स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हण्जे चिकन वैगेरे व्यवस्थित होईल का<<< एकदम मस्त होतं,
झालच तर हा ओ टोपात अ‍ॅल्ञुमिनियमसारखी बिर्याणी वैगेरे करु शकतो का?>> अ‍ॅल्युम्,मिन्यमपेक्षा बेस्ट होते हा स्वानुभव.

आनि लहान साइजच्या टोपात कुकरमधे भात करु शकतो का? >> हो. माझा अख्खा कूकर आणि प्रेश पॅनच हार्ड अ‍ॅनाडोइझ्ड आहेत.
जोरदार फोडन्या केलेल्या चालतात का?>>> यावरून आठवलं! माज्याकडे तडका पॅन आहे तो पण हार्ड अ‍ॅनाडाईझ्डच आहे. मस्त फोडण्या वगैरे होतात. लवकर करपत नाहीत.

आमच्याकडे हॉकिन्सचा आहे. तवा आणी कढई पण. दोन्ही उत्तम निघालेत. जरुर बघा. प्रेस्टिज असो वा हॉकिन्स दोन्ही छान आहेत.

चालत असेल तरी माझ्या मते स्टिलचे कालथे/उलथण/सराटे हा.अ‍ॅ. मधे वापरु नये , चरे पडतातच... मी कायम परता परतीला लाकडी कालथे वापरते ...एकतर वजनाला कमी अस्तात आणि चरे पडत नाही.

जोरदार फोडन्या केलेल्या चालतात का? >> चालत असतील तरी फोडण्या लोखंडी पळीतच केलेल्या जास्त खमंग लागतात.

What ideal power of mixer / grinder should be so that the jars will not be hot while grinding dosa / idli batter etc.

मला किचन डिजिटल Weighing Scale घ्यायचे आहे. कोणता ब्रँड चांगला?. फ्लिपकार्ट वर खूप ऑप्शन्स आहेत, पण कोणते घ्यावे कळत नाही.

नवीन मिक्सर घ्यायला गेले होते. 'फिलिप्स'चा मिक्सर विचारला तर दुकानदारने 'सुजाता' चा मिक्सर सुचवला. खूप चांगला आणि दणकट आहे. सगळ्यां हॉटेल्स आणि फूड जॉइंट्स मध्ये हाच वापरतात असे सांगितले. त्याच्याकडे फिलिप्स नव्हता म्हणून उगाच सुजाता खपवतोय म्हणावे तर अजून २-४ दुकानदारांनी तेच सांगितले. इंटरनेटवर पण सुजाताचे रिव्ह्युज चांहले आहेत. पण आवाज खूप करतो असे म्हणतायेत सगळे. इकडे कोणी वापरला आहे का सुजाताचा मिक्सर? किंमत फिलिप्स एवढीच आहे. शिवाय ८१० वॅटेज आहे. Uhoh

याशिवाय अ‍ॅमेझांनवर सुमीतचे नवे मिक्सर्स दिसले. सुमीतने परत प्रॉडक्शन सुरु केले का खरेच? काही कल्पना आहे का कोणाला?

मला कणीक मळायची मशीन घ्यायची आहे (आटा मेकर). खरच उपयोग होतो का? उपयोगी असेल तर कोणता घ्यावा? फूड प्रोसेसर पेक्ष फक्त आटा मेकर चान्गला का?

विद्या, मी माझ्या एका बॅचलर मित्राला हाताने चालवायचा आटा नीडर पाठवला होता. त्याला तरी तो खुप आवडला. त्यातच कांदा वगैरे कापता येतो आणि ताकही घुसळता येते. अमेझॉन वर आहेत बरीच मॉडेल्स.

प्राची, मला ब्रेंडनेम माहिती नाही, पण आमच्या शेजारच्या दुकानातही एक नवीन मॉडेल पाहिलं मिक्सरचं, ८०० वॅटचं. पण घरगुती वापरासाठी जास्त होईल असं तिथले भैया म्ह्णाले. बहुतेक आवाजही जास्त असणार. रोजच्या वापराला फिलिप्सच सांगितला त्यांनी.

दिनेशदा, आटा नीडरचे मेक आणि मॉडेल सुचवा ना. तुम्ही कोणता पाठवला होता ?
फूड प्रोसेसर मधे कणिक मळता येतेच ना, मग दोन्हीमधे फरक काय ?

अ‍ॅमेझांनवर सुमीतचे नवे मिक्सर्स दिसले. सुमीतने परत प्रॉडक्शन सुरु केले का खरेच? काही कल्पना आहे का कोणाला?>>> हो सुमीतचं प्रॉडक्शन परत सुरू झालंय. माझ्याकडे (अमेरीकेत) गेली १९ वर्षे वापरतीये. बारीकसारीक दुरूस्त्या वगळता I am very happy with Sumeet. नवीन सुमीत मला वाटतं ७५० वॅट आहे. जेव्हढी जास्त पॉवर तेव्हढा जास्त आवाज.

KenBerry KB1003 Multi Food Processor - Atta Kneader / Dough Maker

हे पाठवले होते मी महेश. तो जिथे राहतो तिथे लाईट खुपदा जाते, म्हणून मुद्दाम असे पाठवले. आणि तसे हे सुटसुटीत आहे मॉडेल.

धन्यवाद ९ आणि अंजली.
अंजली, मी पाहिलेले सुमीतचे मॉडेल १००० वॅटचे होते. सुमीतचे जुने मिक्सर खूपच छान होते. आता नवीन मिक्सर पण तेवढेच टिकाऊ आणि उप्योगी आहेत का ते बघावं लागेल. Happy
माझ्याकडे माझी स्वैपाकीण बाई पण मिक्सर वापरणार, त्यामुळे नाजूक काम घेऊन चालणार नाही. फिलिप्स नाजूक असेल ना? त्यामुळे, तो सुजाता घ्यावा असे मनात येते मध्येच. Proud

खोबरं खवायची अ‍ॅटॅचमेन्ट असलेला फु प्रो आलाय का? कुणी वापरलाय? ब्रॅन्ड? > रोनाल्ड ची खोबरं खवायची अ‍ॅटॅचमेन्ट ईझी आणि सेफ आहे.
http://www.ronaldmixers.net/

धन्यवाद भ्रम , मी फ्लिपकार्ट वरून खालील स्केल मागवले आहे.
http://www.flipkart.com/nova-ks-1313-weighing-scale/p/itmdrwvaczcrjpmb?p...

मृनिश, <<दाद.. हो बहुतेक सगळ्या मेन ब्रॅण्ड मध्ये आली आहे नारळ खोवण्याची अ‍ॅटॅचमेन्ट>>, रोनाल्ड सोडल्यास कोणत्या इतर ब्रॅन्ड्स मधे आहे?
रोनाल्डचे रिव्ह्यूज चांगले नाहीत.

मर्फी रिचर्ड्स, रिको, बजाज, केनस्टार, ग्रीनलाईन यात नक्की आहे..
माझ्याकडे ५ वर्षापासुन ग्रीनलाईन आहे विथ नारळ खोवण्याची अ‍ॅटॅचमेन्ट
मस्त चालला आहे

पण ते साफ करायला सोपे आहे का? कारण मी मागे हाताने करायची घेतले होते. साफ करायलाच इतका वेळ जायचा कि हाताने मळलेली बरी. ऑटोमटीक असते का? धन्यवाद माहीती आणी प्रतीसादाबद्द्ल.

रोनाल्डचे रिव्ह्यूज चांगले नाहीत> दाद आमच्याकडे जवळ जवळ ८ वर्षे रोनाल्ड चा फु पो आहे अजुन तरी काही प्रॉब्लेम आला नाही. इव्हन सिंगापूर ला बहिणी साठी हि नेला, ४ वर्षे ती वापरत आहे. अजुन तरी चांगला चालला आहे.

गेल्या वर्षी बजाजचा ७५०W मिक्सर-ग्राइंडर घेतलेला. ८-१० महिन्यात दुसऱ्यांदा सर्विस करावा लागेल. पहिल्या वेळेस अख्ख्या घराची वीज ट्रीप होत होती. सर्विसवाल्याने सरळ नवीन मोटर आणून बसवली. आता परत इडलीचे तांदूळ वाटताना धूर आला, म्हणून थांबलो. थोड्यावेळाने उरलेले थोडे तांदूळ वाटायला घेतले, तर वेट ग्राइंडिंगच्या भांड्यातले पातेच तुटले. Angry

दिनेशदा, धन्यवाद !

http://www.amazon.in/KenBerry-KB1003-Multi-Food-Processor/dp/B00XDVC61Y

बर्यापैकी स्वस्त आणि मस्त दिसतो आहे, तसेच त्याच्या जोडीला प्रेस्टीजचा रोटीमेकर पण सुचवला आहे.

Prestige PRM 1.0 41018 900-Watt Roti Maker with demo cd
http://www.amazon.in/Prestige-PRM-41018-900-Watt-Maker/dp/B01982I4BM/ref...

प्रिथी (Preethi) ब्रँड चा मिक्सर पण उत्तम आहे. मी सिंगापुरमध्य गेली चार वर्ष वापरत आहे. स्टीलचे जार्स व प्लास्टीक झाकणे. ईडलीचे पीठ पण छान होते.

मला हा easy pull smart chopper भेट मिळाला.
कांदा बारीक चिरायला चांगला उपयोग होतो. गाजराचे तुकडेसुद्धा हवे तितके मोठे/बारीक कापता आले.
कांदा बारीक चिरायला फुड प्रोसेसरचा उपयोग होत नाही. त्याला पाणी सुटतं. हा चॉपर ते काम करतो.
(व्हिडियो मी अपलोड केलेला नाही)

Pages