बाजीराव मस्तानी या संजय लीला भन्सालीच्या बहुचर्चित सिनेमांतील ‘पिंगा ग्ग पोरी’ हे गाणे नुकतेच यू ट्य़ूब वर झळकले.
इथे ते गाणे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=xz-Vac75to4
आणि बस्स यावरूनच फेसबूक, व्हॉटसप, आणि मराठी सोशलसाईटसवर वाद सुरू झाला.
(खरे तर बाजीराव पेशव्यांच्या भुमिकेसाठी AIB फेम रणवीर सिंगला घेतले तेव्हाच मला खटकले होते, पण ते एक असो)
मुळातच बाजीराव पेशवे हे त्यांच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असण्यापेक्षा बाजीराव मस्तानी या प्रेमप्रकरणासाठीच जास्त प्रसिद्ध. एकाअर्थी हे दुर्दैवीच. पण बरेचदा ईतिहासातील काही जोड्या अश्याच प्रसिद्ध होतात. उदाहरणार्थ, अकबर राजा काय कोण होता हे माहीत असायच्या आधीच आपल्याला तो “अकबर-बिरबल’ म्हणून समजतो. पुढे त्यावर चित्रपटही ‘जोधा-अकबर’ नावाने निघतो.
असो, या निमित्ताने का होईना, भले बाजीराव मस्तानी यांची प्रेमकथा ही केंद्रस्थानी असली तरी बाजीराव पेशव्यांचा ईतिहास चित्रपटाच्या सशक्त माध्यमातून जगभर पोहोचणार आहे. पण इथे एक प्रश्न उभा राहतो ते त्या ईतिहासाची चीरफाड तर होणार नाही ना. कारण ऐतिहासिक चित्रपट म्हणजे काही ‘देवदास’ नाही जे भन्साली सिनेमॅटीक लिबर्टी वापरून मूळ ईतिहासाशी फारकत घेणारी पटकथा लिहितील. आता हे असे झालेय की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. सेन्सॉरची परवानगी मिळाली म्हणजे त्यांच्यामते काही गैर नसावे. अर्थात सेन्सॉर हा मुद्दा लक्षात घेतात की नाही हा आणखी एक चर्चेचा विषय होईल कारण त्यासाठी त्यांना स्वत:ला ईतिहासाचा अभ्यास करावा लागेल आणि त्यातून खराखोटा ईतिहास शोधावा लागेल. जे हल्ली फार कठीण काम झालेय.
तर आता पिंगा ग्ग गाण्याकडे वळूया,
देवदासमध्ये पारो आणि चंद्रमुखी एकत्र नाचताना दाखवल्या होत्या. डोला रे डोला गाणे हिट झाले होते. या गाण्याचा फायदा चित्रपट चर्चेत आणायला आणि हिट करायला झाला. बस्स पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला वापरत भन्सालींनी यात ‘मस्तानी आणि काशीबाई’ यांचे एकत्रित नृत्य ठेवले आहे. बहुधा इतिहासात अश्या नाचाचा संदर्भ असावा असे वाटत नाही. त्यामुळे नक्कीच हे सिनेमेटिक लिबर्टीमध्येच येते. सिनेमा डॉक्युमेंटरी सारखा बनवण्यापेक्षा प्रमोशनसाठी असे एखादे गाणे बनवून त्यात कमर्शिअल फॅक्टर जोडल्यास तो सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, पर्यायाने बाजीराव पेशव्यांचा ईतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, असा विचार केल्यास यात फारसे काही चुकीचे वाटत नाही. (आता चित्रपट बनवणार्यांचा हेतू ईतिहास सर्वदूर पोहोचवणे आहे की पैसा कमावणे आहे हे तुर्तास बाजूला ठेऊ. कारण चित्रपट बघायला येणारे प्रेक्षकही ईतिहास बघायला येणार आहेत की प्रियांका, दिपिका आणि भव्यदिव्य सेटस बघायला, हा देखील मग संशोधनाचा विषय होईल.)
तर पिंगा ग्ग पोरी या गाण्यात सिनेमॅटीक लिबर्टी घेत पैसा कमवायच्या नादात पेशवेकालीन संस्कृतीची वाट लावली आहे असा ओरडा गेले दोन दिवस सगळीकडे दिसत आहे. उत्सुकतेने आज वेळ मिळताच मी हे गाणे यूट्यूबवर पाहिले. गाणे सुरू झाले आणि थोड्यावेळासाठी मी विसरून गेलो की मी नक्की कश्यासाठी हे गाणे बघायला आलोय. उत्कृष्ट कोरीओग्राफ केलेले गाणे, दोघींचेही लाजवाब दिसणे आणि तितकेच दिलखेचक नृत्य. सोबत संगीतही चांगले असल्याने गाण्याचा मी पुरेपूर आनंद उचलला. जर यातील पेशवेकालीन संदर्भ क्षणासाठी विसरून गेलो तर त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही, वाटूही नये.
त्यानंतर मग मी उठलेल्या वादाला अनुसरून पुन्हा एकदा ते गाणे पाहिले, पण तरीही काही ठिकाणी जशी टिका वाचून आलेलो की गाणे फार उत्तान झालेय तसे काही आढळले नाही. कदाचित प्रत्येकाचा उत्तानपणाचा बेंचमार्क वेगळा असावा किंवा टिका करणारा पेशवेकालीन संस्कृतीचा बेंचमार्क डोळ्यासमोर ठेवून बोलत असावा. आता त्या गाण्यातील साडी वा दागिने वगैरे त्या काळात मुळी असे घालायचेच नाहीत अश्या वादात मला रस नाही, पण काहीतरी वल्गर, असभ्य, असंस्कृत दाखवल्याच्या आवेशात जी टिका कुठेकुठे पाहिली त्यात तेवढेही तथ्य वाटले नाही.
मी माझे हे प्रामाणिक मत तितक्याच निरागसपणे एके ठिकाणी मांडताच मलाही त्यावर टिका झेलावी लागली. अर्थात कोणाच्या भावना कुठे दुखावतील हे आपण सांगू शकत नसल्याने त्या भावनांचा आदर ठेवत मी मनात कोणाबद्दल राग ठेवला नाही. तसेच कोणाला माझ्या मताचा राग आला असल्यास त्याबद्दल मी देखील क्षमस्व. कदाचित मी पेशवेकालीन संस्कृती आणि तेव्हाची नृत्यसंस्कृती याबद्दल अनभिज्ञ असेल असेही असू शकते. त्याकाळाचा विचार करता खरेच एखाद्याला ते संतापजनक वाटू शकते. मात्र आणखीही चार भिन्न प्रवृत्ती आणि विचारांच्या माणसांची मते जाणून घेऊया म्हणून हा विषय मायबोलीवर आणत आहे.
पिंगा ग्ग पोरी सारख्या गाण्यात किंवा पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ऐतिहासिक चित्रपटात सिनेमॅटीक लिबर्टी घेणे कितपत योग्य अयोग्य?
आणि एखाद्या दिग्दर्शकाने ती घेतलीच, तर पुढे काय?
अनु पिंगा पहिल्यांदा पाहिला
अनु
पिंगा पहिल्यांदा पाहिला तेव्हा मलाही हेच वाटल सगळी डोला रे ची कॉपी
.
.
केस मोकळे सोडून मस्तानी
केस मोकळे सोडून मस्तानी युद्धावर का जाईल? अंबाडा बांधणार नाही का साधा लॉजिकली? >>> अगदी , माझ्या मनात हेच आल होतं.
जाउदे केसात शंभर गुंते झाले
जाउदे केसात शंभर गुंते झाले आणि हजार ठिकाणी केस अडकून तडतडले की आपोआप पुढच्या युद्धात आम्बाडा बांधून जाईल, काही लेसन्स या पोरींना स्वतः ठेचा खाउनच शिकूदे
अनु
अनु
मला असंही वाटून गेलं की केस
मला असंही वाटून गेलं की केस बांधले तर ती अगदीच ओळखता येणार नाही. पहिल्याच झटक्यात ती एक बाई आहे, दिपिका आहे, मस्तानी आहे हे लोकांच्या एका सेकंदात लक्षात यायला हवं. मग पात्र, त्याची मानसिकता, त्याचं वागणं मुळात कसंही का असेना. ती हीरॉइन आहे आणि तशीच दिसायला हवी कधीही, कुठेही :-|
अजून एक, मस्तानी अफाट लावण्यवती होती असं म्हणतात. ते लावण्य दिसावं यासाठी दिपिकाला या सिनेमात अननॅचरल गोरं (?) (पांढरं) दाखवलंय असं नाही वाटलं कोणाला ट्रेलरमध्ये? ती मुळात इतकी गोरी नाहीये कारण.
जाऊदे, या सिनेमाबाबत काहीच आवडत नाहीये. बाजीराव मस्तानी म्हटलं की डोळ्यापुढे मनोज जोशी, स्मिता तळवलकर आणि अश्विनी भावेच येतात. त्यांना डोळ्यासमोर ठेवून 'राऊ' वाचावे
मराठी बाजीराव मस्तानी
मराठी बाजीराव मस्तानी मालिकेतील मस्तानी प्रचिती काही तरी दिसायला छान होती.
जुनी मस्तानी अश्विनी भावे तर ऑल टाईम मस्त.
दिपीका ऐवजी ऐश किंवा कॅट (आता मला झोडपणार पब्लिक!!) छान दिसली असती. कॅट वर इंडियन ट्रेडिशनल खूप छान दिसते (स्लाइस च्या जाहीराती)
मस्तानी गोरी हवी हो, अशक्त
मस्तानी गोरी हवी हो, अशक्त नाही. ऐश किंवा कॅट दोघी कुपोषणग्रस्त दिसतात.
कुपोषणग्रस्त नको, मग प्रीटी
कुपोषणग्रस्त नको, मग प्रीटी झिंटा चालेल का?किंवा सोनाक्षी?किंवा आलीया?

टुनटुन चालेल का?
टुनटुन चालेल का?
मनोज जोशी, स्मिता तळवलकर आणि
मनोज जोशी, स्मिता तळवलकर आणि अश्विनी भावेच येतात. त्यांना डोळ्यासमोर ठेवून 'राऊ' वाचावे >>>>> कस्स्ली आठवणं काढलीतं ! अहाहा .. !
मनोज जोशी, स्मिता तळवलकर आणि
मनोज जोशी, स्मिता तळवलकर आणि अश्विनी भावेच येतात. त्यांना डोळ्यासमोर ठेवून 'राऊ' वाचावे >>> +१
मनोज जोशी, स्मिता तळवलकर आणि
मनोज जोशी, स्मिता तळवलकर आणि अश्विनी भावेच येतात. त्यांना डोळ्यासमोर ठेवून 'राऊ' वाचावे >>> +१
मनोज जोशी, स्मिता तळवलकर आणि
मनोज जोशी, स्मिता तळवलकर आणि अश्विनी भावेच येतात. त्यांना डोळ्यासमोर ठेवून 'राऊ' वाचावे >>> +१
जाऊदे, या सिनेमाबाबत काहीच
जाऊदे, या सिनेमाबाबत काहीच आवडत नाहीये. बाजीराव मस्तानी म्हटलं की डोळ्यापुढे मनोज जोशी, स्मिता तळवलकर आणि अश्विनी भावेच येतात. त्यांना डोळ्यासमोर ठेवून 'राऊ' वाचावे >>>> अगदी अगदी
मनोज जोशी आवडलाच खूप, उत्तम
मनोज जोशी आवडलाच खूप, उत्तम काम पण अंगद म्हसकरनेपण काम छान केलं. मी अंगदची सिरीयल अधे मधेच पाहिली. प्रचीती मात्र अजिबात आवडली नाही. अश्विनी भावेच फेवरेट मस्तानी.
सद्ध्याच्या मराठी
सद्ध्याच्या मराठी अभिनेत्रींमधून काशीबाई व मस्तानीच्या भूमिकेसाठी नावे सुचवा.
काशी स्पृहा जोशी आणि मस्तानी
काशी स्पृहा जोशी आणि मस्तानी प्रिया बापट
काशी स्पृहा जोशी - ओके
काशी स्पृहा जोशी - ओके
मस्तानी प्रिया बापट - ये बात कुछ हजम नहीं हुई. आणखी सुचवा
बाकीच्या माहितीच नाहीत,
बाकीच्या माहितीच नाहीत, म्हणजे चेहरे माहित आहेत पण त्या चेहर्यांची नावं नाहीत.
उर्मिला कानिटकर?
हां, उर्मिला कानिटकर जमू
हां, उर्मिला कानिटकर जमू शकेल.
मस्तानी म्हणुन शर्वरी जमेनिस
मस्तानी म्हणुन शर्वरी जमेनिस परफेक्ट वाटते..
शर्वरी जमेनिस - ही पण जमू
शर्वरी जमेनिस - ही पण जमू शकेल. तिच्यात तो अपील आहे.
म्हणुनच.. पंत तुम्ही काय पोल
म्हणुनच.. पंत तुम्ही काय पोल घेताय का
झालाय न हे मागे?
झालाय न हे मागे?
.
.
पोल नाही. भविष्यात कुणी
पोल नाही. भविष्यात कुणी सिरिअल / सिनेमा काढला आणि मतं मागवली तर द्यायला बरं.
पंत तुम्हीच काढा एक पिक्चर
पंत तुम्हीच काढा एक पिक्चर मराठीत....
काशीबाई- सोनाली कुलकर्णी
काशीबाई- सोनाली कुलकर्णी (जुनी)

मस्तानी- सोनाली कुलकर्णी (नवी)
हिम्या, आमच्याकडे पैकं
हिम्या, आमच्याकडे पैकं न्हाईत.
Pages