स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ३/४ वर्ष्यांपुर्वी घेतलेला छोटा कुकर जवळ जवळ रोज वापरते आणि फक्त शिट्टी काढुन डिश वॉशरला जागा असेल तिथे, मोस्ट्ली खालीच, लावते. अजुन्ही इन्टॅक्ट आहे. Happy

आज ऑलमोस्ट पंधरा वर्षांत त्याची रिंग, व्हॉल्व बदललेला नाही. >>>>> व्हॉल्व समजू शकतो.पण रिंग बदललेली नाही????

बटरफ्लाय म्हणून ब्रँड आहे वत्सला.
कुकरबरोबर छोटा प्रेशरपॅन आहे ज्यात आपण छोले, पावभाजी वगैरे करतो. तो मला जरा त्रास देतो म्हणजे शिट्टी न होणं, झाकणातून वाफ बाहेर जाणं वगैरे त्यामुळे तो वापरणं बंद केलंय हल्ली.

मंजू Lol

आज ऑलमोस्ट पंधरा वर्षांत त्याची रिंग, व्हॉल्व बदललेला नाही =- अग रबरी पार्ट असतात हे. एव्हाना रबर कडक होवून तुकडे पडायला झाले असतील .

नाही मृणाल. तसं झालं असतं तर बदललं असतंच ना? कुकरची रिंग अगदी नॉर्मल आहे, मऊ आहे. माझ्याकडे कुकरबरोबर स्पेअर येणार्‍या गोष्टी पडून आहेत. पण आज बदलतेच.

.

मी फेब. २००२ ला नवीन कुकर घेतला होता. आज ऑलमोस्ट पंधरा वर्षांत त्याची रिंग, व्हॉल्व बदललेला नाही. तर माकाचु?

कुकर अधुन मधुन अडगळीतुन काढुन वापरला नाही हेतुचु. Wink Light 1

>>कुकर अधुन मधुन अडगळीतुन काढुन वापरला नाही हेतुचु>> नाही, आठवड्यातून तीनदा तरी डाळ, भाज्या लावल्या जातात कुकरला.

मी माझ्याकडचा कुकर २००५ साली घेतलेला आहे .. मलाही त्याची काहीच उस्तवार करायला लागलेली नाही .. डाळ भात, बटाटे, कधी (कड)धान्य शिजवणे ह्याकरताच वापरला जातो .. त्याचे पार्ट्स बरीच वर्षं जपून ठेवले होते .. आता कुठे आहेत तेही आठवत नाही .. मा पण काचु का?

हार्ड अ‍ॅनो भांड्यात अन्न ठेवले तर चालते का? म्हणजे पदार्थ करून झाल्यावर तसाच झाकून ठेवला तर? की अन्नावर काही रिअ‍ॅक्शन होईल?

>>हार्ड अ‍ॅनो भांड्यात अन्न ठेवले तर चालते का? म्हणजे पदार्थ करून झाल्यावर तसाच झाकून ठेवला तर?>>> चालते.

Gas ची शेगडी व चिमणी घ्यायची आहे. कोणती घ्यावी ? २ बर्नर कि ३ बर्नर? कोणत्या कंपनीची घ्यावी ? आणि चिमणी कोणत्या कंपनीची घ्यावी Autoclean/ with Hood/without hood प्लीज सल्ला हवाय

नवीन मिक्सर घ्यायचाय...........reviews मधे बहुतेक ठिकाणी लिहलय.....की खूप आवाज करतो.....
थोडा तर आवाज होणारच .......पण कमी आवाज करणारा.........५०० watt ते ७५० watt ...मॉडेल सुचवा.
Morphy Richards Ritz Essentials कसा आहे ?

क्राॅम्प्टन ग्रीव्हज् चा ७५० watt चा मस्त आहे. आवाज कमी करतो. किंमत रु. ५९००/-, २४ महिने वाॅरंटी. मी जानेवारी २०१५ ला घेतला.

Morphy Richards>>> अजिब्बात घेऊ नका. माझ्याकडे मॉर्फीचा मिक्सर आहे, मॉडेल वेगळे आहे. (Icon Delux) पण अनुभव चांगला नाहीये. जार्ससाठी वापरलेले स्टील चांगले नाहीये. ४ महिन्यातच जारला कट गेला. त्यामुळे, झाकणही नीट बसत नाही. काही दिवसांनी ब्लेड्स ची धार अगदी जाणवण्याइतपत कमी झाली. ब्लेंडर जारचे हँडल ३-४ वापरातच तुटले. आता फक्त चटणी जारवर काम भागवते आहे. Angry

मनुरुची, सनफ्लेमची एक्सेंज ऑफर सुरु आहे. लाभ घ्यावा.
प्रेस्टीजची पण एक्सेंज ऑफर सुरु आहे. लाभ घ्यावा.

हे आधी झाले असेल बोलून तर तिथला पत्ता द्या.
नॉनस्टिकसाठीची लाकडी उलथनी वगैरे संदर्भात प्रश्न.
१. नवीन घेताना काय काय चेक करायचे? पॉलिश नसणे वगैरे..
२. किती दिवस वापरून टाकून द्यायची?

Pages