्युमिमीयमचे घेतलेले बरे का? हार्ड अ‍ॅनो चे टोप / पातेली कढया रोजच्या सयंपाकासाठी चांगले आहेत का?
आमच्या इथे अपना बाजारमधे बरीच वारायटी आली आहे हार्ड अ‍ॅनो भांड्यांची.

हार्ड अ‍ॅनोडाईज्ड भांडी अगदी अवश्य घ्या. रोजच्या स्वयंपाकासाठी दणकट आणि उत्तम. महाग वाटली तरी व्हॅल्यू फॉर मनी. पण माझ्याकडे फक्त प्रेस्टीजची आहेत. आणि मी त्यांच्याबद्दलच खात्री देऊ शकते. बाकी कंपन्यांचा मला अनुभव नाही. माझ्याकडे तवा आणि कढया आहेत.

सस्मित, मी हार्ड अ‍ॅनोडाईज्ड भांडी दादरला भवानी शंकर ऱोडवर घेते. तिथे चांगल्या क्वालिटीची भांडी जवळ जवळ अर्ध्या किमतीत मिळतात. नुकतेच मी तिथुन एक मोठे पातेले गिफ्ट द्यायला म्हणून ५०० रुपयांना घेतले. इतर दुकानांमध्ये ८०० पेक्षा कमी किमतीला मिळणार नाही. तिथे सर्व साइझेस च्या कढया आणि पातेली मिळतात.

हार्ड अ‍ॅनो >> अगदी घ्या! मी रोज भाजी करायला वापरते. मी अम्रिकेतून घेतली त्यामुळे इकडच्या कंपन्यांचा अनुभव नाही. मी घेतलेल्या सेटवर लिहिलेल्या सूचना तंतोतंत पाळते. म्हणजे भांडं फार तर मध्यम आंचेवर वापरायचं. पण मी कमी आंचेवरच भाजी करते. तेल घालून भांडं तापायला वेळ लागतो, पण त्याचा अंदाज आला की भाजी मस्त होते. कारण भांडं सगळीकडून एकसारखं तापतं. आणि असा अनुभव आलाय की भाजी ९०% शिजल्यावर गॅस बंद केला तरी उरलेली भाजी भांड्याच्या गरमपणावर आणि झाकणाखालच्या वाफेवर शिजते. स्पेशली ग्रेव्हीवाल्या भाज्या मस्त मिळून येतात.

भेंडी वगैरे मात्र नाही करत. जिथे कुठे आंच कमी-जास्त करा, मोठी आंच ठेवा आणि भराभर परता वगैरे प्रक्रिया आहेत तिथे ही भांडी, तवा मी वापरत नाही. आणि कामाला येणार्‍या ताईंना ही भांडी घासायला देत नाही. इमर्जन्सी म्हणून शिकवून ठेवलंय पण एक कढई आणि तवा घासणं सोपंच आहे. मी तूपही यातच कढवते.

पण माझ्याकडे फक्त प्रेस्टीजची आहेत.>> माझ्याकडेही प्रेस्टिजच्याच दोन कढया आहेत. हार्ड अ‍ॅनोडाईज्ड डोसा तवा मिळतो का?

हार्ड अ‍ॅनोडाईज्ड डोसा तवा मिळतो का?>> कल्पना नाही. पण माझ्या पोळीच्या हा अ‍ॅ तव्यावर थालिपीठ, धिरडी चिकटली होती; हिंदालियमच्या तव्यावर चिकटतात तशी. त्यानंतर कधी प्रयोग नाही केला. डोस्यासाठी नॉन-स्टिकच वापरते.

रच्याकने, दाणेही खमंग, खुसखुशीत भाजले जातात हा अ‍ॅ कढईत.

हा अ‍ॅ तव्यावर थालिपीठ, धिरडी चिकटली होती;>> हो! पोळीसाठीचा हा.अ‍ॅ. तवा फक्त पोळी, फुलके, पराठ्यांसाठीच योग्य आहे.

फुलक्यांसाठी हा.अ‍ॅ. तवा जड वाटत नाही का प्रत्येक वेळी उचलायला? आईकडे हा. अ‍ॅ. आहे, पण ते लोक पोळ्या करतात. तेव्हा हा वजनाने हलका पण मिळतो का?

मी हा अ‍ॅ तवा फक्त धिरडी आणि उत्तप्पा यासाठी वापरते. पोळ्यांसाठी नाही. आंच कमी-जास्त झाली की माझ्या भांड्यांना चरे पडतात. (असं त्या सेटवर लिहिलंय. तव्याशी जरा खेळ केला मी, पण तो नडतोय हे बघून वेळीच उद्योग आवरले म्हणून तवा अजून चांगलाय.)

हार्ड अ‍ॅनोडाईज्ड डोसा तवा मिळतो का?>> मिळतो. पण फार तेल वापरायाला लागतंय. हा अ‍ॅ वर पोळ्या, ऑम्लेट आणि उत्तप्पे मस्त होतात.

माझ्याकडे संपूर्ण सेट हार्ड अ‍ॅनोडाईज्ड्सचा आहे. कढई, तवा, पातेली, आणि दोन ग्रेव्हीसाठी भांडी. एक बेबी कूकर आणि प्रेशर पॅन पण हा अ‍ॅ मधलाच आहे. सब कुछ प्रेस्टीज. आजवर काहीही प्रॉब्लेम आलेला नाही. चरे वगैरे पडले नाहीत किंवा नॉनस्टिकसारखं कोटिंग उडणं वगैरे प्रकार झालेले नाहीत. टोटल व्हॅल्यु फॉर मनी.

धन्यवाद.
कढया भाजी साठी वापरणे ठीके. पण पातेल्यात भात वैगेरे करता का?

माझ्याकडे पण चपातीसाठी/ फुलक्यासाठी हार्ड ऑनि तवा आहे. दोसा/उत्तपा नॉस्टि तवा.

भातपण मस्त होतो.

http://www.jcpenney.com/cooks-10-pc-classic-hard-anodized-nonstick-cookw...|&dimComboVal=cookware+sets|&currentDim=Item+Type&currentDimVal=cookware+sets&_dyncharset=UTF-8&colorizedImg=DP1114201317060249M.TIF&urlState=/shop-departments/kitchen-dining/shop-brands/cooks/cookware-sets/_/N-glimqiZ1z141s1/cat.jump

या लिंकमधे आहे तसा १०पीस सेट आहे माझा. असा सेट मी ५ वर्षांपूर्वी घेतला, खूप डिस्काऊंटवर. त्यात ज्या ४ कढया (?) आहेत त्यापैकी कशातही भात मस्त होतो. सगळ्यात लहान आहे ती २-३ माणसांच्या भाजीला भरपूर होते. २ पॅन्स आहेत ते धिरडी-उत्तप्पे वगैरेसाठी. शिवाय मी आधी एक तवा घेतला होता, तो सध्या कमी वापरला जातोय, पण तोही बेस्ट आहे.

मला काय विचारायचय ते स्पष्ट विचारते. Happy
माझा पाहुणे आल्यावर चिकन रस्सा बनवायचा टोप बदलायचा आहे. तर त्याच साइझचा हार्ड ओनि चा टोप घेउ का असा विचार करतेय. म्हण्जे चिकन वैगेरे व्यवस्थित होईल का? झालच तर हा ओ टोपात अ‍ॅल्ञुमिनियमसारखी बिर्याणी वैगेरे करु शकतो का? आनि लहान साइजच्या टोपात कुकरमधे भात करु शकतो का? जोरदार फोडन्या केलेल्या चालतात का?

मन्जुडी! डोस्यासाठी मी फ्युच्युराचा तवा वापरतेय, पोळ्यासाठी त्याचाच लहान आहे ... डोसे करताना पहिल्या वेळेस जरा जास्तिच तेल लागत मग्,पुढचे बिनतेलाचे निघतात व्यवस्थित.... ६-७ वर्श झाली वर्क्स बेस्ट.
हार्द अ‍ॅनोडाइज्ड चा माझा अनुभव पण चान्गलाच आहे माझ्याकडे एक खोल झाकणाचा उभट पॅन होता ...साइझ मोठी अस्ल्याने त्यात जरा जास्तिचे पदार्थ मस्त बनायचे... परतायला स्टीलचे कालथे चालत अस्ले तरी मी वापरले नाहि कधिच..मी एक-दोन वेळेस डिशवॉशर ला लावला आणी त्याच्या कोन्टिन्गची वाट लागली.... आता सबकुछ स्टील.

Pages