स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी परवा कॉस्टकोत बघितले सेट! Kirkland,circulon, calphalon( I guess) असे सगळे ब्रॅन्ड होते, Kirkland
स्टीलचे आहेत, मस्त वाटलेत पण झाकण जड वाटली आणी थोडि मोठि आहेत, शिवाय त्यात पास्ता पॅन आहे त्याचा फारसा उपयोग नाही मला, circulon hard anodized आवडला मला, साईझ ही छान मध्यम आहे, बहुधा तोच घेइल..

Kirkland वैगेरे स्टीलच्या भांड्यात / पॅनमध्ये ऑम्लेट, डोसा, धिरडी, थालिपीठ असे पदार्थ पण छान होतात का? मला ह्या पदार्थांसाठी नॉन-स्टिक कुकवेर लागते नाहीतर चिकटतात तव्याला. फोडणी नीट होते का?

माझ्याकडे kirkland ची भांडी नाहियेत. माझ्याकडच्या कॉपर बॉटम स्टीलच्या भांड्यात फोडणी चांगली होते. ऑम्लेट वगैरे चिकटले नाही पण एकंदरीत तेल जास्त टाकावे लागले. मुलाला आणि नवर्‍याला तर अजिबात जमत नाही त्यामुळे ऑम्लेट, धिरडी, थालीपिठासाठी आम्ही कास्ट आयर्न पॅन वापरतो.

धन्यवाद स्वाती. कर्कलँड असं स्पेसिफिक नाही, आजकाल जी महागडी स्टील कुकवेर मिळायला लागली आहेत त्याबद्द्लच विचारायचे होते. माझ्याकडे पूर्वी एक कॉपर बॉटम स्टील कढई होती त्यात फोडणी करायची म्हणजे तिथेच उभं राहावं लागायचं. फोडणी करपली नाही तरी भांड्याला आतून तेलाचा डाग पडायचा.

माझ्याकडे पूर्वी एक कॉपर बॉटम स्टील कढई होती त्यात फोडणी करायची म्हणजे तिथेच उभं राहावं लागायचं. फोडणी करपली नाही तरी भांड्याला आतून तेलाचा डाग पडायचा>>>+१ फक्त भूतकाळाऐवजी वर्तमान्काळ वापरून.

Pot / pan hanger कितपत उपयोगी आहे ? कोणी वापरलं आहे का?

>>स्टील कुकवेअरमध्ये तवा टाईप फ्लॅट मी पाहिलेलंच नाही.
सायो, हे बघ..

इथे आणखी एक तवा आहे. सगळ्यांची बुडं तांब्याची दिस्ताहेत. आतलं स्टील.

माझ्या कडे कॉपर बॉटम पॅन आहे ते लै जुने आहे. revere ware चा सेट होता नवर्‍याचा.
मृण्मयी, तू लिंक दिली आहेस तसली भांडी माझा लेक मागत होता भेट म्हणून. आधी ला क्रुशे चा किडा चावला होता आता हा.

http://wonderchef.in/default/hotsets/wonderchef-picasso-set-with-free-si...
हा सेट घ्यावासा वाटतोय. इथे कोणी वंडरशेफ चे प्रोडक्ट्स वापरले आहेत का? त्याचा रीव्ह्यू कसा आहे कोणी सांगेल का आणि आफ्टर सेल्स सपोर्ट कसा आहे? ह्या सेटची बॉटम डिझाईन वापरल्यानंतर खराब होईल का? जाणकारांनी मदत करावी.

मला मिक्सर साफ करणे फार कटकटिचे वाटते. सध्या असलेल्या मिक्सरच्या भांड्यांना गास्केट आहेत. ति सारखी लूज पडतात आणि बदलावी लागतात. म्हणुन magic bullet आणि hand blender घ्यावासा वाटतो आहे. हे combination योग्य आहे का? किंवा अजुन काही सुचवु शकता का?

hand blender घेतला तर कुठला घ्यावा?

स्टिलचा सेट घ्यायचा हे पक्के केले आणी बर्‍याच शोधाशोधी नन्तर बीजेज मधला वुल्फगॅन्गपकचा सेट घेतला..
आता वापरल्यावर कळेल.
मेसिज मधला टुल्स ऑफ ट्रेड चा सेट पण चान्गला आहे असे मैत्रिणीकडुण कळले.

थॅन्क्यु स्न्हेहा! तु सिझन केलेलास का सेट वापरण्याआधी, म्हणजे करावा लागतो का? अस विचारायच होत खरतर
http://www.bjs.com/wolfgang-puck-14-piece-stainless-steel-cookware-set.p... मी हा घेतला आहे सेट!

मेसीज मधे मिळणार्‍या स्टेनलेस स्टील सेट्स पैकी आहे का कोणाकडे? कुझिनआर्ट, Calphalon, Tools of the trade, Belgique असे ब्रँड्स दिसत आहेत. यातला एखादा असेल तर अनुभव ऐकायला आवडेल.....

Belgique << आहे माझ्याकडे, मला त्याचा साईझ, शेप, बॉट्म थिकनेस (फोडणीसाठी) आवडतो.

धन्यवाद अदिति! मला पण Belgique आवडला ऑनलाईन पाहून....शेप छान वाटला त्यांचा. कांदा परतताना चिकटतो का? इथला कांदा ब्राऊन करायला खुप्च परतावा लागतो Sad

नॉनस्तिक चि सवय असेल तर जाण्वत, बेलिगे छानच आहे. टुल ऑफ त्रेड चे रिव्ह्यु मिक्स आहेत, काल फ्लान पण मस्त आहे अस
एकल

शेफ संजीव कपूर ह्यांनी रेकमेंड केलेला ग्रिल पॅन घेतला. मस्त आहे. ग्रिल्ड चिकन छान होते. कबाब व व्हेज पदार्थ ह्यासाठी ही छान वाट्तो आहे दणकट आहे. इंडक्षन वर पण वापरता येइल असा आहे.

Pages