स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धा, आम्ही ते वापरले आहे. अनुभव चांगला नाही. थोडे दिवस नीट चालते मग इलेक्ट्रीकल प्रॉब्लेम्स सुरु होतात. कोटींग पण हळू हळू निघून जाते. ( आमच्याकडे इतर आफ्रिकन्स पण वापरत असत. कदाचित निगुतीने वापरले तर टिकेल. )

नीधप, लाकडाला वास अजिबात येता कामा नये. ( हे एकदा वापरून ओले झाल्यावरही बघायचे ) त्याला खाचाखोचा नकोत. जर त्याचा रंग बदलला, जळले, हळदीने माखले, तूकडा उडाला तर टाकून द्यायचे. काही ठिकाणी परंपरेने असे डाव वापरात आहेत ( अर्थातच कोकण ) तिथले बिनधास्त वापरायचे.

स्वाती धन्यवाद. पण टोमॅटो, बीन्स वगैरे वापरले तर काही प्रोब्लेम होत नाहीना।? पदार्थ खराब होणे वगैरे?

>>टोमॅटो, बीन्स वगैरे वापरले तर काही प्रोब्लेम होत नाहीना।? पदार्थ खराब होणे वगैरे?>>
नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. चांगले सिझन केलेले पॅन हवे. अणि पदार्थ शिजला की दुसर्‍या भांड्यात काढून ठेवायचा. मी बरीच वर्षे वापरतेय.

खलबत्त्याला आतुन तळाला गंज आलाय तो काढता येइल का? एकदाच धुतल्यावर कोरडा करायचे राहुन गेले व लगेच गंजला.

परत तारेच्या घासणीने लिंबू व मिठ लावून घसाघसा घासून मग वाळला की लगेच तेलाचा हात लावून आत फडके कोंबून ठेवा....वापरायच्या वेळेस फडके बाहेर काढून मग पुसून घेऊन वापरा

मला लहान स्वैपाकघरात पाण्याच्या स्टीलच्या गोल पिंपाची अडचण होतीये....टपर्वेअरचे चौकोनी १० ली चे पिंप आवडले आहे पण चांगले असलेले ट्रॅडिशनल पिंप काढून ते नवे प्लॅस्टीकचे विकत आणले तर घरच्यांच्या संभाव्य प्रतिक्रियांची जरा भिती वाटतीये. कोणी काही उपाय शोधलाय का ह्यावर? Happy

माझ्या देशी मिक्सरने राम म्हटलं आहे. संधीचा फायदा घेऊन Vitamix घेईन म्हणतेय. कोणी वापरलय का? काय अनुभव ? कमी quantity असेल -- चटणी, आल लसूण पेस्ट -- नीट होते का? की फक्त सुप, ईडली पीठ वगैरे?

http://hotdishes.net/Indian_kitchen_Appliances/Indian_Mixie_mixer_grinde... इथल्यासारखे दिसणारे बारके मिक्सरचे भांडे ऑस्टर ब्लेंडर वर व्यवस्थित फिट होते. त्यात थोडेसे वाटण असेल तर व्य्वस्थित होते . ओल्या चटण्या, कांदा खोबरे वाटण .

ऑस्टर ब्लेंडर? हे नविन ऐकले ... पहाते. मॅजिक बुलेट आहे, पण पाणी घातल्याशिवाय काही होत नाही त्यात. ओली चतणी होते पण आलं लसूण पेस्ट, कोरड्या चटण्यांना ऊपयोगी नाही Sad

सानुली! रिव्हेलचा ब्लेन्डर मिळतो, ईन्दियन ग्रोसरीत, तो कोरड्या चटण्या, पाणी न घालता वाटणाला बेस्ट आहे.
माझ्याकडे हा ७ वर्श आहे, मस्त आहे एक्दम! पण आकाराने लहान आहे, एकच भान्ड आहे, त्यामुळे तुला मोठ्या गोश्टिसाथी सपोर्टला लागेल काहितरी,
http://www.ebay.com/itm/like/111825060303?ul_noapp=true&chn=ps&lpid=82
( मि पन इग्रो मधे ४० लाच घेतला होता)

रोटीमेटीक बद्दल खुप महिन्यापुर्वी आपण चर्चा केली होती. कोणी घेतला असल्यास आता अनुभव लिहाल का? घ्यावा का?

नुट्रीबुलेट पण मस्त आहे. पण जास्त प्रमाणातच छान वाटले जाते.

परवाच्या सायबर मंडेला अमेझॉनवर इन्स्टन्ट पॉट मिळाला. प्रेशर कुकर, स्लो कुकर , राईस कुकर अजुन काय काय सगळं ७-इन-१ प्रकार. भारी उपकरण आहे. आतमध्ये स्टीलचे भांडे आहे मोठे. वेगवेगळी सेटींग्ज वापरून तूरीची डाळ घालून खिचडी बनवली परवा. फोडणी पण त्यातच करता येते. ८ मिनिटात मस्त मऊ शिजली खिचडी. प्रेशर जाऊ द्यायलाच १० मिनिटं लागतात. पण शिट्ट्या नाहीत आवाज नाही. आज उद्यात पावभाजी करून पाहणार आहे.

अजुन कोणाकडे आहे का? रेसिप्या शेअर करा बरं..

http://www.amazon.com/Calphalon-Tri-Ply-Stainless-13-Piece-Cookware/dp/B...

मी हा सेट घेऊन ठेवला ब्लॅकफ्रायडे ला. कुणी वापरला आहे का? (रचक्याने, मला पण हा सेट कमी किंमतीत मिळाला, आता वाढलीय किंमत)
तिथे दुकानात एक बाई म्हणाली की खूपच छान आहे मी त्यातल्या पॅन मध्ये डोसे करते http://www.maayboli.com/dir/Language_and_Literature/index.html
मी घेतलाय पण वापरला नाहिये.

आणि स्टिल्ची भांडी नॉनस्टीक सारखी कशी करावीत्/वापरावीत ह्या बाबतीत हुडकताना हे सापडल https://www.youtube.com/watch?v=1376ITxF1Oc

मी असा स्टेनलेस स्टीलचा सेट दोनेक वर्षांपूर्वी ब्लॅक फ्रायडेला कॉस्कोतून ऑर्डर केला होता. सेट आहे चांगला पण एक दोन भांडी वगळता सगळीच मोठ्या साईजची भांडी आहेत आणि चार माणसांच्या स्वैपाकाला अजिबात लागत नाहीत म्हणून मग मार्शल्समधून मिडीयम साईजचे दोन तीन पॅन्स, पॉट्स घेतले आहेत.

मी फिलिप्सचा हा मिक्सर ग्राइंडर घेतलाय. आतापर्यंत वापरलेल्या मशीन्सपैकी बेस्ट. पॉवरफुल. झाकण क्लिप लावून बंद करायची सोय. डोम शेप्ड झाकणामुळे वेट ग्राइंडिंगला/ब्लेंडिंगला जास्त जागा मिळते. तसंच झाकण न उघडताही काम कसं चाललंय ते दिसतं. वाटलेला /दळलेला जिन्नस भांड्याला चिकटत नाही. आवाज कमी.त्याचं नावंच सुपर सायलेंट आहे.

फक्त चटणीचं भांडं जरा लहान वाटतंय. आणि मशीन वापरताना येणारा प्लास्टिकचा स्ट्राँग वास दोन महिने झाले तरी जात नाहीए.

पॉवरफुल. झाकण क्लिप लावून बंद करायची सोय. डोम शेप्ड झाकणामुळे वेट ग्राइंडिंगला/ब्लेंडिंगला जास्त जागा मिळते. तसंच झाकण न उघडताही काम कसं चाललंय ते दिसतं. वाटलेला /दळलेला जिन्नस भांड्याला चिकटत नाही. आवाज कमी.>>>>>>>>>> ह्या सगळ्य गोष्टी माझ्या ही मिक्सर मधे आहेत. ८ वर्ष काहीही न होता चालतोय. मॅगीचा आहे.

Pages