बाजीराव मस्तानी - पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ...

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 November, 2015 - 15:19

बाजीराव मस्तानी या संजय लीला भन्सालीच्या बहुचर्चित सिनेमांतील ‘पिंगा ग्ग पोरी’ हे गाणे नुकतेच यू ट्य़ूब वर झळकले.

इथे ते गाणे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=xz-Vac75to4

आणि बस्स यावरूनच फेसबूक, व्हॉटसप, आणि मराठी सोशलसाईटसवर वाद सुरू झाला.
(खरे तर बाजीराव पेशव्यांच्या भुमिकेसाठी AIB फेम रणवीर सिंगला घेतले तेव्हाच मला खटकले होते, पण ते एक असो)

मुळातच बाजीराव पेशवे हे त्यांच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असण्यापेक्षा बाजीराव मस्तानी या प्रेमप्रकरणासाठीच जास्त प्रसिद्ध. एकाअर्थी हे दुर्दैवीच. पण बरेचदा ईतिहासातील काही जोड्या अश्याच प्रसिद्ध होतात. उदाहरणार्थ, अकबर राजा काय कोण होता हे माहीत असायच्या आधीच आपल्याला तो “अकबर-बिरबल’ म्हणून समजतो. पुढे त्यावर चित्रपटही ‘जोधा-अकबर’ नावाने निघतो.

असो, या निमित्ताने का होईना, भले बाजीराव मस्तानी यांची प्रेमकथा ही केंद्रस्थानी असली तरी बाजीराव पेशव्यांचा ईतिहास चित्रपटाच्या सशक्त माध्यमातून जगभर पोहोचणार आहे. पण इथे एक प्रश्न उभा राहतो ते त्या ईतिहासाची चीरफाड तर होणार नाही ना. कारण ऐतिहासिक चित्रपट म्हणजे काही ‘देवदास’ नाही जे भन्साली सिनेमॅटीक लिबर्टी वापरून मूळ ईतिहासाशी फारकत घेणारी पटकथा लिहितील. आता हे असे झालेय की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. सेन्सॉरची परवानगी मिळाली म्हणजे त्यांच्यामते काही गैर नसावे. अर्थात सेन्सॉर हा मुद्दा लक्षात घेतात की नाही हा आणखी एक चर्चेचा विषय होईल कारण त्यासाठी त्यांना स्वत:ला ईतिहासाचा अभ्यास करावा लागेल आणि त्यातून खराखोटा ईतिहास शोधावा लागेल. जे हल्ली फार कठीण काम झालेय.

तर आता पिंगा ग्ग गाण्याकडे वळूया,

देवदासमध्ये पारो आणि चंद्रमुखी एकत्र नाचताना दाखवल्या होत्या. डोला रे डोला गाणे हिट झाले होते. या गाण्याचा फायदा चित्रपट चर्चेत आणायला आणि हिट करायला झाला. बस्स पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला वापरत भन्सालींनी यात ‘मस्तानी आणि काशीबाई’ यांचे एकत्रित नृत्य ठेवले आहे. बहुधा इतिहासात अश्या नाचाचा संदर्भ असावा असे वाटत नाही. त्यामुळे नक्कीच हे सिनेमेटिक लिबर्टीमध्येच येते. सिनेमा डॉक्युमेंटरी सारखा बनवण्यापेक्षा प्रमोशनसाठी असे एखादे गाणे बनवून त्यात कमर्शिअल फॅक्टर जोडल्यास तो सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, पर्यायाने बाजीराव पेशव्यांचा ईतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, असा विचार केल्यास यात फारसे काही चुकीचे वाटत नाही. (आता चित्रपट बनवणार्‍यांचा हेतू ईतिहास सर्वदूर पोहोचवणे आहे की पैसा कमावणे आहे हे तुर्तास बाजूला ठेऊ. कारण चित्रपट बघायला येणारे प्रेक्षकही ईतिहास बघायला येणार आहेत की प्रियांका, दिपिका आणि भव्यदिव्य सेटस बघायला, हा देखील मग संशोधनाचा विषय होईल.)

तर पिंगा ग्ग पोरी या गाण्यात सिनेमॅटीक लिबर्टी घेत पैसा कमवायच्या नादात पेशवेकालीन संस्कृतीची वाट लावली आहे असा ओरडा गेले दोन दिवस सगळीकडे दिसत आहे. उत्सुकतेने आज वेळ मिळताच मी हे गाणे यूट्यूबवर पाहिले. गाणे सुरू झाले आणि थोड्यावेळासाठी मी विसरून गेलो की मी नक्की कश्यासाठी हे गाणे बघायला आलोय. उत्कृष्ट कोरीओग्राफ केलेले गाणे, दोघींचेही लाजवाब दिसणे आणि तितकेच दिलखेचक नृत्य. सोबत संगीतही चांगले असल्याने गाण्याचा मी पुरेपूर आनंद उचलला. जर यातील पेशवेकालीन संदर्भ क्षणासाठी विसरून गेलो तर त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही, वाटूही नये.

त्यानंतर मग मी उठलेल्या वादाला अनुसरून पुन्हा एकदा ते गाणे पाहिले, पण तरीही काही ठिकाणी जशी टिका वाचून आलेलो की गाणे फार उत्तान झालेय तसे काही आढळले नाही. कदाचित प्रत्येकाचा उत्तानपणाचा बेंचमार्क वेगळा असावा किंवा टिका करणारा पेशवेकालीन संस्कृतीचा बेंचमार्क डोळ्यासमोर ठेवून बोलत असावा. आता त्या गाण्यातील साडी वा दागिने वगैरे त्या काळात मुळी असे घालायचेच नाहीत अश्या वादात मला रस नाही, पण काहीतरी वल्गर, असभ्य, असंस्कृत दाखवल्याच्या आवेशात जी टिका कुठेकुठे पाहिली त्यात तेवढेही तथ्य वाटले नाही.

मी माझे हे प्रामाणिक मत तितक्याच निरागसपणे एके ठिकाणी मांडताच मलाही त्यावर टिका झेलावी लागली. अर्थात कोणाच्या भावना कुठे दुखावतील हे आपण सांगू शकत नसल्याने त्या भावनांचा आदर ठेवत मी मनात कोणाबद्दल राग ठेवला नाही. तसेच कोणाला माझ्या मताचा राग आला असल्यास त्याबद्दल मी देखील क्षमस्व. कदाचित मी पेशवेकालीन संस्कृती आणि तेव्हाची नृत्यसंस्कृती याबद्दल अनभिज्ञ असेल असेही असू शकते. त्याकाळाचा विचार करता खरेच एखाद्याला ते संतापजनक वाटू शकते. मात्र आणखीही चार भिन्न प्रवृत्ती आणि विचारांच्या माणसांची मते जाणून घेऊया म्हणून हा विषय मायबोलीवर आणत आहे.

पिंगा ग्ग पोरी सारख्या गाण्यात किंवा पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ऐतिहासिक चित्रपटात सिनेमॅटीक लिबर्टी घेणे कितपत योग्य अयोग्य?
आणि एखाद्या दिग्दर्शकाने ती घेतलीच, तर पुढे काय?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेशव्यांचे वंशज 'उदयसिंह पेशवे' यांनी पिंगा गाण्यावर आक्षेप घेतलाय. ते चित्रपटातून काढून टाका नाहीतर कायदेशीर कारवाई करणार. टीव्ही ९ ला दाखवत आहेत.

अभिव्यक्ती स्वातंत्र म्हणून जर कमाल अमरोहीने हेमा मालिनीला रजिया सुलतान मधे नाचवली असती तर चालल असत का???
तरी बर तेव्हा फक्त दुरदर्शनच होत आणि शोभा डे, कुमार सप्तर्षी, अरुन्धती रॉय वगैरे नुसतेच होते.
नाहीतर दंगल करून गावं जाळण्याची फुल्ल संधी देणारा एक ऐतिहासिक सिन त्यात होता.

काशीबाईंनाही नाचवले का भन्सालिने शब्बास.....

खरेतर पेशव्याच्या लढायांवर चित्रपट काढायला हवा होता पण भन्सालिने त्याच्या बाहेरख्यालिपणावर चित्रपट काढलाय हे चुकीचे वाटते.

मस्तानी हा राउंचा बाहेरख्यालीपणा नव्हता. शब्द जपुन वापरा.

मस्तानी हा राउंचा बाहेरख्यालीपणा नव्हता. शब्द जपुन वापरा.

सचिन पगारे,
कृपया पेशवाईतल्या सामाजिक जीवनाबद्दल थोडी माहिती करून घ्या. अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, ना. गो. चापेकरांचं 'पेशवाईच्या सावलीत'. वा. कृ. भाव्यांचं पुस्तकही उत्तम आहे.

चिनुक्स, नक्किच वाचेल.

परंतु त्या काळात बहुपत्नित्वाची चाल असली तरी धर्मबाह्य विवाह हा निषिध्द मानला जात असे.

आता सिनेमाचा ट्रेलर बघितला, सगळच मॅग्नम करायच्या नादात बर्‍याच गोष्टी चक्क बदलौन टाकल्यात, हा मराठा विराचा पिक्चर न वाटता मुगले आझम पार्ट २ वाटतोय..कॉस्ट्युमस फक्त बाजिरावचे त्यातल्या त्यात बरे आहेत, रणविर बराच आश्वासकही वाटतोय, शनिवारवाडा असा काय दाखवलाय, तो एखादा मोगलाई दरबार वाटतोय, काशि बाईची साड्या नेसायची पद्धत,खोपा घालताना केसाच वळण चुकलय,अनेक डिटेलिन्ग गन्डलेत, साड्या,दागिने तर मेजर डिसअपॉइन्टेमेन्ट वाटतेय,
सिनेमॅटिक लिबर्टी!! ह!

>>सेनापती... | 19 November, 2015 - 09:19
शिवाजीच्या ७ च बायका का बरे? १६५९ नंतरचा डान्स असणार आहे का?<<

सेनापती - काय शब्द वापरले आहेत, तुमची सारासार बुद्धी ठिकाणावर आहे का? Angry

अहो राज,

मागे उल्लेख निघाला त्यावर उपहासात्मक प्रतिक्रिया दिली आहे ती. शिवाय त्यात आकड़ा देखील चुकला म्हणून तसे विचारले आहे. इतके भडकू नका.

>>इतके भडकू नका.<<

सेनापती - मराठ्यांच्या इतिहासाचा तुमचा अभ्यास आहे, लेखन सुद्धा केलेलं आहे; तरी सुद्धा महाराजांविषयी इतक्या खालच्या पातळीवर केलेली उपहासात्मक टीका चीड आणणारीच आहे.

पगारेंचं ठीक आहे, त्यांचा अभ्यास तोकडा प्डतो म्हणुन डोळेझाक करता येते; तुमच्या कडुन हि अपेक्षा नव्हती...

सेनापति, मुकूट मस्त फिरवताय.सांगा कि राव काय चांगले होते त्या संबंधात...

पगारे नेहरु घराण्यााचा इतिहास सोडून बाकीचेही वाचत जावा.....

बाहेरख्यालाीपणाच्या बरोब्बर विरोधात जाणारे हे नाते होते. त्याकाळचा दांभिक समाज बाजीरावांच्या मस्तानीबरोबरच्या संबंधाना खपवून घेत होता. पण त्याच स्त्रीला बाजीरावांनी पत्नीचा दर्जा देणे त्यांना मान्य नव्हते. आणि सगळा विरोध हा त्यासाठी होता.
बाजीरांवांनी सर्वसामान्य कलावंतणीसारखी मस्तानीबरोबर संबध ठेऊन विषय संपवला असता तर त्याची कुठेच चर्चा झाली नसती पण तसे न करत सर्व समाजाच्या नाकावर टिच्चून बाजीरावांनी तीला शनिवारवाड्यात आणली आणि पत्नीचा दर्जा दिला. म्हणूनच ही प्रेमकहाणी अविस्मरिणय ठरते.

पण तो धर्मबाह्यपणा झाला ना.दुसर्या कुणि त्या काळात असे केले असते तर समाजाने त्याचे लचके तोडले असते.पण सत्ता नि सामर्थ्य असलेल्या व्यक्ति ह्या समाजाला फाट्यावर मारतात आजच्या काळातही हे दिसुन येते.नियम हे फक्त दुर्बळांसाठि असतात एखादा धनदांडगा सत्ता नि संपत्तिच्या जोरावर सारे नियम पायदळी तुडवतो. नि दुर्बळ समाज भितीने त्याचेही स्पष्टिकरण शोधुन आरत्या ओवाळत राहतो.

लचके त्यांचेही तोडले गेलेच की. पेशवे होते म्हणून काय फार मुभा दिली गेली नव्हती. घरच्या व्यक्तींपासून ते भट भटजींपर्यंत सगळ्यांनी टीकेची झोड उठवली, दोघांना वेगळे केले, मस्तानीवर मारेकरी घातले, तिला रातोरात शनिवारवाड्यातून बाहेर जावे लागले, आणि बाजीरांवाच्या मृत्युसमयी ती बंदीवासात होती.

पेशवे असूनही इतके झाले. आजचे धनदांडग्यांची तुलना बाजीरांवाशी करू नका...नुसताच घराण्याचा वारसा घेऊन कर्तुत्वशून्य असूनही प्रमुखपदी नेमणूक झाली नव्हती. त्यांच्या पराक्रमाचा दाखले अाजही दिले जातात त्यामुळे आरत्या ओवाळायच्या तर त्या किमान पात्र व्यक्तीच्या ओवाळल्या जात आहेत यात समाधान आहे.

अहो राज,
मी काही टिका वगैरे केलेली नाहिये आणि राजांवर तर मुळीच केलेली नाहिये. शिवाजीवर चित्रपट आला तर भंसाली त्यात ७ राण्याचा नाच ठेवेल असे कोणीतरी वर लिहिले त्याला मी प्रतिसाद दिलेला. ह्यात काही खालच्या पातळीवरची टिका नाहिये. तरीही तुम्हाला राग आला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

पगारे, धर्मबाह्यपणा आणि बाहेरख्यालीपणा हे दोन वेगवेगळे आणि वेगवेगळ्या अर्थाचे शब्द आहेत.

पगारे,
तुमच्या वक्तव्यावर तुम्हाला प्रश्न केला कि तुम्ही प्रतिप्रश्न करता मात्र उत्तर देणे टाळता. तेंव्हा मी देखील उत्तर देणार नाहिये. तसेही आशुने वर लिहिले आहेच.

अभ्यासाकरिता शुभेच्छा...

अहो आशुचँप लढाया करणारे तर बरेच होते.इंग्रज तर सातासमुद्रापार आपल्या कर्तुत्वाचा डंका फिरवित होते. बाजिराव शुर होता असेल पण त्याने जनतेसाठि काय केले यावर, समाजाच्या भल्यासाठी काय केले यावर, अस्प्रुश्यतेची रुढी दुर करण्यासाठी केलेले प्रयत्न,जनतेला शिक्षण देण्यासाठी त्याची तळमळ, आरोग्याबाबतचे प्रश्न ह्याबाबत चित्रपट काढला गेला असता तर ते योग्य ठरले असते.

त्याचे काय आहे पगारे तुम्हाला काहीही सांगितले तरी तुम्ही अजून काहीतरी खुसपट काढणार.....
बाजीराव जात पात फारशी मानत नव्हते, सरदारांच्या, लष्करी जवानांच्या मांडीला मांडी लाऊन भाकर तुकडा खात होते. त्याकाळचा समाज लक्षात घेता हे ब्राह्मण व्यक्तीने तेही इतक्या मोठ्या पदावरच्या हे फारच न पटण्यासारखे होते. पण पेशव्यांनी त्याची तमा केली नाही. त्यांनी जाती पातीचा भेदभाव न करत कर्तृत्ववान लोकांना पुढे आणले.

पण ते काळ लढाईच्या धामधुमीचा होता. त्यामुळे प्रजेच्या समृद्धीपेक्षा त्यांची सुरक्षीतता त्या काळात महत्वाची होती. त्यामुळे उगा त्यांनी शिक्षण का नाही दिले, विधवा विवाह का नाही घडवून आणले, असले काहीतरी बोगस विचारू नका....

इथे लिहीण्यापुर्वी लिहीलेले एकदा पुन्हा एकदा वाचत चला. की आपण किमान माहीती न घेता इथे बोलणे योग्य आहे का....

पण तुम्हाला काय बोलणार.....चालू द्या तुमचे....मी आता अजून डोके आपटणार नाही.

सुरक्षिततेपुढे जनतेचे दूसरे मोठे भले नव्हते. ते काम बाजीराव आणि त्याआधी शिवाजी करत होता. हेच एक सर्वात मोठे कार्य होते.

त्याने जनतेसाठि काय केले यावर, समाजाच्या भल्यासाठी काय केले यावर, अस्प्रुश्यतेची रुढी दुर करण्यासाठी केलेले प्रयत्न,जनतेला शिक्षण देण्यासाठी त्याची तळमळ, आरोग्याबाबतचे प्रश्न

ह्यावर ठरवायचे असेल तर शिवाजी संभाजी देखील शुरवीर नव्हते असे म्हणावे लागेल.

. बाजिराव शुर होता असेल पण त्याने जनतेसाठि काय केले यावर, समाजाच्या भल्यासाठी काय केले यावर, अस्प्रुश्यतेची रुढी दुर करण्यासाठी केलेले प्रयत्न,जनतेला शिक्षण देण्यासाठी त्याची तळमळ, आरोग्याबाबतचे प्रश्न ह्याबाबत चित्रपट काढला गेला असता तर ते योग्य ठरले असते.>>> भन्साली त्याच्या पैशानं पिक्चर काढतोय. काय दाखवायचं ते तो ठरवेल. तुम्हाला हवं असेल तसा पिक्चर तुम्ही काढा की. कुणी नको म्हटलंय. बघयाह्चा नसेल तर बघू नका, सिम्पल.

Pages