"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक २

Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:00

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
zabbu_flower_macro.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहा पुणे मंडईतला फुलांचा बाजार.. लहानपणी आजीबरोबर जायचे मी. या बाजाराच्या मागे छोट्या चाळवजा इमारती होत्या/ आहेत तिथे गाळे होते फुलांचे. असा जमिनीपासून ढीग लावलेला असायचा तिथे. गुलाबाच्या गाळ्यात गेलं की नुसता घमघमाट आणि असले सुंदर रंग.... एकदम ते सगळं आठवलं...

फुलं मस्तच.. बुचाच्या फुलांचा पण काय मस्त वास असतो. हिरवी पण अबोली असते.. छान दिसते ती सुद्धा.. झेंडू डोक्यात घातलेला मस्त दिस्तोय.. Happy

हा माझा आजचा झब्बू..

IMG_0951.JPG

नी, तू टाकलेला फोटो कुठल्या फुलाचा आहे?... कसलं मस्त आहे ते प्रकरण!

माझा आज पहिल्यांदाच फुलांचा गड्डा झब्बू:

DSC01587.JPG

Rose Garden
Birmingham Botanical Gardens
Birmingham, AL, USA

आणखी एक

Flower2.jpg

GD1.jpg

कसले क्लास फोटो सगळ्यांचे..
सखीप्रिया, मला नाव पाठ होतं एकेकाळी पण आता लक्षात नाही. कोकणात बर्‍याच ठिकाणी दिसतं हे.

नीरजाने टाकले आहे ते Helocinia , उच्चार हेलोकिनिआ. मराठीत 'सीतेची वेणी' असं म्हणतात.

मोगरा, अबोली, हजारी मोगरा , बॉल लिली अणि बकुळी !!!!! मला माझं लहानपण आठवलं . ही सगळी फुलं आमच्या बागेत होती. गणेशवेलीच्या फुलाचे फोटो नाहीत का कोणाकडे?

किती सगळी फुले ! Happy
नलिनी सुरेख फोटो आहेत सगळे. लाजो वरच्या फोटोतले कलर डिटेल्स क्लास आहेत.

कुणाकडे संक्रांतवेल आहे का? संक्रांतीच्या सुमारास फुलते आणि अशी झळझळीत केशरी असतात फुलं. घोसाने येतात. माझ्या पुण्याच्या घरातल्या बाहेरच्या कंपाउंडवर होती अशीच आलेली. पण त्याची काडी काढून त्याचं रोप करायच्या आधीच आमच्या समोरच्या कारखानावाल्याने ती उडवली आणि कंपाउंडची जाळी काढून सिमेंटची भिंत घातली. Sad

Pages