स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप विसळून घेण्याची गरज नाही>>ओह्ह ओके.
वेळ किती लागतो.?
2:30 ते 3 तास असं वाचलंय
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद बॅग्झ.

वेळ किती घेतो हे कुठला मोड आपण सिलेक्ट करतो त्यावर आहे (वॉशिंग मशिन सारखं) - उदा. एक क्विक मोड आहे जो ३० मिनिटांत उरकतो सगळं. आम्ही "ऑटो" वर ठेवतो - १ तास २० मि. व्यवस्थित होतात भांडी.

चांगला मिक्सर घ्यायचाय कोणता घ्यावा? मी बजाजचा mixer plus jucer वापरला 2 वर्ष पण अजिबात चांगला नाहिये.. खूपच तकलादू आहे... त्यामुळे आता त्याला पैसे लागण्यापेक्षा नवीनच घ्यायचाय.. कोणता चांगला राहील? प्लीज काही माहिती असेल तर सांगावे..

Philips viva collection 750वॅट चा मिक्सर गेले आठ महिने घरात वापरतोय. चांगला आहे. 3 जार आहेत. Juicer नाहीये.
product warranty 2वर्ष आणि मोटरची 5 वर्षाची वॉरंटी आहे. Price 5000. घेताना 4200ला पडला.

Morphy Richard's घ्या डोळे झाकून. मी आठ वर्षे झाली वापरत आहे. सुक्या खोबऱ्याचे तुकडे सुद्धा क्षणात बारीक होतात.

डिशवॉशर भारतातील भांडी घासतात? म्हणजे आपली स्टीलची ताटे, ॲल्युमिनियची टोप, कढई, लोखंडी तवे, मिक्सरचे भांडे तसेच पोलपाट-लाटणे. खरचं जाणून घ्यायचे आहे मला.

डिशवॉशर भारतातील भांडी घासतात? म्हणजे आपली स्टीलची ताटे, ॲल्युमिनियची टोप, कढई, लोखंडी तवे, मिक्सरचे भांडे तसेच पोलपाट-लाटणे. खरचं जाणून घ्यायचे आहे मला.

निल्सन मी दररोज भारतातील स्वयंपाक करते आणी भाज्या केलेल्या स्टीलच्या कढया ओट्स् केलेले पातेले, वाट्या, चमचे, काचेचे ग्लासेस, ताटे, मिक्सरचे छोटे भांडे, स्टीलचा कूकर, दह्याची पातेली, ही सर्व भांडी डिश वॉशरला लावते. लोखंडी तवे, अल्युमिनिअमची भांडी, मुलामा दिलेली भांडी, लाकडी पोळपाट लाटणे, या गोष्टी घालू नयेत असं लिहिलं आहे मॅन्युअलमध्ये. तसेही पोळपाट धुवायला किती वेळ लागतो? भांडी बेताची साफ करून खरकटे काढून टाकली तर खरचं चकचकीत होतात.

@अनुजा, कोणता आहे dishwasher? Specific liquid? थोडं सविस्तर लिहा न.
तसेही कामवाल्या मावशीला पण खरकटं काढून द्यावी लागतात भांडी

खरकटं काढुन विसळुन भांडी डिवॉ ला लावयची त्यात परत अल्युमिनिअमची भांडी, मुलामा दिलेली भांडी, लाकडी पोळपाट लाटणे, या गोष्टी घालू नयेत तर मग खरंच डिवॉ ची गरज आणि उपयुक्तता आहे का? असा प्रश्न पडला मला.
माझा मिक्सर मॅग्गी कंपनीचा आहे. १२ वर्षं वापरतेय. १२ वर्षांपुर्वी २९०० ला घेतला होता. एकदम मस्त आहे. वाट्णात सुकं खोबरं नेहमी तुकडे करुनच घालते. किसत नाही. फास्ट आणि मस्त बारीक करतो मिक्सर.

मी सिंक जवळ साबणपाणी भरलेला टब ठेवते - भांडी त्यातच घालायची. मग वेगळी विसळायला नाहीत
हार्ड अनोडाईज्ड भांडी /काचेचे डबे /ट्प्र्रवेअर डबे /स्टीलची भांडी /कॉपर बॉटम भांडी व्यवस्थित स्वच्छ होतात
बाकी ऍल्युमिनिअम /मुलामा असलेली /लाकडी /मातीची भांडी फारशी वापरत नाही - त्यामुळे मला डिशवॉशर चा भरपूर फायदा होतो

आमच्याकडे अल्युमिनिअमची भांडी, मुलामा दिलेली भांडी, लाकडी भांडी (पोळपाट आणी चमचे सोडून) वापरत नाही. भाज्या आमट्या सरळ स्टीलच्या पातेल्यात्/पॅन मध्ये होतात. पदार्थ काढून ठेवायला काचेची भांडी वापरतो. पण डबे, साठवणीचे व ऑफीसचे, पाण्याच्या बाटल्या, रोजचे कप, चहाची पातेली, ब्रेकफास्ट्चे पॅन, ही भांडी चिकार होतात. सुर्‍या, काटे, चमचे, गाळणी, प्लेटसही असतात. हे सर्व धुवायला मला मस्त उपयोग होतो. आमच्याकडे IFB Neptune आहे 12 place settings वाला. आपली ताटे, भांडी आकाराने मोठी असतात त्यामुळे एवढा मोठा लागतोच. साधारण सहा सात वर्षे जुना आहे. पाणी हार्ड नसल्याने Softener वापरत नाही. आमचं वीज बिलही नेहेमीपेक्षा खूप जास्त येत नाही. Over all very happy with the dishwasher कारण बाई वर अवलंबून रहावं लागत नाही आणी भांडी पण स्वच्छ निघतात.

माझ्या आईकडे आहे. आमच्याकडे तसेही खरकटे काढून भान्डी विसळून ठेवाय्ची सवय आहे, सो डिशवॉशर एकदम सोप्पे वाटते वापरायला. कामवाली बाई मॅनेज करण्यापेक्शा डि वॉ बरे.

मी नुकताच cast iron डोसा तवा घेतलाय amazon वरुन. कितीतरी महिने मागेपुढे चालले होते. पण आता तो इतका छान निघालाय आणि वापरात येतोय की मी इतकी वर्ष नॉन स्टीक तव्यामधे पैसे घातल्याचा पश्चाताप होतोय. पराठे, धिरडी पण मस्त होतात. मग skillet पण विकत घेतली आहे बाकीच्या स्वयंपाकासाठी. कोणी विचार करत असेल असा डोसा तवा घ्यायचा तर नक्की घ्या, खूपच सोय आणि फायदा होतो. सवयीने त्याच्यावर बिन तेलाचे डोसे पण करता येतात. मला थालीपीठ पण करायचे आहे पण ते डायरेक्ट तव्यावर थापता येणार नाही. खाली थापून मग तव्यावर टाकायची ट्रिक शोधावी लागणार.

राजसी
पोळपाटावर ओला रूमाल किंवा ओला टिशु पेपर ठेवा आणि ओल्या रूमालावर थालीपीठ थापुन घ्या आधी. मग तो रूमाल उचलून थालीपीठ वाली बाजू तव्यावर टाका आणि थालीपीठ तव्यावर व्यवस्थित टाकल्यावर रूमाल काढुन घ्या

राजसी, मस्त दिसतोय दोसा ! खूप जड असतात हे तवे हन्डल करायला व खिशालाही .... किंमत कमी असेल तर विचार करता येईल.।..

धन्यवाद रुनी पॉटर, नक्की try करुन बघते आणि सांगते जमलं का Happy इथे रुमालच वापरून पाहीन. Tissue पेपर तितके छान मिळत नाहीत.

मंजूताई, मला जवळपासची चांगली स्थानिक दुकान माहीत नाहीत, त्यामुळे amazon वरुन घेतला. हजाराच्या आत मिळाला, महाग पडला असणार. कदाचित खात्रीशीर ओळखीचा दुकानदार असेल तर स्वस्त मिळेल. वजनाला मात्र जड पडतो. माझी south indian शेजारीण साध्या लोखंडी तव्यावर करते म्हणे डोसा कारण तिला जड नको. माहीत नाही कसं काय? कधी करताना बघितले नाही.

राजसी,
मी डोसे करायला साधा लोखंडी तवा आणि कास्ट आयर्न असे दोन्ही वापरते. लोखंडी तव्याला सुरवातीला पुसट तेल लावावे लागते तेवढेच. डोसा खालून झाला की कडेने सुटायला लागतो अजिबात चिकटत नाही. सासरी आणि माहेरी डोसे लोखंडी तव्यावरच करतात.
कास्ट आयर्न तव्यावर थालीपीठ लावताना तव्यावर तेल पसरवून आच मंद करायची. तव्यावर मधोमध भिजवलेल्या पीठाचा गोळा ठेवायचा आणि वाटीतल्या पाण्यात बोटं बुडवत थालीपिठ थापायचे. थापून झाले की आच वाढवायची.

ते डायरेक्ट तव्यावर थापता येणार नाही.
<<
का?

डोसा टाकताना आधी मिठाचं पाणी शिंपडतो आपण. याचं बेसिक कारण तवा थंड करणे हे असते. अन्यथा खाली चिकटून पीठ पसरत नाही. एक्झॅक्टली तसंच, थंड तवा आधी तेल लावून मग गॅसवर ठेवा. लगेच त्यावर थालिपिठ थापा. पहिलं या प्रकारे पट्कन होतं. नंतर तवा गार करावा लागतो. तो कसा करायचा हा आपापला प्रश्न. आमच्याकडे २ तवे आलटून पालटून वापरतो आम्ही. प्लस तेल. याने थालीपीठ पसरतं पट्कन. हाताला भरपूर पाणी लावून थापत गेलं तर बरोबर जमतं.

अन शेवटी, आधी हाताला चटके तरच मिळणार थालीपीठं.

बादवे, ओल्या टिश्यूवर थालीपीठ हा प्रयोग करू नये असे वाटते. कागदयुक्त गोळा फेकून द्यावा लागेल बहुतेक. फडके इज ओके.

येस आरारा, आम्ही ही सेम टेक्निक वापरतो. दोन तवे आलटून पालटून. एकच तवा असेल तर पाण्याचा शिपका देऊन जरा गार करून घेणे. थालीपीठ डायरेक्ट तव्यावरच लावलेलं परवडतं. पाण्याच्या ओल्या हातानी लावलं तर चटका बसणे इ. प्रकार होत नाहीत. प्लॅस्टिक, केळीचं पान, रुमाल बिन्नेस मध्ये खेळखेळ जास्त होतो हे मावैम.

स्वाती, लोखंडी तव्यावर पण डोसे जमत असतिल तर छानच! थालीपीठ पण जमतं का?
आरारा, मी पण दोन नॉन-stick तवे वापरून थालीपीठ करते. पण आता हा नवा तवा एकच आहे. त्यामुळे मला तवा गार न करता प्रयत्न करायचा आहे. आमच्याकडे थालिपीठाचा प्लान असेल तर प्रत्येकाला दोन थालीपीठ लागतात. मला शक्यतो नवीन नॉन-स्टीक घ्यायचे नाही आहे. कितीही जीवापाड जपलं तरी मोलकरीण कुठेतरी चरा आणतेच.

थालीपीठ पण जमतं का?

<

माझ्या मते एनी जाड बुडाचं भांडं विल डू. भांडं, तवा, प्यान, कढई कैपन. थाळीमधे थापलेलं पीठ. हाकानाका. आमच्या आजीचे थालिपीठ जाड बुडाच्या पितळी पातेल्यात बनत असे. सॉफ्ट अन क्रिस्पीचा पर्फेक्ट बॅलन्स..

Rock.

प्लॅस्टिक, केळीचं पान, रुमाल बिन्नेस मध्ये खेळखेळ जास्त होतो हे मावैम.>>
आम्ही कधीच डायरेक्ट तव्यात थालीपीठ थापत नाही. प्लॅस्टीक/ मलमल कापडावर थापून अगदी छान जमत. मला उलट ते तवा गरम करण मग गार करण वगैरे फार कॉम्प्लिकेटेड वाटत. सवयीवर असाव बहुदा.

मला उलट ते तवा गरम करण मग गार करण वगैरे फार कॉम्प्लिकेटेड वाटत. सवयीवर असाव बहुदा.>> ट्रु! शिवाय गरम थालिपिठ तव्यावरुन थेट पानात खाण्यात आहे ती तवा गार गरम मधे चालली जाते, मी २ तवे ठेवते, पहिले २थालिपिठ गार तव्यावरच लावायची दुसरी बॅच, रुमाल ओला त्यावर तेलाचा पुस्ट हात पान्याच्या हाताने थालिपिठ मस्त पातल लागते.
त्यातही इकडे आता कॉइल असल्याने गॅससारख तापमान पटकन कमी होत नाही त्यामुळे तव्याचा मुड बिघडवुन चालत नाही.

राजसी, मी पण cast iron pan घेतला आहे amazon. एकदम मस्त डोसे, धिरडी, घावणे, गुलगुले होतात. मी जुन मध्ये घेतला होता. त्यानंतर skillet घेतला. पण अजून ते वापरला नाही.
दोन लोखंडी तवे घेतले लोकल मार्केट मधून. एक भाकरी ला आणि एक पोळी ला.
पोळीच्या तव्यात थालीपीठ करते.
लोखंडी तवे घासून धुवून गॅस वर मिनिट भर ठेवायचे. म्हणजे गंज/जंग चढत नाही.
सध्या माझ्या कडे हे तीन तवे धरून अजून दोन आहेत, एक अलुमिनिम, एक hard anodized. गेल्या सात आठ महिन्यात हे दोन तवे वापरले नाहीत. दोन nonstick वापरून झालेत. ते नॉनस्टिक कोटींग गेल्यामुळे विकून टाकले.

@मंजूताई, नॉनस्टिक तवा 500पर्यत बसतो, शिवाय ते कोटींग खराब हि होते. ते पोटात हि जाऊ शकते. शिवाय तुम्ही आठवड्यतून दोन वेळा डोसे, धिरडी करत असाल तर नॉनस्टिक तवा 2-3 महिन्यात खराब होऊन जातो.
Cast iron एकदाच घ्यायचं (1000 चा घेतला), आयुष्भर कटकट नाही. पिढीजात होऊन जातो.
मला तर डोसे बनवणे खुप सोपे जाते. डोसे घावन आंबोळ्या, धिरडी. आठ्वड्यातुन दोन -तीन वेळा होतात माझ्याकडे.
हा माझ्या कडील फोटो.

हा तवा

IMG20200223131114.jpg

डोसा मस्त गोल्डन होतो

IMG20200223131225.jpg

Pages