मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रम

Submitted by रैना on 5 January, 2011 - 23:48
ठिकाण/पत्ता: 
लोकमान्य साहित्य सेवा संघ. विलेपार्ले पूर्व

मॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शन- पार्ले

लेखिका कविता महाजन यांच्या मुलाखतीने कार्यक्रमांचे उद्घाटन होणार असून स्नेहा अवसरीकर आणि पत्रकार मुकुंद कुळे त्यांची मुलाखत घेतील. ८ जानेवारी रोजी विजय केंकरे हे ‘रंगभूमी, छोटा पडदा ते मोठा पडदा’ या कार्यक्रमाअंतर्गत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांची मुलाखत घेणार आहेत. ९ जानेवारी रोजी द्वारकानाथ संझगिरी हे उद्योजक किशोर अवर्सेकर आणि रवींद्र प्रभुदेसाई यांची मुलाखत घेतील, तर १० जानेवारी मुकुंद टाकसाळे हे गीतकार स्वानंद किरकिरे यांची मुलाखत घेणार आहेत. ११ जानेवारी रोजी ‘गे आणि लिव्ह इन रिलेशनशिप’ या विषयावर परिसंवाद होणार असून चिन्मय केळकर, उज्ज्वला कद्रेकर आणि अनिल कदम हे त्यात सहभागी होणार आहेत. १२ जानेवारी रोजी ‘लोकसत्ता’चे कार्यकारी संपादक गिरीश कुबेर हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेमार आहेत. तर १३ जानेवारी रोजी ‘भाषा बदलते आहे’ या परिसंवादात प्रवीण दवणे, ‘लोकसत्ता’च्या वरिष्ठ सहसंपादक शुभदा चौकर, प्रदीप भिडे, मनस्विनी लता रवींद्र आपले विचार मांडतील. १४ जानेवारी रोजी ‘बदलती जीवनशैली आणि आरोग्य’ या विषयावर मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांची सुचित्रा इनामदार या मुलाखत घेणार आहेत. १५ जानेवारी रोजी ‘क्रिकेट, वल्र्डकप आणि भारत’ या चर्चासत्रात द्वारकानाथ संझगिरी, प्रवीण आमरे आणि विनोद कांबळी सहभागी होणार आहेत. १६ जानेवारी रोजी आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांच्या मुलाखतीने ‘मॅजेस्टिक’ गप्पांची सांगता होणार आहे. याशिवाय सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

लोकसत्तेतील बातमी.

माहितीचा स्रोत: 
वर्तमानपत्र, इतर
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Thursday, January 6, 2011 - 21:00 to शनिवार, January 15, 2011 - 21:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्ड ट्रेड सेन्टर , कफ परेड. सिल्क फॅब. आजच प्रदर्शन सूरू झाले आहे. ३ ऑगस्ट पर्यन्त आहे.
वेळः सकाळी ११ पासून रात्री ८ पर्यन्त.
शक्यतो चुकवू नका.

“Art Furniture and Household Decoration In Nineteenth Century Bombay: Trading Art Across The Globe” by Dr Mrs Louiza Rodrigues (Research Fellow- Avabai Wadia Research Fellowship)
at 6 pm on Tuesday, 4th August 2015, Dr Sir J J Modi Memorial Hall, 136 Bombay Samachar Marg, Opposite Lion Gate, Fort, Mumbai – 400 023

परदेशातील पर्यटन -माहिती/नावनोंदणी वगैरेसाठी प्रदर्शन

IITM Mumbai
Date: 28, 29, 30 August 2015
Venue : Hall No. VI, Bombay Convention & Exhibition Centre, Goregaon East, Mumbai – 400063

एशियाटिक सोसायटीतर्फे 'प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास' या पदविका अभ्यासक्रमसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. यात वेद, रामायण, जातककथा, संस्कृत साहित्य, विविध लिपी, शिलालेख, नाणी यासंबंधी धडे देण्यात येतील. गेल्या वर्षीपासून हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. ५ सप्टेंबरपासून अभ्यासक्रमाला सुरुवात होईल. बारावी उत्तीर्ण ही किमान शैक्षणिक पात्रता आहे.प्राचीन भारतीय संस्कृतीचे मूलस्त्रोत आणि भारतीय संस्कृतीचे विविध पैलू अश्या दोन विभागात हा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. प्रत्येक आठ्वड्याच्या शनिवारी दुपारी २ ते ५ वेळेत हे वर्ग चालतील. अधिक माहितीसाठी ०२२-२२६६००६२ वर संपर्क साधावा.

(लोकसत्तातली जाहिरात)

मुग्धा कर्णिक यांच्या फेसबुक वॉलवरून :

अतिशय सुंदर खडक, खनिजद्रव्ये, जीवाश्म, प्राचीन भारतीय नाणी, अनेक पुरावस्तू यांचे भव्य प्रदर्शन मुंबई विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण विभागातर्फे अनेक शैक्षणिक संस्था आणि व्यक्तींच्या सहकार्याने दि. १६ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०१५ या चार दिवसांत विद्यानगरी, सांताक्रूझ पूर्व येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे भरवण्यात येत आहे. सकाळी दहा ते सायं. सहा पर्यंत प्रदर्शन खुले राहील.
प्रवेश निःशुल्क.
प्रदर्शनाव्यतिरिक्त अनेक उपक्रम, कार्यशाळाही असतील.
अवश्य भेट द्या.

IIT Bombay is hosting Asia's largest science and technology festival called Techfest at Powai. 26-28 Dec. Entry free. Photo ID needed.

सम्यक कलांश प्रतिष्ठान आणि शासकी य विधी महाविद्यालय नाट्य विभाग ह्यांच्या संयुक्त विद्यमाने २७-२९ डिसेंबर सकाळी ११ ते दुपारी १ कळसूत्री बाहुल्यांची ३ दिवसांची कार्यशाळा चर्चगेट येथील शासकीय विधी महाविद्यालय इथे आयोजित करण्यात आली आहे. सर्व वयोगटा तील लोकांसाठी. अधिक माहिती ९६६४२७८५८०.

(लोकसत्ता जाहिरात)

मुंबई विद्यापी ठाच्या बहि:शाल शिक्षण विभागातर्फे कलिना ये थे भूशात्र आणि पुरातत्त्व यासंबंधी प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. १६-१९ डिसेंबर

अपंगांसाठी मुंबईत आय टी प्लेसमेंट मेळावा आहे इतक्यात. एव्हडीच माहिती मिळालीये. तेही कुणीतरी व्हॉटस अ‍ॅप वर वाचली होती असे कळाले. पण पोस्ट नाही मिळाली व्हॉटस अ‍ॅपची. कुणाला या मेळाव्या बद्दल माहित असेल तर प्लीज लिहा इथे Happy

मुंबई संस्कृती हा शास्त्रीय संगीत महोत्सव ९ ते १० जानेवारी ला एशियाटिक लायब्ररीसमोरच्या टाऊन हॉलमध्ये आहे. पहिल्य दिवशी बासरीवादक राकेश चौरसिया, तबलावादक उस्ताद फझल कुरेशी आणि पखवाजविद्वान पंडित भवानी शंकर ह्यांचे कार्यक्रम तर दुसर्‍या दिवशी पार्वती आण त्यांचा चमू पाच शास्त्रीय नृत्यं सादर करणार आहेत. विनामूल्य प्रवेशिका र्‍हिदम हाऊस, महाराष्ट्र वॉच कंपनी आणि एमटीडीसी काऊंटर (मादाम कामा रोड) इथे उपलब्ध.

(लोकसत्ता)

गोदरेज आर्काइव्ह्ज, टाटा सेन्ट्रल आर्काइव्ह्ज आणि छत्रपती शिवाजी महारा़ज वास्तूसंग्रहालय याम्च्या वतिने डॉ.रामचंद्र गुहा यांचे 'द चॅलेंज ऑफ कंटेंपररी हिस्टरी' ह्या विषयावर व्याख्यान आहे. १९ जानेवारी, संध्याकाळी ६ वाजता, व्हिजिटर्स सेंटर, छत्रपती शिवाजी महारा़ज वास्तूसंग्रहालय, काळा घोडा, एम जी रोड फोर्ट.

(लोकसत्ता)

एशियाटिक सोसायटीत पाचव्या दुर्गा भागवत स्मृती व्याख्यानांतर्ग्त डॉ. अरुणा ढेरे ह्यांचे 'द्रौपदी आणि महाभारत - एक वेगळा दृष्टीकोन' ह्या विषयवार व्याख्यान. अध्यक्षस्थानी डॉ. मीना वैशंपायन. ५ जानेवारी, संध्याकाळी ५:३०, दरबार हॉल, एशियाटिक सोसायटी, टाऊन हॉल.

(लोकसत्ता)

महालक्ष्मी सरस १६ जानेवारीपासून सुरु होतंय असं ऐकलंय. पेपरात काहीही आलेलं नाहिये अजून. कोणाला काही माहिती?

आशिष बुक सेंटरचा पुस्तक मेळा आता बोरिवलीत

श्री जालाराम मंदिर मैदान, टीबीझेड शोरूमसमोर, गुलमोहर रोड, ऑफ लोकमान्य टिळक रोड, बोरिवली पश्चिम

८ जानेवारी ते ७ फेब्रुवारी

सकाळी १० ते रात्रौ १०

येस्स.....महालक्ष्मी सरस ची जाहिरात आलेय आज लोकसत्तात....१६ ते २८ जानेवारी. बान्द्रा रेक्लेमेशन. Happy

The Welfare of Stray Dogs (WSD) is an animal welfare NGO that sterilizes and immunizes stray dogs. We also have an adoption program for abandoned pets and pariahs, an on-site first–aid program and an education and awareness program in schools, colleges, streets and slums. WSD has so far sterilized more than 51,000 stray dogs and impacted the lives of over a lakh and forty thousand through first-aid, immunization and adoption.

WSD spends Rs 7, 00, 000 per month on the above activities and we depend on the largesse of donors to fund these activities.

One of the methods of raising funds to sustain our costs is our regular garage/jumble sales and we are having a BOOK and GARAGE SALE from May 11 to 13, 2016(Wednesday to Friday) from 10 am to 8 pm.

Venue : LAXMI BAUG HALL, Avantikabai Gokhale Road, (Auto Spare Parts Market Lane), Off Lamington Road, Near Opera House, Girgaum, Mumbai - 4

On Sale -Books, Crockery, Cutlery, Paintings, Kitchenware, Toys, Knick knacks, Artefacts, Glassware, CDs, DVDs, Gift Items at Throw Away Prices.

You will find a treasure trove of BOOKS on various subjects including Children, Fiction, Non-fiction, Self-Help, Hobbies, Poetry and New Releases books at Special Prices.
Special items: Evolution clothes dryer, wood/glass coffee table, wood/glass cabinet, L Pavoni coffee mill, handheld blender, automatic pet feeder, 27 inch Aiwa TV (not flat screen), old glass lamp shades, Yamaha keyboard, guitar, Ab Exerciser bench, 3-seater upholstered sofa

The proceeds of the Garage Sale would be used to fund the above–mentioned programs.

मॅजेस्टिक बुक डेपोच्या विलेपार्ले शाखेत पुण्याच्या देशमुख आणि कंपनीतर्फे ३० जूनपर्यंत (सकाळी १० ते संध्याकाळी ८) पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. ना. धों. ताम्हनकर, इरावती कर्वे, वि.स. खांडेकर, विभावरी शिरुरकर ह्यांची पुस्तकं उपलब्ध आहेत.

सुंदरबाई हॉल (इन्कम टॅक्स ऑफिसच्या मागे, चर्चगेट) मध्ये आशिष बुक सेंटरचं पुस्तक प्रदर्शन भरलंय. २-२१ ऑगस्ट, ९:३०-८:३०. १५ ऑगस्टला सुध्दा खुलं आहे.

मुंबईतील प्रदर्शने, फेब्रुवारी २०२०.

काही मोजकी प्रदर्शने आणि जागा पाहा.

१) पंचविसावे फळे फुले प्रदर्शन, मुंबई महापालिका यांचे.
वीरमाता जिजाबाई उद्यान(राणीबाग),मुंबई (भायखळा स्टेशनपाशी) - ३१ जाने, १,२ फेब्रुवारी.
मागच्या वर्षी लहान मुले खूप आली होती. विविध सेल्फी पॉइंटस फुलांचे देखावे होते. बच्चेकंपनी खुश.
यावर्षी मुंबईतील गेटवे, म्हातारीचा बूट वगैरे फुलांचे आकार असणार आहेत. रोपे, कुंड्या,विक्रीचे अनेक स्टॉल्स.
(शुल्क नाही.)
शिवाय राणीबागेत नवीन आणलेले प्राणी. २६ जानेवारीला उदघाटन झालेली दालने पाहता येतील. ज्येष्ठांना नि:शुल्क. इतरांना ५०.

● दरवर्षी बागकामाचा तीन दिवसांचा कोर्स पहिल्या दिवशी दहाला सुरू होतो. दहा ते पाच. शुल्क पाचशे रु, सर्टिफिकेट मिळते.( विनाशुल्क विना प्रमाणपत्र तीनही दिवस बसता येते.)
----------------------------

२) पर्यटन प्रदर्शन

३,४,५ फेब्रुवारी २०२०
३ फे - फक्त बिझनेस एजंटसाठी
४ फे दु दोन ते सात, सर्वांसाठी
५ फे दु अकरा ते सात.सर्वांसाठी

TTF ,Fairest Media. Site - ttfotm dot com.
Bombay exhibition center. Goregaon east.
बान्द्रा बोरिवली हायवेवर आहे.
----------------------------

३)झाडांचे प्रदर्शन

फ्रेंडस ओफ ट्रिज यांचे - ८,९ फेब्रुवारी, रुपारेल कॉलेज आवार. माटुंगा रोड रेल्वे स्टेशन ( पश्चिम रेल्वेचे) समोर). गुलाब, इतर फुलझाडे, निवडुंग, अनेक बोनसाई.

---------------------------

४) काला घोडा आर्ट फेस्टीवल २०२०

शनिवार १ फेब्रुवारी ते रविवार ९ फेब्रु २०२०.
रोज सकाळी दहा ते दहा. पहिल्या दिवशीच ब्रोचर मिळवा. Official site kala ghoda art festival
दमून जाल एवढे भरगच्च कार्यक्रम असतात.

अधिक माहिती बातमी holidayfi

-----------
2016 चे kala ghoda ब्रोशर (पन्नास पानी)

त्यातले एक पान

चारही ठिकाणी हौशी फोटोग्राफरांना भरपूर संधी.
----------------------------

आणखी एक इवेंट असतो हिंदुस्तान टाईम्सचा प्रायोजित ' No tv day' म्हणून. बहुतेक १ मार्च. या दिवशी फ्री हेलिकॉप्टर राईड मुलांसाठी असते, हौशी फोटोग्राफरांसाठी फोटो स्पर्धा असते.

Pages