उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनवन्ती, रात्री झोपताना कोरफड जेल फासणे.
अर्थात त्याने स्किन एका रात्रीत उजळ वगैरे होणार नाही. पण जो अपाय होत रहातो तो होणार नाही आणि कमी काळवंडेल.

पुण्यात उर्जिता जैनची products कुठे मिळतील, एक कलीगला हवी आहेत, ती टिळक रोडला राहते. सो आजूबाजूच्या एरियात मिळण्याची शक्यता आहे का?

11.GIF ही कोरफड जेल dr. urjita jain यान्ची आहे का? मी वापरतेय म्हणून विचारले. त्यावर Dr's JAIN"S असे म्हणले आहे.

हो

उन्हामुळे माझे हात खुप काळवंडले आहेत. परवा फेसबुकवर एक नुस्खा वाचला आणि अनुभवात आणावा असे वाटले म्हणुन करुनही पाह्हिले.

एक पिकलेला टोमॅटो मिक्सरमध्ये वाटुन घ्यायचा, त्यात दोन चमचे जेष्ठमध पावडर, अर्धे ल्लिंबु पिळुन आणि दोन चमचे गुलाबपाणि घालुन चांगले मिक्स करायचे. हे मिश्रण हातावर लावुन १५-२० मिनिटे ठेवायचे, साधारण वाळेपर्यण्त. मग ओल्या कापसाने किंवा कापडाने जरा घासावे. मी जरासे ओलसर असताना तसेच हातावर घासले. आणि नंतर थंड पाण्याने धुतले. खुप फरक जाणवला. साधारण आपण कुठलाही लेप त्वचेवर लावला की तात्पुरता फरक जाणवतोच. पण याने नंतरही फरक जाणवत राहिला. मी एकदाच केले. पण परत परत करुन टॅन पुर्ण घालवायचाय मला. आणि याने नक्कीच जाईल असे वाटतेय्.

Forest Essentials Narangi Nagkesar Facial Ubtan,try this product,its awesm,n reviews are rave too(couldnt type in marathi)

साधना थँक्स... नक्की करुन बघेन...

माझा अनुभव - पिकलेल्या टोमॅटोची चकती हातावर घासली तरी टॅन खुप कमी होतो.. tv बघता बघता हे काम होऊन जाते.....

संत्र्याच्या फोडीनं मसाज केला तरी टॅन एकदम कमी होतो. एकुणातच चेहर्‍याची कल्हई करण्यासाठी संत्र्याची फोड बेस्टेस्ट उपाय आहे Happy

Happy Happy आता ह्या धाग्या वरच्या पोस्टी काय करायच्या??????????? की असला धागा काढायला दिल्याबद्दल अ‍ॅडमिनला निषेध खलिता पाठवाव ?????

काय हे!!!
तिकडे बायका गुलामगिरीत अडकून पडल्यात म्हणून सगळ्या जगाला काळजी वाटतीये आणि तुम्ही उजळ त्वचेसाठी टोमॅटो मिक्सरमध्ये वाटुन घ्या

तिकडे बायका गुलामगिरीत अडकून पडल्यात म्हणून सगळ्या जगाला काळजी वाटतीये आणि तुम्ही उजळ त्वचेसाठी टोमॅटो मिक्सरमध्ये वाटुन घ्या>>> Rofl

Pages