"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक २

Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:00

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
zabbu_flower_macro.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं हेलिकॉप्टर नाहीये केलेलं. माझ्या क्यामेर्‍याने ज्याला ते फूल लटकलंय तो कोळ्याच्या जाळ्याचा धागा पकडलाच नाही.

याचं नाव माहिती नाही पण सुगंध अगदी वेड लावणारा.. आणि त्यांत आजूबाजूचं बर्फाच्छादीत सृष्टीसौंदर्य.. उफ्फ्! ओ पी नय्यरच्या एखाद्या गाण्यात असल्यासारखं वाटत होतं Happy

DSC03123_1.JPG

ही मुळशीला टिपलेली बांबुची फुलं, प्रत्येक बांबुच्या जातीला ठरावीक वर्षांनी फुलं येतात म्हणे... आणि एकाच 'घराण्यातील' दोन झाडं जगात कुठही असतील तरी त्यांना एकाच वेळी फुलं येतात असं ऐकलंय!!

Maldives chya resort madhil salad decoration: beet root, onion, carrorts, raddish, etc...
IMG_3552.jpg

गणपतीच्या चरणी आज हे फूल अर्पण...
ajun-ek-phul.jpg

शोनू तुला खेळांच्या झब्बूवर द्यायचा होता का हा झब्बू?

svs, जास्वंद खूपच सही!

घरच्या बागेतलाच मेफ्लॉवर....

Picture 011.jpg

याचे कंद वर्षभर जमिनीखाली गाडलेले असतात. वर काहीच दिसत नाही. उन्हाळ्यात अचानक कोंब फुटून पानं येतात आणि बघता बघता हा लालबुंद डोलारा उभा राहतो Happy

हा माझा पण झ्ब्बू....................Copy of ishu 112.jpg

ishu 1
12.jpgहा माझा पण झब्बू..................... किती ट्राय केल्यावर जमल मला. हूश्...........

उजू,
फोटो छानच आहे पण तुम्ही एकच फोटो का टाकताय. ही जास्वंद तीन वेळा टाकली गेलीये. तुम्हीच टाकलीये. दर वेळेला नवीन फूल टाका.

Pages