बाजीराव मस्तानी - पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ...

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 November, 2015 - 15:19

बाजीराव मस्तानी या संजय लीला भन्सालीच्या बहुचर्चित सिनेमांतील ‘पिंगा ग्ग पोरी’ हे गाणे नुकतेच यू ट्य़ूब वर झळकले.

इथे ते गाणे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=xz-Vac75to4

आणि बस्स यावरूनच फेसबूक, व्हॉटसप, आणि मराठी सोशलसाईटसवर वाद सुरू झाला.
(खरे तर बाजीराव पेशव्यांच्या भुमिकेसाठी AIB फेम रणवीर सिंगला घेतले तेव्हाच मला खटकले होते, पण ते एक असो)

मुळातच बाजीराव पेशवे हे त्यांच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असण्यापेक्षा बाजीराव मस्तानी या प्रेमप्रकरणासाठीच जास्त प्रसिद्ध. एकाअर्थी हे दुर्दैवीच. पण बरेचदा ईतिहासातील काही जोड्या अश्याच प्रसिद्ध होतात. उदाहरणार्थ, अकबर राजा काय कोण होता हे माहीत असायच्या आधीच आपल्याला तो “अकबर-बिरबल’ म्हणून समजतो. पुढे त्यावर चित्रपटही ‘जोधा-अकबर’ नावाने निघतो.

असो, या निमित्ताने का होईना, भले बाजीराव मस्तानी यांची प्रेमकथा ही केंद्रस्थानी असली तरी बाजीराव पेशव्यांचा ईतिहास चित्रपटाच्या सशक्त माध्यमातून जगभर पोहोचणार आहे. पण इथे एक प्रश्न उभा राहतो ते त्या ईतिहासाची चीरफाड तर होणार नाही ना. कारण ऐतिहासिक चित्रपट म्हणजे काही ‘देवदास’ नाही जे भन्साली सिनेमॅटीक लिबर्टी वापरून मूळ ईतिहासाशी फारकत घेणारी पटकथा लिहितील. आता हे असे झालेय की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. सेन्सॉरची परवानगी मिळाली म्हणजे त्यांच्यामते काही गैर नसावे. अर्थात सेन्सॉर हा मुद्दा लक्षात घेतात की नाही हा आणखी एक चर्चेचा विषय होईल कारण त्यासाठी त्यांना स्वत:ला ईतिहासाचा अभ्यास करावा लागेल आणि त्यातून खराखोटा ईतिहास शोधावा लागेल. जे हल्ली फार कठीण काम झालेय.

तर आता पिंगा ग्ग गाण्याकडे वळूया,

देवदासमध्ये पारो आणि चंद्रमुखी एकत्र नाचताना दाखवल्या होत्या. डोला रे डोला गाणे हिट झाले होते. या गाण्याचा फायदा चित्रपट चर्चेत आणायला आणि हिट करायला झाला. बस्स पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला वापरत भन्सालींनी यात ‘मस्तानी आणि काशीबाई’ यांचे एकत्रित नृत्य ठेवले आहे. बहुधा इतिहासात अश्या नाचाचा संदर्भ असावा असे वाटत नाही. त्यामुळे नक्कीच हे सिनेमेटिक लिबर्टीमध्येच येते. सिनेमा डॉक्युमेंटरी सारखा बनवण्यापेक्षा प्रमोशनसाठी असे एखादे गाणे बनवून त्यात कमर्शिअल फॅक्टर जोडल्यास तो सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, पर्यायाने बाजीराव पेशव्यांचा ईतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, असा विचार केल्यास यात फारसे काही चुकीचे वाटत नाही. (आता चित्रपट बनवणार्‍यांचा हेतू ईतिहास सर्वदूर पोहोचवणे आहे की पैसा कमावणे आहे हे तुर्तास बाजूला ठेऊ. कारण चित्रपट बघायला येणारे प्रेक्षकही ईतिहास बघायला येणार आहेत की प्रियांका, दिपिका आणि भव्यदिव्य सेटस बघायला, हा देखील मग संशोधनाचा विषय होईल.)

तर पिंगा ग्ग पोरी या गाण्यात सिनेमॅटीक लिबर्टी घेत पैसा कमवायच्या नादात पेशवेकालीन संस्कृतीची वाट लावली आहे असा ओरडा गेले दोन दिवस सगळीकडे दिसत आहे. उत्सुकतेने आज वेळ मिळताच मी हे गाणे यूट्यूबवर पाहिले. गाणे सुरू झाले आणि थोड्यावेळासाठी मी विसरून गेलो की मी नक्की कश्यासाठी हे गाणे बघायला आलोय. उत्कृष्ट कोरीओग्राफ केलेले गाणे, दोघींचेही लाजवाब दिसणे आणि तितकेच दिलखेचक नृत्य. सोबत संगीतही चांगले असल्याने गाण्याचा मी पुरेपूर आनंद उचलला. जर यातील पेशवेकालीन संदर्भ क्षणासाठी विसरून गेलो तर त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही, वाटूही नये.

त्यानंतर मग मी उठलेल्या वादाला अनुसरून पुन्हा एकदा ते गाणे पाहिले, पण तरीही काही ठिकाणी जशी टिका वाचून आलेलो की गाणे फार उत्तान झालेय तसे काही आढळले नाही. कदाचित प्रत्येकाचा उत्तानपणाचा बेंचमार्क वेगळा असावा किंवा टिका करणारा पेशवेकालीन संस्कृतीचा बेंचमार्क डोळ्यासमोर ठेवून बोलत असावा. आता त्या गाण्यातील साडी वा दागिने वगैरे त्या काळात मुळी असे घालायचेच नाहीत अश्या वादात मला रस नाही, पण काहीतरी वल्गर, असभ्य, असंस्कृत दाखवल्याच्या आवेशात जी टिका कुठेकुठे पाहिली त्यात तेवढेही तथ्य वाटले नाही.

मी माझे हे प्रामाणिक मत तितक्याच निरागसपणे एके ठिकाणी मांडताच मलाही त्यावर टिका झेलावी लागली. अर्थात कोणाच्या भावना कुठे दुखावतील हे आपण सांगू शकत नसल्याने त्या भावनांचा आदर ठेवत मी मनात कोणाबद्दल राग ठेवला नाही. तसेच कोणाला माझ्या मताचा राग आला असल्यास त्याबद्दल मी देखील क्षमस्व. कदाचित मी पेशवेकालीन संस्कृती आणि तेव्हाची नृत्यसंस्कृती याबद्दल अनभिज्ञ असेल असेही असू शकते. त्याकाळाचा विचार करता खरेच एखाद्याला ते संतापजनक वाटू शकते. मात्र आणखीही चार भिन्न प्रवृत्ती आणि विचारांच्या माणसांची मते जाणून घेऊया म्हणून हा विषय मायबोलीवर आणत आहे.

पिंगा ग्ग पोरी सारख्या गाण्यात किंवा पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ऐतिहासिक चित्रपटात सिनेमॅटीक लिबर्टी घेणे कितपत योग्य अयोग्य?
आणि एखाद्या दिग्दर्शकाने ती घेतलीच, तर पुढे काय?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेजस्विनी लोणारी नावाची मराठीतली ती अ‍ॅक्ट्रेस शोभेल अशा ऐतिहासिक विषयांच्या सिनेमात.
या आधी एक टि.व्ही सिरियल होती , जोधा अकबरचे सेट्स आणि ज्वेलरी वापरून बनवलेली, 'महारानी पद्मिनी का जोहार ' त्यात होती. मस्तं दिसायची!
image_64.jpgimage_65.jpg

देशातले सगळे प्रश्न सुटले वाटतं ?
( माफ करा उधार घेतलाय डायलॉक ! मागे कुणी वापरला लक्षात नाही. ज्याचा असेल त्याला श्रेय देण्यात येत आहे)

कडाडून विरोध करून हे सारे बंद पाडायचे >>> ???

महेश, ज्यांना खटकले त्यांनी बघू नये, जमेल तेथे टर उडवावी. बंद कशाला पाडायचे? ऑलरेडी प्रत्येक ऐतिहासिक व्यक्तींचे एकेक- मोस्टली स्वजातीय- गट झालेले आहेत त्यांच्याबद्दल "टोटल सर्वगुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्त्व, जगातील सर्वात भारी ऐतिहासिक व्यक्ती" याशिवाय काहीही कमी खपवून न घेणारे. 'पेशवे' अजून त्यात नाहीत. ते चांगलेच आहे.

असले दाखवण्याबद्दल राग येणे अगदी बरोबर आहे. पण बंद पाडणे, सरकारला हस्तक्षेप करायला लावणे हे दुसरे चुकीचे टोक आहे.

राग नक्कीच येतो.
शिकलेल्या आणि स्वतःला सुसंस्कृत समजणा-यांनी इतरांसमोर कुठली उदाहरणे ठेवायची ? शिवाजी महाराजांचा वापर करून झाला. त्या वेळीही वारंवार भावना दुखावत. आता सेना दूर गेली की महाराजांबद्दलच्या भावना दुखावण्याची ढाल करून या सिनेमासाठी वापरणे वगैरे हसू येण्याच्या पलिकडचं आहे. लोकांना आपणच चिथवायचं, आपणच त्यांच्या भावना दुखावण्याबद्दल टर उडवायची... आपल्याला कुणी सांगायला येतं का भावना दुखावण्याबद्दल ? दोन्हीकडून कसं जमेल ?

तरी देखील बंदी आणायची तर आणा. पण मग ऐतिहासिक पार्श्वभूमीवर किंवा पात्रावर लिहीलेल्या कथा कादंब-यांवर सुद्धा बंदी आणावी लागेल. त्यात काल्पनिक प्रसंग नाहीत कि काय ? कि खरा इतिहास आहे असा दावा आहे ?

श्रीमान योगी कादंबरीतील संवाद लेखकाला कुणी कानात येऊन सांगितले ? आणि ही कादंबरी घराघरात गेली.

ऋणम्या आणि मायबोलीकर...रॉबीनहूड यांनी टाकलेलं चित्र Lol

यहां इतना गदारोळ क्यू है भई ?

च्याकलेट खाल्ल्यावर आणि ते 'चढल्यावर ' सासू आणि सून रस्त्यावर येऊन कळावंतिणीसारक्या नाचत असतील तर , कदाचित काशीबाई आणि मसतानी 'पान ' खाल्ल्यावर नाचत सुटल्या असतील ! हाकानाका ....

च्याकलेट खाल्ल्यावर आणि ते 'चढल्यावर ' सासू आणि सून रस्त्यावर येऊन कळावंतिणीसारक्या नाचत असतील तर

>>

काही फेस्बुकी पोस्ट बघितल्यावर तर वाटले ... जाऊ द्या ...

राग तर फार आलाय . पण याला विरोध व्हावा , स्टे यावा हाच तर भंसाळीचा हेतू आहे ना Sad
मग लोक अस काय होत त्यात म्हणून जास्त बघायला जातील Sad

मलाही काल आधी वाटले होते की हे त्याला होणार्‍या विरोधातून मिळणार्‍या प्रसिद्धीकरता असेल, पण तशी शक्यता कमी आहे. पिक्चर्स, जाहिराती, सिरीयल्स, पेपर्स यामधून सतत हे जाणवते की मराठी वाचक्/प्रेक्षक यांचे कसलेही महत्त्व या लोकांच्या दृष्टीने नाही. सर्वसाधारण मराठी माणूस असले प्रकार, जाहिरातींमधले भाषांतरित निर्बुद्ध मराठी, धेडगुजरी भाषा ई प्रकार पाहतो, हसतो आणि सोडून देतो. वास्तविक महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातील व मराठी लोकांच्या मोठ्या समुदायाची परचेसिंग पॉवर महत्त्वाची असायला हवी, पण तसे चित्र दिसत नाही.

It's not that they want to insult us. They probably just don't care Happy

It's not that they want to insult us. They probably just don't care>>>>+१२३४५६७८९

It's not that they want to insult us. They probably just don't care स्मित >> +११

आता हे चांगल की वाईट माहित नाही

It's not that they want to insult us. They probably just don't care>>>>+१

भन्साळ्याने गेलाबाजार राउ मालिका तरी नजरेखालुन घालायची होती.

It's not that they want to insult us. They probably just don't care स्मित >> So you agree this was insulting?

चिखलफेक सुरू व्हायच्या आत आवरा.

भावना दुखावणे या बद्दल सर्वच समाजांचं प्रबोधन होणं अत्यंत गरजेचं आहे. त्या बाबत वस्तुस्थिती मांडली जावी. भन्साळीचा हा सिनेमा श्रीमान योगी, बाबासाहेब पुरंदरेंचं शिवचरित्र, मृत्युंजय , स्वामी, छावा, शहेनशहा या कादंब-यांप्रमाणेच ऐतिहासिक पार्श्वभूमीवर असलेला मनोरंजक सिनेमा आहे, तो इतिहास नाही किंवा बाजीरावाचे चरित्र नाही. या कादंब-या किंवा भन्साळीचा सिनेमा यांना इतिहास समजले जाईल अशी भीती असणा-यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही.

बाजीरावावर आजवर कुणीही सिनेमा बनवलेला नाही. मस्तानीवरही नाही बनवलेला. भन्साळी ने एव्हढ्या मोठ्या पटावर बनवलाय तर त्याचे आभार मानायचे राहीले बाजूला आणि खुस्पटं कसली काढायचीत ?

भंसाली ने हवा काढली. आता चित्रपट बघित्ल्यानंतर सर्वांनी आपापल्या तलवारी बाहेर काढाव्यात

It's not that they want to insult us. They probably just don't care स्मित >> So you agree this was insulting?
>> पॉईंट आहे पण हा शब्द खेळ वाटतो.
भन्सालीच्या नजरेतून पाहिले तर तो तिथे कोणाचा इन्सल्ट करायला किंवा कोणाचे गुणगाण गायला बसला नाही. तो पैसा कमावतोय हेच त्याच्या आजवरच्या कारकिर्दीवरून सिद्ध होते. हा हेतू ठेवून पिक्चर बनवताना तो कोणाच्या भावना दुखावण्याची पर्वा करतोय की नाही हा प्रश्न आहे. या बाबतीत तो ती पर्वा करत नाही कारण ज्यांच्या भावना दुखवायची शक्यता आहे त्या गटाचे उपद्रवमूल्य त्याच्यामते फार नाही.

असले दाखवण्याबद्दल राग येणे अगदी बरोबर आहे. पण बंद पाडणे, सरकारला हस्तक्षेप करायला लावणे हे दुसरे चुकीचे टोक आहे. >> +१

It's not that they want to insult us. They probably just don't care >>> १००% सहमत!! पण ह्याला कारणीभूत मराठी वाचक आणि प्रेक्षकच आहेत!! आपल्यालाच फिकिर नाही मग इतर कोणी कशाला फिकिर करेल??

भन्सालीच्या नजरेतून पाहिले तर तो तिथे कोणाचा इन्सल्ट करायला किंवा कोणाचे गुणगान गायला बसला नाही. तो पैसा कमावतोय >>> सहमत

>>ह्याला कारणीभूत मराठी वाचक आणि प्रेक्षकच आहेत!! आपल्यालाच फिकिर नाही मग इतर कोणी कशाला फिकिर करेल??
सहमत, मेली आहेत मराठी मने पानिपतावर Angry

मग लोक अस काय होत त्यात म्हणून जास्त बघायला जातील >>>>> हे भवितव्य मी कालच वर्तवल होत केदार, हेच्च होणारे. काल एका न्युजचॅनेलवर सुद्धा या गाण्यावर चर्चा चालु होती. भन्साळीने इतिहासाचा अज्जिबात अभ्यास न करता पिक्चर काढला आहे. कॉश्च्युमही गंडलाय. नाभीखाली नौवारी, अंगप्रत्यंगाच दर्शन घडवणारा पिन अप केलेला पदर __/\__ महान आहे..

लोकांबद्दल कशाला बोला पण इतकं काय खराब आहे हे पिंग गाणं बघू बरं म्हणत इथल्या कित्तींनी मुद्दाम जाऊन आवर्जुन गाणं पाहिलं असेल सांगा बरं Happy
धिस इज कॉल्ड अ‍ॅज पब्लिसिटी माय बॉय

रिया अजुन पिक्चर रिलीज व्हायचाय. काल आतल्या खोलीत असताना गाण्याचे शब्द ऐकु आल्यावर मी सुद्धा "बघु तरी काय दिवे लावलेत?" हा विचार करुन धावत आले गाण बघायला. डोळे दिपले ते गाण बघुन, कॉस्च्युम बघुन तर अजुनच गहिवरले..

उदात्त मनाच्या काशीबाई दाखवण्यासाठी त्यांनी पिंगा कशाला घालायला हवा? आणि ते ही मस्तानीबरोबर? तिला हळदिकुंकवाला बोलावुन साडी-चोळी देउन ओटी भरु शकतील की त्या.. पेशव्यांकना काय कमी होत?

भन्साळीला सिनेमा हिट्ट करायचाय, त्याने येन केन प्रकारे प्रसिद्धी करवुन घेतली. आता उत्सुकता म्हणून लोक जातील त्याचा त्याला फायदा.

कापोचे, प्रश्न खुसपट काढण्याचा नाहीये, तर जे वास्तवात घडलेलेच नाहीये त्याबद्दल आहे. त्या काळात बायका पडद्या आड राहुनच बोलायच्या. मग एकदम मनाचा मोठे पणा अशा पद्धतीने कश्या व्यक्त करतील? ते ही सवतीबरोबर?

मुग्धटली >> आपला कॉश्च्युम बद्दलचं मत पटलं

खाली दिलेला आनंदीबाई जोशींचा फोटो पहा १८८५ सालं चा आहे. माने वरचा भाग आणि कोपऱ्या पासून हाथ सोडले तर पायाचं नख सुद्धा दिसत नाहीये Wink

1.jpg
फोटो : आंतरजालावरून साभार

१८८५ साली हि कथा तर बाजीरावांच्या काळाबद्दल काही न बोलणे चा योग्य ठरेल

Pages